अरविंद बाळ यांची अंनिसवरील अप्रकाशित प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in जनातलं, मनातलं
28 Oct 2020 - 6:24 pm

प्रास्ताविक - आमचे ज्येष्ठ मित्र श्री अरविंद बाळ यांचे दि.27 ऑक्टोबर 2020 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.आंतरजालावरील उपक्रम या संकेतस्थळाविषयी मी जेव्हा जालाबाहेरील लोकांशी चर्चा करत असतो त्यावेळी त्यांना मराठी संकेतस्थळाविषयी उत्सुकता तर असतेच पण येथील चर्चांविषयी एक आकर्षणही असत. श्री अरविंद बाळ यांचे लेखन हे जालाबाहेरील वर्तुळात असते. गप्पांमधुन ते भरभरुन बोलतात पण लिखाणाबाबत जरा उदासीनच. अरविंद बाळ हे B.E. (Civil) व्यवसायाने सिव्हिल इंजीनिअर . या क्षेत्रातील कंपन्यातून नोकरी व नोकरीनिमित्त भारतभर प्रवास. तीन वर्षे इराकमधे वास्तव्य. निवृत्ती सन 2000 घेतल्यावर पुण्यात कर्वेनगरला स्थायिक. ज्ञानप्रबोधिनीशी राष्ट्रवाद विचार मंडळापुरताच संबंध.मुस्लिम सत्यशोधक मंडळाशी कायम संपर्क व त्याचे एक हितचिंतक. Pakistan India Peoples Forum for Peace & Democracy च्या पुणे शाखेचे सभासद.त्यांचे काही लेख अंतर्नाद, परममित्र इत्यादीतून प्रसिध्द. झाले आहेत. अनेक विचारसरणींच्या बैठकांना ते नेहमी जातात. त्यात अंनिस च्या बैठकीला आपटे प्रशालेत ते सुरवातीला आले होते. तेव्हापासून त्यांची माझी ओळख व पुढे मैत्रीपूर्ण संबंध. अंनिसशी त्यांचे फारसे जमले नाही कारण त्यांची मते कडवी इहवादी व निरिश्वरवादी होती. त्यांनी दै सकाळ व डॉ नरेंद्र दाभोलकर यांना पाठवलेली व प्रकाशित न झालेली वाचक या नात्याने प्रतिक्रिया- दि. 19/12/2000. मल ही प्रतिक्रिया स्वतंत्र पत्रासोबत पाठवली होती. ते पत्रही एक सार्वजनिक दस्तैवज आहे. त्याविषयी नंतर कधी तरी.

