Skip to main content

साहित्यिक

कार्ट्यांस...

लेखक नगरीनिरंजन यांनी शनिवार, 16/04/2011 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरच्या सर्व कार्ट्यांस समर्पित. (चालः चल री सजनी अब क्या सोचे) लिही रे भावा तू अपुल्या मनचे डोहाळे कशाला प्रतिक्रियांचे लिही रे... टाकून खरडी भिक्षा मागणे जमवून कंपू गोंधळ घालणे असं काही ऽऽ करू नकोऽऽ, करू नकोऽ रे लिही रे... असेलही तुझी लेखणी धमाल करिती इथले सगळेचि लाल स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽच रे लिही रे... लिहीले जरी तू ओतुनि तनमन गेले जरी पुढच्या पानी ते पटकन दबलेलाऽ कोळसाऽ तो होईल हिरा रे लिही रे... जुन्या जाणत्यांचे लागावे चरणी आतल्या गोटात लावावी वरणी भाषा नाहीऽ शैली नाहीऽ पीआर हवा रे लिही रे...

फोरिनची पाटलीण

लेखक मृत्युन्जय यांनी बुधवार, 13/04/2011 13:16 या दिवशी प्रकाशित केले.
एक तृप्तीचा ढेकर देउन शंकरराव पाटावरुन उठले आणि ओसरीवर येउन बसले. आता एकेक करत मंडळी येतील आणि दुपारचा चहा होइस्तोवर पंचायतीची कामं उरकुन घेता येतील असा शंकररावांचा कयास होता. शंकररावांकडे तशी गावची पाटीलकी पिढीजात होती त्यात सरपंचपद पण त्यांच्याकडेच होते. त्यामुळे ते गावात आब राखुन होते. वर्षाकाठी एकदा पालकमंत्री, शिक्षणमंत्री गावच्या शाळेला भेट देउन जातील याकडे ते जातीने लक्ष घालत त्यामुळे आजुबाजुच्या गावांमध्ये पण त्यांचा वट होता.

मेघस्पर्षी

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 12/04/2011 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळचा ७.३० चा गजर झाला आणि "तो" नाइलाजाने उठला. त्या आधी सव्वासातचा आणि सातचा गजरही वाजुन बंद झाला होता. कुंभकर्णापुढे नगारे वाजवले तरी तो उठणार नाही हे सरावाने माहिती झाल्यामुळे घरच्यांनीही दुर्लक्ष केले. उठताना त्याचा हात चुकुन उशीला लागला आणि स्वतःचीच लाळ हाताला लागली. झोपताना खंडाळ्याच्या बोगद्यासारखे सताड उघडे असलेले तोंड, त्यातुन आघाडीच्या सरकारमधुन आतबाहेर करणार्‍या प्रादेशिक पक्षांसारखे आतबाहेर करणारे डास आणि तोडातुन लिटर दीड लिटर बाहेर पडणारी लाळ या सगळ्याचीच त्याला किळस यायची. स्वतः बद्दल त्याला न आवडणार्‍या अनेक गोष्टींपैकी ती एक होती.

नीलकांत यांचा आज वाढदिवस

लेखक इंटरनेटस्नेही यांनी मंगळवार, 22/03/2011 01:10 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो, आज आपल्या मिसळपाव या बेव साईटचे मालक श्री. नीलकांत यांचा आज (२२ मार्च) वाढदिवस आहे! सुरुवातीस मिपाची तांत्रिक बाजु भक्कमपणे सांभाळणारे नीलकांत, अनेक महिन्यांपासुन मिसळपाव.कॉम चा एवढा प्रचंड डोलारा एकहाती समर्थपणे चालवत आहेत. काळाबरोबर अतिशय वेगाने बदलत्या तांत्रिक आणि अन्य आव्हानांच्या आजच्या घडीला नीलकांत यांच्या शिवाय मिपा ही कल्पना सुद्धा करवत नाही. नीलकांत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

पुस्तके ..अर्थ मनाचा १

लेखक गणेशा यांनी शुक्रवार, 18/03/2011 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
येथे दिलेले पुस्तकांचे अर्थ हे मी वाचताना घेतलेले आहेत .. तुम्ही जर वेगळ्या अर्थाने वाचले असेल तर येथे द्या.. त्या मुळे आपल्याला वेगवेगळ्या कोणातून पाहता येईल पुस्तकांकडे.. पुस्तक परिक्षण या पेक्षा पुस्तकातील विचार मांडणे मला आवडते .. तुमचे ही असे लेखन दिले तर छान वाटेल. १. पार्टनर .. व.पु. काळे पार्टनर ही फ़क्त कादंबरी नाहि तर आपल्यासारख्या माणसांचा जीवन प्रवास आहे. त्या मध्ये प्रेम, विरह या बरोबरच स्वताच्या मनात येणारे विचार आणि फिलोसॉफ़ी उत्कृष्ट पणे मांडलेली आहे. वपुंनी या पुस्तकात सामान्य माणसाचे जे दुसरे मन असते ..

पुस्तके ..अर्थ मनाचा १

लेखक गणेशा यांनी शुक्रवार, 18/03/2011 10:01 या दिवशी प्रकाशित केले.
येथे दिलेले पुस्तकांचे अर्थ हे मी वाचताना घेतलेले आहेत .. तुम्ही जर वेगळ्या अर्थाने वाचले असेल तर येथे द्या.. त्या मुळे आपल्याला वेगवेगळ्या कोणातून पाहता येईल पुस्तकांकडे.. पुस्तक परिक्षण या पेक्षा पुस्तकातील विचार मांडणे मला आवडते .. तुमचे ही असे लेखन दिले तर छान वाटेल. १. पार्टनर .. व.पु. काळे पार्टनर ही फ़क्त कादंबरी नाहि तर आपल्यासारख्या माणसांचा जीवन प्रवास आहे. त्या मध्ये प्रेम, विरह या बरोबरच स्वताच्या मनात येणारे विचार आणि फिलोसॉफ़ी उत्कृष्ट पणे मांडलेली आहे. वपुंनी या पुस्तकात सामान्य माणसाचे जे दुसरे मन असते ..

शब्दांच्या पलिकडले !

लेखक स्पंदना यांनी रविवार, 06/03/2011 20:50 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी नुकत्याच तुम्ही 'शरद्जींच्या' दोन कविता वाचल्या. त्याच दोन पत्रांची उलगड माझ्या शब्दात, 'गुरु आज्ञा शिरसावंद्य मानुन' मी इथे द्यायच धाडस करते आहे. प्रयत्न गोड मानुन घ्यावा! बरचस सांगता येत नाही! बरचस बोलताही येत नाही ! ना डोळ्यातून डोकावण्याची मुभा असते या 'बरचस' ला! पण हे ' बरचस ' तुटत ही नाही, मिटत ही नाही ! मंडळी कल्पना करा, पन्नास वर्षापुर्वी गुंतलेल्या दोन जीवांची! बरचस जीवन उंबर्‍याच्या आत व्यतित करणार्‍या तुमच्या माझ्या आज्जीच्या वेळच्या काळाची! कुठ काहिस वादळ उठल , पण त्या वादळाला बाहेर येण्याची मुभा नसल्यान मनाच्या आतच; त्यान तांडव मांडल्यान व्याकुळ 'ती 'अन व्याकुळ 'तो'!