मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मैसूर

मृत्युन्जय ·

छोटा डॉन 20/08/2010 - 16:32
एक नंबर फोटो अहेत मालक. भाग-२ पटकन येऊद्यात ( नाहीतर तेवढ्या वेळात मी इथुन झटकन म्हैसुरला जाऊन येईन, त्यावर लेख टाकेन आनि तुमचा टीआरपी खाऊन टाकेन ) ... दुसर्‍या भागात थोडे लेखनही वाढवा फोटोबरोबर ... -छोटा डॉन

आमच्या घराचे, वृंदावनाचे तसे आमच्या प्राणीराज्याचे फोटु टाकल्याबद्दल मनःपुर्वक धन्यवाद मॄत्युंजय सरकार. आज पुन्हा एकदा आम्ही आपल्या नजरेतुन आमच्या राज्याकडे बघितले. अतिशय सुरेख छायाचित्रे. कोण आहे रे तिकडे ? मृत्युंजयांना एक शाल आणि दोन श्रीफळे द्या. (श्रीफळे वाजवुन बघु नयेत) छिद्रान्वेषी शंका :- मैसूर का म्हैसूर ??

In reply to by परिकथेतील राजकुमार

मृत्युन्जय 20/08/2010 - 17:03
(श्रीफळे वाजवुन बघु नये) चिंता नसावी. आम्ही पुणेकर असल्यामुळे ते काम आम्ही घेण्यापुर्वी करुच

मदनबाण 20/08/2010 - 16:39
पण मि पा वर इतकी उद्बोधक चर्चा चालु होती की उगा लोकांना डिस्टर्ब करावेसे वाटले नाही. वा... ,उत्तम , छान !!! ;) मैसूरची चित्ररुपी सहल घडवल्या बद्धल धन्स... :) जाता जाता :--- लेखन विषय आणि लेखन प्रकार फारच कमी निवडलेत तुम्ही... ;)

मीनल 20/08/2010 - 17:55
हत्तीचे पिल्लू, हाय करणार पोपट, मोर, डोसा मस्त. खरेतर सर्वच फोटो मस्त. मैसूर च्या ट्रीपची आठवण झाली.

मितान 20/08/2010 - 17:59
सुंदर फोटो ! चामुंडा टेकडीवरून मैसूर शहराचा एखादा फोटो काढला असेल तर तो पण द्या की..

मस्तच फोटो रे! पुढचा भाग सोमवारी टाक रे, विकान्ताला बरेच मिपाकर नेटपासून आलिप्त असतात. आणि दुसर्‍या भागात लिही काहीतरी!! मैसूरचा राजवाडा जर राजवाडा असेल तर मात्र बकिंगहॅम पॅलेसला सर्व्हंट क्वार्टर म्हणावं लागेल.

बेसनलाडू 21/08/2010 - 04:53
या जागी जायचा योग अद्याप आलेला नाही. नाही म्हणायला बंगलोरहून कुठेतरी जाताना (की येताना) रात्रीच्या वेळी या दिव्यांच्या झगमगाटात न्हाऊन निघालेल्या या महालाचे दर्शन झाल्याचे पुसटसे स्मरते. (स्मरणशील)बेसनलाडू मोराची प्रकाशचित्रे तर निव्वळ अप्रतिम! (प्रेक्षक)बेसनलाडू

आमोद शिंदे 21/08/2010 - 04:56
ओहोहो..जबरदस्त फोटो. मैसुरची काय मस्त सफर करुन दिलीत. शेवटचा फोटो तर एक नंबर!! (त्या प्रभोची रेसिपी बघून मी आज लंघन करायचे ठरवले होते तुम्ही दिलेला हा फोटो बघून निर्णय बदलला. ;) )

अरुंधती 21/08/2010 - 22:36
प्राण्यांचे एकेक फोटो सह्ही आहेत.... पोपट, मोर, हत्ती, वाघोबा सगळेच छान टिपलेत. आणि शेवटचा मसाला डोसा भूक खवळवणारा! :-)

शिल्पा ब 23/08/2010 - 04:23
मस्त फोटो...मला आपला मोरच आवडला..पांढरा मोर कसातरीच दिसतो...हत्ती मात्र थोडे अशक्त वाटत होते..असो. पोपट छान...राजवाडा बराच प्रचंड दिसतोय (आम्ही अजून राजस्थान पहिले नाही) बाकी जे डोश्याचे तेच म्हैसूर नावाच्या गोड पदार्थाचेसुद्धा का?

3

उल्कावर्षाव!

असुर ·

श्रावण मोडक 20/08/2010 - 00:46
छान. उल्कापातामुळे मानवी वस्तीत हानी झाल्याचा दाखला आहे का? काय घडले होते, कसे घडले होते?

In reply to by श्रावण मोडक

अनुराग 20/08/2010 - 12:18
उल्कापातामुळे हानि झाल्याचे माहित नाहि पण बुलडाणा जिल्ह्यात लोणार येथे सरोवर तयार झाले आहे.

In reply to by श्रावण मोडक

असुर 20/08/2010 - 23:26
उल्का मनुष्यवस्तीजवळ किंवा वस्तीत पडून वित्तहानी झाल्याचे किंवा तुरळक वेळी लोक जखमी झाल्याचे माहिती आहे. परंतु जीवितहानीचे फारसे वाचल्याचे आठवत नाही. नाही म्हणायला, १५व्या शतकात चीन मध्ये उल्का पडून हजारो लोक मेले असल्याचा उल्लेख वाचला आहे. हेच शोधताना जालावर ही लिंक मिळाली. इच्छुकांनी माहितीचा लाभ घ्यावा.