अरविंद बाळ यांची अंनिसवरील अप्रकाशित प्रतिक्रिया

“मी हिंदू आहे म्हणून आधी माझ्या धर्मातील अंधश्रद्धा दूर करण्याचे काम करतो” डॉ नरेंद्र दाभोलकर
सुमारे दोन महिन्यापूर्वी प्रभात वाहिनीवर डॉ. दाभोलकरांची श्री.सुधीर गाडगीळ यांनी घेतलेली मुलाखत " थेट भेट” या कार्यक्रमात पाहिली. श्री गाडगीळ यांनीही हा एक प्रश्न “ तुम्ही फक्त हिंदु धर्मातल्या अंधश्रद्धेविरुद्ध चळवळ करता का ? ” विचारला. पण त्यावेळी मात्र दाभोलकर यांनी वेगळीच नव्हे तर जरा विरोधीच भूमिका घेतली. डॉ. दाभोलकर म्हणाले, “या देशांत बहुसंख्य हिंदु आहेत म्हणून सहाजीकच आमच्या चळवळीतून हिंदु धर्मातल्या अंधश्रद्धांवर जास्त प्रमाणात घाला घातला जातो. पण मुसलमान आणि ख्रिश्चन धर्मातल्या अंधश्रद्धांवरही आम्ही चळवळी केल्या आहेत. आमच्या चळवळी धर्मनिरपेक्ष आहेत. लोकसंख्येप्रमाणे कमी प्रमाणात का होईना पण मुसलमान, ख्रिश्चन कार्यकर्तेही आमच्या चळवळीतून कार्यकर्ते आहेत." श्री गाडगीळांनी तेव्हा अशा मुसलमान व ख्रिश्चन कार्यकत्यांची नावे विचारली नाहीत. मी ती विचारु इच्छितो कृपया डॉ. दाभोळकरांनी ती नावे प्रसिद्ध करावीत.
पण त्याहून महत्वाचा मुद्दा असा की परवाच्या आपल्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या भाषणाच्या वृत्तांतात ( पुणे दि. 30 जुलैला झालेले व्याख्यान) डॉ दाभोलकरांनी असं विधान केल आहे की,” मी हिंदु आहे म्हणून आधी माझ्या धर्मातल्या अंधश्रद्धा दूर करण्याचे काम करतो. आधी स्वत:चे घर स्वच्छ करावे ,नंतर बाहेर बघावे, हा त्यामागील उद्देश आहे.” डॉ दाभोलकर पुढे असही म्हणाले, "तुम्ही असं कधी म्हणता का हो, हा रोज रोज फक्त स्वतःचच घरा का झाडतो? शेजार्यांगची घरे का झाडत नाही!" या वाक्यावर मंदसा हशाही झाला (व्याखानाला मी उपस्थित होतो)
डॉ दाभोलकरंच्या या विधानातून, विचारधारेतून एक गोष्ट स्पष्ट होते. डॉ दाभोलकर स्वत: व ते” अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रतिनिधित्वातून बोलत असतील तर अंनिस.असं मत आहे की,” ते हिंदु म्हणूनच स्वत:च्या घरात रहातात.
हिंदुंच घर स्वतंत्र आणि मुसलमान ख्रिश्चन इत्यादि अन्य धर्मियांची घरे वेगळी. ते शेजारी , फार तर चांगले शेजारी , अगदी सख्खे शेजारी पण शेजारीच. आपल्या घरातील कुटुंबीय नव्हे हे मात्र नक्की.”
प्रथमत: मी असे स्पष्ट करु इच्छितो की अंनिस. च्या कार्याशी मी संपुर्ण सहमत आहे. मी शिवसेना रा.स्व. संघ भाजपा विहिंप अशा कोणत्याहि संस्थेचा प्राथमिक, द्वितीय तृतीया अशा कुठच्याही श्रेणीतील सभासद नाही. किंबहुना या सर्वच संस्था आणि चळवळीच्या धर्म सापेक्ष विचारसरणीचा मी विरोधकच आहे. पण तरीही डॉ दाभोलकर व अंनिसने काही स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे .1) अंनिस त मुसलमान आणि ख्रिश्चन कार्यकर्ते किती आहेत?. संख्येने किती आणि टक्केवारीने किती?
2) हिंदुएतर धर्मातील एकही कार्यकर्ता नसेल तर तसं का? म्हणजे हिंदु सोडून इतर धर्मियांना अं.नि.स. प्रवेश घटनेनेच नाही की तसं बंधन नसूनही कोणी मुसलमान वा ख्रिश्चन समितीत येउ इच्छित नाहीत.
3) पण मुसलमान आणी ख्रिश्चन कार्यकर्ते असतील तर डॉ. दाभोलकरांच्या वरच्या विधानाचा अर्थ काय? अशा इतर धर्मिय कार्यकर्त्यांना घेउन ते ते हिंदु आहेत म्ह्णून फक्त हिंदु धर्मातील अंधश्रद्धा दूर करण्याचंच कार्य करणार काय?
4). डॉ दाभोलकरांनी भाषणात शिवसेना, भाजप, विहिंप आणि अस्तित्वात नसलेल्या हिंदु महासभे वर हि टीका केली. ती टीका अगदी रास्तच होती. पण याहून जरा जास्तच अंधश्रद्धा असणार्याध इतर धर्मियांच्या संस्थांचा उल्लेख मात्र आला नाही. पण त्याहूनहि खटकणारी गोष्ट म्हणजे त्यांचं हे तिरकस वाक्य." एका –प्रार्थनामंदिराला उध्वस्त करुन एखादा पक्ष लोकसभेतील आपले सांसद चार वरुन एकशे चाळिसवर नेउ शकतो "- अंधश्रद्धेशी संबंध नसणारे असले राजकीय प्रश्न आणि तेही एकांगी दृष्टीने अं.नि.स.च्या भाषणातून येऊ नयेत. पुरोगामित्वाच हे एक आवश्यक लक्षण असं डॉ.दाभोलकर मानतात काय?
-या पत्राच्या (कि लेखाच्या?) समारोपात काही गोष्टी कळकळीने सांगाव्याशा वाटतात. 1, अंनिसचे कार्य संपूर्णतः स्तुत्य आहे, ते केवळ हिंदुंपुरते मर्यादित राहिले तरी आणि त्यात इतर धर्मियांचा समावेश झाला तरीहि
२ अंधश्रद्धा आणि राष्ट्रवाद याची गल्लत अंनिसने करं नये आणि आपलं कार्य क्षेत्र केवळ अंधश्रद्धा निर्मूलनापर्यंतच स्तिमित ठेवाव. 3. राजकारण आणि राजकीय पक्ष यांच्यावर टीकाटिप्पण्या करु नयेत, तिरकसपणे तर नक्कीच करु नयेत. राजकारणाशी संबंध आला तर डॉ. नरेंद्र दाभोळकरांचे शरद जोशी व्हायला वेळ लागणार नाही’.
- -अरविंद बाळ लेन नं.५ मनीषा सोसायटी, कर्वेनगर
पुणे ४११०५२

समाजप्रकटनविचारप्रतिसाद

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

28 Oct 2020 - 6:32 pm | प्रकाश घाटपांडे

यातील सर्व मतांशी मी सहमत आहे अशातला भाग नाही. पण एका कठोर निरिश्वरवादी व रॅशनॅलिस्ट माणसाचे विचार आहेत. बाळ हे एक वेगळेच रसायन होते.

