साफसफाई एक समृद्ध प्रयत्न
घरातील अडगळ झटकताना उडालेली सुवर्णधूळ, झगमगून
टाकत खिडकीपुढला आसमंत, गुदमरवून
टाकत फुप्फुसाकाश, कोंडला
अनंत प्राचीन श्वास, ढकलत कासावीस प्राण.
सूर्यशक्तीचे तेजान्न घेऊन
उधळणारी हिरण्यधूळ, विखुरते
घनमेघांकृतीतून
होऊदे तुझा तेजोभंग येताच
कल्लोळ्हुंकार व्हॅक्यूम क्लीनरचा.
हे वेड्या व्हॅक्यूमक्लीनरा,
सुवर्णधूळरूपी अन्न घराच्या कानाकोपर्यामध्ये विखुरले आहे,
ते तुला खाता येत नाही, कारण
आता वीज गेली आहे.
--लिखाळचंद्र
काव्यरस
मिसळपाव