मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रतिसाद

माझी दिवाळी

संपादक मंडळ ·
नमस्कार मिपाकरहो, दिपावली अभिष्टचिंतन! कोणताही सण आला की आपण तो साजरा करताना आई काय करत असे किंवा आज्जी कसे करत असे ते आठवून, त्यांना विचारून, पुस्तकात वाचून त्या पद्धती आचरणात आणायचा प्रयत्न करतो. काहीवेळा सगळे साग्रसंगीत करायला जमते तर कधी गोष्टी शास्त्रापुरत्या कराव्या लागतात. दिवाळी हा आपल्यकडील मोठा सण समजला जातो. चार दिवस आपापले वैशिष्ठ्य टिकवून असतात. वाईट वृत्तीचा नाश करण्यापासून ते लक्ष्मीच्या पुजेपर्यंत तर सासरच्या नातेवाईकांपासून माहेरच्या नातेवाईकांची भेट घडवत हा सण आठवणींच्या सुखाची उबदार शाल मनावर अलगदपणे सोडून पुढील वर्षाची वाट पहायला लावतो.

शेवटचा तुकडा..

गवि ·
जतिन साधा माणूस आहे.  खूप शांत माणूस आहे. कुणाच्या अध्यात ना मध्यात. असं सागरदर्शन हाऊसिंग सोसायटीत राहणारे बरेच लोक म्हणायचे.  शांततेचा तळ किती खोल असतो याची जाणीव किंवा पर्वा वर वर पोहणाऱ्यांना नसते. त्याला एकटा मात्र कोणी म्हणत नव्हते. एकटे असण्यात एक काहीतरी अस्वस्थता, दुःख वगैरे असतं. गेलाबाजार उदास खिन्न चेहरा तरी असतो.  पण जतिनच्या आतमध्ये आता काहीच उरलं नव्हतं. त्यामुळे खिन्नताही दिसत नव्हती. त्याला एकटा तरी कसं म्हणायचं?  लोकांना काही अंदाज येणं शक्य नव्हतं.

शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..

आजी ·
हल्लीची काही मुलं परीक्षेत शतप्रतिशत म्हणजे शंभरपैकी शंभर मार्कस् मिळवतात. काहीजण तर शंभर टक्क्यांपेक्षा जास्त मार्कस् मिळवतात म्हणे.. कसे कोण जाणे.. हे सर्व माझ्यासारख्या आजी, आजोबा झालेल्या व्यक्तीला अचंबित करणारे असलं तरी ते वास्तव आहे. मी जेव्हा शाळेत जात होते तेव्हा मला कोणत्याही विषयात शत प्रतिशत गुण मिळाले असं फारसं आठवत नाही. तसं म्हटलं तर माझे भाषा विषय उत्तम होते. संस्कृत मध्ये मला दोन, तीन वेळा खरंच शत प्रतिशत गुण मिळालेही होते. पण फक्त आणि फक्त संस्कृतमध्येच.. आमच्या वेळी.. काय सांगू? ३५ टक्क्यांना पासिंग होतं. ७० टक्के मिळाले की डिस्टिंक्शन.

"गाॅसिपिंग" याने की "कुचाळक्या"..

आजी ·
गॉसिपिंग उर्फ कुचाळक्या सर्वजण करतात. आपण सगळ्यांनी ते केलंय. लहान मुलं ,स्त्रिया, पुरुष, तरुण ,म्हातारे सगळेजण गॉसिपिंग करतात. गॉसिपिंग करण्यासाठी अट फक्त एकच. ज्याच्याबद्दल किंवा जिच्याबद्दल गाॅसिपिंग करायचं ती व्यक्ती तिथे हजर असता कामा नये. अर्थात कुणीतरी एक चहाडखोर असतोच बरं का आणि तो त्या व्यक्तीपर्यंत ही निंदा नालस्ती, टवाळकी लगबगीने पोहोचवतोच. काही पठ्ठे तर दोन्हींकडेही गाॅसिपिंग करतात आणि दोघांनाही एकमेकांच्या बातम्या पोहोचवतात. गॉसिपिंग फक्त दोघेजण किंवा अनेकजण एकत्र जमून देखील करतात. ते प्रत्यक्ष बोलून किंवा व्हॉट्सॲपवर सांकेतिक भाषेत किंवा फोनवरून देखील चालतं.

सी पी बेरार सर्किट

गवि ·
आज अचानक माझ्या लहानपणीचा भूगोल आठवला. आमचा रत्नागिरी जिल्हा तेव्हा, .. तेव्हा म्हणजे १९७० आणि १९८० च्या दरम्यान,.. पार गोव्याला जाऊन टेकला होता. देवगड हापूस आणि रत्नागिरी हापूस हे एकाच जिल्ह्यातले होते. भूगोलाच्या "आपला जिल्हा" शिकवणाऱ्या एका शालेय वर्षात आमचा रत्नागिरी जिल्हा म्हणजे नकाशातला एक लांबलचक उभट पट्टा होता. सिंधुदुर्ग जिल्हा झाला आणि तळकोंकण अशी वेगळी आयडेंटिटी गडद झाली. माझ्या रम्य बालपणी आम्ही रोज शाळेत पोचताच प्रार्थना म्हणण्यापूर्वी "प्रतिज्ञा" म्हणायचो.