प्रकाश घाटपांडे's picture

28 Oct 2020 - 6:41 pm | प्रकाश घाटपांडे

(परम-मित्र दिवाळीअंक 2006)
त्यांच्या Secularism एक सर्वंकष विचार या प्रदीर्घ लेखाचे उपक्रम वर लेखमाला केली होती

1) Secularism ची व्यत्पत्ति, अर्थ आणि इतिहास
2) Secularism चे चुकीचे लावलेले अर्थ.
3) Secularism शी गल्लत होणा-या दुस-या संकल्पना
4) Secularism आणि भारतीय राज्यघटना
5) Secularism आणि राष्ट्रवाद.
6) Secularism आणि हिंदुत्व
7) समारोप - एक स्वप्न

आंबट चिंच's picture

28 Oct 2020 - 7:08 pm | आंबट चिंच

सारखे काय हो तेच तेच .

कधीयी बघावं तेव्हा असे टीआरपी वाढवाणारे लेख टाकत आहात. कधी अंधश्रध्दा, भविष्य , फलज्योतिष

प्रकाश घाटपांडे's picture

28 Oct 2020 - 7:35 pm | प्रकाश घाटपांडे

आपल्याला न वाचायचे , प्रतिक्रिया न द्यायचे स्वातंत्र्य आहेच की!

निनाद's picture

29 Oct 2020 - 3:12 am | निनाद

फार जुना धंदा आहे यांचा हा...

प्रकाश घाटपांडे's picture

29 Oct 2020 - 10:22 am | प्रकाश घाटपांडे

फार जुना धंदा आहे यांचा हा...>>>> हे मी अस वाचतो.फार जुना छंद आहे यांचा हा... :)

निनाद's picture

29 Oct 2020 - 3:11 am | निनाद

PAKISTAN INDIA PEOPLE'S FORUM FOR PEACE & DEMOCRACY-INDIA

AIMS AND OBJECTIVES
As a members of PIPFPD, one agrees to uphold the following objective of the forum:

Promotion of peace between India and Pakistan through people to people initiatives.
Promotion of democracy and secularism.

ज्यांच्या संस्थेचे नाव घेतांना आधी पाकिस्तान लावावे लागते यातच हे फालतु लिबरल विचारजंत आहेत हे कळून येते.
बहुदा ही संस्था छुप्या रितीने आय एस आय प्रणित पण असू शकते.

घाटपांडे - यांचा तुम्हाला इतका का कळवळा आहे हे समजले नाही?

शा वि कु's picture

29 Oct 2020 - 7:42 am | शा वि कु

Get well soon.

प्रकाश घाटपांडे's picture

29 Oct 2020 - 10:19 am | प्रकाश घाटपांडे

यांचा तुम्हाला इतका का कळवळा आहे हे समजले नाही?>>>> वर लिहिल आहे ना ते मित्र होते. ते सर्व विचारसरणीच्या लोकांचे ऐकून घेत असत. त्यांचे इस्लाम धर्मांधते बद्दल चे विचार ऐकले तर ते तुम्हाला हिंदुत्ववादी वाटतील. हिंदुत्वातील सनातन्यांच्या विरोधात विचार ऐकले तर ते पुरोगामी वाटतील. पुरोगाम्यांना झोडपणारे विचार वाचले की परत तुम्हाला हिंदुत्ववादी वाटतील. असे ते वेगळेच रसायन होते. अनेक तरुण लोक त्यांच्याशी विचारविनिमय करण्यास येत. पाकिस्तान या शब्दाची अ‍ॅलर्जी त्यांना नव्हती. मलाही नाही. त्यांचे जिना भिनले हा लेख जरुर वाचा.

निनाद's picture

2 Nov 2020 - 4:13 am | निनाद

हे असे फालतू लेख वाचून त्यांचे लिबरल विष आपल्या डोक्यात कशाला कालवून घ्या?
असे काही वाचू पण नका. हे लोक अत्यंत पद्धतशीर रित्या कुंपणावर बसून विष कालवण्याचा धंदे चालवतात.
तुम्ही येथे पाकिस्तान प्रेमी मित्राचे विषारी विचार दिले आहेत तेच काढा आधी येथून.

महासंग्राम's picture

29 Oct 2020 - 9:25 am | महासंग्राम

@ प्रकाशजी लेखाच्या अनुषंगाने एक प्रश्न विचारावा वाटतो योग्य वाटलं तर उत्तर द्या

डॉ. स्वतः आस्तिक होते कि नास्तिक होते ? या वर माझा पुढचा प्रश्न अवलंबून आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

29 Oct 2020 - 10:08 am | प्रकाश घाटपांडे

तुम्हाला डॉ दाभोलकर म्हणायच आहे का? ते व्यक्तिगत जीवनात नास्तिक होते. अरविंद बाळ ही व्यक्तिगत जीवनात नास्तिक होते.

