पाऊस-कविता झाली पाडून
काव्यरस
पाऊस-कविता झाली पाडून
विठुलाही वेठिस धरिले
जशी मागणी तसा पुरवठा
ब्रीदवाक्य कवि-झोळीतले
जरा स्वस्थ बैसेन तोवरी
दिन येईल स्वातंत्र्याचा
हस्तिदंती मम मनोऱ्यातुनी
शब्द तिरंगी लिहिण्याचा
दुरून मग खुणवेल दिवाळी
शब्दांची आतषबाजी-
-करण्यासाठी सज्ज होऊनी
लावीन "प्रतिभेची(?)" बाजी
"स्वांत:सुखाय लिहितो बिहितो"
धूळफेक जरि करितो मी
शब्दांच्या पलिकडे वसे ते
सांग कधी का पाहीन मी? :)
वाचने
2553
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
सांग कधी का पाहीन मी? :)
अगदी साध्या शब्दात लिहिलेली,
तुझ्या थुंकीहूनही कोरडे आहेत
कविवर्य...
In reply to कविवर्य... by कर्नलतपस्वी
कर्नल आपला प्रतिसाद
भागो धन्यवाद. खानोलकरांचे हे लेखन
In reply to भागो धन्यवाद. खानोलकरांचे हे लेखन by अनन्त्_यात्री
कुठून तरी वाचली आणि संग्रही