Skip to main content

मौजमजा

मंटू, ॲलेक्सा आणि गाणी

लेखक चांदणे संदीप यांनी शनिवार, 14/10/2023 22:07 या दिवशी प्रकाशित केले.
इंटरनेट फोफावण्याच्या आधी म्हणजे अगदी १० वर्षांच्या पाठीमागे गाणी नियमितपणे ऐकायचो. नियमितपणे म्हणजे दिवसातले चार पाच तास वगैरे. त्याच्याही आधी जेव्हा टीव्ही बोकाळायचा होता, तेव्हा घरी रेडिओ आणि टेपरेकॉर्डर दिवसाचे आठ-दहा तास व्यापून असायचा. टीव्हीवरच्या कार्यक्रमांसाठी ठराविक काळ राखून ठेवलेला असायचा. इतर वेळी रेडिओ किंवा टेपरेकॉर्डर सतत चालू. रेडिओवरही फक्त विविधभारती. टेपरेकॉर्डरच्या कॅसेट्ससाठी कपाटाचा एक मोठा कप्पा होता. सर्वात वरती, काचेचा. तीन-चार ओळीत त्या सर्व कॅसेटी ठेवलेल्या असायच्या. त्यात पुन्हा, भक्तीसंगीत, मराठी, हिंदी चित्रपट गाणी अशी वर्गवारी असायची.

आदित्य-L1

लेखक भागो यांनी मंगळवार, 29/08/2023 08:39 या दिवशी प्रकाशित केले.
चांद्रयान-३ ची यशस्वी मोहीम पार पाडल्यावर इस्रो ने आता सूर्याकडे नजर वळवली आहे. आदित्य-L1 असे या यानाचे म्हणा किंवा वेधशाळेचे नाव असेल. ही वेधशाळा सूर्याचा वेध घेऊन सूर्याची तेजप्रभा (corona) आणि सूर्यापासून वाहणारे वारे (सोलर विंड) आणि इतरही अनेक गोष्टींचा अभ्यास करून त्याची विदा आपल्याला पाठवेल. ह्या छोट्या लेखात "L1" हा काय आहे त्याची चर्चा केली आहे.आदित्य-L1 बद्दल जिज्ञासूना https://www.isro.gov.in/Aditya_L1.html इथे माहिती मिळेल. १) थ्री बॉडी प्रॉब्लेम म्हणजे दोन महाकाय आणि एक इटुकला पिटुकला त्यांच्यामध्ये घुटमळणारा. ह्यांचे गणित.

स्वतःचे खरे रूप .

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 15/07/2023 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
स्वतःचे स्वरूप ,पाहू दे मज डोळा नाही मी भोळा , कळेल मज . जाऊ दे मला , माझीया आत्म्याकडे अन्य कुणीकडे , कळेल निजरूप??? पहीला मी खादाड , नंतरचा आसक्त त्यानंतर अजून काही (?), भ्रम हा गेला ! आसक्ती हे मूळ , त्यावरी अनंत बांडगूळ वेगवेगळे खूळ , पोशिले मी आवडीने . ऐश्या निरंतराची , आहे मज गाठी याशिवाय पाठी , नाही काही ! आत्मा म्हणे आता , पाहूनी मूळ रुप होऊ नको तद्रूप , पुन्हा एकदा . मूळ रुप खरे , जन्मांतरीचे बरे .

(मातीचे पाय - मोकलाया वर्जन)

लेखक गड्डा झब्बू यांनी शनिवार, 08/07/2023 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेर्ना - मातीचे पाय पयन स्प्र्शुन अले ते हत मलले होते लक्क उमग्ले तेवहा ते पय मतिचे होते मि केवल पहत होतो पयन्च्य खल्चि धुल ति ललतस लववि हे एकच मथि खुल मि इथ्वर पहुन अलो पौल्खुना विर्नर्या अधि कुन्वत, मगुन कप्ति विकत हस्नर्या अत पुन्ह चलवे पुधे, कि परत फिर्वे? सोस न-लयक पयन्चे पुसुन अव्घे तकवे? प्रेमल श्ब्दन्चि ओल मनत र्झिपत नहि व्हवे नत्मस्त्क पयहि दिसत नहि ते सरेच निगुन गेले जे पय दरवे सुच्ले मतिचे पत मत्कट मगे मज्यसह उर्ले टंकनीक चमनगोटा दाढिमिशि श्निवार ०८/०७/२०२३
काव्यरस