मृत्युन्जय 20/08/2010 - 00:48
झक्कास. असले काहीतरी व वाचायला खुप आवडते. दुर्दैवाने आमचे डोके या गोष्टींमध्ये चालत नाही. तु खुपच सोप्पे करुन सांगितलेस. खुपच छान. सध्या चालु असलेल्या काही बकवास कचरा धाग्यांमघ्ये तर हा झक्कास धागा नक्कीच एकदम उठुन दिसेल . अभिनंदन.

फोटो असते तर आणखीन बहार आली असती. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत. लिहिलात तर या विषयांवर अधिक वाचायला आवडेल - साधारण किती लहान उल्का जळून जातात? आपल्याला चेंडूएवढी अशनी मिळाली तर मुळात ती किती मोठी उल्का होती याबाबत काही अंदाज आहे का? - चंद्रावरचे खड्डे हे असेच उल्कांमुळे झालेले 'धडक-खड्डे' आहेत का? - तसं असलं तर पृथ्वीवर ते तितके का दिसत नाहीत? - उल्कांनी प्रचंड प्रमाणावर जीवितहानी होते, तसे आत्तापर्यंतचे महत्त्वाचे उल्कापात कोणते? - आर्मागेडन सारख्या धोक्याची तीव्रता कमी करण्यासाठी सध्या काही उपाययोजना आहेत का? तसे योजण्याची गरज आहे का? - उल्कांमुळे जीवनाच्या उगमाविषयी काही सांगता येतं का? पृथ्वीवरच्या जीवनाची सुरूवात उल्कांनी आणलेल्या रेणूंमुळे झाली असं वाचल्याचं आठवतं. ते कितपत खरं असेल? - ऑक्टोबर महिन्यात नक्की कधी दर्शन होऊ शकतं? - उल्का वर्षाव काटकोनामुळे अधिक नेमका का होतो? वारंवार मराठीत वापरात येणारे इंग्रजी शब्द अवतरणात का टाकले आहेत कळलं नाही. एकंदरीतच अवतरणं कमी झाली तर बरं होईल असं वाटतं.
अर्थात अश्या विविधतेसाठी वेगवेगळ्या आकाराच्या, वस्तुमानाच्या उल्का हव्यात आणि कमीतकमी प्रकाशमात्रा असलेली मोकळी जागा हवी.
कमीतकमी प्रकाशमात्रा म्हणजे भरपूर अंधार का? (ह. घे.)

In reply to by राजेश घासकडवी

- तसं असलं तर पृथ्वीवर ते तितके का दिसत नाहीत? मध्यंतरी डिस्कवरीवर एक कार्यक्रम पाहत होतो. त्यातल्या शास्त्रज्ञाचा असा दावा होता की 'अशा अनेक उल्का पृथ्विवर पण येऊन आदळल्या होत्या आणि त्यामुळे पडलेली विवरे युरोपात खूप मोठ्या प्रमाणात आहेत. त्या साठी त्याने जर्मनीतल्या एका शहराचे अंतराळातून पण फार दूर न जाता केलेले चित्रीकरण मिळवून अभ्यास केला होता. त्यात अनेक अशा उल्का आदळल्यामुळे पडलेली पण आता बुजत आल्यासारखी विवरे दिसत होती. मग त्या भागाचे जमिनीवरुन केलेले चित्रीकरण दाखवले तर ते शहर छान पैकी पुण्यासारखे सर्व बाजूंनी डोंगर असल्याने तयार झालेल्या बशीसारख्या आकारात वसलेले होते. पृथ्वीवरील आंतरखंडीय हालचांलींमुळे अशी विवरे बुजली किंवा उथळ झाली असावीत. अशा प्रकारची अनेक विवरे समुद्रतळाशी देखील आहेत. त्याचाही पुरावा म्हणून वापर केला होता त्या कार्यक्रमात.

In reply to by राजेश घासकडवी

sagarparadkar 20/08/2010 - 12:44
उल्का वर्षाव काटकोनामुळे अधिक नेमका का होतो? मला वाटतं धूमकेतूची कक्षा प्रुथ्वीच्या कक्षेशी छेद करताना काटकोन करेल तर उल्का वर्षाव अधिक नेमका दिसेल. पण जर धूमकेतूची कक्षाच जर प्रुथ्वीच्या कक्षेच्या प्रतलाशी काटकोन करेल तर आप्ल्याला त्याच्या कचर्‍यापासून निर्माण होणारा उल्का पात दिसणारच नाही. जाणकार तज्ञ यावर अधिक सांगू शकतील ...

