मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नाट्य

गोटीपुअ

आळश्यांचा राजा ·
हे नृत्य पहा. ओडिसी सदृश आहे. या नृत्याचे नाव आहे "गोटीपुअ". हे पाहताना आई म्हणाली, अरे या मुली छान नाचतायत, पण एकही दिसायला चांगली नाही, असं कसं काय? आणि अशा काय विचित्र चालतायत! मी म्हणालो, अगं आई, हे मुलगे आहेत. मुलगे. पुरुषासारखंच चालणार. आणि मुलींचे कपडे घालून मुलींसारखे साजूक नाजूक थोडेच दिसणार? गोटी म्हणजे एक, आणि पुअ म्हणजे मुलगा. मुलगा नाचतो, म्हणून नृत्याचे नाव गोटीपुअ. प्रत्यक्षात आठ दहा जण नाचतात. पण नाव पडले आहे.

दिलीप प्रभावळकरांचा !

दिपोटी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
गांधींच्या भूमिकेसाठी राष्ट्रीय पारितोषिक आणि रंगभूमीला दिलेल्या योगदानासाठी संगीत नाटक अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार या दोन अत्यंत मानाच्या पुरस्कारांपाठोपाठ ज्येष्ठ अभिनेते-लेखक श्री दिलीप प्रभावळकर यांना आता त्यांच्या 'बोक्या सातबंडे' या पुस्तक-मालिकेसाठी गेल्या सोमवारी १४ नोव्हेंबर रोजी साहित्य अकादमीचा 'बाल साहित्य' पुरस्कार प्रदान करण्यात आला. या निमित्ताने त्यांच्या अभिनयकारकीर्दीचा घेतलेला हा धांडोळा ...

रंगीत तालीम

अविनाशकुलकर्णी ·
लेखनविषय:
सहावि सातवित असेन..बहुतेक उन्हाळयाच्या सुट्या चालु झाल्या होत्या.. आमचे १०-१२ मित्रांचे टोळके बाळ पुंडलीक मित्राच्या वाड्यात दंगा करायला जमले होते... वाडा चौसोपि व.मोठा. .. आत एक विठ्ठल मंदिर हि होते..सभामंडपात सारे जमलो होतो.. गप्पा चालु होत्या.. "अन आपण नाटक करु यात का?".चंद्या घाटपांडे म्हणाला.. सा~यांनी कल्पना उचलुन धरली.. पण कोणचे? .कुणालाच सुचेना शेवटी "तुच एखादे नाटुकले लिहि..असा मला आग्रह झाला.. मित्रांच्या विश्वासाचा अन अज्ञानाचा फायदा घेत मी पण हो म्हटले.. रात्री विचार करीत अश्वथाम्याच्या कथेवर एक छोटे नाटुकले लिहिले... अश्वथामा दुध मागतो ..घरची गरीबी..

लगाम फक्त त्याचे हात होते ...!!

प्रकाश१११ ·
लेखनविषय:
काव्यरस
[ -घोडा म्हणजे मनातील विकार . दूरदेशी गेल्यावर त्यावर नियत्रण ठेवणे अवघड जाते .आपले मन म्हणजे संस्कार .संस्कार म्हणजे लगाम. आपला आपल्याला लगाम लावणे अवघड जाते त्रास होतो आणि ही तारेवरची कसरत असते].

नरेंद्र मोदी यांचे उपोषण

आशु जोग ·
लेखनप्रकार
क्रिकेटचा वर्ल्डकप सुरु झाला आणि सगळे राष्ट्र टी व्ही कडे डोळे लावून बसले. काय होतय, काय होतय ? उत्कंठा होती. १९८३ मधे जिंकला, यावेळी जिंकणार का ! त्यात पुन्हा सचिनचा शेवटचा वर्ल्डकप. बेट्याने नेहमीप्रमाणे शतके ठोकली. पाकिस्तान, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया यांच्यावर मात करीत २०११ चा वर्ल्डकप भारताने जिंकला. सचिनला भारतरत्न द्यावे ही मागणी होउ लागली. ४ दिवस जातात तोच अण्णा हजारे यांनी लोकपाल विधेयकासाठी आंदोलन सुरु केले. ते दिल्लीमधे उपोषणाला बसले. एप्रिल नंतर ऑगस्टमधे पुन्हा उपोषणाला बसले. पूर्वीहून अधिक प्रतिसाद मिळाला. आंदोलन प्रचंड यशस्वी.

