दहावीत असताना टायटॅनिक पाहिला होता, ईंग्रजी अॅक्सेंट तेव्हा तेवढा कळत नव्हता, पण आज पुन्हा अचानक पाहिला.
मनात अनेक विचार उठले, कल्लोळ जाहला... माजला.... डोकं काम करेनासं झालं... का? कुणास ठाउक...
काही काही वाक्ये मनाला स्पर्शुन नाही तर घासुन गेली.. ओरखडली..
इतके विचार कल्लोळ माजवुन गेले.. त्यातलाच एक विचार.
(he exists in my memories).. अप्रतिम. त्यावरुन सुचलेलं काहीसं.
माणसं... एखादी कुत्री मांजरी मेली तर कदाचित दुख: होणार नाही, पण एखादा रोज दिसणारा भिकारी अचानक गेला तर मनाला हुरहुर लागते. का?
कितीही वाईट असो, मित्र, नातेवाईक कोणीही, पण एक नातं असतं जे ओढतं, जवळीक साधतं ते का?