(पावश्या लवकर आलाच आहे तर.....)

हे ताडपत्रीवाल्या, गतसाली न खपलेल्या मालावरची धूळ झटक हे पाणीपुरवठा खात्यातल्या टेंडर बाबू, फिल्टर सफाईच्या निविदांच्या नैवेद्यांची ताटे सजव हे वृक्षसंवर्धन खात्यातील खात्यापित्या लोकसेवका, ट्री ट्रिमिंग च्या निमित्ताने कोणते वृक्ष भुईसपाट करायचे ते बिल्डरांबरोबर ठरव हे नगर सेवका, नालेसफाईच्या हातसफाईवरच्या श्वेतपत्रिकेचा कच्चा खर्डा बनवायला घे हे पालक मंत्र्या, महापुरोत्तर अन् भूस्खलनोत्तर सहसंवेदनांचे वार्षिक भावविभोर सांत्वनसंदेश बनवायला घे हे विदग्ध साहित्यिका, मेघदूताची नव्या अंगाने चिरफाड करणारे तुझे लेख आघाडीच्या वृत्तपत्र पुरवणीत छापून आणायला सेटिंग लाव हे हायबरनेटिंग कविवर्या

अभ्यासोनी मग ...

लेखनविषय:
"अभ्यासोनी मग | प्रकटावे" ऐसे कुण्या रामदासे | सांगितले "दिसामाजी काही | तरी ते लिहावे प्रसंगी वाचावे | अखंडित" असेही वदले | तेव्हा रामदास मना उपदेश | करताना आता मला सांगा | लिहिणे, वाचणे अभ्यास करणे | कोणा झेपे? अभ्यास कशाला | प्रकटण्या आधी? इंटरनेट हाती | असताना ! हाती जे येईल | फॉरवर्डावे तेच पुढच्यास ठेच | लागेना का वायफळ मळे | पिकवू अमाप काळाची झडप | येवो सुखे

खरा तरुण !

लेखनविषय:
(सासवड - कस्तुरबा आश्रम येथील एका सांस्कृतिक कार्यक्रम प्रसंगी , एका ८५ वर्षाच्या आजोबांनी खणखणीत आवाजामध्ये गीतरामायणातलं एक गाणं सादर केलं . त्यावेळी माझ्या मनात त्यांच्या माझ्यातल्या तुलनेबद्दल जी भावना झाली, ती मी या कवितेतून मांडलेली आहे . ) ------------------------------ पंच्याऐंशीतला तरुण उभा माझ्या समोर ताजा ! पंचेचाळीशीतला बसलेला मी, अन् गुडघा दुखतो माझा ! त्या वेळचं हवा पाणि, अन् त्यांनी खाल्लेलं अन्न ताजं ! आणि प्रिझर्वेट पिझ्झा बर्गरवर फुगलेलं पोट माझं ! सांगा तुम्हीच आमच्या दोघातलं नक्की तरुण कोण ?

बडिशोप

बडीशोप काही गोड नाही, ती फार मोठी खोडंही नाही . तंबाखू सारखी वाट लावणारी, ती सर्वांगिण ओढंही नाही . हातावर चोळावी लागत नाही. चुन्यासह पोळावी लागत नाही ! तोंडामध्ये कडेला ठेवून, तासंतास घोळावी लागत नाही ! तशी ही सोपी आहे साध्या सहज स्वभावाची कुणाशी मैत्री / वैर / ना प्रेम जो हातावर घेइल , ती त्याची ! आता म्हणणारच तुम्ही ,तंबाखू आणि हिच्यात वेगळं काय ? अहो - हिचे नुसतेच दोन हात ! तिला आणखीन दोन पाय ! आय आय आय ! आला ना आवाज आतून ? हाय हाय हाय ! भाजला ना गाल त्यातून ? आम्ही वळिखले ,तुम्ही आमचे पूर्वाश्रमीचे तंबाखूप प्रेमी ! म्हणूनशानच आम्माला बी म्हैतेत तुमच्या सगळ्याच गेमि !

