Skip to main content

प्रतिसाद

मिपावर निलंबने वाढत आहेत

लेखक आनन्दा यांनी शुक्रवार, 04/09/2015 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या मिपावरील निलंबनांची संख्या बघुन मन भरून येते. मागच्या काही वर्षापासून आपल्या मिपावर वेगाने निलंबनांची संख्या वाढते आहे. मिपा सारख्या संस्थळावर जिथे चांगल्या चांगल्या प्रतिसादकर्त्यांना मखरात सजवले जाते, तिथे अशा प्रकारची निलंबने बघुन मन अस्वस्थ होते. खरच आपण इतके असहिष्णु आहोत का की आज आपल्याला चांगले विरोधी लेखन दुरापास्त होत आहे. ज्यांनी मिपाचे उत्तमोत्तम धागे हायजॅक केले, आपला वेळ देउन पंचशतकी केले तेच आज (असल्या निलंबनकारांमुळे) मिपापासुन दूर गेलेले पाहून मन दु:खी होते. सामान्य वाचक अशी आशा करतात की चांगले धागा-अपहरणकर्ते उत्तमोत्तम काड्या टाकत राहतील.

नात्यातले लुकडे जाडे

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 03/09/2015 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
कोणत्याही नात्यामध्ये दोघांपैकी जो वजनाने मोठा असतो त्याचेकडून सतत डाएटिंगची आणि जास्त कामाची अपेक्षा केली जाते. केवळ वजनाने मोठा आहे म्हणून सगळ्यांचे त्याला ऎकून घ्यावे लागते व खाण्यापिण्याला आणि आरामाला मुरड घालावी लागते. पण हाच जाड्या असलेला व्यक्ती जेव्हा लुकड्याला एखादा उपदेश करतो, दोष दाखवतो, आज्ञा करतो तेव्हा मात्र लुकडा जर त्याचे ऎकत नसेल आणि जाड्याला योग्य तो मान मिळत नसेल तर मात्र त्या नात्याला एकतर्फी नाते म्हणता येईल.

मिपावर ट्रॉल वाढत आहेत

लेखक इस्पिक राजा यांनी गुरुवार, 03/09/2015 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या मिपावरील ट्रोलांची संख्या बघुन मन भरून येते. मागच्या काही वर्षापासून आपल्या मिपावर वेगाने ट्रोलांची संख्या वाढते आहे. मिपा सारख्या संस्थळावर जिथे चांगल्या लेखकांना मखरात सजवले जाते, तिथे अशा प्रकारचे ट्रोल बघुन मन अस्वस्थ होते. खरच आपण इतके पुढारलेले आहोत का की आज आपल्याला जेन्युइन आयडी दुरापास्त होत आहेत. ज्यांनी मिपाला उत्तमोत्तम प्रतिसादांनी सजवले, आपला वेळ देउन मोठे केले तेच आज (असल्या टोळांमुळे) मिपापासुन दूर गेलेले पाहून मन दु:खी होते. सामान्य वाचक अशी आशा करतात की चांगले लेखक उत्तमोत्तम लेख देत राहतील.

फस्ट बाइट लव्ह

लेखक कोमल यांनी बुधवार, 19/08/2015 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
मी एकदा बालेवाडी वरून आउन्ध ला निगालेले. सीक्स शितर मदून. वाटेत बाणेर आल्यामुळे मला भुक लागली. म्हणून मी उतारले. बाकीच्या हाटेलान्प्रमने त्यालापण काचेचे दरवाजे लावले होते. त्याच्या आजूबाजूची गर्दी बर्यापेकी कमि होती. थोड्याच वेळात एक माणूस येउन ती काच पुसून गेला. अतिशय टणक आणि चकचकीत काच होती ती. मला त्या काचेमधुन आत एक सिम्बोल दिसला. का कोणास ठाऊक माज्या पोटात गुडुगुडू व्हायला लागलं. क्षणभरातच मला ते हॉटेल हवहव्स वाटू लागलं. मी काचेच्या दारातून आत गेले आणि वाशरूम चा बोर्ड असलेल्या दारातून आत घुसले. ५ मिनिटाने फ्लश करुन, बाहेर येउन मी ऑर्डर केलेल्या पिझ्याचा आनंदाने बाईट घेतला.

तंत्रशिक्षण निर्णायक वळणावर … ३ (अंतिम )

लेखक खेडूत यांनी गुरुवार, 16/07/2015 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ३ (अंतिम ) भाग १ भाग २ २०१५ आज ३२ वर्षानंतरही संस्था वाढवण्याची स्पर्धा कमी होत नाही. कापड गल्लीत अजून एक कापडाचं दुकान चालतंच ! किंवा अजून थोडं वेगळं उदाहरण. एखाद्या मंदिरात जत्रेनिमित्य लाखोंची गर्दी होणार, आणि येणारा प्रत्येकजण एक प्रसादाचा नारळ घेणार असेल तर नारळाची भरपूर दुकाने निघणारच. काहीजण चार दुकाने टाकणार तर कुणी फक्त भांडवल टाकून दुकान दुसऱ्याला चालवायला देणार. विशिष्ठ लोकेशनच्य दुकानाचे अन ओरडणाऱ्याचे जास्त नारळ खपणार.

