Skip to main content

मौजमजा

आमचीबी आंटी जन टेस

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 26/04/2021 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
आमचीबी आंटी जन टेस गावात कायबी काम नव्हतं आजकाल. सगळे निसते बशेल. कोरूनामुळं नाम्याचं रसाचं गुर्‍हाळबी बंद पडेल व्हतं. त्येच्यायच्या त्या कोरूनाच्या. सकाळ संध्याकाळचा आमच्यावाला आड्डा आसा बंद पडेल. वावरातबी कांदे काढेल व्हते, आन या येळेला भाव काय मिळाला नाय. टॅक्टरचा हप्ता घरातून द्यावा लागला, आता बोला. या कोरूनाची आंटी जन टेस करून घ्या, आंटी जन टेस करून घ्या म्हनून मलेरीया डाक्टर आन आशाबाई गावात फिरत व्हती. मलेरीया डाक्टर लई बाराचं हाय बरं का आमच्या आरोग्य शेंटरवरचं. कायम आशाबाईला बरूबर घेवूनच फिरतं लेकाचं.

हॅपी होली - एक चिंतन

लेखक पुष्कर यांनी शुक्रवार, 16/04/2021 19:11 या दिवशी प्रकाशित केले.
आज काल धुलीवंदनाच्या दिवशी मधूनच कोणीतरी अचानक समोर येतो आणि "हॅपी होली" असं काहीतरी म्हणत तोंडावर रंग फासतो. तेव्हा "अरे अरे .... हा तो दिवस नाही" असं म्हणण्याची संधी देखील मिळत नाही. रंग लावल्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही, पण आज धुळवड असते. रंग हा रंगपंचमीला लावतात - अशी आपली एक संकल्पना लहानपणापासून मनात फिट्ट बसलीये. हे म्हणजे नागपंचमीला कोणी "हॅपी राखीपौर्णिमा" असं म्हणून हातात राखी बांधली तर त्या भावाला किती विचित्र वाटेल, तसं धुलीवंदनाला कोणी रंग लावला कि वाटतं. आपल्याकडे "होळी" म्हणजे कालचा, म्हणजे धुलीवंदनाच्या आधीचा दिवस.

अध्यात्माची भूमिती

लेखक अनन्त्_यात्री यांनी बुधवार, 14/04/2021 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
अनादिच्या अलिकडचा "अ" हा नि:संग असा एक बिंदू घेतला. मग अनंताला स्पर्श करू धजणारा, ज्ञानगम्य असा, "ज्ञ" हा दुसरा बिंदू घेतला. "अ" ला "ज्ञ"शी जोडणारी "अज्ञ" ही रेषा आखली. ह्या रेषेवर माझ्याच जवळपास कायम घोटाळणारा "हम्" हा बिंदू निवडला. "अज्ञ" या रेषेशी लंबरूप, फटकून असणारे, "सोs" हे प्रतल असे निवडले की ते "अज्ञ" रेषेला "हम्" बिंदूत छेदेल. "सोs" प्रतलावरील १,२,३,....
काव्यरस

सध्या मी काय पाहतोय ? भाग ४

लेखक मदनबाण यांनी शनिवार, 10/04/2021 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
स्कॅम १९९२ ही वेब सिरीज मला विशेष आवडण्याची अनेक कारणे असतील, पण यातील प्रतीक गांधी यांचा अप्रतिम अभिनय आणि याच्या जोडीलाच असलेले अफलातुन संवाद हे २ घटक मला फारच भावले. ही वेब सिरीज हिट झाली हे काही वेगळ्याने सांगायची गरज नाही,पण मला अचानक ही सिरीज आठवण्याचे कारण म्हणजे याच घटनेवर अभिषेक बच्चन यांचा [ अर्थातच अभिनय नसलेला ] द बिग बुल चित्रपट आला...

टाटा निक्सन एक्सएम पेट्रोल मॅन्युअल गाडीचा, पुरेशा वापरानंतरचा रिव्यू

लेखक कांदा लिंबू यांनी सोमवार, 05/04/2021 09:14 या दिवशी प्रकाशित केले.
कार विकत घेण्यासाठी मार्गदर्शन हवे आहे हा धागा मी काढला होता. तिथल्या सूचना, सल्ले व मार्गदर्शनाबद्धल सर्व व्यक्त-अव्यक्त मिपाकरांचे मनःपूर्वक आभार. २० सप्टेंबर २०२० ला गाडी हातात आली. महिनाभर वापरल्यावर रिव्यू लिहीन असं ठरवलं होतं पण मग म्हटलं पाचेक हजार किमी वापरानंतर लिहावा (टंकाळा, दुसरं काय!). आता लिहितोय. उशीर झाल्याबद्धल क्षमस्व. स्वतःची नवीन चारचाकी घेण्याचा पहिलाच अनुभव होता. पोटात अनेक फुलपाखरे बागडत आहेत असं उगीच वाटत होतं.

