मराठी मालिकांची लेखनकृती
पूर्वतयारी:
१. अगदी हार्डकोर ममव१ असणं, आणि मराठी मालिकाविश्वात लागेबांधे असणं गरजेचं. चांगला शब्दसंग्रह, चांगली भाषा इत्यादी फुटकळ गोष्टी नसल्या तरी चालतील. फ्रेशर्सना प्राधान्य. आधी काही दर्जेदार लिहीलं असेल तर ह्या वाटेला जाऊ नये. हा लेखप्रकार फक्त मधल्या वेळचं/संध्याकाळचं ह्यात येतो. विचारप्रवर्तक वगैरे हवं असेल तर स्वत:चा कल्ट२ पहिले काढावा. तुमचे अनुयायी आपोआप तुमच्या लेखनाला 'युगप्रवर्तक' पर्यंत नेऊन पोहोचवतील.
२. लक्ष्य रसिकवर्ग निवडावा. महाराष्ट्रात दोनच असतात. एक म्हणजे मुंबईपुणेकर आणि दुसरे नॉन-मुंबईपुणेकर३.
मिसळपाव