तीस रुपयाची छॉटीसी गोष्ट

लेखक शब्दानुज यांनी गुरुवार, 16/07/2015 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
कॉलेज चालू होऊन थोडेच दिवस झाले होते. अशाच एका संध्याकाळी माझ्या एका मित्र्ाने एका अमुक एक ठिकाणाच्या मंदिराकडे जाणार असल्याचे ठरवले. ते ठिकाण जवळपास ३ तासांच्या अंतरावर होते. अमुक एक तिथीला मित्र्ाच्या घरचे तिथे जात असत. यावेळेस हा जाणार होता. सोबतीसाठी त्याने मला विचारले.मी लगेच राजी झालो. सकाळी ८ च्या आासपास आम्हाला बस मिळाली. खडडयातुन आमची गाडी मंदगतीने पुढे सरकत होती. थोड्याच वेळात आमच्या गप्पांना आम्हीच कंटाळलो आणि झोपी गेलो. यथावकाश ती बस एकदाची पोहचली. तीन तासाचा प्रवास आणि जवळपास शंभराहुन जास्त पैसे मोजुन आम्ही तिथे पोहचलो. तिथे अर्थातच गर्दी पसरली होती.

हे हृदय कसे बापाचे......!

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 20/06/2015 17:32 या दिवशी प्रकाशित केले.
(उद्या जगभरात माणसांच्या दुनियेत Father’s Day साजरा होईल. पण पक्ष्यांच्या मुक्त जगातला हा रोजचा Father’s Day वाचकांसाठी....) रणरणते वाळवंट. निर्मम सूर्य. नजर टाकली तरी, आपले डोळे भाजून जावेत! अशा ठिकाणी कुठला पक्षी रहात असेल, वस्ती करीत असेल, मनातही येत नाही. पण निसर्गाची किमया आणि माया अगाध! ............. ............. ................ एक पक्षीण आपल्या नवजात पिलांना पोटाशी घेऊन खुरट्या झुडपांआड बसलेली. पिलेही आपल्या आईच्या पोटाच्या सावलीला बिलगून, आजूबाजूला टुकूटुकू पाहतायेत. असल्या रणरणत्या वाळवंटात त्यांना दानापाणी कुठून मिळत असेल?

देवलसीकर्मकांडिपणा : माझे विचार

लेखक संदीप डांगे यांनी बुधवार, 10/06/2015 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
अत्रुप्त यांच्या ह्या धाग्यावरील प्रतिसादांतून सुचलेलं पण बराच काळ मनात साचलेलं...
देवलसीकर्मकांडिपणा >> म्हणजे जगातील कुठल्याही प्रकारच्या अज्ञाताला शरण जाण्याची निसर्गदत्त मूलभूत प्रवृत्ति. धर्मात ती देवाप्रधान कर्मकांडात्मक असते,आणि अधर्मात निधर्मात कुठल्याही गोष्टी अथवा गृहितकांवरचि संपूर्ण शरणागत अंधनिष्ठा असते. दोन्हीकडे कर्मकांडां सारखं काहीतरी करून समाधान/फ़ायदा/फलप्राप्ति मिळवण्याचि प्रवृत्ति असते. तिलाच मी या शब्दसंहतित कोंडलं आहे.

ये दोस्ती ......

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 09/06/2015 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
( १८ एप्रिल २०१५ रोजी या http://www.bbc.co.uk/news/blogs-ouch-32325809 संकेत स्थळावर दोन मित्रांची एक प्रेरणादायी कहाणी वाचनात आली. तिचे मराठी कथेत रुपांतर करताना, केवळ आणि केवळ एकच हेतू मनात आहे – लिहिणाऱ्या/वाचणाऱ्या सर्वांनी ‘एक तरी झाड लावावे, जगवावे, वाचवावे!’ ) हेग्झिया आणि वेंकी. उत्तर चीन मधील येली या छोट्याशा खेड्यातील दोन शाळूमित्र. दोघांत एखाद वर्षाचा फरक. पाठच्या भावंडासारखे सोबत वाढले. हसले. खेळले. ..... आणि दोघांच्या वाट्याला आलेले दुर्दैव आणि त्यावर केलेली मातही जगावेगळी! ..... ........

रॅंपेज

लेखक आकाश खोत यांनी सोमवार, 08/06/2015 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
"साहेब.. ते माझा रूट बदलायचं बघा की.. किती दिवसांपासून मागे लागलोय तुमच्या. माझी झोप होईना झाली नीट. आता मुलीचं लग्न ठरलंय. लय कामं लागणार माझ्यामागं आता. काहीच सुधरत नाय सध्या.. करा की एवढं काम." निरकर त्यांच्या कदमसाहेबांना विनवत होता. कदम वैतागले होते. "बघू म्हटलं नाय का रे तुला.. कशाला माझ्यामागे भुणभुण लावतोय. आता याद्या निघतिल काही दिवसात तेव्हा बघू ना." "अहो साहेब याद्या आलरेडी ठरल्यात म्हणून कानावर आलं माझ्या. ज्याला हवं ते करून घेतलय सगळ्यांनी. मग माझं पण काम करा ना त्यात." "कोणी सांगितलं तुला?.. अजुन मलासुद्धा माहीत नाही यादीत कोण आहे कोण नाही..