महासंग्राम's picture

29 Oct 2020 - 3:10 pm | महासंग्राम

हो डॉ. दाभोळकरांबद्दलच म्हणालो मी.

आस्तिक म्हंटल कि देव आला आणि जिथे देव आला तिथे धर्म आलाच. पण जर डॉ.नास्तिक असले तर तुम्हांला दुसऱ्यांच्या धर्मात लुडबुड कशी करू शकता ?
आणि हिंदू धर्मातल्या अंधश्रद्धा दूर करायच्या तर नास्तिक कसे म्हणवून घेता ?
सार्वजनिक आणि व्यक्तिगत जीवनात देवाच्या बाबतीत वेगवेगळ असणं हा दुटप्पीपणा असून चळवळीच्या कार्यकर्त्यांची फसवणूक नाही का ?
जर डॉ. स्वतःला नास्तिक म्हणवून घेत असतील म्हणजे ते कोणत्याही एका धर्माला न मानता सर्व धर्मांतल्या अंधश्रद्धांवर सारखे प्रहार करू शकले असते तसं का झालं नाही ? (मी माझ्या घरातली घाण आधी साफ करेन या पेक्षा वेगळं उत्तर अपेक्षित आहे. कारण जर ते नास्तिक असतील तर हिंदू धर्म त्यांचं घर नाही आणि पक्षी त्यातल्या चांगल्या वाईटावर ते अग्रक्रमाने हक्क दाखवण्याचा अधिकार नक्कीच त्यांना नाही ) .

मला डॉ. कार्याबद्दल आदर नक्कीच आहे. पण त्यांच्या काही गोष्टी नक्कीच पटत नाहीत. ते जर असते तर त्यांना नक्कीच विचारलं असतं.

हाच प्रश्न माझ्या मनात देखील आहे..
एका बाजूला तुम्ही हिंदुत्ववादी नाही, आणि सगळे धर्म समान आहेत असे सांगायचे आणि दुसरीकडे हिंदू म्हणजे माझे घर आहे असे सांगण्यात वैचारिक गोंधळ आहे असे वाटत नाही का?
नास्तिकाला कसला आलाय धर्म आणि पंथ?

अवांतर - जालावर बरेच हिंदुत्ववादी नास्तिक पाहिलेत मी, पण ते हिंदू आणि अन्य धर्मांवर सारखेच प्रहार करत असतात, त्यांनी मी हिंदू आहे असे म्हटले तर समजू शकतो, कारण ते हिंदू म्हणजे मी आणि माझा समाज या भावनेने म्हणतात, आणि त्याला सर्वधर्मसमभाव वगैरे मध्ये आणत नाहीत.

दाभोलकर सर्वधर्मसमभाव मानणारे नसतील तर माझे हे मत गैरलागू आहे.
अवांतर - पराकोटीचा डोळस (असे मी मानतो) आस्तिक असून सुद्धा मला विज्ञानवादी/नास्तिक लोकांचे आकर्षण का आहे ते कळत नाही.. याला काही कारण असेल का?

महासंग्राम's picture

29 Oct 2020 - 4:03 pm | महासंग्राम

पराकोटीचा डोळस (असे मी मानतो) आस्तिक असून सुद्धा मला विज्ञानवादी/नास्तिक लोकांचे आकर्षण का आहे ते कळत नाही.. याला काही कारण असेल का?

आस्तिक माणसाकडे acceptance जास्त असतो आपण त्याला सहिष्णू म्हणू शकतो. त्यामुळेच तो बदलला नवीन गोष्टी स्वीकारायला पटकन तयार होतो. या उलट नास्तिक माणसं जास्त हटवादी, मी म्हणेन तेच खरं असं म्हणणारी जास्त आढळतात. यात अपवाद आहेतच पण ते मोजके.

प्रकाश घाटपांडे's picture

29 Oct 2020 - 5:17 pm | प्रकाश घाटपांडे

आणि हिंदू धर्मातल्या अंधश्रद्धा दूर करायच्या तर नास्तिक कसे म्हणवून घेता ?>>> मला वाटत इथे गफलत होते आहे. हिंदु धर्मीय हे निरिश्वरवादी असू शकतात. चार्वाक दर्शन हे नास्तिक च आहे. त्याच्याही पुढे देव धर्म न मानताही लोक अध्यात्मिक असू शकतात. राजीव साने यांची इहवादी अध्यात्म ही व्याखानमाला इथे जरुर ऐका
https://www.youtube.com/channel/UCGb9L94CoQrYxta3CmxX2hQ

महासंग्राम's picture

29 Oct 2020 - 5:22 pm | महासंग्राम

अंधश्रद्धा देवाशी निगडित असतात. जर देव मानत नसाल तर त्या अंधश्रद्धा पण मानायला नको.
अंधश्रद्धा मानत असाल तर देव देव मानला आणि पर्यायाने ते आस्तिकच

