Skip to main content

वावर

नव्या वर्षाची हीच जिंगळ.....

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 07/01/2011 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
अंगळ मंगळ टंगळ चंगळ शनीवारात येता चम्बळ फुफाट्यातला फाटका फटाका मोजून सटका. चालुनी चालुनी ;चप्पल दमली घालु जाता अंगठा तुटका येता ध्वनी फीमेल कानी. क्यूमेल होऊनी काया फुलते. हलते डूलते निर्लज्ज लाजते अंगळ मंगळ टंगळ चंगळ चेहेरा मात्र अम्मळ अमंगळ नव्या वर्षाची हीच जिंगळ घेऊनी सज्ज मद्यमंडळ खळ्ळ खळ्ळ खॅट्याक खळ्ळ खॅट्याक खळ्ळ खॅट्याक खळ्ळ दादोजींचा दुर्दम्य दंगा , औरंगनगरी थेट पंगा अशोकाची निष्पर्ण छाया बारामतीत जाई वाया विलासातले सुशील सारे नारायणाच्या शीडात वारे. दंगा घाला पिंगा घाला हातात हात ..हळू चाला नव्या वर्षाची हीच जिंगळ घेऊनी सज्ज मद्यमंडळ खळ्ळ खळ्ळ खॅट्याक खळ्ळ खॅट्याक खळ्ळ खॅट्य

तात्या अभ्यंकरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभकामना !

लेखक नीलकांत यांनी रविवार, 02/01/2011 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो ,
Tatya
आज आपल्या मिसळपावचे संस्थापक श्री तात्या अभ्यंकर यांचा वाढदिवस आहे. मिसळपाव उभारणीत आणि ते एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकप्रिय करण्यात तात्यांचा सिंहाचा वाटा आहे. मिसळपावच्या तात्या अभ्यंकरांना मिसळपावच्या सर्व सदस्यांतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभकामना.

हैप्पी ३१ स्ट

लेखक विनायक बेलापुरे यांनी शुक्रवार, 31/12/2010 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
दारु की खुश्बू गुटके की मिठास गांजे की महेक और चरस का स्वाद भांग के पकोडे और विल्स का प्यार मुबारक हो आपको बेवडों का त्योहार हैप्पी ३१ स्ट (एका समस वरुन साभार)

नव्या वर्षांच्या शुभेच्छा

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 31/12/2010 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रानो. दरवर्षी नेमाने येणारा क्षण आज पुन्हा येतोय या वर्षाला निरोप देवून नव्या वर्षात प्रवेश कराण्याचा क्षण. नवी नवरी माहेराहून सासरी जाताना तिच्या मनात असते तशी हुरहुर आणि आनन्द अशा सम्मिश्र भवना घेवून आपण हे क्षण जगत असतो. सरत्या वर्षात काय गमावले /काय कमावले याचे जमाखर्च मांडत आपण नव्या वर्षात काय करणार याचे मनसुबे रचत असतो. लहानपणी १ जानेवारीला मी गेल्या वर्षी झोपलो ते एकदम थेट्या वर्षीच उठलो असे सांगायचो. ते खरे देखील होते. ३१ दिसेंबरला टीव्हीवर फारतर रात्री ११ पर्यन्त कार्यक्रम असायचे. गावात एखादा गाण्याचा कार्यक्रम वगैरे असायचा. ३१ डिसेंबर हा इवेन्ट झालेला नव्हता.

३१ डिसेंबर : मदत : हॉली-डे रिसॉर्ट ( माहिती )

लेखक छोटा डॉन यांनी मंगळवार, 21/12/2010 14:04 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो, मागच्या काही दिवसात खादाडीच्या चर्चेत जे भरभरुन प्रतिसाद आले तेच पाहुन ( असो, पण टीआरपीचा आम्हाला मोह नाही ) ही चर्चा टाकण्याचे धाडस करतो आहे. विषय : पुण्यापासुन ५०-६० किमी अंतरापर्यंत असणारे एखादी हॉलिडे रिसॉटची माहिती सांगणे अंदाजे ८-९ लोकांसाठी बजेट : नो बार ! अपेक्षा ( कमीत कमी ) : १. शहरापासुन, गर्दीपासुन, गोंगाटापासुन दु ऽऽऽऽऽ र असावे २. जंगलात, तळ्याच्या काठाशी ( मराठीत : लेक नियर ) किंवा हिल-स्टेशनवर असलेले चालेल. ३. रहाण्यास एकच मोठ्ठी डॉर्मेट्री वगैरे असलेलेच रिसॉर्टच हवे. ४. २४ तास रुम सर्व्हिस असणे अपेक्षित आहे ५.

