मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बालकथा

अकुंच्या - पकुंच्या ....

विवेकपटाईत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आमची छकुली (आमची नात) आता पाच महिन्यांची होत आली आहे. तिच्या हिरड्या सळसळू लागल्या आहे, जे समोर दिसेल त्या वर तोंड मारायचे, तोंडात घालून चोखून बघायचे. मग स्वत:च्या पायाचा अंगठा का असेना. काल गम्मत म्हणून कारले तिच्या तोंडात दिले. थुर्रSS करत विचित्र तोंड बनविले आणि भोंगा पसरला. बहुतेक रडताना विचार करत असेल, आजोबा, काही दिवस थांबा, मला मोठी होऊ द्या, बघून घेईल तुम्हाला, काय समजता स्वत:ला. च् च् च् करत तिला दोन्ही हातानी वर उचलले, तिच्या नाकाला आपले नाक रगडले. हा तिचा आवडता खेळ.

परीकथेची सव्वा दोन वर्षे - भाग ९

तुमचा अभिषेक ·
लेखनविषय:
३ जून २०१६ जेव्हा केव्हा रस्त्याने येता जाता आम्हाला डॉगी दिसतो .. अर्थात मुंबईच्या रस्त्यावर दर चौथ्या पावलावर कुत्रे दिसतेच .. तेव्हा त्याला बघून परीची बडबड अशी असते, "मम्मा भूभूऽऽ ... मम्मा भूभूला घाबरते माऊ भूभूला घाबरते अर्चू माऊ भूभूला घाबरते अप्पू माऊ भूभूला घाबरते .. परी भूभूला घाबरत नाही . . (कारण...) .... ... .. परीचे पप्पा भूभूला फाईट देतात :) फिलींग सुपर डॅड .. :) (फक्त भूभूला आमची भाषा समजत नाही हे माझे नशीब!) . . ६ जून २०१६ रात्री झोपण्यापूर्वी, बेडवर पडल्यापडल्या, तासदिड तास, झोप येण्यापूर्वी, रोजच आमची काही ना काही धमाल असते.

परीकथेची दोन सव्वा दोन वर्षे - भाग ८

तुमचा अभिषेक ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
९ एप्रिल २०१६ आजी आजोबांनी नातवंडांचे हात धरून अक्षरे गिरवायला शिकवायचा काळ केव्हाच ईतिहासजमा झालाय. सध्या आमच्या रात्रशाळेत प्रौढशिक्षणाचे वर्ग भरतात. ज्यात परी आजीआजोबांचे बोट पकडून त्यांना स्मार्टफोन वापरायला शिकवते :) . . १७ एप्रिल २०१६ बाबड्या चुरूचुरू बोलायला लागलीय तशी कॉमेडी, आगाऊ आणि बरेच काही झालीय. प्रत्येक गोष्टीत आपले लॉजिक लावू लागलीय. त्या दिवशी गार्डनमध्ये आम्ही पकडापकडी खेळत होतो. तिच्या हाताला सहजी लागणार नाही एवढा वेग ठेवून मी पळत होतो. मी पुढे पुढे, ती मागे मागे. थोड्याच वेळात ती समजली, की पप्पाला काही आपण पकडत नाही. तसे म्हणाली, "जास्त नको पळू. थोडे थोडे पळ.

< < < < मजबूरी हय > > > >

चांदणे संदीप ·
मिकादा, पैजारबुवा, अभ्यादादा आऊर रातराणीतै के पिच्चे पिच्चे मै भी कस्काय चल पड्या कायच म्हैती नाही. पन मेरा भी जळके करपा मस्सालाभात हुवा इस्लीये मयनेभी हिन्दिक्की चिंदी करनेका ठाणच डाल्या. मंग काय...एक आय अपने पोरट्याको कयसे धोपातटी हय वैच्च चित्र कविता मे उतारके इद्दर डालरा हू!

शिव दुग्धाभिषेक -सत्य घटने वर आधारित

विवेकपटाईत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सन १९७०-७२चा काळ. जुन्या दिल्लीत नवी बस्तीतून एक गल्ली नया बाजार कडे जाते, त्या गल्लीत एका घरात राधा-कृष्णाचे मंदिर होते. मंदिराच्या प्रांगणात शिवपंचायत हि होती. भक्त गण आधी महादेवाच्या पिंडीवर दुग्धाभिषेक/ जलाभिषेक करायचे आणि नंतर राधा-कृष्णाचे दर्शन घेत असे. मंदिर निजी संपती असली तरी जवळपासच्या भक्तांसाठी मंदिर सकाळी १० पर्यंत उघडे राहात होते. मंदिराच्या बाहेर एका पायाने अधू असलेली भिकारीण भिक मागण्यासाठी बसत होती. तिची कहाणी हि अत्यंत दारूण होती. जवळपास दोन एक वर्षांपूर्वी आपल्या नवर्यासोबत ती मजदूरी करायला जुन्या दिल्लीत आली होती.