इहवादामध्ये अंधश्रद्धा असतात का ? जर असल्या तर आधी त्या काही नाही दूर करत

आग्या१९९०'s picture

5 Nov 2020 - 8:49 pm | आग्या१९९०

मी माझ्या घरातली घाण आधी साफ करेन या पेक्षा वेगळं उत्तर अपेक्षित आहे. कारण जर ते नास्तिक असतील तर हिंदू धर्म त्यांचं घर नाही आणि पक्षी त्यातल्या चांगल्या वाईटावर ते अग्रक्रमाने हक्क दाखवण्याचा अधिकार नक्कीच त्यांना नाही ) .

भारतात जन्म झाल्यावर जन्मदाखल्यावर धर्माची नोंद केली जाते , धर्म न नोदवण्याचा पर्याय उपलब्ध नसतो. पूढे आयुष्यभर त्या धर्माचा शिक्का मिरवावा लागतो किवा धर्मांतर करून दुसरा धर्म स्वीकारता येतो. ह्याचा अर्थ तुम्ही तुमचा धर्म व नाव बदलू शकता. हेच जर दाभोळकरांनी नाव व धर्म बदलून हिंदूं धर्मातील अंधश्रध्दा निर्मूलन केले असते तर हिंदूंना चालले असते का?

डॉ दाभोलकरांनी हिंदू धर्मातील अंधश्रद्धा निर्मूलन कार्य केले हे स्पृहणियच आहे.

परंतु त्याच वेळेस त्यांनी इतर धर्मात समोर ढळढळीत दिसत असलेल्या अंधश्रद्धांबद्दल डोळेझाक केली. याबद्दल लोकांचे आक्षेप आहेत.

उदा. अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा करताना त्यांनी केलेली मागणी ‘कोणत्याही मूर्तीसमोर बळी देणे, हा अंधश्रद्धेचा गुन्हा मानला जाईल आणि त्याला शिक्षा म्हणून ५ वर्षांचा कारावास अन् १ लाख रुपयांचा दंड होईल.

कायद्यातील समानता या तत्त्वाने कोणत्याही प्राण्याची कोणत्याही कारणासाठी हत्या करणे गुन्हा मानले गेले पाहिजे,

फक्त मूर्तीसमोर बळी देण्यालाच गुन्हा ठरवणे अयोग्य आहे. त्यामुळे मूर्तीसमोर बळी दिल्यामुळे हिंदु समाजावर कारवाई होईल आणि ईदची कुर्बानी म्हणून करोडो पशूंची हत्या करणारे मात्र त्या कायद्याखाली येणार नाहीत.

तसेच चिकन-मटण दुकानांमध्ये प्रतिदिन लाखो-करोडो प्राण्यांची हत्या करणारे मात्र गुन्हेगार ठरणार नाहीत.

म्हणजे एकाच कृतीसाठी हिंदु समाजालाच गुन्हेगार ठरवायचे; मात्र इतरांना नाही, हा पुरोगामी दुटप्पीपणा जनतेला मान्य होईल का?

सुबोध खरे's picture

29 Oct 2020 - 10:12 am | सुबोध खरे

मी हिंदु आहे म्हणून आधी माझ्या धर्मातल्या अंधश्रद्धा दूर करण्याचे काम करतो

हा भेकड पलायनवाद आहे.

मुसलमानांच्या अंधश्रद्धांवर टीका केल्या असत्या तर त्यांनी घराला आग लावली असती

आणि

ख्रिश्चनांच्या अंधश्रद्धांवर टीका केल्या असत्या तर नको इतके कायदेशीर खटले गळ्यात आले असते.

हे भीषण वास्तव आहे आणि ते स्वीकारण्याची हिम्मत डॉक्टर दाखवू शकले नाहीत हे कटू सत्य आहे.

असंतांचे संत हा लेख आठवा. कुबेरांनी शेपूट घालून हा लेख मागे घेतला आणि स्वतःची विश्वासार्हता घालवून बसले.

अंनिसचे कार्य स्पृहणीय असूनही शेवटी डॉक्टर डाव्या फुरोगामी सेक्युलरांचे नादी लागले म्हणून मग हिंदुत्ववाद्यांवर टीका करणे आपोआप आलेच.

यामुळे आपल्या बद्दलचा समाजातील आदर ते घालवून बसले आणि अंनिसला उतरती कळा लागली.

जोवर बाबा, बुवाबाजी, देवदासी सारख्या अंधश्रद्धांविरुद्ध आंदोलन होते तोवर हिंदुत्ववाद्याना सुद्धा त्यांच्या बद्दल आदर होता.