वाई ते पुणे

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 11/02/2023 17:18 या दिवशी प्रकाशित केले.
अलिकडेच एके दिवशी पाचगणीला गेलो होतो. बऱ्याच वर्षांनी पाचगणी, वाईला भेट देत असल्यामुळं गेल्या वेळेपेक्षा आता तिथं बदललेलं बरंच काही दिसत होतं. पाचगणीची भेट आटपून पुण्याला परत येण्यासाठी सकाळी निघालो. पाचगणीच्या एसटी स्थानकात पोहचल्यावर पुण्याच्या बसला वेळ आहे समजलं. त्यामुळं समोर उभ्या असलेल्या वाईच्या बसमध्ये आम्ही बसलो. वाईला पोहचल्यावर काही वेळानं पोलादपूर-स्वारगेट बस आम्हाला मिळाली. पोलादपूर ते स्वारगेट बस कोणत्या मार्गावरून जाते, हे पाहिल्यावर असा पूर्ण प्रवास एकदा करावा असं वाटू लागलं. बसच्या फलकावर पोलादपूर-महाबळेश्वर-पाचगणी-वाई-खंडाळा-शिरवळ-स्वारगेट असे लिहिलेलं होतं.

नको ना रे

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 31/12/2022 19:14 या दिवशी प्रकाशित केले.
नको रे नको नको म्हटलं ना नको नक्को ना. नको. अं हं न नको न न नको नक्को ना रे नको

महिला क्रिकेट ....भारत 3, इंग्लंड 0.... ये नया भारत है...

लेखक मुक्त विहारि यांनी मंगळवार, 27/09/2022 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतीच, इंग्लंड विरूद्ध भारत ही तीन सामन्यांची एक दिवसीय क्रिकेट मालिका संपली. हळूहळू का होईना पण, महिला क्रिकेट बाबतीत, लोकं रस घेत आहेत, हे जाणवले. पहिल्या आणि दुसर्या मॅच मध्ये, हरमन प्रीत कौरने, अप्रतिम खेळ केला, विशेषतः दुसर्या मॅच मध्ये... 2017 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध केलेल्या 169 रन्स नंतर, ही 111 चेंडूत 139 रन्सची खेळी, खरोखरच दृष्ट लागण्या सारखी.

पुणे मिपाकट्टा सप्टेंबर २०२२ वृत्तांत: मिपाकट्टा संपन्न झाला

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 17/09/2022 21:48 या दिवशी प्रकाशित केले.
आज दिनांक : १७ सप्टेंबर, शनिवार रोजी सकाळी १० ते दु. २ च्या दरम्यान ठिकाण पाताळेश्वर लेणी, जंगली महाराज मंदिराशेजारी, जंगली महाराज रोड, शिवाजी नगर, पुणे - 411005 येथे अत्यंत उत्साहात साजरा झाला. एकूण सतरा (१७) मिपाकर, मिपा मालकांसहीत उपस्थित होते. त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.

गडकरींनी पुण्यात केले 'हे' वक्तव्य... खड्ड्यात वाहन गेले की...

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 14/09/2022 14:08 या दिवशी प्रकाशित केले.
पुणे वार्ताहर: दि. १४ सप्टेंबर. रस्त्यातील असलेले खड्डे दुरुस्ती करणे किंवा त्या जागी नवे रस्ते करणे सरकारला लगेचच अशक्य आहे. भारतावर चीन ने राज्य केले तरच ते शक्य आहे. अशा परिस्थितीत रस्त्यांत असलेले खड्डेच वाहनचालकांच्या मदतीस येतील, कारण असल्या खड्ड्यांतूनच वीजनिर्मिती भविष्यात करू अशी घोषणा रस्ते वाहतूक मंत्री श्री. गडकरी यांनी काल पुण्यात केली. गणपती विसर्जन झाल्यानंतर आलेल्या पावसाच्या पुराची पाहणी पुण्यात केल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत बोलत होते. ही परिषद रात्री ११ वाजता शासकीय विश्रामगृहात झाली. गडकरी पुढे म्हणाले की, रस्त्यांवरील खड्डे हे आपले मित्रच आहेत. त्यांना वैरी संबोधू नका.