Skip to main content

पन्ख नवे गगन नवे

लेखक बद्दु यांनी गुरुवार, 04/11/2010 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
कोणाकडे श्रेया घोसाल चे नविन ' पन्ख नवे गगन नवे " आहे काय? अल्बम चे नाव आहे San Yeti Ghara CD-1 लिन्क दिल्यास मदत होइल. धन्यवाद.

नयनिती ही बहु प्रेमाला..

लेखक ५० फक्त यांनी गुरुवार, 04/11/2010 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
मला नयनिति ही बहु प्रेमाला, मज धर्म हा समजावला हे गाणं हवं आहे, क्रुपया मदत करा. माझ्याकडे गाडित स्पिकर वरुन रेकॉर्ड केलेलं आहे पण आत ३ वर्षांनी त्याची क्वालिटी खराब होत आहे. धन्यवाद हर्षद

सूर तेच छेडिता

लेखक यकु यांनी बुधवार, 03/11/2010 20:32 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ गीत: सूर तेच छेडिता मूळ गीत एका प्रियकरानं प्रेयसीसाठी म्हटलेलं आहे. गमंत अशी असते की बहुतांशी लोकांची प्रेयसी जेव्हा सुटते, तेव्हा त्यांना सिगारेट ही नवी प्रेयसी हमखास मिळत असते. या कल्पनेवर या गाण्याचे शब्द सहज इकडे तिकडे ठेऊन पाहिले आणि तयार झालं धूर तोच काढीता...
काव्यरस

शास्त्रीय संगीताबद्द्ल माहीती देनारा दुवा.

लेखक अज्ञात यांनी बुधवार, 03/11/2010 05:55 या दिवशी प्रकाशित केले.
संगिताविशयीचं मला काहीच माहित नाही. शास्त्रिय संगीताविशयी मी जानुन घेन्यासाठी मायाजाळावर शोध घेताना, हा धागा सापड्ला. रसीकांना आवडेल. ह्यात प्रत्येक रागाबद्द्ल सविस्तर माहीती दिलेली आहे. http://www.swarganga.org

हे सुरांनो चंद्र व्हा

लेखक ५० फक्त यांनी मंगळवार, 02/11/2010 08:10 या दिवशी प्रकाशित केले.
हे गाणे मी पहिल्यांदा कॉपी पेस्ट्च्या वयांत ऎकलं, म्हणजे १७-१८चा असताना. दुरदर्शन वर बहुधा आरती पाटिल अश्या नावाची कोणी गायिका होती. आता नाव नक्की आठवत नाही, पण त्या काळांत गाणं जास्त लक्षात राहिलं ते त्या गायिकेच्या दिसण्यामुळं, तिचा चेहरा आणि तिची तवला वाजवणा-या कडं पाहतानाची नजर, त्या नजरेत एक प्रकारचा धाक होता किंवा अधिकार होता. हे गाणं चारच ऒळींचं, अगदि टिपीकल नाट्यसंगीत, थोडेसेच शब्द आणि त्या बरोबरच्या सुर, आलाप, तानांच्या नाना हरकती.

रैना बिती जाए..

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 31/10/2010 21:32 या दिवशी प्रकाशित केले.
राग तोडी..! हिंदुस्थानी रागसंगीतातला एक दिग्गज राग. ज्याला तोड नाही असा तोडी..! सुरवातीलाच सारंगी.

नारायणरावांची पुण्याई!, नितिन देसाईला शुभेच्छा..

लेखक विसोबा खेचर यांनी शनिवार, 30/10/2010 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, आमचं दैवत असलेले, मराठी संगीत रंगभूमीचे सम्राट नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व यांच्या जीवनावर प्रसिद्ध कला-दिग्दर्शक नितिन देसाई हे चित्रपट निर्मिती करत आहेत. ही अत्यंत मोलाची कामगिरी ते करत आहेत, त्याकरता त्यांचं अभिनंदन व चित्रपटाकरता अनेकानेक शुभेच्छा.. आज हिंदी रजतपटाच्या दुनियेत नितिन देसाईंनी कला-दिग्दर्शक म्हणून आपल्या उत्कृष्ट कामाचा जो ठसा उमटवला आहे त्याचा कुठल्याही मराठी माणसाला अभिमानच वाटावा..

फुल्ल टू दबंग

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शुक्रवार, 29/10/2010 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
काल मध्यान्ह मुहूर्तावर मी छानसे देवाला आणि स्वतःला वंदन केले. त्यानंतर 'हे कसे शक्य आहे? ' 'असे कधी असते का? ' असे नको ते प्रश्न विचारणारा मेंदूचा भाग काढून बाजूला ठेवाल. त्यानंतर छानसा उजव्या हाताला रुमाल गुंडाळला आणि शर्टाचे वरचे बटण उघडे टाकून मी रिक्षावाल्यांच्या ईस्टाइलने खुर्चीत स्थानापन्नं झालो.

अभ्यंग स्नान..

लेखक डावखुरा यांनी शुक्रवार, 29/10/2010 01:16 या दिवशी प्रकाशित केले.
तीळीचे तेल..आणि वनौषधिंनी युक्त होममेड (आईने बनवलेलं) असे त्यात थोडे बेसन पीठ मिसळुन ते दुधात भिजवुन त्यात थोडेसे मध कालवुन या पद्धतीचा उट्ण..