प्रकाश घाटपांडे's picture

29 Oct 2020 - 10:56 am | प्रकाश घाटपांडे

विरोध पत्करुन काम करायच म्हणजे काही मर्यादा असतातच. शिवाय काही स्टॅटीजी असतात ना! .चळवळ जरी दोन्ही धर्माना समान लेखत असली तरी जन्माधिष्ठित चिकटलेल्या धर्मामुळे हिंदू कार्यकर्ते हिंदूत्ववाद्यांना मुस्लिमांपेक्षा जास्त जवळचे वाटण्यची शक्यता अधिक. हा एक भाग आणि दुसरा म्हणजे हिंदू धर्मात असलेले विविध, प्रसंगी परस्पर विरोधी विचार प्रवाह ही बाब. ग्रंथप्रामाण्य असलं तरी विशिष्ठ धर्मग्रंथ हाच एक प्रमाण हा भाग नाही. धर्मसंस्थापक ही कुणी एक व्यक्ती नाही. चार्वाक दर्शनाला सुद्धा मानाचे स्थान आहे या अर्थाने हा धर्म सर्वसमावेशक आहे. धर्मचिकित्सेलाही एक परंपरा लाभली असल्याने अंधश्रद्धा निमूर्लनाला पोषक असा विचार प्रवाह संतसाहित्यातच सापडतो. त्यामुळे हिंदू धर्मांधता ही मुस्लिम धर्माधते पेक्षा बोथट बनलेली आहे. त्यामुळे येथे अंधश्रद्धा निमूर्लन हे तुलनात्मक दृष्टया सोयीचे आहे.जरा सुसरबाई तुझी पाठ मउ म्हणुन जरा समाज प्रबोधन च्या दिशेने जात असेल तर जरा तडजोड करायला काय हरकत आहे. मुस्लिम समाज हा तुलनेने कडवा व अधिक धर्मांध आहे. अगोदरच धर्मचिकित्सा हा संवेदनाशिल विषय असल्याने सोयीचा असलेला भाग हा प्राधान्यक्रमात असणं स्वाभाविक आहे. हे आपल माझ व्यक्तिगत मत.

महासंग्राम's picture

29 Oct 2020 - 3:14 pm | महासंग्राम

अंधश्रद्धा निमूर्लनाला पोषक असा विचार प्रवाह संतसाहित्यातच सापडतो.

पण संत देव मानत होते,त्यामुळे त्यांना अंधश्रद्धांबद्दल कान पिळण्याचा अधिकार आहे. आता जे नास्तिक आहेत त्यांनी एकाच धर्माच्या बाबतीत लुडबुड का करावी ?

प्रसाद_१९८२'s picture

29 Oct 2020 - 1:39 pm | प्रसाद_१९८२

शब्दा शब्दाशी सहमत !
-

मराठी_माणूस's picture

29 Oct 2020 - 12:16 pm | मराठी_माणूस
प्रकाश घाटपांडे's picture

2 Nov 2020 - 10:44 am | प्रकाश घाटपांडे

अभिराम सारखे त्यावेळचे अनेक तरुण अरविंद बाळांच्या संपर्कात असायचे. वैचारिक मतभिन्नता राखूनही विचारांचे आदान प्रदान व्हायचे व मैत्री टिकून राहयची.

अंधश्रद्धा आणि श्रद्धा ह्यांची सीमा रेषा पुसट आहे.
अनिस असेल किंवा दुसरे कोणते विद्वान अंधश्रद्धा निर्मूलन करता करता लोकांच्या श्रधेलाच धक्का देतात.
त्या मुळे लोकांमध्ये अशा संस्था आणि व्यक्ती ह्यांच्या विषयी विश्वास नाही.
नस्तिक विचारसरणी असणाऱ्या व्यक्ती नी हे बिलकुल समजू नये की ते जसा विचार करतात ते त्रिवार सत्य आहे .
आस्तिक सारखा नास्तिक पण सिद्ध न झालेला फक्त विचार आहे.
आस्तिक विचारात काही तरी तत्तवज्ञानात्मक तरी आहे पण नास्तिक विचार हा विद्रोही विचार आहे त्याला काहीच आधार नाही.
आणि नास्तिक मंडळी ही पूर्णतः अधार्मिक नाहीत त्यांनी कोणता तरी धर्माशी संग केलेला आहे.

गामा पैलवान's picture

30 Oct 2020 - 12:21 am | गामा पैलवान

आनन्दा,

आस्तिक असून सुद्धा मला विज्ञानवादी/नास्तिक लोकांचे आकर्षण का आहे ते कळत नाही.. याला काही कारण असेल का?

मला वाटतं की हो, कारण आहे.

माझ्या मते शुद्ध नास्तिक कोणीही नसतो. जो स्वत:ला नास्तिक म्हणवतो तो नास्तिपक्षाचा आस्तिक असतो. तुम्हीही आस्तिक आहात. मग आस्तिकास अस्तिक्याचं आकर्षण असणं साहजिक आहे.

आ.न.,
-गा.पै.

