परीजन्माची कहाणी - http://misalpav.com/node/27398
परीकथेचे सव्वा वर्ष - http://misalpav.com/node/32062
परीकथा २ - सव्वा ते दिड वर्ष - http://misalpav.com/node/32553
३१ ऑगस्ट २०१५
सध्या आमच्याकडे रोज डंबशेराजचा खेळ चालतो.
जीभ बाहेर काढून ती बोटाने त्यावर टिकटिक करते, तेव्हा तिला जेली नाहीतर चॉकलेट खायचे असते.
हाताने हवेत गोल गोल रेघोट्या मारते, तेव्हा पाटीवर खडू गिरवायचा असतो.
जेव्हा तोच हात वायपरसारखा फिरवते, तेव्हा ते गिरवलेले साफ करायला डस्टर हवा असतो.
फोन हवा असल्यास हात कानाला लावते, तर झोपायचे असल्यास तसाच हात कानाला लावत मान झुकवते.