मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शुद्धलेखन

नको तो रविवार !!

वडापाव ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
चौथे चिमणराव ह्या चिं. वि. जोशींच्या पुस्तकात चिमणरावांना रविवार हा कधीच सुखाचा सुवर्णदिन वाटला नाही. त्यावरुन रविवारला हल्लीच्या शाळेतल्या एखाद्या विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून नावे ठेवण्याची मला कल्पना आली. ती पुढीलप्रमाणे मांडत आहे - मौजेचे सहस्रावधी क्षण वाटते असतील विलक्षण व्यर्थ जातात पण तोचि रविवार म्हणावा थोडक्यात काय, सुट्टी मिळते, पण फुकट जाते. शनिवारी शाळेतून प्रचंड गृहपाठ मिळालेला असतो. तो रविवारावर ढकलण्यात येतो. शनिवारीच काय ती मौजमजा!

मनाच्या कुपितले-जर्नल

विनायक पाचलग ·
मनाच्या कुपीतले या सदरातला हा सलग बारावा लेख. हे सर्व लेख तुम्ही इथेही वाचु शकता
जर्नल
हाय लोकानो काय चालु हाय ,अहो मला ओळखले नाहीत का! हा कसे ओळखणार म्हणा, तुम्हा सगळ्यांची शिक्षण होवुन लय दीवस झाले, आणि त्या काळात आमच्या भावंडानी तुम्हाला लय पीडलेला मग तुम्ही मला कसे ओळखाल. बाकी म्या जर्नल आणि माझा मालक म्हणजे ह्यो विन्या टारगट मी आपला त्याचा पामर .ए कोण ते म्हणले रे टॅब बंद करतो त्या विन्या मुर्खाचा नवा निबंध कशाला वाचत बसु,गप्प बस आज म्या बडबडणार आहे.

आनंदाची बातमी..! :)

विसोबा खेचर ·
एक निवेदन... कळवण्यास अत्यंत आनंद होतो आहे की मिपावर शुद्धलेखन विषयक लेखांवरील, चर्चांवरील बंदी आता उठवण्यात आली असून मिपावर एक शुद्धीचिकित्सक विभाग सुरू करण्यात आला आहे.. :) माननीय मिपाकर सतिशराव हे या विभागाचे प्रमूख असतील व तात्या त्यांच्या हाताखाली त्या विभागातील एक दुय्यम क्लार्क म्हणून काम पाहील! :) सतिशरावांनी प्राणिपात कोटि कोट आणि मोकलाया दाहि दिश्या या दोन कविता मिपावर लिहून तात्याच्या कानफटात मारली आहे आणि शुद्धलेखन विषयक झणझणीत अंजन समस्त मिपाकरांच्या डोळ्यात घातले आहे.

मराठी टायपि॑गसाठी मद्त

जयेश माधव ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आपण मि.पा.वर ज्याप्रमाणे मराठी टाइप करतो त्याच प्रकारे माक्रोसॉफ्ट वर्ड,पॉवर पॉइ॑ट्,फोटोशॉप मध्ये टाइप करु शकतो का? पा॑पारिक पध्दत खुपच क्लीस्ट वाट्ते.कोणी काही सुचवु शकतो का? जयेश माधव

मिपा ओळख २

चेतन ·
प्रसंग दुसरा : मिपाचे सदस्य होउन पंधरा एक दिवस झालेत. भाउ पंधरा दिवस झाले बघ तु सांगितलेले आणि न सांगितलेलं सगळ येड्**सारखं वाचुन काढलं. आता मी पण काहितरी लिहाव म्हणतोय. बहुतेक हा मिपावरचा दुसरा गटणे होणार वाटतं तरी बरं पंधरा दिवसात यानि काही चर्चाप्रस्ताव टाकले नाहित. काय म्हणालास? नाही काही नाही हे आपलं खुदं के साथ बातां. हे ही मिपावरुनच ढापलेलं बर का मी आपला पी.जे केल्याच्या थाटात म्हणालो. तर हा हिरो तेव्ह्ढ्याच थंड्पणे म्हणतो कसा दादा मिपावर दुसरर्‍याचं लिखाण प्रसिद्ध करायला परवानगी नाही आहे माहिते ना!

मिपा ओळख

चेतन ·
लेखनप्रकार
प्रसंगः एक नविन मराठी माणसाला मिपाबद्दल सांगताना पुलंनी ज्यांच्यापुढे करं जोडावेत अशी महाराष्ट्रातील तीन गावं सांगितली. त्यानंतर असेच कर जोडण्यासारखे एक गाव म्हणजे मिपा. येथे (---^---) असे काहितरी कर जोडावे लागतात. तशी इतरही अनेक संस्थळ आहेत पण पुलंच्या भाषेतच सांगायचे तर ज्यांच्यपुढे करं जोडावे असे फक्त मिपाच त्याची सर इतरांना नाही. इथल्या माणसांची नावेदेखील गावचा, साहित्याचा बाज असणारि अर्थात काही अपवाद म्हणून ढोले पाटिल पॅरडाइस् सारखी इंग्रजाळलेली ब्रिटिश टिंग्या सारखी नावं पण आहेत.

"ल "या अक्षराचे वळण असे करता येईल ?

तळेकर ·
"ल "या अक्षराचे वळण असे करता येईल ? lalaa शक्य असेल तर जरुर करा. आणि ते आमच्या संगणकात कसे करता येईल तेही सांगा.

अतिदीर्घ बोधकथा (संपूर्ण काल्पनिक)

आजानुकर्ण ·
ही कथा खरे तर नेहमीच्या स्टँडर्डप्रमाणे लघुकथा आहे. मात्र काही आधुनिक कथांशी तुलना करता तिला कादंबरी किंवा अतिदीर्घ कथा म्हणणे योग्य ठरेल. शिवाय नारदमुनी वगळता सर्व कथापात्रे (म्हणजे उरलेले एक) काल्पनिक. नेहमीप्रमाणे पगाराचा करमुक्त भाग असणारा लीव्ह ट्रॅव्हल अलाउंस क्लेम करण्यासाठी रजा घेऊन नारदमुनी पृथ्वीवर आले (अन्यथा त्या पैशावर त्यांना कर भरावा लागला असता.) मंडळी करांविषयी नंतर कधीतरी. मिसळपाववरच! पृथ्वीवर त्यांना एक गोंडस डुक्कर दिसले. काय त्याचे सौंदर्य वर्णावे महाराजा.