नेत्रेश's picture

30 Oct 2020 - 11:34 am | नेत्रेश

"दाभोलकरांनी असं विधान केल आहे की,” मी हिंदु आहे म्हणून आधी माझ्या धर्मातल्या अंधश्रद्धा दूर करण्याचे काम करतो. आधी स्वत:चे घर स्वच्छ करावे ,नंतर बाहेर बघावे, हा त्यामागील उद्देश आहे.” डॉ दाभोलकर पुढे असही म्हणाले, "तुम्ही असं कधी म्हणता का हो, हा रोज रोज फक्त स्वतःचच घरा का झाडतो? शेजार्यांगची घरे का झाडत नाही!" या वाक्यावर मंदसा हशाही झाला "

- ईथे डॉक्टरांची उपमा चुकली.

डॉक्टरांचे काम म्हाणजे एकाच घरात रहाणार्‍या लोकांपैकी एकालाच स्वःच्छतेच्या नावाखाली झोडपायचे, आणी दुसरा गटारात लोळुन आला तरी दु:र्लक्ष करायचे हा प्रकार होता. त्यांनी फक्त सर्वांशी सारखा व्यवहार करावा एवढीच लोकांची अपेक्षा होती. त्यांना कुणीची शेजार्‍याचे (पक्षी: पाकीस्तान, नेपाळ, श्रीलंका) घर झाडायला सांगितले नव्हते. फक्त एकाच घरात (भारतात) रहाणार्‍या सर्व लोकांशी (हिंदु, मुस्लिम, ख्रिश्चन या सर्वांशी) सारखेच वागण्याची अपेक्षा होती.

अशी दाबोळकर ची धारणा असेल.
घर म्हणजे भारत आणि सदस्य म्हणजे विविध धर्म
घरा

हे घर फक्त हिंदू चे नाही.असे खसा दुखे पर्यंत निधर्मी ,सर्वधर्म समभाव वाले सांगताच असतात.
हे दाबोलकर विसरले वाटत.

दाभोलकर ह्यांनी हिंदू धर्मातील अंध श्रद्धा न वर टीका केली.
हिंदू धर्मातील अंध श्रथांवर का तर dabolkar हिंदू आहेत म्हणून स्वतःचे घर साफ करायचे आहे.
ह्याच्या वर शेंबड पोर तरी विश्वास ठेवेल का?
हिंदू च्या प्रतेक सणा मागे ,रिती रिवाज मागे विज्ञान आहे हे जगाला पटवून देणे हे हिंदू म्हणून दबोळकर चे कर्तव्य आहे ह्याची जाणीव त्यांना बिलकुल नाही .
म्हणजे हा माणूस खरोखर हिंदू chya अंध श्रद्धा निर्मूलन करण्यावर ठाम आहे का.
बुवा बाजी आणि श्रद्धा ह्या वेगळ्या आहेत
हिंदू पेक्षा मुस्लिम,ख्रिस्त लोकांमध्ये जास्त अंध श्रद्धा आहेत आणि त्या विज्ञान च्या विपरीत आहेत त्याचा गाजावाजा का केला जात नाही.

लोकहो,

मराठी_माणूस यांनी दिलेल्या इथल्या लेखाच्या दुव्याबद्दल त्यांना धन्यवाद! :-)

अरविंद बाळांशी चर्चा झाली असती तर माझा वनलायनर असता : पाकिस्तानातल्या लोकांची भारतापासून फुटून निघायची स्पष्ट इच्छा नसतांना भारताची फाळणी झालीच कशी?

असो.

अरविंद बाळ यांची चिकित्सक वृत्ती व प्रखर राष्ट्रवाद आवडला. मात्र दाभोलकरांच्या बाबतीत त्यांचा अंदाज चुकलेला दिसतो. दाभोलकर हे आर्थिक गैरव्यवहारांत आकंठ बुडालेले होते.

तसंच श्री. बाळ याचं गोळ्वलकरांबद्दल निरीक्षण त्रोटक वाटतं. मी गोळवलकरांचं साहित्य विशेष वाचलं नाहीये. जे काही वाचलंय त्यावरून गोळवलकर द्रष्टे होते इतकंच म्हणेन. श्री. बाळ यांनी आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर गोळवलकरांची भाष्ये बहुधा वाचलेली दिसंत नाहीत.

आ.न.,
-गा.पै.

प्रकाश घाटपांडे's picture

31 Oct 2020 - 11:03 am | प्रकाश घाटपांडे

मात्र दाभोलकरांच्या बाबतीत त्यांचा अंदाज चुकलेला दिसतो. दाभोलकर हे आर्थिक गैरव्यवहारांत आकंठ बुडालेले होते.

