वदनी कवळ घेता … पुंडलिक वरदा हरी विठ्ठल

लेखनविषय:
लेखनप्रकार
लहानपणापासूनची सवय : लग्नातल्या पंगतीत बसलं की फक्त ‘पुंडलिक वरदा’ म्हणेस्तोवर धीर धरायचा. एकदा त्या काकांचं ते जोरात म्हणून झालं की मग आपण जेवणावर अगदी अ‍ॅटॅक करायचा...!! एक मात्र आहे, की असं अन्नावर तुटून पडायला आधीच ठरवून ठेवावं लागतं. हल्ला आधी कश्यावर करायचा? जिलबी, लाडू, भजी, श्रीखंड, पुरी, पापड, मिरगुंड, आमटी, की उसळ? (अहो, लग्नात काय काय पक्वान्नं असतात ते आता मी तुम्हाला सांगायला नकोय ! उगीच यादी करता करता मलाच इथे भूक लागायची, काय?!) सांगण्याच तात्पर्य हे की मी जन्मापासूनच खादाड. हो हो..!! अगदी कुणाला पण विचारून बघा.

णारींच पुण्य

लेखनविषय:
लेखनप्रकार
कालच एका जुन्या मित्राचा फोन आला. "काय टार्‍या कसा आहेस? मी सुद्धा तुमच्या फ्लोर वरलाच होतो. पण फक्त वेगळ्या टिमचा होतो. बर्‍यापैकी ओळखीचा आवाज वाटत होता. "बरं. बोला साहेब..." "टार्‍या तुझ्या फ्लोर खरी शोभा काय सांग पाहू?" "वेळी अवेळी माझ्या क्युब पाशी पडिक किंवा घुटमळत असणारे माझे मित्र" मी. "छ्छे.. ते झालंच रे. पण खरी शोभा काय ते सांग ना साल्या!" अचानक हा शिव्यांवर आलेला पासून माझं टाळकंच सटकलं. "अरे म्हणजे तुझ्या क्युबपाशी लोकं का येतात? असं विचारतोय मी. छ्छे! साल्या तुझाच फ्लोर आणि तुलाच तुझ्या फ्लोराची खरी शोभा काय हे माहीत नाही?" छ्छे छ्छे छ्छे! "हम्म...

पूर्णब्रह्म!

लेखनप्रकार
खाण्याचा विषय निघाला आणि पुणेकरांनी तिथे आपले मत व्यक्त केले नाही असं आजपर्यंत झालं नाहीये. आणि मीही अस्सल पुणेकर आहे, त्यामुळे जाईन तिथे, आणि जमेल तिथे मतप्रदर्शन करणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आणि आद्यकर्तव्य आहे. असो, पुणेकरांचे हक्क आणि त्यांचे कर्तव्यपालन हा एक चर्चेचा वेगळा विषय होऊ शकतो, तूर्तास आपण खाण्याकडे वळूयात. मुळात आपण भारतीय लोक चवीच्या बाबतीत अतिशय लकी आणि सुखी आहोत हा शोध मला भारतात होतो तेव्हा लागला नव्हता हे करंटेपण मान्य करूनही मी हे सांगू इच्छितो की आपली खाद्यसंस्कृती ही आंग्लभूमीला खरोखर भयभीत करून सोडणारी आहे. एखादा इंग्रज खाण्याचे असे किती प्रकार सांगू शकेल?

पोटपुजेची ठिकाणे

लेखनविषय:
रोमनाचा धागा बघितला .. आणि वाटले ज्याला जिथले पदार्थ आवडतात तो येथे त्या ठिकाणाची माहिती लिहिन .. त्यामुळे केंव्हाही कोठे ही महाराष्ट्रभर फिरलो तरी कळेल की कोठे काय छान मिळते. परवाच एका च्या सांगण्यावरुन .. शिंदेवाडिच्या पुढे कैलास मध्ये रात्री जेवन केले पिठल भाकरी थाली अआणि इतर महाराष्ट्रियन पदार्थ .. जबराट आहे एकदम सगळे .. असो ... खालील माहितीचा बाकीच्यांना उपोयोग होयील असे वाटते. ------------------------------------- मिसळ : १. सिन्नर ची मिसळ ही अतिशय उत्कृष्ठ आहे असे मला वाटते.. नंतर नाशिकची .. २.

