Skip to main content

'द किंग'

लेखक प्रास यांनी मंगळवार, 25/01/2011 21:03 या दिवशी प्रकाशित केले.
१९५० चा काळ, अमेरिकेत ज्याकाळात वर्णद्वेष ब~यापैकी वास्तव होते तेव्हा मिश्रवस्ती असलेल्या 'मेम्फिस' शहरामध्ये एक गौरवर्णीय मुलगा खूपदा कृष्णवर्णीयांच्या मौजेच्या ठिकाणी दिसायचा. त्यांच्या म्युझिक क्लब्स मध्ये जायचा, गाण्यांच्या कार्यक्रमात जायचा, इतकंच नाही तर गौरवर्णीयांच्या क्लब्समध्येही 'ज्यूकबॉक्स'मध्ये '~हिदम एन ब्लूज', 'गोस्पेल' आणि 'स्पिरिच्युअल' प्रकारची गाणी ऐकायचा. एरवीही रेडिओला चिकटण त्याला नवीन नव्हत.

शबद गुरबानी

लेखक अरुंधती यांनी मंगळवार, 25/01/2011 18:44 या दिवशी प्रकाशित केले.
काही वर्षांपूर्वी एका पंजाबी स्नेह्यांच्या घरी झालेल्या कार्यक्रमात मी 'मेहरावालेया साइयां रक्खी चरनां दे कोल' हे मला तेव्हा येत असलेले एकमेव पंजाबी भक्तिगीत गायले अन् त्या स्नेह्यांनी खूश होऊन लगेच त्यांच्याकडील उत्तमोत्तम पंजाबी गीतांची कॅसेटच मला भेट म्हणून दिली! शिवाय त्यांच्याकडे असलेले एक पुस्तकही चाळायला दिले. पंजाबी भाषेतील गाण्यांशी माझा तो पहिलाच परिचय! त्या अगोदर हिंदी चित्रपटांच्या काही गाण्यांमधून या भाषेची गोडी जाणवली होती. पण आता ती गाणी नियमित ऐकू लागल्यावर त्यांच्यातील रसमाधुर्य अजूनच आल्हाद देऊ लागले.

काका हलवायाकडची जिलबी..

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 24/01/2011 20:21 या दिवशी प्रकाशित केले.
परंतु आज नीलकांताने मुखपृष्ठावर, आज काही काळ मिसळपाववर भीमसेनांच्याच संबंधी धागे यावेत आणि ज्यांना ज्यांना त्यांच्या विषयी लिहायचे असेल त्यांनी तसे लिहावे असं म्हटल्यामुळे लिहायला बसलो आहे, परंतु खरं तर काहीच लिहायला सुचत नाही..सारा दिवस कसाबसा गेला परंतु आता रात्र मात्र अंगावर येऊ पाहाते आहे. अक्षरश: ओक्साबोक्षी रडावसं वाटत आहे, पण धड रडूही येत नाही. गेल्या दोनचार दिसापूर्वी मीच त्यांच्याकरता मारे विमान वगैरे मागवलं होतं, अर्थात त्यांचा त्रास, अंथरुणातल्या हालअपेष्टा संपाव्यात म्हणून. परंतु वास्तव इतकं सोपं नसतं.

देव नाही देवालयी

लेखक रमताराम यांनी सोमवार, 24/01/2011 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्याच्या दक्षिणेकडे असलेल्या सिंहगडाकडून एकच रस्ता शहराकडे येतो. शहरात येताना आम्हाला हाच रस्ता घ्यावा लागतो. पण शहरात येताना दत्तवाडीपासून सरळ दांडेकर पुलाकडे न जाता आम्ही नेहमी आत वळतो, नि तेथील कॉलनी नर्सिंग होम जवळच्या लहान रस्त्याने पुढे जातो. हा जो थोडा दूरचा रस्ता आम्ही घेतो त्याला एक कारण आहे. या आतल्या रस्त्याला एक देवालय आहे. जाताजाता त्या देवालयातील देवाचे - ओझरते का होईना - दर्शन घडावे म्हणून. गेले चार वर्ष मात्र या देवाचे दर्शन दुर्मिळच झाले होते. असे म्हणतात की तुमच्या आमच्या पापांचे हलाहल पचवणार्‍या देवालाही कधी कधी ते भोवतेच नि त्यालाही काही त्रास सहन करावाच लागतो.

देवा, येऊ देत आता अजून एक विमान...!

