प्रार्थनास्थळे बंद असण्याबाबत साहित्यीकांची अन मान्यवरांची दुटप्पी भुमिका
आजच्या ऑनलाईन वर्तमानपत्रांत "नेमाडे-पठारेंसह 2 हजार मान्यवरांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले समर्थनाचे पत्र, (मंदीरे उघडण्याबाबतीत) श्रद्धांशी खेळणाऱ्या राजकारणावर घेतला आक्षेप" अशा अर्थाच्या बातम्या आलेल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे:
राज्यपालांनी दबाव आणला तरीही...!; नेमाडेंसह १०४ मान्यवरांनी केले CM ठाकरेंचे अभिनंदन
या बातमीच्या संदर्भात केलेला उहापोह खालील लेखात करत आहे.
सर्वात प्रथम असे वाटते की वरील बातमीत मंदीरांऐवजी प्रार्थनास्थळ असा शब्द हवा होता. मंदीर या शब्दामध्ये केवळ हिंदू समाजाच्या प्रार्थनास्थळाचा संदर्भ येत असतो. चर्च, दर्गा, मशीद, गुरूद्वारा आणि इतर प्रार्थनास्थळांना आताच उल्लेख केलेली नावे स्पष्ट आहेत. या उल्लेखलेल्या देव, भगवान, अल्ला, येशू इत्यादी वंदनीय रुपांच्या भक्तीसाठी जे जे स्थळ उभे केले जाते त्यांचा एकाच शब्दात उल्लेख करावयाचा झाल्यास प्रार्थनास्थळ असा शब्द उपलब्ध आहे. असो.
कोरोनाचे लॉकडाऊन जाहीर झाले तसे मंदीरे (या पुढे प्रार्थनास्थळ असा उल्लेख करूयात), बसेस, रेल्वे, दुकाने, कंपन्या, आस्थापने इत्यादी बंद करण्याचा आदेश सरकारने दिला. त्यानंतरच्या अनेक अनलॉकडाऊन च्या निरनिराळ्या टप्यात निरनिराळ्या वेळी नागरीकांच्या सुविधेसाठी वर उल्लेख केलेल्या नागरी सुविधांची ठिकाणे सरकारने चालू करण्याचे आदेश दिले. आता कालपरवाच मुंबईतील लोकल सेवा महिलांसाठी चालू झाली आहे. त्या आधी राज्यातील बस सेवा चालू झालेलीच होती.
कोरोना हा आजार संपूर्ण जगात पसरला आहे. सोशल डिस्टंसींग, हात धुणे, मास्क लावणे इत्यादी वैयक्तीक तसेच सार्वजनीक रित्या पाळावयाचे नियम हे त्याविरूद्ध लढण्याची हत्यारे आहेत. जेव्हा सरकारी बस सेवा चालू झाली तेव्हा सुरूवातीला एका बाकावर एकच प्रवासी असा नियम केला गेला. खाजगी वाहतूक करणारी वाहने या आधीपासून बेकायदेशीरपणे पूर्ण क्षमतेने वाहतूक करत होतीच. महाराष्ट्राचा विचार करता सरकारी बससेवेत सोशल डिस्टंसींग टप्याटप्याने तो हटवले जाऊन बस पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करू लागली. म्हणजेच सोशल डिस्टंसींग तेथे न पाळल्या जाऊ लागले. दुसर्या की तिसर्या टप्यात सरकारी सेवा देणार्या व्यक्तींसाठी लोकल सेवा सुरू झाली. त्यातही सोशल डिस्टंसींग काटेकोर पाळले गेलेच असे नाही. सोशल मिडीयावर या बाबीच्या पुष्ठ्यर्थ अनेक विडीओ उपलब्ध आहेत.
या सर्व प्रकारात एक निष्कर्ष निघतो की बससेवा उपभोगणार्या प्रवाशांना बसमध्ये प्रवास करतांना कोरोनाची लागण होत नव्हती काय? असलाच प्रश्न लोकल सेवेबाबतही विचारला जाऊ शकतो, किंवा लोकल सेवा मर्यादीतरित्या चालू करण्यात त्यातील प्रवाशांना कोरोना न होण्याची शाश्वती काय होती? सांख्यंकीय - स्टॅस्टेस्टीकल आकडेवारीने याचा अभ्यास केला गेला होता काय? किंबहूना संपूर्ण भारतात कोरोनासंदर्भात आकडेवारी अभ्यास करणार्या खात्याची जी जी आकडेवारी आलेली होती ती सगळीच चूकली होती याचीच आकडेवारी आता प्रसिद्ध होत आहे!
दुसरा महत्वाचा प्रश्न आजच्या बातमीच्या संदर्भाने उपस्थित होऊ शकतो. माननिय राज्यपाल तसेच माननिय मुख्यमंत्री यांचेमध्ये प्रार्थनास्थळे उघडण्याबाबत पत्रापत्री झालेली आपण वाचलीच असेल. आपल्याला त्यातील राजकारणाविषयी बोलायचे नाही. बससेवा, लोकल, खाजगी आस्थापने, कंपन्या, दुकाने आजच्या घडीला पूर्ण क्षमतेने चालू झालेली आहेत. सरकारदरबारी जरी कमी क्षमतेने चालू आहेत अशी जरी नोंद असली तरी अप्रत्यक्षरित्या वरील सर्व आस्थापने (सरकारी सोडून) पूर्ण क्षमतेने चालूच झालेली आहेत. लोकांना काम, रोजगार टाळता येणे शक्य नाही. किती दिवस लोक घरी बसून राहतील? तर मग या ठिकाणी सोशल डिस्टंसींगची पाळण्याची गरज आपोआपच संपुष्टात आलेली आहे. व्यवहार करतांना आपसूकच गर्दीमुळे सोशल डिस्टंसींग नाकारले जात आहे. सुदैवाने, कोरोनाची लागण होण्याची क्षमताही कमी कमी होत चालली आहे. कोरोना रुग्णालयात खाटा रिकाम्या राहत आहेत.
आता जर सर्व विवेचन आपण वाचले असेल तर बस, लोकल आदी ठिकाणी सोशल डिस्टंसींग न पाळताही लोक जर व्यवहार करत आहेत अन कोरोना पसरण्याचा वेगही मंदावला आहेत तर मग केवळ बस, लोकल, दुकाने, मॉल्स आदी ठिकाणच्या लोकांना, प्रवाशांना सर्वांनाच कोरोना होत आहे काय?