In reply to by राजेश घासकडवी

असुर 21/08/2010 - 00:32
माझ्या अल्पमतीप्रमाणे उत्तरे द्यायचा प्रयत्न केला आहे. >>>- साधारण किती लहान उल्का जळून जातात? आपल्याला चेंडूएवढी अशनी मिळाली तर मुळात ती किती मोठी उल्का होती याबाबत काही अंदाज आहे का? ० ते १०मी. व्यासाच्या उल्का तर जळूनच जातात. १० ते ३५मी. व्यासाच्या उल्का पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचू शकतात. पण हे बऱ्याच गोष्टीवर अवलंबून आहे. १. त्यांचा वेग २. त्यांची बांधणी- बांधणी जेवढी सुटी (किंवा ढिसाळ), तेवढे लवकर तुकडे होऊन उल्का लवकर जळते. ३. पृथ्वीच्या वातावरणाशी असलेला त्यांच्या चक्राकार (spiral) गतीचा कोन - वातावरणात प्रवेश करतेवेळी उल्केचा कोन जितका काटकोनाकडे तेवढी उल्का कमीतकमी वेळात पृष्ठभागापर्यंत पोहोचू शकते. त्यापेक्षा मोठ्या उल्का फार कमी आहेत. त्यामुळे धोका असला तरी तो कमीच आहे. >>>- चंद्रावरचे खड्डे हे असेच उल्कांमुळे झालेले 'धडक-खड्डे' आहेत का? होय. चंद्रावर वातावरणाचा अतिशय विरळ असा थर आहे (अगदीच नावाला आहे). त्यामुळे बहुतेक उल्का ह्या विशेष न जळता चंद्रापर्यंत पोहोचतात आणि झकासपैकी धडक-खड्डे (इंपक्ट क्रेटर) तयार करतात. >>>- तसं असलं तर पृथ्वीवर ते तितके का दिसत नाहीत? वातावरणाच्या प्रचंड दाट थरामुळे बहुतांश छोट्या उल्का जळून जातात. आणि पृथ्वीच्या पृष्टभागाच्या ७१% भाग असलेल्या समुद्रात पडणार्‍या उल्कांचे खड्डे दिसत नाहीत. >>>- उल्कांनी प्रचंड प्रमाणावर जीवितहानी होते, तसे आत्तापर्यंतचे महत्त्वाचे उल्कापात कोणते? अशी प्रचंड प्रमाणात जीवितहानी झाल्याचे मला तरी माहिती नाही. अपवाद एका उदाहरणाचा आहे, ते उदाहरण आणि लिंक वर श्रामोंच्या प्रतिसादात दिली आहे. >>>- आर्मागेडन सारख्या धोक्याची तीव्रता कमी करण्यासाठी सध्या काही उपाययोजना आहेत का? तसे योजण्याची गरज आहे का? 'नासा' या प्रकारच्या उपाययोजना राबवण्यात अग्रगण्य आहे. सध्या शोधा, लक्ष ठेवा आणि धोक्याची तीव्रता मापून ठेवा या धर्तीवर काम चालू आहे. तसेच अतिधोकादायक उल्का/अ-ग्रहीय वस्तू नष्ट करण्यासाठी किंवा त्यांना पृथ्वीपासून दूर ढकलण्यासाठी अनेक उपाय आहेत. आण्विक अस्त्रांचा वापर करून उल्का नष्ट करणे, रॉकेट सोडून उल्केची दिशा बदलणे, उल्केचे छोटे तुकडे करून ते वातावरणातच जाळून जातील अशा प्रकारची अस्त्रे वापरणे आणि अजून काय काय. पण सध्या तरी अशा प्रकारची कोणतीही चिंता करण्याचे कारण नाहीये. आणि अर्मागडॉन मधले उपाय शक्य असले तरी अगदीच जे दाखवलंय ते तद्दन फिल्मी आहे. >>>- उल्कांमुळे जीवनाच्या उगमाविषयी काही सांगता येतं का? पृथ्वीवरच्या जीवनाची सुरूवात उल्कांनी आणलेल्या रेणूंमुळे झाली असं वाचल्याचं आठवतं. ते कितपत खरं असेल? जीवनाच्या उगमाविषयी अनेक मतप्रवाह आहेत. पण मला त्यातले काहीच कळत नाही. माणसामुळे माणूस जन्माला येतो (आणि कर्तृत्वाने सुजाण अथवा गाढव होतो) इतपतच माहिती आहे. >>>- ऑक्टोबर महिन्यात नक्की कधी दर्शन होऊ शकतं? १७ ते २५ ऑक्टोबर महिन्यात ओरीनीड्स उल्कापात दिसू शकेल. १० ते २२ नोव्हेंबर ह्या दरम्यान लेओनीड्स उल्कापात दिसू शकेल. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात भारतात आकाश बहुधा स्वच्छ असते, त्यामुळे उल्का दिसण्यास त्रास होणार नाही अशी अपेक्षा आहे. >>>- उल्का वर्षाव काटकोनामुळे अधिक नेमका का होतो? धूमकेतू त्याच्या कक्षेतून जाताना कचरा सोडत जातो. हा कचरा पृथ्वीच्या कक्षेवर जिथे सांडेल त्या ठिकाणी पृथ्वी आली कि आपल्याला उल्कापात दिसतो. धूमकेतूची कक्षा तितकी काटकोनात तितका हा कचरा जास्त एके ठिकाणी पसरेल अन्यथा विखरून जाईल. हा कचरा जितका जास्त विखुरलेला असेल तितक्या जास्त दिवस उल्का पडत राहणार. आता समजा धूमकेतू १०० दगड मागे सोडून गेला आहे. हे १०० दगड जर कमी परिसरात पसरले तर आपल्याला एका रात्रीत १०० उल्का दिसू शकतील. हाच कचरा विखुरला तर कदाचित ५-६ रात्री मिळून १०० उल्का दिसतील. या तत्वानुसार, धूमकेतूची कक्षा जितकी काटकोनात तितका उल्कापात नेमका असे समजले जाते. माझे मत: गुर्जी, आपले प्रश्न फार आवडले. मजा आली. अवांतर : अवतरन चिन्हे कमि करन्यचि कल्जि पुधच्य वेलि घेइन. य वेलि सोरि. फर जस्त झलियेत असे वतत असेल तर प्लिज अवतरन चिन्हे गलुन वाचावे. -- असुर जप्कर अतिअवांतर : इतका मोठा प्रतिसाद पाडल्याबद्दल डान्राव, माफी द्या येक डाव. -- गन्या ढिश्क्यांव