मला वाटत गामाजी आपल मागे यावर चर्चा झाली होती . सनातनवाले हाचा आरोप करत होते. याच उत्तर दिले आहे. पहा http://www.misalpav.com/comment/881958#comment-881958

गामा पैलवान's picture

31 Oct 2020 - 6:54 pm | गामा पैलवान

प्रकाश घाटपांडे,

इथे एक ४० पानांची ५० एमबीची पीडीएफ धारिका आहे. तिच्यात दाभोलकरांच्या संस्थांवर केलेले आर्थिक घोटाळ्यांचे व नक्षल संबंधांचे आरोप आणि तदानुषांगिक पुरावे आहेत : https://www.scribd.com/document/172674025/Narendra-Dabholkar-s-financial...

आज दाभोलकर जीवित असते तर तुरुंगात असते. ते तुरुंगात जाऊ नयेत म्हणून त्यांचा काटा काढला गेला आहे, असं दिसतंय.

आ.न.,
-गा.पै.

प्रकाश घाटपांडे's picture

1 Nov 2020 - 10:06 am | प्रकाश घाटपांडे

तुम्ही म्हणता त्यात सत्य असेल तर उद्या अंनिसही अडकेल. मुक्ता दाभोलकर ने आपण केस दाखल करु शकता असे सनातनवाल्यांना जाहीर कार्यक्रमात सांगितले आहे. जी काही परदेशी आर्थिक मदत घेतली असेल तर ती कायद्याची परिपुर्ती करुन घेतली आहे असे तिने सांगितले आहे. अंनिस च्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना किंवा हितचिंतकांना समितीचे आर्थिक व्यवहार याबाबत काही माहिती नसते. ते कार्याशी बांधलेले असतात. जनरली कोणत्याही सस्थांमधे कार्यकारिणीच्या धोरणात्मक आर्थिक बाबींशी बाकीच्यांचा संबंध येत नाही . त्या गोष्टी तशाही किचकट असतात.
हिंदु जनजागरण,सनातन वगैरे मंडळी हा आरोप दाभोलकरांच्या हयातीत पण करत होतेच की. त्यातल्या केवळ सनसनाटी भागाला काही माध्यम टीआरपी साठी प्रसिद्धी देतात.
अनेकांना दाभोलकरांची मते मान्य नाहीत पण त्यांच्या प्रामाणिकपणाबद्द्ल वा हेतु बद्द्ल शंका नाही.

गामा पैलवान's picture

1 Nov 2020 - 3:39 pm | गामा पैलवान

प्रकाश घाटपांडे,

माझ्या अंदाजानुसार दाभोलकर हे आरोपी हयात नसल्यामुळे खटला प्रलंबित आहे.

आ.न.,
-गा.पै.

प्रकाश घाटपांडे's picture

1 Nov 2020 - 8:29 pm | प्रकाश घाटपांडे

पण आरोप संस्था / ट्रस्ट वर आहे ना? कोण करत त्याचीही विश्वासार्हता न्यायालय तपासतेच ना? असो

गामा पैलवान's picture

2 Nov 2020 - 2:20 am | गामा पैलवान

प्रकाश घाटपांडे,

कायदा धाब्यावर बसवलंय दाभोलकरांच्या संस्थेने. त्याविरुद्ध खटला सरकारने दाखल करायचा आहे. हिंदू जनजागृती समितीचा संबंध येतोच कुठे?

आ.न.,
-गा.पै.

निनाद's picture

2 Nov 2020 - 11:05 am | निनाद

त्या दुव्यावर दिलेल्या दुसर्‍या पानावरच आरोप आहे की दाभोळकरांच्या अंनिस ने शाळेत शास्त्रीय दृष्तिकोन बनवण्याचा उद्योग आरंभला होता.
यास कोणता ही खर्च नव्हता. तसेच यास शासकीय मान्यता नव्हती तरीही हे काम केले गेले. आणि यासाठी २७ लाखाचा खर्च दाखवला आहे.

याशिवाय महाराष्ट्र राज्याचा स्टेट इंटेलिजन्स विभागाने अंनिस चे नक्षलवाद्यांशी संबंध आहेत असा आरोप आहे.

त्यांच्या वार्तापत्रातून आलेले सर्व उत्पन्न कुठे ही जमा झालेले नाही. म्हणजे 'गायब' झाले आहे. पैसे हवे विरून गेले आहेत.

तसेच वर्षानुवर्षे हिशोब सादर केलेल नाहीत याबद्दल कोणताही दंड शासनाने केलेला नाही.

वरील कोणतेही आरोप माझे नाहीत. गामा जीं तेथे जे दिले आहे तेच येथे मांडले आहे.

यांना एकदा मुसलमानांच्या अंधश्रद्धा निर्मूलन करायला तुम्ही का जात नाही? असे विचारले असताना खरा खुरा खुलासा केला, 'मला काय मरायचे आहे का?'

प्रकाश घाटपांडे's picture

2 Nov 2020 - 7:06 pm | प्रकाश घाटपांडे

सध्या ते युट्युब वर जोरात दिसतात.पातीचा इतिहास सान्गतात. राजकारणावर बोलतात. असो तो त्यान्चा भाग आहे