वात्रटिका - मोबाइलचं खोकं

सोत्रि ·
लेखनप्रकार
स्थळ: मेट्रो शहरातील एक गजबजलेले रेल्वे स्थानक पात्र: 2 शहरी गिज़्मो इक्वीप्ड कूल डुड्स, गॅरी (गिरिष, Software Engg.) आणि सॅंडी (संदीप, BPO कर्मचारी), 1 भंजाळलेला खेडूत ग़ॅरी: हे मेट व्हॉट्स अप. लॉन्ग टाइम नो सी, है किधर सॅंडी: अरे काही नाही रे कालच ऑनसाइट वरून आलो.

ज्वलंत सामाजीक एकांकी नाट्य-प्रवेश: दुसरा स्वातंत्र्यलढा

पाषाणभेद ·
ज्वलंत सामाजीक एकांकी नाट्य-प्रवेश: दुसरा स्वातंत्र्यलढा (ढिसक्लेमर: या नाट्यप्रवेशातील सर्व पात्रे, घटना काल्पनीक आहेत. त्या पात्रांचा व घटनांचा कोणत्याही जिवीत अथवा मृत व्यक्तींशी संबंध नाही. तत्राप असा संबंध आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.) (भुमिका: अर्जून, माया, श्रेया, रिषी, कविता, प्रणव) अर्जून: काय करावे बरे? हि अजून माया कशी आली नाही ते? छे! कित्ती उशीर? आता १० वाजून गेले अन प्रभात फेरीला सुरूवातही नाही. तिकडे आप्पांच्या उपोषणाला मग पाठिंबा कसा मिळणार? अन सरकार कसे हादरणार? (अर्जून रंगमंचावर येरझर्‍या घालतो.) माया: अर्जून, मी आले बघ.

फ्रायडे टाईमपास

मुक्तसुनीत ·
कधीकधी माझ्यातच पाहतो मी एक बेहद्द नाममात्र घोडा पाठीवरती जीन मखमली पायी रुपेरी तोडा म्हणे कुणासाठी, कुणासाठी, कशासाठी, कुठवर इमानाने जन्मभर रेटायचा ऐसा गाडा ? कधीकधी माझ्यातच पाहतो मी भव्य हिमालय तुमचा अमुचा ज्याच्या छातीचा फोडुनिया कोट , गुलाम केले गेले जयाने लोक तीस कोट. बोलेना तो खळ मैंद म्हणती बळकट धश्चोट कर्मठ जो प्राणी तो पोंचट. कधीकधी माझ्यातच पाहतो मी गणपत वाणी बिडी पिताना चावायाचा जो नुसतिच काडी नाही खर्चिली कवडी दमडी नाहि वेचिला दाम श्रीराम जयराम जयजय राम. कधीकधी माझ्यातच पाहतो मी षंढ सारी लेकरे लेकरे उदंड जाली अरुण उगवला पहाट झाली झाले मोकळे आकाश आकाश झाले थेन्गने अन चानदन्या झ

सातवाहन आणि नाणेघाटातील शिलालेख. आता पूर्ण येथेच केला आहे.

जयंत कुलकर्णी ·
नाणेघाटातला शिलालेख – आपल्यापैकी अनेकजण नाणे घाटात मुक्काम टाकतात. दरीतून वरती येणारे ढग कवेत घेतात, शूद्ध हवा छातीत भरून घेतात आणि त्या गुहेतल्या पवित्र आणि गुढ अशा वातावरणात निस्तब्ध होतात. त्या गुहेच्या दारात उभे राहून मग आपण खालून रस्त्याने येणार्‍या व्यापारांचा काफिला नजरे समोर आणू लागतो. दमलेले, तहानलेले ते जीव हळू हळू वर येत असतात आणि वर आल्यावर विश्रांतीसाठी आपली पथारी सोडतात, जेवणाचे डबे उघडतात आणि थंड पाणी पिऊन तृप्त होतात. सुखदु:खाच्या दोन गोष्टी बोलून पुढच्या मार्गाक्रमणाबद्द्ल चर्चा करतात.

आमची बी एक

मुक्तसुनीत ·
आमची प्रेरणा : ही भयभीषण कविता कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर विसर षंढ-गंध आता , जाळुनीया राख कर वेड होते त्या मिपाला, मांडिशी तू भोंडला वेड 'तात्या'ला तुझे जो, कायमीचा झोपला यायचे ते ना पुन्हा, तू वाट बघणे बास कर.. कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर टांगण्या वेशीवरी तव लक्तरे सारे पुढे चिंधड्या तव "कव्वितेच्या" फ़ाडती शेंबडी मुले ना कुणी तुज तारीफेला , तू अपेक्षा लाख कर!! कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर कोण झोपे, काय झाले, ना इथे पडले कुणा "भीक नाही , काव्य आवर" बाकी कुणी काही म्हणा "जळ्ळीं मेली लक्षणे ती, हे रसीका तूच मर!"