मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

खरा तरुण !

अत्रुप्त आत्मा · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
(सासवड - कस्तुरबा आश्रम येथील एका सांस्कृतिक कार्यक्रम प्रसंगी , एका ८५ वर्षाच्या आजोबांनी खणखणीत आवाजामध्ये गीतरामायणातलं एक गाणं सादर केलं . त्यावेळी माझ्या मनात त्यांच्या माझ्यातल्या तुलनेबद्दल जी भावना झाली, ती मी या कवितेतून मांडलेली आहे . ) ------------------------------ पंच्याऐंशीतला तरुण उभा माझ्या समोर ताजा ! पंचेचाळीशीतला बसलेला मी, अन् गुडघा दुखतो माझा ! त्या वेळचं हवा पाणि, अन् त्यांनी खाल्लेलं अन्न ताजं ! आणि प्रिझर्वेट पिझ्झा बर्गरवर फुगलेलं पोट माझं ! सांगा तुम्हीच आमच्या दोघातलं नक्की तरुण कोण ? त्यांनी मारलेली हाक सुद्धा दहा कोस जाते, आणि मला लागतो स्पिकर फोन ? तुम्ही म्हणाल काय आजोबांचं लई कौतुक करता ? आणि आम्हाला हसवायला कविता लिहून जास्तीच स्वतःला धरता ? पण खरंच सांगतो पिढी दर पिढी काही फरक पडत जातो ! नुसतच वय वाढलेलं नसेल, तर माणूस खरंच घडत जातो ! मग गाणारा असो माणूस किंवा एखाद्या माणसाचंच असो गाणं आम्हाला शिकायला मिळतं अशांकडून खऱ्या अर्थाचा जगणं ! प्रत्येक पिढी एकमेकाला काही ना काही देत असते ! आमच्याकडून घेतलीच तर एखादी कविता काढून घेत असते ! दोन शब्द बोलून माझे तोकडे गीत थांबवतो . आणखी ऐकवायला लागलो तर म्हणाल हा फारच वेळ लांबवतो ! ============ नंतर हीच कविता तिथे वाचून दाखवली . तिला हशा टाळ्यांचा छान प्रतिसाद मिळाला . त्याच्या व्हिडिओचा फेसबुक दुवा खाली चिकटवत आहे . ज्यांना ही गंमतशीर कविता लाईव्ह एन्जॉय करायची आहे, त्यांनी तिकडे येऊन तो जरूर पहा . खरा तरुण https://www.facebook.com/share/v/1Ckcee3zCn/

वाचन 1512 प्रतिक्रिया 0