Skip to main content

बालकथा

ऑक्टोबर मध्ये होणारे ३ कट्टे.....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 06/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
ह्यावेळी डोंबोली, ठाणे आणि पुणे इथे ३ कट्टे होणार आहेत. डोंबोलीतला कट्टा नक्की झाला आहे. ठाण्यातील आणि पुण्यातील कट्या संदर्भातील इतर माहिती लवकरच कळवण्यात येईल. डोंबोली कट्ट्याची माहिती खालील प्रमाणे... १. ठिकाण ===> नंदी पॅलेस २. दिनांक ===> १८-१०-२०१४ ३. वेळ ====> संध्याकाळी ७:३० ४. संपर्काचे माध्यम ===> व्य.नि. करणे. डोंबोली कट्टा झाला की मग ठाणे कट्टा आणि मग पुणे कट्टा असा बेत आहे.

जीवन - सार

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 20/09/2014 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा : काय सॉम्गॉयलॉच पायजे क्का? रॉर्बट जोत्याच्या घराकडे जाताना दिसला. मॉरेयॉ भवतेक त्यालाच शोधत होती. तसे पाह्यला गेले तर रॉर्बट आणि मॉरीयॉ दूरच्या नात्यातले. रॉर्बट मॉरीयॉ च्या मावशीच्या नणंदेच्या दिराच्या सासूचा नातू. प्ण एका लग्नात मॉरीयॉला रॉर्बट भेटला आणि ते जवळ आले. आख्खे आख्खे दिवस ते एकमेकाना आटवू लॉगले. एकमेकाम्शिवाय त्यान कर्मायचे नाही. राँर्बट जेव्वा जेव्वा मॉरीयॉला भेटॉयचा तेव्वा तेव्वा तो तिच्यासाटी पेपरमिटाच्या गोळ्या ऑणॉयचॉ. मॉरीयॉला त्या मदे भोक आस्लेल्या पांडर्या गोल्या खूप्प आवडॉयच्या. रॉर्बंट ज्जे काही करायचॉ ते अगदी श्टैल मधे करायचा.

(स्वामी चेकाळदर्शी उवाच: सनातनीनाम् किम् लक्षणं?)

लेखक मार्क ट्वेन यांनी गुरुवार, 04/09/2014 या दिवशी प्रकाशित केले.
चेकाळदर्शी बाबा ध्यानमग्न बसलेले होते, बहुधा आज संध्याकाळी पाय चुरायला येणार्‍या फिल्मतारकेबद्दल काही चिंतन करीत असावेत. अचानक त्यांनी डोळे उघडले, क्षणाचा ही बिलंब न करता मी प्रश्न विचारला, स्वामीजी मनात एक शंका आहे. स्वामी चेकाळदर्शी: काय शंका आहे बच्चा? मी: स्वामीजी सनातनी कोण असतो, त्याची लक्षणे काय? स्वामी चेकाळदर्शींच्या चेहऱ्या एक हास्याची लहर पसरली, ते म्हणाले बच्चा, समोर वडाचे झाड बघ, झाडाच्या वरच्या टोकाला एक वाळकी फांदी दिसते आहे न. मी म्हणालो होय, स्वामीजी. स्वामी चेकाळदर्शी: त्या फांदीखाली बघ, त्याखालच्या फांद्याना सनातनी असे म्हणतात.

< मिसळपाव वरील १० वैशिष्ठपुर्ण बाबी >

लेखक प्यारे१ यांनी शनिवार, 16/08/2014 या दिवशी प्रकाशित केले.
१. "मिपा" हे नाव झणझणीत पणा मुळे पडले आणि मिसळ व पाव एकञ येउन " मिसळपाव". २. काथ्याकूट हा खेळ मिपावर उदयास आला. ३. कोडाईकनाल, कृष्णमूर्ती आणि गरम पाण्याचे कुंड हे मिसळपाव वरील 'जे न देखे रवि' ह्या काव्य विभागात निर्माण झाले. ४. 'टेम्पोत बसवणे, चपला घालणे' वगैरे वाक्प्रचार मिसळपाव वर सुरु झाले. ५. जगातलं पहिलं धागा विश्लेषण वर मिसळपाव वर सुरु झालं. ४३४ प्रतिसादांच्या एका धाग्यापासुन आदूबाळ ह्यांनी त्याचं विश्लेषण केलं गेलं. ६. आजची खादाडी हा खेळ श्री विसोबा खेचर (तात्या) यांनी तयार केला आणि त्याचे खरे नाव आजची बायडी आहे. त्यामध्ये खादाडीचा उपयोग केलातर पोटोबाचे समाधान होत असे असा समज असे.