मला बेचलर काळात (धपकन) पडलेली स्वप्न!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 02/04/2021 10:11 या दिवशी प्रकाशित केले.
ढिशुम क्लेमर:- (सदर लेखन आम्हास काल इमेल बॉक्स चे उत्खनन करताना सापडलेले आहे,म्हणून त्यास हे टायटल दिले आहे. आमचे टायटल पाच वर्षांपूर्वी क्लिअर-झालेले असल्याने "असे" नाव सुचले,हे वाचकांपैकी गरजूंनी नीट ध्यानाच्या आत घ्यावे! गरजू 'नसलेल्यांबद्दल' आमची काहीही आरजूच नाही! ;) त्यामुळे त्यांनी नुसतेच वाचावे) मला बेचलर काळात (धपकन) पडलेली स्वप्न! 1) मला (सकाळची) वेळेवर आपोआप जाग आलेली आहे. 2) मेसवर शेपूची भाजी खायला मिळते आहे. 3) मी दररोज कपडे धुतो आहे. 4) रात्री झोपताना मोबाईल चार्जिंगला लावला आहे.

तू जीव माझा- तू प्राण माझा - आलीस तू अवचिता

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 29/03/2021 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
तू जीव माझा - तू प्राण माझा - घ्यावया नच होतीस आली मालूम होते मला शौच्यालयात घुसता मग सावरून बसता मोबाइलात रमता आलीस तू अवचिता जवळि जवळ येता मग कडकडून डसता मम उष्ण रक्त प्रशिता मेरा चैन-वैन सब लुटिता वाजवून टाळिका मी जीव तुझा - मी प्राण तुझा - हरिला - अल्विदा मच्छरिनी - अल्विदा. .

डेस्टिनेशन ∞

लेखक अनन्त्_यात्री यांनी शनिवार, 06/03/2021 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
अनंताच्या यात्रेसाठी जय्यत तयारी केली आहे चांदणचुर्‍याचे भूकलाडू हिमनगांचे तहानलाडू (तहानभूक हरपू दे पण) रसद टकाटक तयार आहे प्रकाशवर्षी मोजपट्टी डार्कमॅटरचा भव्य फळा धूमकेतूचा खडूतुकडा होल्डाॅलमध्ये भरला आहे दिशा कोन ढळून जातील घड्याळ काटे उलटे फिरतील उद्याच्या बातम्या काल कळतील याची तयारी ठेवली आहे मुक्कामाला पोचलो तर दृृृष्ट तिथे काढतील माझी त्यासाठी मी कृृृष्णविवरछाप काजळडब्बी घेतली आहे आता फक्त यान कुठचे इंधन साठवायला कॅन कुठचे उकडले तर फॅन कुठचे ह्या प्रश्नांशी लढतो आहे अनंताच्या यात्रेसाठी फक्त निघायचं बाकी आहे

हितोपदेश

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 04/03/2021 22:47 या दिवशी प्रकाशित केले.
लिस्टिलेली थोतांडे । पचवुनी छद्मशास्त्रांचे घोडे पहा दौडती चोहीकडे । सोमिवरी बिंधास नवशास्त्रांचे अवडंबर । माजवू नका इत:पर सर्वज्ञ अमुचे पूर्वज थोर । विसरू नका पळभरी जे जे शोधिता कष्टाने । करोनी खर्चिक संशोधने ते ते आम्ही अंतर्ज्ञाने । जाणितो सहज सोडा विज्ञानाचा हेका । नका मारू गमजा फुका सर्वज्ञतेचा घाऊक ठेका । घेतलासे आम्हीच छद्मशास्त्रांच्या रेट्यात । शास्त्रकाट्याची काय मात मूग गिळोनी तस्मात । बसोनी ऐसावे ---------------------------- जड घेतल्यास लय भारी ;-)

क्रिकेटची आवाजकी दुनिया

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी सोमवार, 14/12/2020 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
इयम आकाशवाणी| संप्रतिवार्ता श्रुयन्ताम| प्रवाचक: बलदेवानन्द सागरः "उठा बाळा... साडेसहा वाजून घेले बघ!" एsssss आघाडा दुर्वा फुलैsssय्यो.... सकाळची ६ वाजून १६ मिनिटं झालेली आहेत... आता ऐकूया "उत्तम शेती" ह्या सदरात उसावर पडणार्‍या तांबेरा रोगाच्या उपायांची माहिती... "कार्ट्या उठ नाहीतर शाळेला उशीर होईल" "पाचच मिनिटं गं आई" ह्यानंतर... र. ना.