मंगळावरील मुरुमातील मुंग्यांचा मुरांबा.

गवि ·
**मंगळावरील मुरुमातील मुंग्यांचा मुरांबा : एक प्राचीन-आधुनिक-वैज्ञानिक पाककृती** --- कालच घरच्या मागच्या अगण्णात मुंग्यांची रांगा दिसली आणि मन भूतकाळात गेल. माझ्या लहानपणी आमच्या गावी लाल मुंग्यांची दिसत असत. आमची आत्या त्या मुंग्यांची चविष्ट चटणी बनवत असे. मी विचार केला की आपण मानवजातीच्या विकासासाठी भविष्यकालात इतर ग्रहांवर देखिल खाता येऊ असा मुरंबा का बनवू नये.

निशानची (हिंदी सिनेमा)

मन ·
‘निशानची’ (अर्थ : नेमबाज, बंदुकबाज, sniper) ह्या सिनेमाचे दोन्ही भाग आवडले. सिनेमाचा विषय एका पैलवान असणाऱ्या वडिलांच्या संशयास्पद मृत्यूनंतर कुटुंबाची झालेली स्थिती, त्या परिस्थितीला दोन भिन्न स्वभावाच्या जुळ्या भावांनी आणि नेमबाजीमध्ये तरुणपणी निपुण असणाऱ्या,  पदकविजेत्या त्यांच्या आईने दिलेलं तोंड, त्यानंतर उलगडत जाणाऱ्या घटना, नवीनच माहिती होत गेलेले धागेदोरे आणि दरम्यान वाढत गेलेली गुंतागुंत असा काहीसा सांगता येईल. अनुराग कश्यपच्या इतर काही सिनेमांप्रमाणेच ह्यातही महिला पात्रे निव्वळ पूरक भूमिका म्हणून, सोबत असायला हवीत म्हणून अशी असण्यापलीकडे आहेत.

छोटीसी बात, गोईंग डाऊन आणि येरूडकर..- किंडल बुक्स..

गवि ·
तिसरं किंडल बुक आता आलं आहे. यातली शीर्षक कथा मौज प्रकाशनाच्या मौज दिवाळी अंकात प्रकाशित झाली होती. जी आता केवळ या पुस्तकातच वाचायला मिळेल. इतर अनेक कथा मिपावर आधी आलेल्या आहेत. पण तरीही ज्यांना शक्य आहे त्यांनी हेही पुस्तक किंडलवर वाचावं, संग्रही ठेवावं किंवा किंडल अनलिमिटेडवर विनामूल्य वाचावं. माझी एक विनंती आहे.. की ज्यांना शक्य आहे त्यांनी या पुस्तकाला अमेझॉनवर रेटिंग देऊन (तारांकित करून) आणि रिव्ह्यू लिहून या पुस्तकाला जगभर पोचवण्यासाठी मदत करावी. रिव्ह्यू किंवा मत अगदी दोन चार ओळींत लिहीलंत तरी चालेल.

निसर्ग आणि माणूसपणाच्या कविता- प्रहरांच्या अक्षरनोंदी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·

‘प्रहरांच्या अक्षरनोंदी’ या आपल्या मिपाकर मी-दिपाली उर्फ दीपाली ठाकूर यांच्या पहिल्या-वहिल्या कवितासंग्रहाचं नुकतंच प्रकाशन झालं. दीपाली ठाकूर या विज्ञान शाखेच्या प्राध्यापिका आहेत. दीपाली ठाकूर या आंतरजालावर प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्या नावाची चर्चा झाली ती त्यांच्या 'बहावा' या कवितेमुळे. फेसबुक, इन्स्टाग्राम, मराठी संकेतस्थळे, ब्लॉग यावर त्यांची ही कविता झळकली आणि त्यानंतर त्यांची ही कविता कोणीतरी कॉपीपेस्ट वाल्याने 'इंदिरा संत' यांच्या नावाने पुढे ढकलली.

चालु घडामोडी- ऑक्टोबर/ नोव्हेंबर -२५

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·
नमस्कार, पाऊस पडून गेला आहे. निसर्गाने हिरवा शालू नेसला आहे. सगळीकडे हिरेवेगार डोळ्याला सुखावणारे चित्र वाटावे असा निसर्ग नटला आहे. नद्या, आपला तीव्र आवेग आवरुन हळुहळु संथ गतीने रमत गमत वाहात आहेत. 'नदीला पुर आलेला, कशी येऊ कशी येऊ ?' असा प्रेमभावनेचा काळ आता सरला आहे. जीवन वास्तवावर आलं आहे, जगण्याची धावळपळ सुरु आहे. शाळा-महाविद्यालयांना सुट्या लागणार आहेत. मिपावर दिवाळी अंकाची लगबग सुरु आहे. मिपावर पाऊस-पाण्यामुळे ऑक्टोबरच्या चालू घडामोडीचा धागा दिसेना तेव्हा, कोणीच पुढाकार घेत नाही म्हटल्यावर गप्प राहील तो मिपाकर कसला म्हणून ऑक्टोबर नोव्हेंबरच्या चालू घडामोडीचा धागा.