अकुंच्या - पकुंच्या ....
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about अकुंच्या - पकुंच्या ....
- 21 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
आमची छकुली (आमची नात) आता पाच महिन्यांची होत आली आहे. तिच्या हिरड्या सळसळू लागल्या आहे, जे समोर दिसेल त्या वर तोंड मारायचे, तोंडात घालून चोखून बघायचे. मग स्वत:च्या पायाचा अंगठा का असेना. काल गम्मत म्हणून कारले तिच्या तोंडात दिले. थुर्रSS करत विचित्र तोंड बनविले आणि भोंगा पसरला. बहुतेक रडताना विचार करत असेल, आजोबा, काही दिवस थांबा, मला मोठी होऊ द्या, बघून घेईल तुम्हाला, काय समजता स्वत:ला.
च् च् च् करत तिला दोन्ही हातानी वर उचलले, तिच्या नाकाला आपले नाक रगडले. हा तिचा आवडता खेळ.