महाराष्ट्र दर्शन - भाग ५/ "अजिंठा"

लेखक स्पा यांनी सोमवार, 06/12/2010 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ - http://www.misalpav.com/node/15474 भाग २ - http://www.misalpav.com/node/15500 भाग ३ - http://www.misalpav.com/node/15529 भाग ४ - http://www.misalpav.com/node/15586 आज औरंगाबाद मधला शेवटचा दिवस , सुट्टीचे ४,५ दिवस कसे गेले समजलेच नाही..... भरभरून पाहून घेतलं, महाराष्ट्रात इतकं सौंदर्य असताना लोक लाखो रुपये खर्च करून परदेशात कशाला झंक मारायला जातात देव जाणे, आधी आपलं राज्य बघा , देश बघा, आणि नं

सदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे.

लेखक नीलकांत यांनी रविवार, 05/12/2010 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मिसळपाव सुरू होऊन तीनाहून अधिक वर्षे झाली आहेत. या दरम्यान अनेक वादळे येऊन गेली. मिसळपावचे स्वरूप मोकळे ढाकळे असावे. लोकांना येथे येणे आणि लिहीने सोपे व्हावे म्हणून कमीत कमी नियम आणि बंधणे ठेवून या संकेतस्थळाची सुरूवात तात्यांनी केली होती. संकेतस्थळाच्या संपुर्ण बांधणीत मी होतो. तेव्हा पासून ते मिसळपावचे सर्व नियंत्रण सांभाळण्यापर्यंत मी मिसळपाव वाढावं आणि अधिकाधिक लोकांना ते आपलं वाटावं म्हणून प्रयत्न करत आलेलो आहे. सुरूवातीच्या काळात मी लिहायचो. मग मिसळपाववर अधिकाधिक सोई उपलब्ध करून देणे आणि नंतर सदस्यांच्या अडचणी सोडवणे यात जास्त वेळ देऊ लागलो.

नमस्कार समस्त मिपाकर!!!

लेखक अनिरुद्ध उर्फ अन्या यांनी मंगळवार, 30/11/2010 13:58 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार समस्त मिपाकर!!! मी अनिरुद्ध उर्फ अन्या... गेले १ वर्ष मिसळपाव चा सदस्य आहे पण फक्त वाचनापुरताच!!! ह्या मिसळपाव मुळेच वाचनाची आवड अजुन वाढली. लिखाण जमेल असे वाटत नाहि, त्या मुळे सध्या तरी एवढेच!!! सर्व मिपाकराना नविन लिखाणासाठी शुभेच्छ्या!!! लिखाणातील चुका माफ कराव्यात!!! ~अनिरुद्ध उर्फ अन्या!!!

आमचा पाव - एक गाव

लेखक यकु यांनी सोमवार, 29/11/2010 08:11 या दिवशी प्रकाशित केले.
पावात यायचं म्हणजे हा एक ताप असतो. म्हणजे इथं आलं की लवकर परत जावं वाटत नाही. तास उलटतात, दुपार होते. डबा खाऊन होतो, चारचा चहासुध्दा होतो आणि हळूहळू दिवस कलून दिवेही झगमगू लागतात. तरी पावातले सोहळे काही संपत नाहीत. अगदी रातच्या साडेतीन वाजताही एखादा पावकरी दूरवर पसरलेल्या नदीत अगदी संथपणे होडीत बसून माशांचे जाळे उसवत असावा तसा दिसून येतो. काही लोक थांबावं की जावं? थोडावेळ थांबूच, नको, नको गेलेलंच बरं म्हणून डुबी मारतात, आणि आणखी पाचदहा मिनीटात श्वास कोंडला की पुन्हा एकदा डोकं वर काढतात!