मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ज्योतिष

आमची बी एक

मुक्तसुनीत ·
आमची प्रेरणा : ही भयभीषण कविता कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर विसर षंढ-गंध आता , जाळुनीया राख कर वेड होते त्या मिपाला, मांडिशी तू भोंडला वेड 'तात्या'ला तुझे जो, कायमीचा झोपला यायचे ते ना पुन्हा, तू वाट बघणे बास कर.. कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर टांगण्या वेशीवरी तव लक्तरे सारे पुढे चिंधड्या तव "कव्वितेच्या" फ़ाडती शेंबडी मुले ना कुणी तुज तारीफेला , तू अपेक्षा लाख कर!! कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर कोण झोपे, काय झाले, ना इथे पडले कुणा "भीक नाही , काव्य आवर" बाकी कुणी काही म्हणा "जळ्ळीं मेली लक्षणे ती, हे रसीका तूच मर!"

<<ज्योतिष - भाकीताचा पडताळा>>

युयुत्सु ·
लेखनविषय:
मी वर्तवलेले पोर्णिमेचे भाकीत खरे ठरतेय असे पे पर मधल्या बातम्यांवरून दिसत माझे भाकित "दिनांक १३ ऑगस्ट २०११ रोजी सायन सिंह-कुंभ राशीत २० अंश ३६ मि.वर होणारी पौर्णिमा अत्यंत घाणेरडी असून ती बर्‍याच जणाना त्रास देण्याची शक्यता आहे. जनक्षोभ, घातपात किंवा मोठे अपघात दर्शवणारी ही पौर्णिमा अनेकाना मन:स्ताप, शारीरिक इजा किंवा हानी निर्माण करणारी ठरेल." पेपर म धली बातमी http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9540188.cms या जोडीला लंडन मधिल हिंसाचार आहेच... टिप - ही जाहिरात नव्हे

भविष्य वर्तवणार्‍यांना आव्हान....इत्यादि...इत्यादि

जयंत कुलकर्णी ·
मित्रहो, आपल्या येथील एका सदस्यांनी त्यांची सतत हेटाळणी होत आहे या समजामुळे ज्योतिष्यशास्त्रासाठी आव्हान स्विकारले आहे. त्यासाठी त्यांनी काही फीही आकारायची ठरवले आहे व ती परत मिळणार नाही असेही जाहीर केले आहे. त्याचे कारण त्यांनी त्यांना या सगळ्यासाठी कष्ट करावे लागणार आहेत त्यासाठी ते पैसे त्यांना मिळाले पाहिजेत असे जाहीर केले गेले आहे. एक गोष्ट त्यांनी लक्षात घेतलेली दिसत नाही ती ही की हे कार्य कोणाच्या घरचे नसून या शास्त्राचा खरेखोटेपणा सिद्ध करण्यासाठी आहे. त्यात त्यांच्या विरूद्ध दंड थोपटून उभे रहायचे कोणाला वैयक्तिक कारण असेल असे मला वाटत नाही.

ज्योतिष - भाग -२ दिनांक १३ ऑगस्ट २०११ रोजीची अत्यंत घाणेरडी पौर्णिमा

युयुत्सु ·
लेखनविषय:
काल प्रसिद्ध (खाली वाचा) केलेल्या लेखाचा हा पुढचा आणि शेवटचा भाग. यात ज्यांच्या जन्मत्रिकेतील मंगळ, शनी, हर्षल, नेपच्यून आणि प्लुटॊ १३ ऑगस्ट २०११ च्या पौर्णिमेने बाधित होतात, त्यांची यादी दिली आहे. (टीप - ब्लॉगची जाहिरात केल्याचा आरोप सातत्याने होत असल्याने यावेळेस संपूर्ण लेख इथे देत आहे) पुढे दिलेल्या तारखांना जन्मलेल्या व्यक्तींच्या पत्रिकेत पौर्णिमेमुळे मंगळ सक्रिय होतो.

ज्योतिष - दिनांक १३ ऑगस्ट २०११ रोजीची अत्यंत घाणेरडी पौर्णिमा -१

युयुत्सु ·
लेखनविषय:
३१ जुलैच्या शुभ अमावस्येने अमेरिकेला आर्थिक पेचातून तारले आता पुढे काय आहे ते बघायला हवे. सहसा मी पौर्णिमेविषयी लिहीत नाही अशी बर्‍याचजणाची तक्रार आहे, पण या खेपेस लिहायचे ठरवले आहे. कारण आगामी पौर्णिमा ज्या ग्रहयोगांमध्ये सापडली आहे ते बघता लोकाना सावध न केल्यास तो एक प्रकारचा ज्योतिषाशी अप्रामाणिकपणा ठरण्याची शक्यता आहे. दिनांक १३ ऑगस्ट २०११ रोजी सायन सिंह-कुंभ राशीत २० अंश ३६ मि.वर होणारी पौर्णिमा अत्यंत घाणेरडी असून ती बर्‍याच जणाना त्रास देण्याची शक्यता आहे. जनक्षोभ, घातपात किंवा मोठे अपघात दर्शवणारी ही पौर्णिमा अनेकाना मन:स्ताप, शारीरिक इजा किंवा हानी निर्माण करणारी ठरेल.