सहज सुचलं म्हणून

सहज सुचलं म्हणून ( राजकारणसोडून छोट्या चर्चांसाठी) इतिहास, पुस्तकं, पाककला आणि इतर विषयांची चर्चा खरडफळ्यावर होते आणि मोठमोठे माहितीपर प्रतिसाद खरडफळा साफ झाल्यावर गायब होतात. तर तसे होऊ नये म्हणून हा धागा सुरू करत आहे. * आमच्या इथे एक पेपर आणि मासिके वाचनाचा एक मिनी ज्येष्ठ नागरिक कट्टा ( म्हणजे दोन बाकडी , कडाप्पा फरशी टाकून) सुरू झाला होता. परवा तिकडे एक पाटी वाचली आणि पुण्यात असल्यासारखं वाटलं. 'ज्येष्ठ नागरिक कट्टा' पाटीखाली 'राजकारण चर्चेसाठी नाही' असं लिहिलं होतं. हसू आलं. तर हा आपला धागाही राजकारण चर्चेसाठी नकोच असं ठरवलं. बघू असा चालतो.

मराठवाड्यातील एक लग्न आणि इतर निरीक्षणे

लेखनप्रकार
मराठवाड्यातील एक लग्न आणि इतर निरीक्षणे परभणी जिल्ह्यातल्या एका लहानशा गावी, माझ्या आजोळच्या एका लग्नाला यायचं होतं. काल रात्री सिकंदराबादहून १७६६३ या रेल्वेने बसलो. आज सकाळी परभणीला आलो. तिथून आधी १७६६८ या गाडीने, नंतर एका जीपने लग्नाच्या गावी आलो. फ्रेश होऊन नाश्ता झाल्यानंतर दाढी ट्रिम् करायला बाहेर पडलो. या गावात दोन सलुन आहेत. आधी एका ठिकाणी गेलो तर तिथे दोनजण आधीच बसून होते. दुसरा दुकानात तीनजण बसून होते. परत पहिल्या दुकानात आलो. वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हते.

थोडा थोडा

लेखनविषय:
सुपारीबाज टपोरीने खंडणीसाठी कपाळावर टेकविलेल्या कट्ट्याचा निष्ठुर घोडा घोडेबाजारात निष्ठेची झूल आडसाली बदलण्यात निर्ढावलेला संधिसाधू घोडा जितांनी केलेल्या जेत्यांच्या जयजयकारात गुदमरलेला अश्वमेधी घोडा बुद्धिबळाच्या कृष्णधवल अवकाशात अवघडलेला अडिचक्या चालीचा घोडा गर्निकाच्या युध्दविकल चौकटीत पिकासोने कोंडलेला टाहो फोडणारा घोडा व्याधविद्ध मृगनक्षत्राच्या झगमगत्या चौकटीत दडलेला तेजोमेघी घोडा बहुरूपी घोडा समजू लागलाय थोडा थोडा

X/0 = ∞ ? !

लेखनविषय:
अगाधा भागाया -शून्य माझ्यातले घेता- भेटी आले अनंतत्व अनंत जोखण्या - हाती मोजपट्टी नव्हती- हिंपुटी नाही झालो धून अनंताची झंकारली गात्री अनंताचा यात्री तेव्हा झालो

पाऊस-कविता झाली पाडून

लेखनविषय:
पाऊस-कविता झाली पाडून विठुलाही वेठिस धरिले जशी मागणी तसा पुरवठा ब्रीदवाक्य कवि-झोळीतले जरा स्वस्थ बैसेन तोवरी दिन येईल स्वातंत्र्याचा हस्तिदंती मम मनोऱ्यातुनी शब्द तिरंगी लिहिण्याचा दुरून मग खुणवेल दिवाळी शब्दांची आतषबाजी- -करण्यासाठी सज्ज होऊनी लावीन "प्रतिभेची(?)" बाजी "स्वांत:सुखाय लिहितो बिहितो" धूळफेक जरि करितो मी शब्दांच्या पलिकडे वसे ते सांग कधी का पाहीन मी? :)

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट: लग्नातले उखाणे

लेखनविषय:
लेखनप्रकार
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट विवाहबंधनात अडकले. त्यांच्या लग्नात एकमेकांनी उखाणे कसे घेतले असतील? आपण कल्पना करू आणि तुमच्या कल्पनेतले उखाणे येथे टाका. लेक लाडकी मोठ्या घरची होणार सुन मी अंबाणीची मोबाईलचा बॅलंस आयुष्यभराचा टाकला अनंतरावांसारखा जोडीदार भेटला लग्नाला आले बॉलीवूड आणि हॉलीवूड अंनंतरावांचे नाव घेते स्पर्श करते टचवूड स्वप्नातला राजकूमार पाहीला होता सुखाने न्हाले मी अंनंतरावांसारखा पती मिळता.
Subscribe to मौजमजा