In reply to by असुर

खरं तर ती प्रश्नांमध्ये दडलेली अजून एक लेख लिहिण्याची विनंती होती. :) हा लेख उल्का म्हणजे काय, याची उत्तम ओळख देणारा झाला, पण खऱ्या गमतीदार गोष्टी अजून यायच्या आहेत... तेव्हा लवकर येऊद्यात. तुम्ही सोप्या भाषेत चांगलं लिहिता.

बहुगुणी 20/08/2010 - 06:33
'गेल्या वेळी आपण येथे वाचलंच असेल की ..' हे वाचल्यावर आपला याआधीचा एक असाच लेख वाचायचा राहून गेलाय हे माझ्या लक्षात आलं, म्हणून असुर यांचं लिखाण शोधलं आणि हा धुमकेतूवरील लेख सापडला (माझ्यासारख्या आणखी कुणाचा चुकला असेल तर सोय म्हणून दुवा देतो आहे. पण असुर राव, मालिकेतील या पुढील लेखांमध्ये आधीच्या लेखांचे दुवे दिलेत तर सोय होईल.) दोन्ही माहितीपूर्ण लेख आवडले, धुमकेतूंवरील लेखाप्रमाणेच या लेखातही चित्रे/छायाचित्रे टाकता आली तर पहा. वर श्रावण मोडकांनी विचारलं आहे की उल्कावर्षावाने मानवी हानी झाल्याची काही उदाहरणं आहेत का? ६५ दशलक्ष वर्षांपूर्वी मेक्सिकोतील युकाटान प्रांतात झालेल्या उल्कापाताने (K-T Event) वनस्पतींचा समूळ नायनाट झाल्याने डायनॉसॉर्स ची अखेर झाल्याची (वादग्रस्त) माहिती वाचली होती, पण मनुष्यवस्तीत काही नुकसान झाल्याची उदाहरणं आहेत का ते माहीत नव्हतं. थोडा शोध घेतला तेंव्हा e-notes मध्ये हा लेख सापडला, हा किती authentic आहे ते अदिती आणि असुर यांच्यासारखे तज्ञच सांगू शकतील, पण तो उताराच इथे उद्धृत करतो: Even though many thousands of meteorites fall to Earth each year it is rare for one to hit a human being. The chances of a human fatality resulting from the fall of a meteorite have been calculated as one death, somewhere in the world, every 52 years. Thankfully, no human deaths from falling meteorites have been reported this century. A woman in Sylacauga, Alabama, was injured, however, by a 8.6 lb (3.9 kg) meteorite that crashed through the roof of her house in 1954. Another close call occurred in August of 1991, when a small meteorite plunged to the ground just a few meters away from two boys in Noblesville, Indiana. In contrast to the situation with human beings, meteorite damage to buildings is much more common—the larger an object is the more likely it will be hit by a meteorite. A farm building, for example, was struck by a meteorite fragment in St. Robert, Quebec in June of 1994. Likewise, in August 1992, a small village in Uganda was showered by at least 50 meteorite fragments. Two of the meteorites smashed through the roof of the local railway station, one meteorite pierced the roof of a cotton factory, and another fragment hit an oil storage facility. One of the more spectacular incidents of meteorite-sustained damage in recent times is that of the Peekskill meteorite which fell in October of 1992 and hit a parked car. इथे २००७ च्या जून महिन्यात आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाचं उल्कापाताने नुकसान झाल्याचं मात्र उदाहरण तसं ताजं आहे, (या अ-घातक नुकसानानंतर आठवड्याभरातच भारतीय वंशाची सुनीता विल्यम्स या अवकाशस्थानकावर पोहोचली होती.) आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाचं तसंच हबल अवकाश दुर्बीणीचं असंच नुकसान पुढील वर्षाच्या उत्तरार्धात होणार्‍या उल्कावर्षावात होण्याची शक्यता नासाने वर्तवली आहे. १९९३ साली पेरेसिड (Pereseid) या दरवर्षी होणार्‍या उल्कापातानंतर ऑलिंपस या satellite चा विद्युतपुरवठा बंद पडल्याने हा satellite बंद पडला होता असं वाचल्याचं आठवतं. त्याच पेरेसिड उल्कावर्षावापासून असं नुकसान बर्‍याच बड्या satellite कंपन्याना भोगावं लागेल अशी शक्यता परवाच्याच ऑगस्ट ११ आणि १२ तारखांना वर्तवली गेली होती असं या दुव्यावर वाचलं (तसं ते खरंच झालं का हे माहीत नाही.) या मानवनिर्मीत उपकरणांचं नुकसान हेही पर्यायाने मानवाचंच नुकसान म्हणता येईल.