चिरंजीव चिंटू

लेखनविषय:
आजचा "चिंटू" वाचला का !? ह्या प्रश्नाने आमची सकाळ होते... chintoo अहो येत्या रविवारी म्हण्जे २१ तारखेला आपल्या सगळ्यांचा लाडका "चिंटू" एकोणिस वर्षे पूर्ण करून विसाव्या वर्षात पदार्पण करतो आहे. प्रचंड लोकप्रियता लाभलेली ही चित्रमालिका तब्बल १९ वर्षापासुन सकाळच्या वृत्तपत्रम

पोलीस राइस

लेखनप्रकार
स्थळ : छत्रपती शिवाजी टर्मिनल च्या आसपास चा परिसर वेळ : साधारण रात्रीचे ८ अशीच एक स्त्याच्या कडेची चायनिस ची गाडी ... कुठल्याही सामान्य इतर खाण्याच्या गाड्या असतात तशीच , लालभडक रंगात रंगवलेली द्र्यागन ची भडक चित्र असलेली , आणि तसंच काहीसं नाव असलेली .. फक्त C .S .T . परिसरात म्हणून, सोन्याची किंमत.. गाडीच्या आजूबाजूला ४ फळकुट ,४ टेबलं, गाडीच्या आतल्या बाजुला गिऱ्हाइकांच "उरलेलं ,उष्ट-माष्ट" टाकण्यासाठी एक डबा, पाण्याचं एक पिंप एवढीच काय ती investment आजूबाजूच्या ५ स्टार,2 स्टार , किंव्हा अतिशय सामान्य हाटेलात सुद्धा जायची ऐपत नसणाऱ्या लोकांचं आश्रय स्थान .

महागाईगीत: कसली भाजी करू मी आज

काव्यरस
महागाईगीत: कसली भाजी करू मी आज
अहो काही सुचेना मला रोजरोज कसली भाजी करू मी आज ||धृ|| दोडके गिलके भेंडी मटार शेवगा भोपळा वाल गवार सार्‍यांनीच मार्केटात संप केला आज कसली भाजी करू मी आज ||१|| बटाटे आणले सगळेच संपले फ्रिजमध्ये टोमॅटो काहीच न उरले काय!

तु आणि मी (मिसळपाव स्टाईल!)

लेखनविषय:
नमस्कार, मिसळपावच्या इतिहासात प्रथमच खफ वरील साहित्य इथे प्रकाशित करतो आहे. आपण धाग्याचा खफ अनेकदा झालेला पाहिला असेल पण ही अशी ही पहिलीच वेळ असावी की आम्ही खफचाच धागा करुन एक प्रकारे बॅकवर्ड इंटीग्रेशन केले आहे. तरी कोणत्याही पुर्वग्रहदुषित नजरेने आमच्या सदर धाग्याचा आस्वाद घ्यावा आणि प्रतिक्रियांचा पाऊस त्यावर पाडावा ही न्रम विनंती. हे साहित्य आमचे एकट्याचे नसुन आमच्या ह्या योजनेत अभावितपणे सहभागी झालेल्या श्री नावातकायआहे, श्री भेन्डिबाजार, श्री कुक, श्री स्वानंद व सौ.

बहुगुणी वडे

लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार! आज आपण बहुगुणी वडे तयार करून पाहाणार आहोत. ही पाककृती अत्यंत नाजूक आहे. त्यामुळे स्वत:च्या जोखमीवरच या पाककृतीला हात घालावा. ही पाककृती फसल्याने पट्टीच्या खवय्यांनाही बध्दकोष्ट, अजीर्ण, कफ आणि बर्‍याच वेळा वात झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे खाणार्‍यांना उबळ, उलटी, मळमळ, अंगाचा दाह, माथेशूळ उठणे इत्यादी त्रास झाल्यास तात्काळ पाककृती गुंडाळावी आणि काढता पाय घ्यावा - त्यांच्या पचनशक्तीला दोष देऊ नये आणि समजूत काढण्याच्या तर बिलकुल भानगडीत पडू नये.
Subscribe to पाकक्रिया