हवा हवाई

लेखक आयुर्हित यांनी शनिवार, 02/08/2014 या दिवशी प्रकाशित केले.
अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके,तेव्हा मिळते भाकर अशा अर्थाच्या हिन्दी वाक्याने, कवयित्री बहिणाबाईंना स्मरून हा हिन्दी भाषेतील चित्रपट सुरु होतो. खेडेगावात रहाणारा अर्जुन(पार्थो गुप्ते)त्याच्या वडीलांबरोबर(मकरंद देशपांडे)देवासमोर पुजा करतांना दाखविला आहे. पुजा झाल्यावर अचानक देवासमोरचा दिवा विझतो.

<बुकी स्टॉल >

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 07/07/2014 या दिवशी प्रकाशित केले.
आमची संप्रेरणा http://misalpav.com/node/28254 समोर चौकतल्या त्या चिठ्ठीवाल्या बाबूकडे पाहत होतो,काय करावे काय नको वाटत होते? किरकोळ असली चिठ्ठी ही त्याची रोजी रोटी होती. अगदी चार आण्यातसुद्धा कल्याण शुभ राशी ठाणे ओपन, कराची क्लोज, सिक्कीम ऑन लाईन वगैरे सगळेच तिथे मिळायचे.

<<< हा मिपाचा विजय >>>

लेखक प्यारे१ यांनी शुक्रवार, 16/05/2014 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही काही काळापूर्वी http://misalpav.com/node/27418 ह्या काकू द्वारे गणपा खरंच मिपाशेफ बनतील का असा एक सर्व्हे घेतला होता. तेव्हा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात 'गणपा' चा प्रचार काही जणांनी केला. त्यांच्या विरुद्ध देखील काही लोक बोलले. आज ह्या ठिकाणी निकालाच्या प्रसंगी गणपा जिंकून आलेला आहे. सगळ्या मिपाकरांनी गणपा लहरी आहे- आपलं- गणपा लहर आहे हे मान्य केलं आहे. तरी देखील गणपा जिंकला म्हणजे सगळं साध्य झालं असं होत नाही. त्याला बर्‍याच पा कृ शिकायच्या आहेत, बनवून दाखवायच्या आहेत, सुगरणींच्या सल्ल्यांमधून नेमकेपणा आणायचा आहे.

सोन्याचे नाणे आणि धर्मराजाचा न्याय

लेखक विवेकपटाईत यांनी शुक्रवार, 25/04/2014 या दिवशी प्रकाशित केले.
भल्या पाहते उगवत्या सूर्याचा सोनेरी प्रकाश अंगावर पडला कि मन कसं प्रसन्न होत. सकाळचे सोनेरी कोवळे ऊन हवे-हवे से वाटते. तसेंच सोनेरी रंगाचे सुवर्ण ही माणसाला प्रिय आहे. सुवर्णाच्या कृपेने माणसाच्या भौतिक इच्छा पूर्ण होतात. कपडे-लत्ते, टीवी, गाडी, बंगला आणि जास्त सुवर्ण असेल तर बंगल्यात राहायला पत्नी रुपात जागतिक सुंदरी ही मिळू शकते. फार पूर्वीची गोष्ट आहे, एक अडाणी व अज्ञानी माणसाला रस्त्यावर सोन्याचे एक नाणे पडलेले दिसले.नकाही विचार न करता त्याने ते नाणे उचलले आणि आपल्या खिश्यात टाकले. थोड्या वेळाने दुसऱ्या माणसाला ही रस्त्यात सोन्याचे नाणे दिसले. त्याने आजू-बाजूला बघितले.

आजोबा तुम्ही पुअर आहात का?

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 23/04/2014 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या एका मित्राने सांगितलेली खरी घटना). माझी लेक आपल्या ४ वर्षाचा लेकी सहा जवळपास दीड-एक वर्षांनी परदेसाहून परतली होती. म्हणतात न दुधा पेक्षा साय केन्हाही प्रिय. उन्हाळ्याचे दिवस आणि सुट्ट्या. गोंडस नाती बरोबर दिवस भर दंगा मस्ती करत वेळ कसा निघत होता कळतंच नव्हत. दिवस भर अविरत चालणारी तिची बडबड ऐकून मी तिचे नाव टाकिंग बर्ड ठेवले. लेकीने इशारा दिला, आजोबा फार डोक्यावर घेता आहात तिला, पण सावधान राहा, वेळ मिळताच ‘बिन पाण्याची हजामत करेल, तेंव्हा तुम्हाला कळेल, ‘टाकिंग बर्ड’ काय चीज आहे ते.