विनंतीला मान देऊन लिहील्याबद्दल असुर याचे आभार. अभ्यासपूर्ण आणि सूचनांचे प्रतिसाद लेखात एकत्र करून एक अधिक परिपूर्ण लेख असुर लवकरच पाठवतील अशी अपेक्षा! ;-) असुरा, तुझी लेखणी एकदम सुटसुटीत चालते. चांगलं लिहीलं आहेस. आणखी एक सूचना: सगळ्याच महिन्यांत होणार्‍या महत्त्वाच्या उल्कावर्षावाची यादी देता येईल का? शिवाय फक्त महिन्यांची यादी न देता, उल्कावर्षाव सर्वात जास्त कधी होईल त्याच्या तारखाही?? अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

असुर 21/08/2010 - 00:37
>>>आणखी एक सूचना: सगळ्याच महिन्यांत होणार्‍या महत्त्वाच्या उल्कावर्षावाची यादी देता येईल का? शिवाय फक्त महिन्यांची यादी न देता, उल्कावर्षाव सर्वात जास्त कधी होईल त्याच्या तारखाही?? यावर एक वेगळा लेख होऊ शकेल असे वाटते आहे. सविस्तर लिहिता येईल. --असुर

मनि२७ 20/08/2010 - 10:38
भारी आहे लेख ....म्हणजे वजनदार नाही तर झक्कास.... :-) !!!!!!! मी पण बुलढाणा जिल्ह्याचीच आहे....आणि लोणार ला पण जाऊन आली आहे... पाहण्यासारखा आहे खरच....एवढा विशाल खड्डा पडलाय कि क्षणभर विश्वासच होत नाही.....

In reply to by परिकथेतील राजकुमार

असुर 21/08/2010 - 00:41
पराशेठ, धूमकेतूंचे किंवा उल्कापाताचे फोटो मी कधीच काढले नाहीत. धूमकेतूंच्या वेळी मी असेच आंतरजालावरून उचलून दिले होते फोटो. पण दर वेळी अशी ढापाढापी करणे प्रशस्त वाटत नाही ओ. --असुर

चतुरंग 20/08/2010 - 15:14
सैबेरियातल्या तुंगुस्का इथे १९०८ साली झालेली अशनीपाताची घटना प्रसिद्ध आहे, 'तुंगुस्का इवेंट' ह्या नावाने ती ओळखली जाते. त्याचा विकीवरील दुवा. बाकी 'तुटलेला तारा' आकाशातून पडताना दिसतो फार सुंदर. ऑक्टोबर आणि नोवेंबरमधला उल्कावर्षाव आकाशाच्या कोणत्या भागातून दिसेल ह्याबद्दल जरा सविस्तर माहिती देशील का? (दगडू)चतुरंग

In reply to by चतुरंग

असुर 21/08/2010 - 04:41
>>>ऑक्टोबर आणि नोवेंबरमधला उल्कावर्षाव आकाशाच्या कोणत्या भागातून दिसेल ह्याबद्दल जरा सविस्तर माहिती देशील का? १७ ते २५ ऑक्टोबर महिन्यात ओरीनीड्स उल्कापात दिसू शकेल. भारतात असताना आकाशाच्या मध्यातून पूर्व-पश्चिम अशी एक काल्पनिक रेषा काढली तर या रेषेच्या जरा दक्षिणेला मृग नक्षत्र दिसते. अमेरिकेतून पाहीले तर हेच नक्षत्र अजून जास्त दक्षिणेला दिसेल. हे नक्षत्र आकाराने बरेच मोठे आणि समजायला सोपे आहे. व्याधाचा तारा, त्याने बाण मारलेले हरीण वगैरेची भारतीय गोष्ट माहितीच असेल. याच तारकासमूहाला ओरायन म्हणतात आणि यातून होणार्‍या उल्कापाताला ओरीनीड्स शॉवर! २२ तारीख ही साधारणपणे या उल्कापाताची मुख्य तारीख मानली जाते. १० ते २२ नोव्हेंबर ह्या दरम्यान लेओनीड्स उल्कापात दिसू शकेल. हे म्हणजे सिंह रास. मृग नक्षत्राच्या जस्ट मागे (म्हणजे पूर्वेला) सिंह रास आहे. हा तारकासमूह (रास) समजायला थोडे कष्ट घ्यावे लगतील, पण एकदा लक्षात आलं की फार मजा वाटते. या राशीचा ठळक तारा म्हणजे मघा नक्षत्राचा तारा (regulus). हा तारा अतिशय तेजस्वी आणि काहीसा लालसर दिसतो. १७ तारीख ही साधारणपणे या उल्कापाताची मुख्य तारीख मानली जाते. आपल्या निरीक्षणाच्या ठिकाणाप्रमाणे हे तारकासमूह थोडेफार वेगळे दिसतात. उदाहरणार्थ, भारतातून मृग नक्षत्र हे एखाद्या हरिणाच्या ४ पायांप्रमाणे दिसते. पण हेच मृग नक्षत्र इंग्लंड मध्ये एखाद्या माणसाच्या आकारात दिसते. याचे कारण म्हणजे आपण उत्तर गोलार्धात वेगवेगळ्या अक्षवृत्तांवरुन निरिक्षण करीत आहोत. आपण अमेरिकेत असाल तर स्थानिक जाणकारांची किंवा नकाशांची मदत घ्या. तसेच शक्यतो अंधार्‍या आणि सुरक्षित जागी जाऊन पाहायचा प्रयत्न करा. जाताना स्लीपिंग बॅग न्यायला विसरू नका. जर आडवे होऊन पाहिलंत (आणि झोप लागली नाही) तर अधिक प्रमाणात आकाश दिसेल आणि जास्त उल्का दिसतील. (आणि आपला हा अनुभव शेअर करायला विसरु नका.) हॅपी उल्कावर्षाव!!! तुंगस्काच्या लिंकबद्दल मन:पूर्वक धन्स. --असुर