"प्यार का पंचनामा"... सिनेमाची ओळख

भडकमकर मास्तर ·
प्यार का पंचनामा. दोन महिन्यांपूर्वी "प्यार का पंचनामा" नावाचा सिनेमा येऊन गेला.. आला कधी गेला कधी कळलाही नाही या टाईपातला हा सिनेमा. तूनळीवरती याच्या संवादांच्या काही क्लिप्स पाहिल्या होत्या. हे प्रोमोज आवडलेही होते. पण बर्‍याचदा प्रोमोज बरे असतात आणि सिनेमा कंटाळवाणा असतो त्यामुळे सिनेमाकडून फ़ार अपेक्षा नव्हती...तरीही पाहिला आणि हा सिनेमा चक्क आवडला. मजा आली. तूनळीवरची झलक http://www.youtube.com/watch?v=pwSmmJV1XvY गोष्ट सोपी आहे. रजत, निशांत आणि चौधरी या नावाचे तीन बॅचलर आय्टी इन्जिनियर्स फ़्लॅटमेट्स आहेत.

[ज्योतिष] दिनांक ३१ जुलै २०११ रोजीची शुभ अमावस्या

युयुत्सु ·
लेखनविषय:
दिनांक ३१ जुलै २०११ रोजी सायन सिंह राशीत ७ अंश १९ मि.वर होणारी अमावस्या गोचर हर्षल बरोबर नवपंचम योग करते. याशिवाय गोचर प्लुटो बरोबर quincunx () नावाचा एकच त्रासदायक योग करते, आदल्या दिवशी दिनांक ३० जुलै २०११ रोजी चंद्र-शुक्र युती होत असून ही युती हर्षल बरोबर नवपंचम योग करत असल्याने, ही अमावस्या बर्‍याच प्रमाणात शुभ ठरण्याची शक्यता आहे. जन्म पत्रिकेत रवि, चंद्र, लग्न, ख-मध्य व शुक्र हे जर सुस्थितीत असतील तर अमावस्ये दरम्यान केलेले मोठे आर्थिक व्यवहार फायदेशीर ठरतील किंवा पूर्वी केलेल्या व्यवहारांचे लाभ पदरात पडतील. अधिक वाचण्यासाठी - http://rajeev-upadhye.blogspot.com/2011/07/blog-post_25.html

[ज्योतिष] माझा उत्कर्ष कुठे होईल?

युयुत्सु ·
लेखनविषय:
माझा उत्कर्ष केव्हा होईल आणि कुठे होईल? हा ज्योतिषांना कायम विचारला जाणारा प्रश्न.यातल्या "केव्हा"चे उत्तर देण्यासाठी दशा, गोचर ग्रह, चलित ग्रह इत्यादींचा उपयोग केला जातो. तर "कुठे" हा प्रश्न पारंपरिक ज्योतिषात अजब तर्‍हानी हाताळला जातो. प्रश्नांची उत्तरे पण संदिग्ध अशीच असतात. पाण्याजवळ उत्कर्ष होईल किंव जुनाट अथवा वडलोपार्जित वास्तूत उत्कर्ष होणार नाही इ. इ.

[ज्योतिष] दिनांक १ जुलै २०११ रोजीची अभद्र अमावस्या

युयुत्सु ·
लेखनविषय:
दिनांक १ जुलै २०११ रोजी सायन कर्क राशीत ९ अंश ८ मि. वर अमावस्या होत असून ही अमावस्या गोचर शनी, युरेनस (हर्षल) बरोबर केंद्र योग करते. त्यात शनी बरोबर होणारा केंद्र योग हा अत्यंत तीव्र स्वरुपाचा आहे. या शिवाय ही अमावस्या प्लुटॊबरोबर प्रतियुती करते. थोडक्यात अमावस्ये मुळे बृहच्चौकोन ही भौमितिक रचना तयार झाली असल्याने ही अमावस्या एकंदर "अभद्र" अशीच म्हणावी लागेल. अपघात, अडथळे, वैफल्य, घातपात, क्वचित जनक्षोभ किंवा नैसर्गिक आपत्तीच्या बातम्या या अमावस्येच्या पुढेमागे १ आठवडा संभवतात.

दिनांक २ जून २०११ रोजीचे खंड्ग्रास सूर्यग्रहण

युयुत्सु ·
लेखनविषय:
दिनांक २ जून २०११ रोजी सायन मिथुन राशीत ११ अंशावर अमावस्येची रवि-चंद्र युती होत असून हे या वर्षातील दूसरे सूर्यग्रहण आहे. हे ग्रहण खंडग्रास आहे. पश्चिमोत्तर भारताच्या काही भागात हे ग्रहण जेमतेम १० टक्के दिसेल तर युरोपात ६० ते ८० टक्के दिसेल. ग्रहणाची ही अमावस्या फक्त एकच गोचर योग करते तो म्हणजे शनीशी नवपंचम योग करते. मात्र सायन तूळ राशीत असलेला शनी मात्र बुध, युरेनस, प्लुटॊ याच्यांशी त्रासदायक योग करतो.