लक्षात घ्या की लेखकाचे मत सोशल डिस्टंसींग पाळणे, हात धुणे, मास्क लावणे या विरूद्ध नाही. ते आता तसेच यापुढेही खूप गरजेचे आहे. सरकारी आदेशांचे पालन करणे हे प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य आहेच. परंतू बस, लोकल, दुकाने, आस्थापने संपूर्ण क्षमतेने चालू झालेली असतांना केवळ प्रार्थानास्थळांतून गर्दी होऊन कोरोना पसरेल हा समज अनाठाई आहे. प्रार्थनास्थळे सरकारी धोरणानुसार कागदोपत्री जरी बंद असली तरी अनऑफीशिअली ती बंद राहीलेली नाहीत. पुजारी तेथील पूजा नियमीत करतच आहेत. शहरांत बरीचशी मुख्य प्रार्थनास्थळे बंद असली तरी गल्लीतील, कोपर्यांतील, खेडेगावांतील अनेक प्रार्थनास्थळे उघडी असून तेथे त्या त्या देवाचे दर्शन दुरून का होईना पण घेता येते आहे. (तसेच प्रार्थनास्थळांत जाऊन प्रार्थना करणे हा ज्याचा त्याचा खाजगी प्रश्न आहे. तेथील आर्थिक उलाढाल अन सामाजीक वर्तवणूक पाहता प्रार्थनास्थळांवर सरकारचे नियंत्रण असणे भारत देशात नितांत आवश्यक आहे. अर्थातच तो वेगळा प्रश्न आहे.)
एक तर्क लक्षात येतो आहे. एटीएम केंद्र हे एक प्रार्थनास्थळ आहे असे माना. तेथील मशीन्स हे जसे काही देवाची मुर्ती आहे असे माना. तेथे एका वेळी एकच व्यक्ती पैसे काढण्यासाठी (देवाच्या दर्शनासाठी) जातो. मुर्तीला जसा स्पर्श करावा लागतो तशीच वर्तवणूक एटीएम मशिन मधून पैसे काढतांना होत असते. मशीनच्या अनेक बटनांना स्पर्श करावा लागतो तरच पैसे हातात येतात.
कोरोनाविरूद्ध जी उपाययोजना एटीएम, लोकल, बस, बँक, दुकाने इत्यादी ठिकाणी राबवण्यात आली आहे तशीच उपाययोजना प्रार्थनास्थळांबाबत तेथली स्थानिक व्यवस्था राबवेलच. अनेक जिल्ह्यांमध्ये माननिय जिल्हाधीकारी साहेब, स्थानिक नगरपालीका अधिकार्यांनी सोशल डिस्टंसींग अतिशय योग्य प्रकारे राखले आणि त्याचे चांगले परिणामही समोर आलेले आहेत. कोणते प्रार्थनास्थळ गर्दीचे आहे कोणते नाही याची चांगली कल्पना तेथील जिल्हाधीकारी, स्थानिक प्रशासन, नगरपालीका, ग्रामपंचायत यांना आहे. त्या अधिकार्यांना प्रार्थनास्थळाबाबत अधिकार देणे गरजेचे आहे. उदाहरणादखल शिर्डी येथील श्री. साईमंदीराबाबत सोशल डिस्टंसींग, मंदीर बंद असणे अन एखाद्या दुरवरील प्रार्थनास्थळ बंद असणे (किंवा उघडे असणे) यात होणार्या गर्दीचा फरक आहे.
आणखी महत्वाचा मुद्दा असा आहे की वरील बातमीत "नेमाडे-पठारेंसह 2 हजार मान्यवरांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले समर्थनाचे पत्र, (मंदीरे उघडण्याबाबतीत) श्रद्धांशी खेळणाऱ्या राजकारणावर घेतला आक्षेप" असा उल्लेख आहे. माझा आक्षेप या साहित्यीकांवर तसेच वरील बातमीत उल्लेखलेल्या "मान्यवर" असणार्या व्यक्तींवर आहे. साहित्यीकांनी पोट पूर्ण भरल्यानंतर केलेले हे निवेदन आहे. त्यात सामाजिक परिणामांचा अजिबात अभ्यास झालेला नाही. अनेक सामाजिक प्रश्नांवर किंवा कोरोना काळात ज्या ज्या घटना झाल्यात त्यावेळी हे साहित्यीक अन "मान्यवर" काय करत होते? कोरोना काळात अनेक कामगारांचे जत्थे परराज्यात पायी गेले, अनेक मृत्यूमुखी पडले, अन्नपाण्यावाचून काही तडफडून मेले ते ते या साहित्यीक अन "मान्यवरां"ना दिसले नाहीत काय?
एव्हाना भारतातील इतर राज्यात प्रार्थनास्थळे उघडी झालेली आहेत. त्या बातम्या या साहित्यीकांनी अन मान्यवरांनी वाचल्या नाहीत काय? मग त्या राज्यांतील प्रार्थनास्थळांतून कोरोनाचा प्रसार होत आहे काय? आकडेवारी काय सांगते? साहित्यीकांचा, मान्यवरांचा आकडेवारीशी नाते काय? आकडेवारी शास्त्रात त्यांनी पदवी संपादन केलेली आहे काय? बरेचसे साहित्यीक ही पांढरपेशी मंडळी आहेत. त्यातील बरेचसे प्राध्यापक, शिक्षक, सरकारी सेवेत असणारे आहेत. सरकारी दबाव आल्याने या साहित्यीकांनी प्रार्थनास्थळे बंद ठेवण्याच्या सरकारी आदेशाला अनुमोदन का दिले नसावे?
त्या ही पुढे जाऊन जर साहित्यीकांना जर आपल्या समाजाचा, मराठी भाषेचा एवढा अभिमान वाटतो आहे तर महाराष्ट्रा- कर्नाटक सीमेवरील सीमाबांधव चार पिढ्यांपासून कर्नाटक सरकारचा वरवंटा खात आहेत तेव्हा तेव्हा त्यांनी एकतरी एकगठ्ठा निवेदन काढले आहे काय? केवळ साहित्यसंमेलनात ठराव पास करण्याव्यतीरीक्त काय आंदोलन केले गेले? एक बाब लक्षात घ्या की, संयुक्त महाराष्ट्राची ठिणगी साहित्यीकांनीच आणि साहित्यसंमेलनातूनच पाडली गेली होती. ती त्याकाळची साहित्यीकांतील धमक आताच्या साहित्यीकांत आहे काय? मराठी भाषा जशी जास्त पसरेल त्या त्या ठिकाणी मराठी साहित्य वाचले जाईल अन पर्यायाने या असल्या साहित्यीकांचीच पुस्तके जास्त छापली जातील अन तो त्यांचा फायदाच नाही काय? अशा चांगल्या आर्थीक फायद्याकडे साहित्यीकांचे दुर्लक्ष त्यांना "परवडणारे" आहे काय?
थोडक्यात, आजच्या बातमीतले साहित्यीक आणि मान्यवरांचे निवेदन/ खुले पत्र आणि प्रार्थनास्थळे बंदच ठेवण्याबाबतचे समर्थन ही त्यांची दुटप्पी भुमिका स्पष्ट करते. अतिशय अयोग्य आणि अवेळी आलेले हे निवेदन आहे. मंदीर बंद असण्याबाबतचे निवेदन हे त्यांनी माननिय मुख्यमंत्री- राज्यपाल यांच्या पत्रापत्रीनंतरच का काढले? त्या आधी का नाही हा प्रश्नही आपसूक येतो आहे. मग आधी कंपन्या, आस्थापना आदी बंद होत्या त्यासाठी का काढले गेले नाही? प्रार्थनास्थळापेक्षा तर असली आस्थापने, कंपन्या कधीही जास्त श्रद्धेय आहेत कारण त्यातून लोकांचे पोटे भरतात. प्रार्थनास्थळात जाणे हा देखील पोट भरल्यानंतरचाच सोपस्कार ठरत नाही काय?
(लक्षात घ्या की लेखकाचे मत सोशल डिस्टंसींग पाळणे, हात धुणे, मास्क लावणे या विरूद्ध नाही. ते आता तसेच यापुढेही खूप गरजेचे आहे. सरकारी आदेशांचे पालन करणे हे प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य आहेच. लेखकाचा आक्षेप केवळ साहित्यीकांचे अन मान्यवरांचे जे काय समर्थनार्थ निवेदन आहे त्या विरूद्ध आहे. वेलांटी, उकार यांतील चूकांबाबत क्षमस्व.)
- पाषाणभेद
२४/१०/२०२०
प्रतिक्रिया
24 Oct 2020 - 12:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माझ्या मतांच्या दोन काड्या टाकून देतो. दमदार काथ्याकूट आहे. ( दोनशे प्रतिसाद अपेक्षित) ''लोकांच्या श्रद्धांचा राजकारणासाठी उपयोग करण्यावर साहित्यिकांनी जो आक्षेप नोंदवला आहे, तो योग्यच आहे असे वाटते. भाजपा आणि राज्यपालांच्या करोनाच्या काळात ज्या विविध भूमिका होत्या त्या पाहता सतत सरकारावर टीका करणे, अडचणी वाढविणे असाच हेतू स्पष्ट दिसतो. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांची पत्रापत्री आपण सर्वांनी महाराष्ट्रातील जनतेने पाहिलेली आहे, त्यामुळे साहित्यिकांची आणि संबंधितांनी घेतलेली भूमिका जी मुख्यमंत्र्यांना पाठींबा देण्याची आहे, त्याबद्दल व्यक्तीस्वातंत्र्य म्हणून त्यांनी केलेली मतं ही सर्वांना पटलीच पाहिजे असे काही नाही असे वाटते. पण त्या भूमिका व्यक्तीश मला पटणारी आहे.
प्रार्थनास्थळे मग ती हिंदूंची असो की मुस्लीमधर्मीयांची किंवा अन्य कोणाचीही तरीही यासंबंधात वेळोवेळी त्या त्या पुढा-यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदने दिलेली दिसतात. व्याकूळ भक्तांच्या समाधानासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्व प्रार्थनास्थळे हळुहळु इतर जगरहाटीप्रमाणे उघडू असे म्हटल्याचे आठवते, शारिरिक अंतर, योग्य काळजी आणि सर्व संबंधित गोष्टी यांची काळजी घेत, जनता आपल्या जीवनव्यवहाराला लागलेली दिसत आहे, तेव्हा आता करोनाची भिती तशी राहीलेली नाही, कमी झालेली आहे. आपण सर्वच आत्मनिर्भरतेच्या वाटेला लागलेलो आहोत.
तेव्हा मा.मुख्यमंत्र्यांनी लोकहितासाठी जरी सर्व प्रार्थनास्थळे बंद केलेली असली तरी देव आणि भक्त यांच्यात असलेली नियमित भक्तीची व्याकुळता पाहता, सर्वच गोष्टींकडे धर्माधिष्ठीत नजरेने पाहात राजकारण करणा-यांची व्याकुळता पाहता आता फ़ार काळ दुरावा निर्माण व्हायला नको, भक्तांना ताटकळत ठेवायला नको असे वाटते.
-दिलीप बिरुटे
24 Oct 2020 - 1:19 pm | पाषाणभेद
आपण एकतर इकडे या नाहीतर पलिकडे जा. पहिल्या परिच्छेदात प्रार्थनास्थळांच्या बंद असण्याच्या समर्थनार्थ अन त्याखालील परिच्छेदात देव अन भक्त यांची भावनिकता दर्शवून प्रार्थनास्थळे उघडण्याबाबत आपली भुमिका परस्परविरोधी आहे.
देवाच्या बाबतीत भावनिकता निराळी अन व्यवहार निराळा. अगदी पुजारी अन भक्तदेखील देवाशी व्यवहारच करतात ना? तु काहीतरी दे म्हणजे मी अमुक तमुक अर्पण करेन हा व्यवहारच झाला. कोण देवळात जातो अन केवळ नमस्कार करतो असा असेल तर तो विरळा.
प्रस्तूत लेखात साहित्यीकांनी आपली भुमिका मांडण्याची जी वेळ निवडली आहे ती संशयास्पद आहे. त्यांनी ती भुमिका आताच का घेतली असावी याचीही कारणमिमांसा वर केलेली आहे अन त्यात बरेच तथ्य आहे.
इतर राज्यात प्रार्थनास्थळांबाबत काय परिस्थिती आहे ते पण लिहीले आहे.
आस्थापना, आकडेवारी, कोरोनाची लागण इत्यादी अनेक मुद्दे आहेत की जे साहित्यीकांच्या बोलण्याविरूद्ध आहेत. थोडक्यात त्यांचा बोलविता धनी (अन खरोखर धन देणारा धनीही असू शकतो) निराळाच आहे.
24 Oct 2020 - 2:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पहिली भूमिका आहे, साहित्यिकांनी घेतलेल्या 'श्रद्धेच्या राजकारणाच्या' भूमिकेचं त्याचं स्वागत केलं आहे, सहमती व्यक्त केली आहे. दुसरी भूमिका मा.मुख्यमंत्री यांनी केलेले जे मत होतं (हळुहळु अनलॉक )त्या भूमिकेचंही स्वागत केलं, आणि तिसरी भूमिका सर्वच अनलॉक होत आहे तेव्हा आता प्रार्थनास्थळे बंद ठेवून काहीही हशील नाही हे म्हटलं आहे, काळानुरुप हे बदलते मुद्दे आणि मतं आहेत.. आपल्याला या भूमिका परस्परविरोधी वाटत असेल तर आपल्या मताचा आदर आहेच.
बाकी आपल्या मूळ काथ्याकूट आणि प्रतिसादातील मुद्यांवर काथ्याकूट करता येईलच...चर्चा सुरु ठेवा.
-दिलीप बिरुटे
-
24 Oct 2020 - 2:09 pm | पाषाणभेद
मग ठिक आहे. तरीपण साहित्यीकांना असले काही लिहून द्या असे आवाहन केले असल्यास त्यांनी नकार द्यायला हवा होता.
कारण हे निवेदन सार्वजनीक आहे. अनेक साहित्यीक, मान्यवर यांनी मिळून दिलेले असल्याने त्याचे महत्व वाढलेले आहे. म्हणूनच त्यातील भुमिकेविषयी बघायला होणार असे त्यांना माहीत असतांना आपले मत अजाणतेपणी दुटप्पी होते आहे असा संशयही त्यांना आला नसावा काय?
24 Oct 2020 - 2:47 pm | Gk
साहित्यिकांनी आपले मत मांडले
तेच मत मोदीही फॉलो करत आहेत
24 Oct 2020 - 2:15 pm | Gk
प्रार्थना स्थळ उघडणे जर योग्य असते तर मोदींनी जन्मभूमी समारंभाला दहा वीस हजार लोक तरी नक्की जमा केले असते ,
स्वतः पूजा करतात अन इतरांना मात्र बोलावत नाहीत , किती हा दुटप्पीपणा !!
24 Oct 2020 - 3:23 pm | आनन्दा
कधी केला म्हणायचा हा कार्यक्रम? काल की परवा?
25 Oct 2020 - 9:31 am | Gk
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आज, रविवारी नागपुरात पार पडतो आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या विजयादशमी सोहळ्यालाला पहिल्यांदाच स्वयंसेवकांच्या कवायती नाही. त्यामुळे आरएसएसच्या पारंपारिक दसऱ्या सोहळा यंदा खंड पडला आहे. आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हडगेवार सभागृहात शस्त्रपूजन केलं, त्यानंतर उत्सवाला सुरुवात झाली. फक्त मोजक्याज ५० स्वयंसेवकांच्या उपस्थितीत हा सोहळा सुरु आहे
25 Oct 2020 - 11:00 am | Gk
<<< फक्त मोजक्याज ५० स्वयंसेवकांच्या उपस्थितीत हा सोहळा सुरु आहे >>>
------ उरलेले सर्व सेवक सिमेवर गेले आहेत..... चीनला हुसकवण्यासाठी.
३ दिवसांत फौज उभी करु असे ते बोल्ले होते ना ? दसरा हा ३.५ मुहुर्तां पैकी एक आहे, या दिवशी सिमोलंघन...
25 Oct 2020 - 11:41 am | सॅगी
तुमचे युवराज एकटे पुरेसे आहेत १५ मिनिटांत चीनला हुसकावून लावण्यासाठी...
24 Oct 2020 - 3:44 pm | Rajesh188
Covid19 च्या प्रकोपला अटकाव निर्माण करण्यासाठी प्रार्थना स्थळ बंद केली होती.
ती योग्य वेळ आल्यावर उघडली जातील.
पण ती आताच उघडली पाहिजेत.
ट्रेन,बस, बार,दुकाने चालू केली मग प्रार्थना स्थळ च बंद का.
पण तुम्ही बाकी अस्थापण आणि प्रार्थना स्थळ ह्यांची बरोबरी कशी करू शकता.
अर्थ चक्र थांबू नये फिरत राहवे म्हणून बाकी आस्थापना चालू केली आहेत ती पण नाईलाज म्हणून.
धोका तर आहेच ह्या निर्णयात.
म्हणून अजुन धोका वाढवायचा का प्रार्थना स्थळ उघडून.
मुळात ही मागणीच राजकीय आहे .
त्या वर जास्त गंभीर पने विचार करण्याची गरज नाही.
24 Oct 2020 - 6:40 pm | बाप्पू
राजेश जी बऱ्याच ठिकाणी आपली मते विभिन्न असली तरी इथे मात्र मी सहमत आहे.
सरकारने जोवर कोरोना संकट आटोक्यात येत नाही तोवर सर्वच प्रार्थनास्थळे ( फक्त मंदिरे नव्हे ) बंद ठेवावीत.
कोरोनामुळे अर्थचक्र पूर्णपणे ठप्प झाले होते आणि त्याला गती देण्यासाठी सरकारने टप्याटप्याने सर्व दुकाने, कंपन्या, कार्यालये इ सुरु केलेत जेणेकरून त्यावर अवलंबून असणारे लोकं उपाशी मरू नयेत.
पण हाच न्याय प्रार्थनास्थळांना लावता येणार नाही. प्रार्थनास्थळे ही जीवनावश्यक गोष्ट नाहीये. परमेश्वराला वंदन करण्यासाठी फक्त तिथेच जाण्याची गरज नाही. सर्व काही घरून देखील करू शकता .
बीजेपी किंवा जे कोणी लोकं प्रार्थनास्थळे उघडण्यासाठी सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतायेत तो एकप्रकारे राजकीय डाव आहे. सामान्य माणसांनी याला बळी पडू नये.
राज्यपाल केशारी यांनी ठाकरे सरकारला "सेकुलर" म्हणून डिवचणे या ही नक्कीच चुकीची गोष्ट आहे. या ठिकाणी जर सरकारने फक्त मंदिरे बंद ठेवून बाकी धर्मियांना अल्पसंख्याक या गोंडस नावाखाली काहीही चाळे करायची मुभा दिली असती ( जी कि खांग्रेस ची जुनी खोड आहे ) तर ती टीका योग्य होती..
पण सरसकट सर्व प्रार्थनास्थळे बंद असताना सरकार वर मंदिरे उघडण्यासाठी दबाव टाकणे म्हणजे नागरिकांच्या आरोग्याशी खेळणे आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे आणि सर्वांनी समर्थन करावे असे वाटते. अर्थात हे माझे वयक्तिक मत आहे. दुसऱ्या बाजूच्या लोकांची मते वाचायला आवडतील.
24 Oct 2020 - 7:17 pm | सॅगी
प्रार्थनास्थळांवरही अनेक लोकांचे जीवन अवलंबून असतेच की... जसे की फूल/हार विक्रेते, मोठ्या प्रार्थनास्थळांजवळील हॉटेल्स्/लॉजेस ईत्यादी..
26 Oct 2020 - 3:39 pm | महासंग्राम
+१
24 Oct 2020 - 6:52 pm | शा वि कु
इतर गोष्टी विनासायास चालू असताना प्रार्थनास्थळे बंद करून काय फायदा होणार ?
हे प्राडॉंचे म्हणणे पटले.
ऑल इन ऑर नथिंग हे लॉकडाऊनचे मॉडेल आहे असे वाटते. इतरत्र गर्दी होणे चालत असेल तर, उपयोगी/गरजेची असो वा नसो, गर्दी आहेच. मग ती प्रार्थनास्थळी काय आणि बसस्टेशनवर काय.
24 Oct 2020 - 7:20 pm | विजुभाऊ
हल्ली बरेचसे व्यवहार कॅशलेस होतात. ए टीम मशीन पर्यंत जाण्याची गरजच भासत नाही. फारसे काही अडते असे नाही.
तद्वत देवळात , प्रार्थनस्थळी जाण्याचीही तशी गरज नसते. घरातला देव वेगळी आणि देवळातला देव वेगळा असे काही असेल असे वाटत नाही.
लोकांना देवळाची प्रार्थनास्थळाची गरज भासते कारण तेथे इतर बरेच काही मिळते/इतर समविचारी लोक भेटतात वगैरे वगैरे. प्ण हे ऑन लाईनही शक्य आहे.
मनुष्य हा सामाजप्रिय प्राणी आहे , तो एकटा राहू शकत नाही.
अन्यथा देवळांची प्रार्थनास्थळांची गरज आहे असे वाटत नाही
24 Oct 2020 - 7:26 pm | चौथा कोनाडा
प्रार्थना घरीही करू शकतो, त्यासाठी प्रार्थना स्थळातच जायला पाहिजे असे नाही !
या अनुषंगाने सध्या तरी शासनाच्या निर्णयाला पाठिंबा.
दिवाळी पुर्वी पर्यंत कोविडचा आलेख नक्की पहावा व त्या नुसार निर्णय घ्यावा.
24 Oct 2020 - 7:28 pm | Rajesh188
घरात मागवले ल जेवण आणि हॉटेल मध्ये जावून तिथे बसून केलेलं जेवण काय फरक असतो तेच पदार्थ असणार.
पण विशिष्ट जागेला महत्व आहे.
मंदिरात जावून दर्शन घेण्यात जी आत्मिक आनंद मिळतो तो घरी नाही मिळणार.
24 Oct 2020 - 8:29 pm | प्रकाश घाटपांडे
हे काहींबाबत खरे जरी असले तरी अशा परिस्थितीत ते करावे का? आपल्या धर्मात मानसपूजेची देखील सोय आहे नुसत्या दर्शनाचे काय घेउन बसलात. परमेश्वर जळी स्थळी काष्ठी पाषाणी आहे ना!
25 Oct 2020 - 9:37 am | Gk
सोलापुरात देऊळ प्रकरणावरून विहिप चे हिंसक आंदोलन .
खरे आहे का ?
सत्ता नसलेल्या राज्यातच आंदोलन होते , हा योगायोग म्हणे , नैतर गुजरात अन वाराणशीत देवळे सुरू आहेत का ?
25 Oct 2020 - 10:12 am | बाप्पू
सहमत GK. तुमची असलेली गुजरात ची कावीळ परत दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद.
स्त्रियांवरील अत्याचार किंवा बलात्कार यांचा देखील असाच विरोध आणि आंदोलने एका विशिष्ठ राज्यात च होतात. इतके मोठे आंदोलन ( इव्हेंट ) असते कि राजकुमारी आणि राजकुमार दोघेही रस्त्यावर येतात. जिकडे त्यांची सत्ता असते तिथे स्त्रियांवर अत्याचार / बलात्कार होत नाहीत का?? तिकडे अश्या घटना झाल्यावर दोघेही पर्यटनाला निघून जातात..
आणि आंदोलन सूरु करण्याआधी व्हिक्टीम ची जात लगेच शोधून काढली जाते. कारण त्यानुसार आंदोलनाची तीव्रता ठरवावी लागते.. किती माणसे भाड्याने बोलवायची ते ठरवले जात असावे..
जिथे राजकुमार यांची pvt ltd सत्तेत आहे तिथे जातींचे रेकॉर्ड ठेवले जात नाही का??
25 Oct 2020 - 10:18 am | Gk
आम्हाला वाईट म्हणता म्हणता तुम्हीही आमच्यासारखेच वागू लागले,
मग पार्टी विथ डिफ्रँस मध्ये आता डिफ्फेरेंट काय राहिले म्हणे ?
25 Oct 2020 - 10:55 am | बाप्पू
तुमच्या चुका दाखवल्या कि लगेच आमच्यावर भाजेपायी असा शिक्का मारून टाकला राव.. चला थोड्या वेळासाठी मान्य करू कि आहे मी भाजपेयी.. भक्त किंवा जे काय असेल ते..
तुम्ही तुमच सांगा ओ. .. सर्वात जुनी पार्टी, स्वातंत्र्य मिळवून देणारी पार्टी, लोकशाही वादी पार्टी, भाईचारा पार्टी ( ज्यामध्ये इक जण नेहमीच भाई आणि दुसरा चारा बनत आलाय ) असे असून तुम्हाला जळी स्थळी काष्ठी पाषाणी एकाच राज्याची उचकी का हो लागते??
आणि मी वर लिहिल्याप्रमाणे मी मंदिर उघडण्याचे, संबंधित आंदोलनाचे, राज्यपाल केशारी यांच्या वागणुकीचे समर्थन करत नाही, कारण माझी बुद्धी मी एका पक्षाच्या, एका धर्माच्या, एका खानदानाच्या, एका विचारसरणीच्या दावणीला बांधलेली नाही.
पण तुम्ही मात्र नेहमीच प्रत्येक धाग्यावर येन केन प्रकारे मोदी आणि गुजरात आणून आपल्या काविळीचा परिचय देता आणि त्याचबरोबर आपल्या मानसिक गुलामीचा देखील. एखाद्याने व्हॅलिड मुद्दा मांडला तरी त्याच्या प्रतिसादातीत एखादा विशिष्ट शब्द शोधून फक्त तेवढ्यावर च त्याला डिवचायचे.. एवढंच करता. मग त्याचे बाकीचे मुद्दे गेले गाढवाच्या xxx..
25 Oct 2020 - 11:20 am | डॅनी ओशन
गाढवाचा/ची XXX म्हणजे हो काय ?
👶
25 Oct 2020 - 12:06 pm | बाप्पू
समझने वाले समझ गये.. !! :D
सॉरी. आम्ही अस्सल कोल्हापूरवाले असल्याने चार पाच वाक्यानंतर असे काहीसे आपसूकच तोंडात येते.. न आल्यास चुकल्या चुकल्या सारखे वाटते..
25 Oct 2020 - 12:19 pm | प्रसाद गोडबोले
सर्वप्रथम - मी जाहीरपणे आर्य सनातन वैदिक हिंदु आहे आणि तरीही मंदिरे अजुनही उघडली नाहीत ह्या बद्दल मला मनापासुन आनंद आहे !
१. मंदिरांचा देवस्थानांचा अक्षरशः बाजार मांडला होता , मेन्यु कार्ड छापल्यासारखे ह्या पुजेला इतकी देणगी अन त्या सेवेला इतकी देणगी अशी पत्रके मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली आहेत . भोळ्या भाबड्या भाविकांच्या श्रध्देचा असा धंदा मांडणार्याच्या बाजार उठवल्या बद्दल मी मुख्यमंत्र्यांचे मन:पुर्वक अभिनंदन करतो.
२. मंदिराबाहेरच्या छोट्यामोठ्ठ्या व्यापार्यांनी देवस्थान परीसरांची अवस्था अक्षरशः हगणदारी सदृष करुन टाकली होती , कोणीही यावे कोठेही तंबु टाकावे , बाजार मांडावा , आओ जाओ राज तुम्हारा चालु होते . हा प्रकार मी देहु , अलंदी , सज्जनगड , कोल्हापुर ह्या माझ्या आवडत्या देवस्थानात पाहिला आहे अन हळहळलो आहे . घृष्णेश्वरला तर अशाच एका व्यापार्याने चप्पल आणि मोबाईल मंदिरात नेणे अलाऊड नाही इथेच ठेवा असे सांगुन १० -२० रुपये मागितल्याचे आठवते. भीमाशंकरला तर भर गाभार्यात "पावती फाडली नाही तर प्रदक्षिणा नाही " असे एका पुजार्याने मला सांगितले होते तेही शिवलिंगासमोर !! मंदिरे बंद असल्याने ह्या असल्या नीच वृत्तीच्या लोकांच्या पोटावर पाय आलेला पाहुन मला मनस्वी समाधान मिळत आहे ( त्याला सात्विक की तामसिक जे काही लेबल लावायचे ते लावा ) .
३. " आम्ही डोंबार्याचा खेळ मांडल्यासारखे पुजा अर्चा करतो " असे एका पुरोहिताने मला स्पष्ट सांगितले आहे , धर्माचा धंदा करुन, भोळ्याभाबड्या भाविकांच्या श्रध्देचा फायदा उचलुन स्वतःची तुंबडी भरणार्या लोकांच्या बाजारु वृतीला नकळत का होईना पण चाप लागला आहे हे चांगलेच आहे !
४. साहित्यिक दुट्टप्पी भुमिका घेत आहेत हे चांगलेच आहे कारण त्यांची इच्छा नसली तरीही योगायोगाने त्यांची भुमिका ही खर्या सश्रध्द भाविकाच्या हिताचीच आहे , शिवाय त्यांचे पुरोगामित्वाचे बुरखे तेच स्वतःहुन फाडत आहेत ह्याचे समाधान आहे !
५. आणि सर्वात शेवटी महत्वाचे म्हणजे - हिंदुधर्मातील देवसथानांच्या बाजारु वृतीला ठेचुन काढण्याचे काम हे हिंदुत्ववादी लोकांना करावे लागत नसुन इतरांना करावे लागत आहे हे म्हणजे अक्षरशः जावयाच्या काठीने साप मारण्यातला प्रकार आहे , सापही मरत आहे अन काठी तुटली तरी ती शेजार्याची असेल आपली नाही ! लय भारी ! :)
तळटीप : वरील प्रतिसादात काही उपरोधिक सारक्यास्टिक नाही , जे आहे ते सरळ स्पष्ट आहे.
अवांतर : सश्रध्द आणि भोळ्या भाविकांना , विशेषकरुन जे नित्यनेमाने मंदिरात जातात त्यांना , देवाचा विरहाने काय मानसिक वेदना होत असतील हे मी जाणतो . पण मंदिरात गेलो नाही म्हणुन काही अडुन रहात नाही , समर्थांची ओवी प्रसिध्दच आहे -
धातु पाषाण मृत्तिका । चित्रलेप काष्ठ देखा । तेथें देव कैंचा मूर्खा । भ्रांति पडिली ॥
तस्मात मंदिरे बंद आहेत म्हणुन हळहळ करण्यासारखे काहीच नाही . माऊली ज्ञानेश्वरी मध्ये काय सांगतात - एर्हवीं सर्वांच्या हृदयदेशीं । मी अमुका आहें ऐसी ।
जे बुद्धि स्फुरे अहर्निशीं । ते वस्तु गा मी ॥ प्र्त्येक प्राणीमात्राच्या हृदयात स्फुरण पावणारा "मी आहे " हा विचारच परमात्मा असल्याने खर्या भक्ताला उपासना करायला मंदिर बंद असल्याने काहीच फरक पडत नाही ! अजुन काही काळ संयम धरु , करोना संपला की राममंदिरात जायचे आहेच आपल्याला!!
इत्यलम .
25 Oct 2020 - 12:25 pm | प्रसाद गोडबोले
ही म्हण नक्की काय ?
ही म्हण नक्की काय आहे , शेजार्याच्या काठी साप मारणे की जावयाच्या काठीने साप मारणे ?
काही का असेना , साप तर मेला पाहिजे अन आपली काठी तुटली नाही की बस्स , जिंकलो =))))
25 Oct 2020 - 2:06 pm | बाप्पू
. - खरी म्हण अशी आहे बहुतेक.
25 Oct 2020 - 2:29 pm | Gk
जावइ आवडता की नावडता यावर अवलंबून आहे
25 Oct 2020 - 8:40 pm | चौथा कोनाडा
मार्कस ऑरेलियस,
मुद्द्यात पॉईन्ट आहे.
पण हे देखील व्यावसायिक कारखाने आहेत आणि या साखळीतील तळागाळाच्या कष्टकर्यांची उपासमार होत आहे हे लक्षात घेऊन त्यांनाही काही तरी पॅकेज द्यावे काय ?
26 Oct 2020 - 12:15 am | प्रसाद गोडबोले
त्यांनाही काही तरी पॅकेज द्यावे काय ?
>>>
नाही .
पॅकेज कोणालाच अन कधीही देऊ नये . नो मोअर गव्हर्न्मेन्ट स्पेन्डिंग ! लेट द बॅड बिजनेस फेल ! लेट देअर बी अ नॅचरल रिकव्हरी अॅन्ड लेट ओन्ली द फिटेस्ट सर्व्हाईव्ह !
थोडे अवांतर आहे हे . आपल्या लोकांना राजकारणाचा , मोदीद्वेषाचा ओव्हरडोस झालाय त्याला मिपाही अफवाद नाही पण असो इकोनॉमिक्स आणि रिकव्हरी फ्रॉम रिसेशन हा नक्कीच चर्चा करण्यासारखा विषय आहे.
निवांत बोलु कधीतरी .
26 Oct 2020 - 5:27 am | Gk
आणि मग उद्योगपतींना मोदी सरकार कर्जे माफ करते , त्याचे काय करणार ?
नेचरल क्युअर पाहिजे तर मग मोदी सरकारने रिजर्व ब्यांकटले पैसे का काढले ?
26 Oct 2020 - 9:08 am | प्रसाद गोडबोले
तुम्ही मोदी मोदी करत बसा,
मला असली चर्चा करण्यात कोणताही रस नाही !
26 Oct 2020 - 4:58 pm | Gk
की बाबर नेहरू करत बसणार ?
26 Oct 2020 - 5:25 pm | चौथा कोनाडा
मार्कस ऑरेलियस साहेब,
फिल्म मस्तच आहे !
(या पार्श्वभुमीवर भारताच्या इकॉनोमीची रिकव्हरी / सुरळित व्हावी म्हणुन केन्द्र शासकिय कर्मचार्यांना भरघोस बोनस देऊन त्यांना खरेदीसाठी उद्युक्त केले जाणार आहे,
अन त्याच वेळी कित्येक छोटे उद्योग, तळागाळातील कष्टकरी प्रचंड आर्थिक चणचणीत आहेत, त्यांचा सर्व्हायव्हल साठी निकराची धडपड सुरु आहे हे जाता जाता आठवले)
मग 'आरक्षण" हे पॅकेज नाही तर काय आहे ?
जगभरात विविध देशांमध्ये पॅकेज देत असतातच, त्या अर्थी पॅकेज देणे हे जगतिक पातळीवरील आर्थिक धोरणांचा भाग आहे.
त्यामुळे हे विधान भाबडे वाटतेय.
हे फारच थेरॉटिकल होतेय ! अपंगाना विविध सवलती देतात ते त्यांच्या नॅचरल रिकव्हरीसाठीच देतात ना ?
हे तत्वतः मान्य होण्यासार्खे असले तरी (भारतात तरी) व्यवहार्य नाही.
25 Oct 2020 - 12:35 pm | धर्मराजमुटके
पाषाणभेद साहेब ! आपला लेख वाचला. काही मुद्द्यांवर मत मांडतो.
१. भारतात स्वातंत्र्यानंतरच्या काळात बहुतांश वेळा स्वत:ला निर्धर्मी म्हणविणारे पण प्रत्यक्षात धर्मांध असणारे पक्षच सत्तेत आहेत.
त्यामुळे मंदीरांबद्द्लचा त्यांचा दृष्टीकोण आजपासून नाही तर गेल्या कित्येक वर्षांपासून जगजाहिर आहे. त्यात नवे किंवा आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही.
सध्या महाराष्ट्रात ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद आहे त्यांनी स्वतःला निधर्मी म्हणणार्या पक्षांशी युती केली असल्यामुळे त्यांना योग्य-अयोग्य काय यापेक्षा इतर दोन पक्षांची काय मते आहेत याचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते. हाच पक्ष आज जर सत्तेत नसता तर आज मंदीरांबद्द्ल त्यांची भुमिका नेमकी १८० अंशाने विरुद्ध राहिली असते हे सांगायला कोणत्याही ज्योतीषाची (किंवा वै़ज्ञानिकाची) आवश्यकता नाही. राजकारण्यांना जनतेच्या हितापेक्षा सत्तेचा विचार नेहमीच अग्रक्रमाने करावा लागतो कारण सत्ता हे त्यांचे प्रथम ध्येय्य असते. सत्तेच्या अनुषंगाने मिळालेल्या जबाबदार्या पार पाडणे ही दुय्यम जबाबदारी असते.
२. साहित्यिक आणि बुद्धीजीवी यांचा सामान्य जनतेशी संबंंध कधीच नव्हता (सन्माननिय अपवाद होते, आहेत आणि पुढेही असणारच आहेत). मात्र साहित्यिकांनी पाठींबा दिला म्हणून मतपेटीच्या राजकारणावर त्याचा परीणाम होत नसतो हे सत्ताधार्यांना, सामान्य जनतेला चांगले माहित आहे. साहित्यिकांना कितपत माहित आहे हे त्यांचे त्यांना ठाऊक. साहित्यिकांचा उल्लेख वर्तमानपत्रात केवळ साहित्य संमेलनाच्या काळात आणि असाच एखाद दुसर्या वेळी येतो. त्यामुळे जर साहित्यिकांना बातम्यात झळकण्याची संधी मिळाली आहे तीचा त्यांना जरुर लाभ व्हावा. त्यानिमित्ताने तरी वाचनशत्रू जनतेला २-४ साहित्यिकांची नावे माहित होतील. न जाणो या कारणामुळे काहींना मराठी साहित्य वाचण्याची प्रेरणा मिळू शकेल. त्यामुळे याही निमित्ताने व्यथित होण्याचे कारण नाही.
३. राहता राहिला प्रश्न मंदीरे उघडण्याचा. मंदिरे उघडली काय आणि न उघडली काय, खर्या भाविकांस त्यापासून काही फरक पडणार नाही.
आपल्या लाडक्या देवतेचे दर्शन न झाल्यामुळे तो कदाचित दु:खी होईल मात्र विरहभावनेमुळे त्याच्या दैवतावरील प्रेमात अभिवृद्धी होईल यात शंका नाही.
त्यामुळे थोडी वाट पाहूया, आज ना उद्या मंदिरे नक्कीच उघडतील यात एक आस्तिक हिंदू म्हणून माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. दानपेटीत काय अर्पण करायचे आणि मतपेटीत काय अर्पण करायचे याचा निर्णय सुज्ञ जनता नक्कीच घेईल. तोपर्यंत
धीर धरी मना !
ध्यान धरी मना !
आपणा सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !
26 Oct 2020 - 7:56 pm | गामा पैलवान
मार्कस ऑरेलियस,
तुमचा इथला https://www.misalpav.com/comment/1084117#comment-1084117 संदेश वाचला. माझ्या मते देवळांत ज्या अपप्रवृत्ती घुसल्या आहेत त्यावर टाळेबंदी हा रोगापेक्षा उपाय भयंकर ठरेल. अपप्रवृत्ती निपटणं प्रबोधनाच्या मार्गाने करायला हवं. टाळेबंदीमुले भक्त देवदर्शनास वंचित होताहेत. यावर उपाय अपेक्षित आहे.
देव जरी चराचरांत असला तरी तो चटकन दिसून येत नाही. तस्मात देवळे हवीच. हवा सर्वत्र असली तरी छातीत सतत ओढून घ्यावीच लागते. गायीचं दूध तिच्या रक्तापासनं बनतं. रक्त गायीच्या देहात सर्वत्र आहे. पण म्हणून तिचं दूध शिंगं खूर, इत्यादि अवयवांत मिळंत नाही. त्यासाठी सडच पिळावे लागतात. या धर्तीवर देवळांची उपयुक्तता ध्यानी यावी.
आ.न.,
-गा.पै.
27 Oct 2020 - 10:08 am | प्रसाद गोडबोले
गा.पै. ,
सादर नमस्कार !
मंदिरांच्या उपयुक्ततेबद्दल कोणतीच शंका नाही, मंदिरे आवश्यक आहेतच . पण
मंदिरांचे बाजारीकरण करणार्या नीच वृत्तीच्या लोकांच्या पोटावर पाय द्यायला टाळेबंदी हा उत्तम उपाय आहे इतकेच माझे मत आहे . ही अपप्रवृत्ती प्रबोधनाने निपटुन काढता येत नाही हे कटु सत्य आहे . देवदर्शनासाठी वंचित होणारे भक्त ह्या अपप्रवृत्तीकडे दुर्लक्ष करतात ही फॅक्ट आहे. :(
हा साप शेजार्याच्याच काठीने मारावा लागेल.
आपल्या मताचा मला आदर आहे पण मी त्याच्याशी सहमत नाही इतकेच खेदाने नमुद करु इच्छितो.
आपण कोणतेही एक , ज्याच्याविषयी तुम्हाला आत्मीयता आहे असे एखादे देवस्थान निवडा अन केवळ प्रबोधनाने तेथील बाजारु अपप्रवृत्तींचा नायनाट करुन दाखवा , मी चुक मान्य करत आपली क्षमा मागेन ! पण हे होईल असे दिसत नाही :(
माझ्या एका अत्यंत प्रिय ठिकाणच्या देवस्थानाने मंदिरात येणार्या भाविकांची अन पर्यायाने देणगीची आवक कमी झाली म्हणुन चक्क फेसबुक पेज काढले आहे अन तिथे त्यांचे " मेन्युकार्ड" दिले आहे , शिवाय बँक खाते क्रमांक यु.पी. आय क्रमांकही दिला आहे . " देवाच्या मुर्तींचे फोटो काढण्यास सक्त मनाई आहे" असले बोर्ड लाऊन मंदिराच्या गाभार्याचे विद्रुपीकरण करणारे हे लोक आता स्वतःच रोजच्या नित्यपुजेचे फोटो आणि विदिओ अपलोड करतात + मेन्युकार्ड आहेच सोबत.
आता आपण मंदिराच्या गाभार्यातील तो बाजारु बोर्ड केवळ प्रबोधन करुन काढुन दाखवणार का ? लगेच देवस्थानाची लिंक पाठवतो तुम्हाला !
बाकी मंदिरांच्या उपयुक्ततेबद्दल शंकाच नाही . कृपया गैरसमज नसावा.
27 Oct 2020 - 7:25 pm | गामा पैलवान
मार्कस ऑरेलियस,
तुम्ही एक कसलेले भक्त आहात. साहजिकंच तुम्हांस चराचरांत देव सापडतो. पण सामान्य जनतेचं तसं नसतं. देवळांवर फक्त भक्तांचाच अधिकार आहे. जे काही करायचं ते सेवा म्हणून करायचं असतं. हे प्रबोधन अंगी मुरायला आजून दोनेक पिढ्या खर्ची पडतील. याला कारण धर्मशिक्षणाचा अभाव हे आहे. हिंदूंना धर्मशिक्षण देणारे कोणी नसल्याने हिंदूंमध्ये धर्मविघातक दृष्टीकोन बळावले आहेत. बाजारू प्रवृत्ती याचाच परिपाक आहेत.
तर या बाजारू विकृतींना टाळेबंदीच्या मिषाने बाजूला सारण्यात यश लाभलं, तरी ते अल्पकालीन असेल. ते दृढमूल करण्यासाठी दीर्घकालीन धर्मशिक्षण हाच उपाय आहे. मला वाटतं हे तुम्हांस मान्य व्हावं.
आता असं बघा की, आपली देवळं ही धर्मशिक्षणाची केंद्रं आहेत. नेमकी तीच बंद ठेवली तर धर्मशिक्षण मिळण्यात अडचणी येतील. त्यामुळे एकीकडे टाळेबंदीचे फायदे व दुसरीकडे धर्मशिक्षणाच्या अभावाचे नुकसान अशा दोन्ही बाजू विचारांत घ्यायला हव्यात. माझ्या मते धर्मशिक्षण हे अधिक महत्त्वाचं आहे. म्हणून देवळं उघडायला हवीत.
तुम्ही मला प्रबोधनयोगे कोणत्याची एका धर्मस्थानातला बाजार बंद करण्याविषयी सुचवलं होतंत. तुमच्या सूचनेबद्दल आभारी आहे. समजा मी हे उद्दिष्ट प्राप्त करून दाखवलं तरी तत्पावेतो दोनपाच वर्षे लोटतील. तोवर आजचा प्रश्न कालबाह्य झालेला असेल. धर्मशिक्षण ही वेळखाऊ व दीर्घकालीन प्रक्रिया आहे. तिच्यातून सत्वर निकाल अपेक्षित नाही.
या पार्श्वभूमीवर तुमची काही विधाने निरखतो.
१.
हे खरंय. माझ्या मते याचं कारण असं की, देवदर्शनार्थ भक्त येतात ते प्रामुख्याने प्रापंचिक विवंचना दूर करायला. म्हणून त्यांचंही प्रबोधन होणं आवश्यक आहे. देव हा नडभागवू निकडपुरवठादार नसून साधनेचा सहाय्यक आहे, हा दृष्टीकोन घट्ट झाला पाहिजे. त्यासाठीही धर्मशिक्षण आवश्यक आहेच.
२.
शेजाऱ्याकडनं मारला गेला तर आनंदच आहे. पण मी या परावलंबनाविषयी साशंक आहे.
३.
यांत खेद कसला? उलट भक्तांमध्ये विविधांगी चर्चा व्हायला हवीये. म्हणून आपलेतुपले मतभेद हा खेदाचा विषय आजिबात नाही.
४.
क्या बात है. आपण (दोघेही) असेच मिळून मिसळून राहूया. सहवीर्यं करवावहै !
असो.
देव भावाचे भुकेले आहेत. त्यांना किती दिवस उपाशी ठेवायचं? एखाद महिना ठीके. पण सहासहा महिने देवळं बंद राहणार असतील तर देवांचा कोप होईल. हिरण्यकश्यपू व रावणाने देवतार्चन थांबवलं होतं. त्यांचं काय झालं हे सर्वांना माहितीये. तसलं काही उद्धव ठाकऱ्यांचं होऊ नये, अशीही माझी एक उपेच्छा आहे.
आ.न.,
-गा.पै.
26 Oct 2020 - 11:45 pm | Rajesh188
पण ह्या अप्रवती आणि लोकांच्या श्रद्धा ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
लोक मंदिरात जातात ते श्रधेपोटी, भक्ती पोटी.
त्या श्रध्देचा वापर स्वतःच्या आर्थिक फायद्या साठी करून घेणारी अप्रवृती मंदिर परिसरात आणि मंदिरात दिसून येते खरी.
ते नाकारता येणार नाही.
आणि ह्या मध्ये सुधारणा करणे हे आपले म्हणजे हिंदू चेच काम आहे.
10 Nov 2020 - 10:16 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
(छाचिजासा)
-दिलीप बिरुटे