मरण!

DEADPOOL ·
"अरे का तापलायेस माझ्यावर? या निष्ठुर जगातल्या लोकांनी दिलेले चटके कमी आहेत का! तु तरी घे एकदाचा जीव माझा!" म्हातारा आकाशकडे पाहुन बडबडत होता.

घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया ४

DEADPOOL ·
वाचकहो घोस्टहंटरला झालेल्या अक्षम्य दिरंगाईबद्दल मी माफी मागतो. भ्रमणध्वनि वर टंकण करत असल्याने मालिकेस उशीर झाला. पुढील भाग लवकर येतील याची खात्री बाळगावी! १. तर मंडळी रोला अजूनही समजत नव्हते की पायरेटचा अंत कसा करावा, कारण पायरेट कोणत्याही शस्त्र अथवा अस्त्र याने घायाळ होत नव्हता. शैतानाच्या दूताकडून त्याला ही जहाज मिळाली होती.त्या जहाजाच्या प्रत्येक भागावर त्याची हुकुमत चालू होती. जहाजाची प्रत्येक दोरी म्हणजे एक साप होतात. असे अनेक प्रकारचे साप तिथे होते. रो कंटाळून त्याच्या ऑफीसमध्ये बसला होता.

परीकथेची दोन वर्षे - भाग ७

तुमचा अभिषेक ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
१४ मार्च २०१६ आज परीला घेऊन गार्डनमध्ये गेलो. गेल्यावेळी तिची मम्मा असल्याने थोडा तरी रिलीफ होता, पण आज मी एकटाच असल्याने समोर काय संकट वाढून ठेवलेय याची कल्पना होती. गेल्यावेळी मी तिला घसरगुंडीत मदत करून तिचा अहंकार दुखावला होता. ते लक्षात ठेवून यावेळी माझा हात झटकून आपले आपणच घसरगुंडीची मजा लुटू लागली. कधी या घसरगुंडीने उतरायची तर कधी त्या घसरगुंडीने. त्याकडे लक्ष ठेवत तिथे पळत जात फिल्डींग लावायचे काम माझे. एकाच सेट अप मध्ये विविध घसरगुंड्या बनवायचे दिमाग कोणाचे काय माहीत. त्याला हे हाल दाखवायला हवे होते. मी तिला खाली झेलतो न झेलतो ते ‘अजून अजून’ म्हणत पुन्हा शिडी चढायला पळत सुटायची.

दहशत - एका नव्या रूपात!

चांदणे संदीप ·
त्याने असं काय विचारल तिला की आतापावेतो गप्पांमध्ये सहभागी असणारी ऑफिसातली मंडळी अचानकपणे सुन्न झाली. आमावस्येच्या रात्री गावाबाहेरच्या जुन्या पडक्या देवळामागच्या काळोखात बुडून गेलेल्या झुडूपांमध्ये असते तशी भेदक कळा त्या झगमगत्या फॉल्स सिलींगमधल्या रोषणाईला आली होती. शांततेचा पारा तर उणे शेकड्यात जाऊन गुरफटून बसला. काहींच्या चेह-यावर अस्वस्थता इतकी दाटली की त्या ऑफिसातल प्रत्येक क्युबिकल आयसीयू वार्ड प्रमाणे भासू लागल.

परीकथा भाग ६ - (फेसबूक स्टेटस पावणेदोन ते दोन वर्षे)

तुमचा अभिषेक ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
२१ डिसेंबर २०१५ खाली डोके वर पाय, शीर्षासन करणे.. पाठीच्या कण्याला हाडच नसल्यासारखे शरीराची उलटी कमान करणे.. हाताच्या अंगठ्या ऐवजी पायाचा अंगठा चोखणे.. पटापटा श्वास घेत पोटाची पिशवी आतबाहेर करणे.. आत्ताच ही लक्षणे आहेत, तर मोठी होत पतंजली नूडल्स खायला लागेल तेव्हा तर विचारायलाच नको :) . . २३ डिसेंबर २०१५ प्रत्येक देशाची जशी एक खाद्य संस्कृती असते तशी प्रत्येक मुलाचीही एक असते. एक आमचीही आहे. अन्न हे फक्त खाण्यासाठी असते आणि ते खाण्यासाठी देवाने एक तोंडच काय ते दिले आहे, या खुळचट कल्पनांवर आमचा जराही विश्वास नाही. आईसक्रीम आम्हाला नाकानेही खाता येते.