Skip to main content

थोडा थोडा

लेखक अनन्त्_यात्री यांनी बुधवार, 06/11/2024 19:57 या दिवशी प्रकाशित केले.
सुपारीबाज टपोरीने खंडणीसाठी कपाळावर टेकविलेल्या कट्ट्याचा निष्ठुर घोडा घोडेबाजारात निष्ठेची झूल आडसाली बदलण्यात निर्ढावलेला संधिसाधू घोडा जितांनी केलेल्या जेत्यांच्या जयजयकारात गुदमरलेला अश्वमेधी घोडा बुद्धिबळाच्या कृष्णधवल अवकाशात अवघडलेला अडिचक्या चालीचा घोडा गर्निकाच्या युध्दविकल चौकटीत पिकासोने कोंडलेला टाहो फोडणारा घोडा व्याधविद्ध मृगनक्षत्राच्या झगमगत्या चौकटीत दडलेला तेजोमेघी घोडा बहुरूपी घोडा समजू लागलाय थोडा थोडा
लेखनविषय:

वाचने 1030
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया