तू मरून, मोजून १३ वर्षे, ५ दिवस आणि काही तास झालेत. काय काय घडत नाही इतक्या काळात? म्हटलं तर फार काही. म्हटलं तर काहीच नाही. मरणाच्या क्षणापाशी काल गोठून जातो.
पण, तू निघून गेल्यापासून back up ठेवल्यासारखा भेटतोयस.
आधी फार जड गेलं. मी अनंत काळ अशीच रडत राहणार असं वाटलं. पण तसे नाही घडले. तू परत भेटलास! माझ्या घरासमोर मंदिरापाशी, रात्रभर पावसात वाट पहात उभारलेला. का तर, मी एकदा तरी खिडकी उघडेन, किती पाउस पडतोय असं म्हणत बाहेर बघेन, आणि तुला दिसेन. पहाटे पाऊस टीपटीप करीत थांबला. पुजारी आला. एवढ्या पावसात चहाचा रिकामा कप कोण ठेवून गेलं, म्हणून इकडे तिकडे विचारीत राहिला.
छानच!
जबरी हाणलाय :)
दंडवत घ्या दंडवत
चांगला प्रयत्न. मिपाकर ह्यात
- सध्याच्या काळातला नवा ट्रेंड म्हणजे अभिनयातल्या प्रस्थापितांच्या बरोबर अभिनयातील ओ की ठो कळत नसणाऱ्यांच्या जुळवलेल्या जोड्या. प्रसंग कुठलाही असो, चेहेऱ्यावर एकच भाव हवा. ह्या लोकांना काम देण्यासाठी चेहरा सदैव दुर्मुखलेला आणि निर्विकार हवा ही पूर्वअट असावी बहुतेक. तिकडे माईंच्या अपघातात सापडलेल्या मुलाला वाचवण्यासाठी डॉक्टर प्रयत्नांची शर्थ करतायत आणि इकडे माईंची सून अभिनय करण्याची.
- प्रतिष्ठित कर्तबगार घराण्यात जर माई अगदी कर्तबगार असेल तर माईचा नवरा अगदीच ठोंब्या, काहीही न उरकणारा असावा. कुठल्याही प्रसंगात मेंगळटासारखा चेहरा करून हॅहॅहॅ करून प्रेक्षकाला बुचकळ्यात पाडता आले पाहिजे.ह्याला बाजारातून अर्धा किलो भाजी आणता येईल की नाही अशी अभिनयक्षमता असली तरी तो प्रत्यक्षात कोट्यवधींची उलाढाल करणारा व्यावसायिक दाखवलाच पाहिजे.
- तोकड्या कपड्यातले एक तरी पात्र असावे, त्याने टीआरपी चांगलाच वाढतो.ह्या पात्राला अभिनयासकट काहीही नाही आले तरी चालते, लाडे लाडे बोलावे, सतत फुक्कटखाऊपणा करावा आणि सारखे शॉपिंग करत राहावे. तिची प्रतिस्पर्धी शालीन असली तरी थोडी गावंढळ-अशिक्षित असावी.मात्र अंगी सामर्थ्य प्रचंड असावे.अर्धा किलो पापड लोणची विकून डायरेक्ट लाखालाखांच्या ऑर्डरी मिळवता आल्या पाहिजेत.
- कार्यालयात निघणाऱ्या निविदा (पक्षी टेंडर) ह्या नेहमीच काही करोड मधल्या असाव्यात. त्या मिळाल्यानंतर काम चालू करून काही काळ लोटला की ती निविदा रद्द झालीच पाहिजे. तसंच त्यामुळे होणाऱ्या नुकसानाबद्दल करारात एक अवाक्षरही न लिहिल्याने सगळे कुटुंब डायरेक्ट रस्त्यावर आले पाहिजे. कंपनीचा सीईओ असला तरी त्याला भरपूर मोकळा वेळ असल्याने, तो कधीही कुठेही मिटिंग सोडून जाऊ - येऊ शकला पाहिजे..परदेशी ग्राहकांना डील करण्यासाठी त्याला आपल्याच कार्यालयात टेबलावरच अस्सल वर्हाडी जेवण देता आले पाहिजे , त्याचेच कर्मचारी वाढप्याचे काम करू शकले पाहिजेत आणि जेवण न आवडल्याने होऊ घातलेला करार रद्द करून गोरी लोक परत मायदेशी जायला पाहिजेत.
- पैलवानाचं डोकं गुडघ्यात असतंय ह्याचा पुरेपूर प्रत्यय देणारे एखादे पात्र असावे.मालिकेच्या टायटल साँग मध्ये त्याला नांगराला जुंपलेले दाखवावे त्यामुळे मालिकेत खरा बैल कोण हे प्रेक्षक लागेल ओळखू शकतात.(पैलवानांनी हलकेच घ्यावे).चेहरा लाजरा बुजरा ठेवावा.गालातल्या गालात हसता आले तर उत्तम.कुस्ती मारून गदा जिंकून आला असला तरी भोळसट्पणाचा अर्क असावा.त्याला कशातलेच काहीच जमत नाही असे दाखवावे.
- मालिकेतल्या पात्रांच्या भाषा: एकाच कुटुंबातली माणसे वेगवेगळी भाषा बोलतात असे दाखवावे. मालवणी/ आगरी/ वर्हाडी वाटेल असे काहीतरी शब्द त्यात घुसडावेत.खलनायकाची भाषा वेगळी, सासूची वेगळी, सुनेची वेगळी आणि मित्रपरिवाराची अजूनच वेगळी दाखवावी.काही पात्रांना जलदगतीने शब्द बोलावयाला लावून प्रेक्षकांच्या डोक्याचा भुगा करावा तर काही गोगलगायीसारखे हळू हळू एक एक शब्द बोलणारे दाखवून प्रेक्षकांचा अंत पाहावा.
सध्या इतकेच.In reply to चांगला प्रयत्न. मिपाकर ह्यात by तेजस आठवले
दुय्यम पात्राचे लग्न
एखादं
छान
छान
छान
मस्त जमलंय. एकम कडक