In reply to by असुर

Arun Powar 16/09/2010 - 17:29
आपल्या निरीक्षणाच्या ठिकाणाप्रमाणे हे तारकासमूह थोडेफार वेगळे दिसतात. उदाहरणार्थ, भारतातून मृग नक्षत्र हे एखाद्या हरिणाच्या ४ पायांप्रमाणे दिसते. पण हेच मृग नक्षत्र इंग्लंड मध्ये एखाद्या माणसाच्या आकारात दिसते. याचे कारण म्हणजे आपण उत्तर गोलार्धात वेगवेगळ्या अक्षवृत्तांवरुन निरिक्षण करीत आहोत. असहमत..!! असुर तुम्ही ही माहिती पुन्हा तपासून बघा..

In reply to by Arun Powar

तो परिच्छेद मी काळजीपूर्वक वाचला नव्हता. पण कित्येक प्रकाशवर्षं दूर असलेला तारकासमूह काही हजार किलोमीटर अंतरावरून बघितला तर वेगळा कसा काय दिसेल?

ऋषिकेश 20/08/2010 - 17:21
वा.. अतिशय सुटसुटीत व माहितीपूर्ण लेख!! आवडला. अदितीच्या सुचनेशी सहमत

Pain 16/09/2010 - 21:19
तारा कधीही तुटत नाही. तो बिचारा त्याचा त्याचा आयुष्य कंठत कंठत म्हातारा होतो, आणि 'ड्वार्फ', 'सुपरनोव्हा' वगैरे बनून गप पडून राहतो. नीट आठवत नाही पण, काही वेळेला, शेवटी, जर त्याचे केंद्र आकुंचन पावत गेले तर कृष्णविवर तयार होते, ही माहिती बरोबर आहे का ? कृष्णविवरांबद्दल लेख किंवा लिंक्स आवडतील.

In reply to by Pain

जर त्याचे केंद्र आकुंचन पावत गेले तर कृष्णविवर तयार होते, ही माहिती बरोबर आहे का ?
तारा मरायला येतो (केंद्रात ऊर्जा बनणं कमी कमी होत संपतं) तोपर्यंत बाहेरचे थर खूप प्रसरण पावले असतात आणि केंद्र आकुंचन पावत असतं. अशा स्थितीत तार्‍याच्या पृष्ठभागाचं तापमान बरंच कमी झालेलं असतं म्हणून रंग लाल होत जातो. या स्थितीचं वर्णन राक्षसी रक्तवर्णी असं करता येईल. सध्या आकाशात काक्षी (मृग), स्वाती, antares (वृश्चिक), eta karinae हे तारे असेच आहेत. सूर्याचा आकार मंगळाच्या कक्षेपर्यंत असेल आणि ग्रहमाला वाचली असेल तर त्यांच्याही कक्षा कदाचित मोठ्या झाल्या असतील आणि बुध-शुक्र-पृथ्वी सूर्याने गिळून टाकले असतील. तार्‍याचं केंद्र आकुंचित होत जातं आणि जास्तीत जास्त लोखंडापर्यंत जड मूलद्रव्य बनून ऊर्जा निर्मिती थांबते. यापुढे अणूकेंद्र एकत्र येऊन ऊर्जा निर्मीती होऊ शकत नाही. गुरूत्वाकर्षण भारी पडतं आणि केंद्राचं आकुंचन सुरू होतं. आकुंचन थांबू शकतं ते electron degeneracy pressure मुळे. एका अणूच्या दोन इलेक्ट्रॉन्सची ऊर्जा सारखी असू शकत नाही - हे तत्त्व पॉलीचे exclusion principle म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे गुरूत्त्वाकर्षणाच्या दाबामुळे जेव्हा एका अणूतल्या दोन इलेक्ट्रॉन्सची ऊर्जा सारखीच होऊ पहाते त्याला इलेक्ट्रॉन विरोध करतात हेच ते degeneracy pressure! जर या degeneracy pressure ने गुरूत्वाकर्षणाला तोलून धरलं तर तार्‍याचा होतो श्वेतबटू / पांढरा खुजा / white dwarf! (सूर्याचं मरण असंच असेल.) पण जर गुरूत्वाकर्षण degeneracy pressure ला भारी पडलं तर मग इलेक्ट्रॉन्स अणूच्या केंद्रकाशी धडकू लागतात आणि शेवटी इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन्स एकत्र येऊन न्यूट्रॉन्स तयार होतात. तार्‍याच्या केंद्राचं वस्तूमान सूर्याच्या एकूण वस्तूमानाच्या १.४ पटीपेक्षा जास्त असेल तरच अशा पद्धतीने न्यूट्रॉन्स तयार होऊ शकतात. हा आकडा शोधून काढला सुब्रमण्यम चंद्रशेखर यांनी! (याच संशोधनासाठी त्यांना नोबेल पुरस्कारही मिळाला.) पुन्हा एकदा न्यूट्रॉन degeneracy pressure गुरूत्वाकर्षणाला रोखून धरतं. न्यूट्रॉन तार्‍यापैकीच काही पल्सार्सच्या स्वरूपात दिसतात. यातही तार्‍याचं वस्तूमान जास्त असेल तर तार्‍याच्या आतल्या बाजूला होणार्‍या पडझडीमुळे केंद्रात स्फोट होतो ज्याला अतिनवतारा किंवा supernova म्हणतात. यातही स्फोटानंतर तार्‍याचं वस्तूमान सूर्याच्या एकूण वस्तूमानाच्या १.४ पटीपेक्षा कमी असेल तर तार्‍याचा श्वेतबटू होतो, जास्त असेल तर न्यूट्रॉन तारा. आणि जर तार्‍याचं केंद्र आणखी जास्त जड असेल तर न्यूट्रॉन degeneracy pressure ही गुरूत्वाकर्षणाला रोखून धरू शकत नाही आणि मग तार्‍यांचं कृष्णविवर तयार होतं. न्यूट्रॉन तारा आणि कृष्णविवर होण्यासाठी तार्‍याचं वस्तूमान किती असायला हवं याचं नेमकं उत्तर आज माहित नाही. कारण कृष्णविवराच्या आत पदार्थाची स्थिती काय असते हे अजून आपल्याला माहित नाही. आता माझी टैम्प्लिस! असुर पुढची गोष्ट सांगेल! ;-)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