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 16/01/2011 17:13 या दिवशी प्रकाशित केले.
देवा परमेश्वरा, आज सकाळीच ते अत्यवस्थ असल्याची बातमी कानावर आली..! देवा, आता पुरे झालं. ने त्यांना आता तुझ्या घरी. अगदी शांतपणे, त्रास न होता डोळे मिटू देत..! ते वयोवृद्ध आहेत, गलितगात्र आहेत, खूप आजारी आहेत. गेल्या बर्‍याच काळापासून अक्षरश: अंथरुणातच आहेत. माझ्यासारखे त्यांचे सामन्य भक्त, प्रशंसक, सगेसोयरे, हितचिंतक सारे त्यांच्या भोवती आहेत रे, पण तरीही ते मात्र पूर्णत: परावलंबी आहेत, असहाय्य आहेत.. आता अश्या अवस्थेत नाही पाहावत त्यांना..! याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा..! त्यांच्या या अभंगाचे स्वर कानी घोळताहेत..!

मकरसंक्रांती पेश्शल - प्पत्तंग उडवीत होते..! :)

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 13/01/2011 21:51 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, सर्वांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा. तीळगुळ घ्या अन् ग्वाड बोला..! मकरसंक्रांती दाराशी उभी आहे. या दिवसाचं आणि पतंग उडवण्याचं काही वेगळंच नातं. खास करून अहमदाबाद आदी गुज्जू शहरात याचं खास महत्व. त्या मानाने आपल्या महाराष्ट्रात कमी.

हॉम राँग

लेखक निनाद यांनी बुधवार, 12/01/2011 10:35 या दिवशी प्रकाशित केले.
हॉम राँग The Overture हॉम राँग हा चित्रपट एका थाई 'रनत एक' (उच्चार योग्य आहे का ते कळवणे, रनाड् असाही उच्चार ऐकल्या सारखे वाटले!) संगीतकाराच्या आयुष्याचा प्रवास उलगडतो. चित्रपटाचा काळ सुमारे १८८० ते १९४०. सॉर्न हा संगीताची उपजत देणगी आणि समज असलेला मुलगा आहे. परंतु त्याच्या भावाचा संगीताच्या नादातून वाद आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला होता. म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला रनत एक संगीत वाद्यांपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तो चोरून एक पडक्या बुद्ध मंदीरात या रनत एक या वाद्याची आराधना करतो.

तडपत रैना दिन..

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 11/01/2011 22:16 या दिवशी प्रकाशित केले.
तडपत रैना दिन.. (येथे ऐका) पं अजय चक्रवर्ती. पतियाळा गायकीचे एक दिग्गज कलाकार. 'दादाजी' बडे गुलामअलींचा वारसा समर्थपणे पुढे चालवणारे..! सदरचा दुवा त्यांच्या एका जमलेल्या मैफलीचा आहे. राग सुरू आहे मारुबिहाग.. राग मारुबिहाग. आपल्या हिंदुस्थानी रागसंगीतातला एक वेगळीच गोडी, एक वेगळीच खुमारी असलेला शृंगाररसप्रधान राग. परंतु हा शृंगार आमच्या नंद, हमीर सारखा कॉलेज गोईंग नाही बरं का मंडळी. त्या मानाने हा जरा मॅच्युअर शृंगार आहे.

व्याख्याच व्याख्या

लेखक स्पा यांनी मंगळवार, 11/01/2011 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
काही मजेशीर व्याख्या,काही कधीतरी वाचलेल्या, तर काही रचलेल्या. बघा आवड्तायेत का? अनुभव - सभ्य शब्दात मांडलेल्या चुका मोह - जो आवरला असता माणूस सुखी राहतो पण आवरला नाही तर अजून सुखी होतो शेजारी - तुमच्या स्वतःपेक्षा ज्याला तुमच्या आयुष्याची खडानखडा माहिती असते तो सुखवस्तू - वस्तुस्थितीत सुख मानणारा वक्तृत्व - मिनिटा दोन मिनिटात सांगून संपणारी कल्पना दोन तास घोळवणे लेखक - चार पानात लिहून संपणाऱ्या गोष्टीसाठी ४०० पानं खर्ची घालणारा फ्याशन - शिंप्याच्या हातून झालेल्या चुका पासबुक/ब्यांक्बुक - जगातील सर्वोत्कृष्ठ पुस्तकाचे नाव (जर भरपूर

केतकीच्या बनी तिथे..

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 10/01/2011 21:56 या दिवशी प्रकाशित केले.
केतकीच्या बनी तिथे... (कृपया येथे ऐका)
१९७०-७५ चा काळ असावा तो. किंवा ७०चं दशक म्हणुया. संध्याकाळी पावणे सात की सात वाजता आकाशवाणी मुंबई 'ब' वर केवळ १५ मिनिटांचाच मराठी गाण्यांचा कार्यक्रम लागायचा. त्यात हे गाणं अगदी हटकून ऐकायला मिळायचं.