मिपावर १२ वर्षे पूर्ण झाली...
लेखनप्रकार
सहज मिपावर नजर टाकताना लक्षात आले की मिपासदस्य होऊन मला १२ वर्षे झाली...!
त्या काळात माझ्याकडून ३०० धागे सादर केले गेले. हा ३०१वा असेल...
या धाग्यावर प्रियालींनी आल्या आल्या माझा बोल्ड उडवला. म्हणाल्या, मिपाचा दिवाळी अंक २००८चा येण्याच्या आधीच हा लेख प्रकाशित केला आहे? आता पाहता ९८०० टिचक्या त्याला पडल्या. नाडी ग्रंथ विषयाने धमाकेदार एन्ट्री घेतली.
त्यानंतर विविध विषयावर माझे लेखन सादर करायला हा मंच फारच उपकारक झाला. मिपाकरांच्या मेळाव्यात नवे मित्र झाले. मुंबईला जाऊन बोटीतील प्रवासकरून घारापुरीच्या लेण्याची माहितीपुर्ण सफर झाली. हवाईदलातील किस्से, अंधारछाया ही कादंबरी, गड आणि किल्ले या वरील घडलेल्या लढायांना मिपाकरांनी वाचले. मते मतांतरे सादर केली.
श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्र पोथीवर केलेले लेखन कार्य अजून मिपावर सादर केले नाही. यथावकाश करता येईल.
या काळात २५ पेक्षा जास्त ब्लॉग्जवरून काही लेखनपण सादर केले गेले. त्यातील मंगला ओक यांच्या महाभारतावरील प्रवचनांच्या ब्लॉगवर मिसळपावच्या लोगोला तिथे संपर्कासाठी चिकटवला आहे.
मिपाकरांचा स्नेह असाच राहो. आणि लेखनाला सुयोग्य प्रतिसाद मिळत राहोत.

वाचने
3176
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
तीनशे धागा क्लबमध्ये प्रवेश
In reply to तीनशे धागा क्लबमध्ये प्रवेश by दुर्गविहारी
अशा तर्हेच्या धाग्यांचा जीव
तीनशे!
तपपुर्ती आणि त्रिशतकी
तपपुर्ती आणि त्रिशतकी
आपले म्हणणे खरे आहे....