**********************
गल्लीतल्या त्या साईमंदीराच्या पुढच्या बाजूच्या बैठया चाळीत बाजूने मोठासा नाला जातो…. सततचा बगळ्याचा वावर एखादया ओढयाला लाजवेल असा… सतत पाणी वाहत असतं निवातं….. इतकं असूनही त्या परिसरात कधीही मच्छर, डास यांचा त्रास जाणवत नाही, का तर? कारण एकच, तिथं कधीही कोणत्याही वेळी धुपारे घालणं चालू असतं. कोण करतं हे? सुंदरमहाराज. इतरवेळी मस्त शर्ट-पॅन्ट घालून स्कूटीवरुन अख्खं मुंबई शहर फिरणारे पण मग संसारासाठी रोजगार आवश्यक, त्यामुळे जशी सूर्याची पाठ फिरली की भगवी लुंगी नेसत घरात प्रवेश करत आपल्या कामाला लागतात.
वाचतो आहे
शिवजयंतीच्या निमित्ताने