Pain 18/09/2010 - 01:38
एवढे सगळे टंकण्याबद्दल धन्यवाद! काही शंका आहेत- तार्‍याचं केंद्र आकुंचित होत जातं आणि जास्तीत जास्त लोखंडापर्यंत जड मूलद्रव्य बनून ऊर्जा निर्मिती थांबते आपल्या सूर्यात हायडोजनचे अणू एकत्र येउन हेलियमचा अणू बनण्याची प्रक्रिया (fusion reaction) सुरु असते. मोठे अणू म्हणजे फार तर म्हणजे बेरिलियम, लिथियम पर्यंत. त्या तुलनेत लो़खंडाचा अणू खूपच मोठा आहे. अस का? (वेगवेगळ्या तार्‍यांमधे वेगवेगळ्या प्रक्रिया म्हणून का आपण त्याच्या नेहमीच्या आयुष्यातील गोष्टी न पाहता तो संपुष्टात येण्याचा कालावधी पाहतोय म्हणून? की इतर काही? एका अणूच्या दोन इलेक्ट्रॉन्सची ऊर्जा सारखी असू शकत नाही येथे उर्जा म्हणजे नक्की कुठली उर्जा अपे़क्षित आहे ? १) त्यांच्यावरचा ऋण भार (negative charge) समान असतो. आणि २) अणूची रचना आपल्या सूर्यमालेप्रमाणे धरल्यास त्यांची गुरुत्त्वाकर्षणामुळे असलेली ( F=Gm1m2/r*r) स्थितीज उर्जा (potential energy) ही प्रत्येक इलेक्ट्रॉनची समान असणार: इलेक्ट्रॉनचे वस्तुमान प्रोटॉन, न्यूट्रॉनच्या तुलनेत नगण्य असते आणि वरच्या सूत्रात घालायचेच असेल तर जे आहे ते प्रत्येक इलेक्ट्रॉनसाठी सारखेच असणार. बाकी G,m1 सारखेच. आणि r (त्रिज्या) ही त्या कक्षेतील सर्व इलेक्ट्रॉनसाठी समान.

In reply to by Pain

आपल्या सूर्यात हायडोजनचे अणू एकत्र येउन हेलियमचा अणू बनण्याची प्रक्रिया (fusion reaction) सुरु असते. मोठे अणू म्हणजे फार तर म्हणजे बेरिलियम, लिथियम पर्यंत. त्या तुलनेत लो़खंडाचा अणू खूपच मोठा आहे.
अगदी बरोबर. तार्‍याच्या जीवनक्रमातला जिवंतपणीचा बराचसा काळ तारा हायड्रोजनचं हेलियममधे रूपांतर करतो आणि त्यात जी वस्तूमानाची घट येते ती ऊर्जेत रूपांतरीत होते. (आईनस्टाईनचं समीकरण: E=m×c×c) जेव्हा केंद्रातला हायड्रोजन संपत येतो तेव्हा हेलियमचं लिथियम (अणूक्रमांक* ३), बेरियम (अणूक्रमांक ४) अशा पद्धतीने रूपांतर व्हायला सुरूवात होते. हलक्या किंवा अणूक्रमांक कमी असलेल्या अणूंची केंद्रकं एकत्र येऊन (nuclear fusion) जड अणूंची केंद्रकं तयार होतात. या प्रक्रियेत ऊर्जा बाहेर पडण्याची क्रिया (exothermic) फक्त लोखंडाचं केंद्र (अणूक्रमांक २६) बनेपर्यंतच होते. पुढची जड मूलद्रव्य (उदा: कोबॉल्ट, निकल, तांबं, सोनं, चांदी, युरेनियम, इ.) बनवण्यासाठी बाहेरून ऊर्जा द्यावी (endothermic) लागते. त्यामुळे तार्‍याच्या अंतर्भागात लोखंडाचा गाभा बनला की पुढची ऊर्जा अणूकेंद्रकं एकत्र येऊन मिळवता येत नाही. सूर्याच्या बाबतीत, सूर्याचं वस्तूमान बरंच कमी असल्यामुळे केंद्रकात कार्बन (अणूक्रमांक ६) पर्यंतच जड मूलद्रव्य बनू शकतील. त्यापुढची मूलद्रव्य बनण्याच्या आधीच सूर्याचा "मृत्यु" होईल.
येथे उर्जा म्हणजे नक्की कुठली उर्जा अपे़क्षित आहे ? १) त्यांच्यावरचा ऋण भार (negative charge) समान असतो. २) अणूची रचना आपल्या सूर्यमालेप्रमाणे धरल्यास त्यांची गुरुत्त्वाकर्षणामुळे असलेली ( F=Gm1m2/r*r) स्थितीज उर्जा (potential energy) ही प्रत्येक इलेक्ट्रॉनची समान असणार:
एका अणूचा विचार करता ... (हायड्रोजनचा विचार करू कारण तो सगळ्यात साधा अणू आहे) ... इलेक्ट्रॉन अणूकेंद्राभोवती फिरतो त्यामुळे त्यावर विविध बलं काम करत असतातः पैकी सगळ्यात जे अशक्त बल, गुरूत्वाकर्षण त्याचा तुम्ही उल्लेख केला आहेच. पण गुरूत्वाकर्षण इतर दोन बलांपेक्षा एवढं कमी असतं की त्याचा विचार करण्यात फारसा अर्थ नाही. अणूकेंद्राचा धनभार आणि इलेक्ट्रॉनचा ऋणभार यांच्यातही आकर्षण असतं ते दुसरं बल झालं. यामुळे इलेक्ट्रॉनला स्थितीक उर्जा (potential energy) असते. १. इलेक्ट्रॉन एका "ठराविक आकारा"च्या कक्षेत (shell) अणूकेंद्रकाभोवती फिरत असतो. (हे खरंतर अर्धसत्य आहे, पण ते प्रश्न असल्यास सविस्तर नंतर लिहेन.) २. शिवाय या एका कक्षेत उपकक्षा (subshell) असतात. क्वांटम थिअरीप्रमाणे या प्रत्येक कक्षा आणि उपकक्षेसाठी ठराविक उर्जा असते त्याहून निराळी उर्जा इलेक्ट्रॉनकडे असू शकत नाही. किंवा प्रत्येक कक्षा आणि उपकक्षेसाठी क्वांटम नंबर्स असतात. किंवा एका ठराविक एककाच्या पटीतच इलेक्ट्रॉनची उर्जा असू शकते. उदा: ए हे एकक ठरवलं, तर इलेक्ट्रॉनची उर्जा १×ए, २×ए, ३×ए ... एवढीच असू शकते. ३. या उपकक्षेचा आकार गोलाकार असतोच असं नाही. तेव्हा उपकक्षेच्या ओरिएंटेशन (मराठी शब्द?) प्रमाणे इलेक्ट्रॉनची उर्जा बदलू शकते. ४. शेवटी, इलेक्ट्रॉन स्वतःभोवती 'स्पिन' होतो. या स्पिनमधेही इलेक्ट्रॉनची उर्जा साठवलेली असते. आणि इथेही उर्जेचं क्वांटायझेशन होतं. या चार प्रकारच्या क्वांटम नंबर्समुळे एका अणू केंद्रकासाठी इलेक्ट्रॉनसाठी ठराविक कक्षा, उपकक्षा इ. असू शकतात. बाहेरून बलप्रयोग न झाल्यास यातल्या अनेक उर्जास्थिती इलेक्ट्रॉनसाठी उपलब्ध असतात. पण जेव्हा श्वेत बटू स्थिती येते तेव्हा बाहेरून गुरूत्वाकर्षण इलेक्ट्रॉन्सना अणूकेंद्राकडे ढकलू लागतं तेव्हा मात्र इलेक्ट्रॉन्सच्या गर्दीत 'पॉलीचे एक्सक्लूजन प्रिन्सीपल', किंवा एका सिस्टममधे एका उर्जास्थितीसाठी एक इलेक्ट्रॉन या न्यायाने इलेक्ट्रॉन्सचा दाब (डिजनरसी प्रेशर) गुरूत्वाकर्षणाला रोखू शकतं. *अणूक्रमांक = अणूकेंद्रात असणार्‍या प्रोटॉन्सची संख्या (हे सगळं मराठीत लिहिण्याचा प्रयत्न केला आहे, पण काही अगम्य भाषेत, अगम्य विज्ञान लिहीलेलं आहे अशी मलाच शंका येते आहे.)

सुनील 17/09/2010 - 07:17
सुरेख. माहितीपूर्ण लेख. लोणारबद्दल वाचले होते.

लहानपणी आपण सगळेच आकाशातली एक 'स्पेशल' गोष्ट पाहून खूप खूष व्हायचो आणि लगेच डोळे बंद करून काहीतरी 'स्पेशल' मागायचो! आठवतंय का काय होती ती स्पेशल घटना? करेक्ट! आपण त्याला म्हणायचो 'तारा तुटला'. तुटणारा तारा ही इतकी विशेष घटना असायची की ते पाहिल्यावर काहीतरी बाप्पाकडे 'विशेष' मागायचं, आणि ते कधी खरं होईल याची वाट पाहत बसायचं. अर्थात असं काही व्हायच्या आधीच अजून एखादा तुटणारा तारा दिसायचा आणि अजून काहीतरी मागणं व्हायचं. असंच नाचत बागडत मोठे झालो, जरा थोडीफार अक्कल आली आणि यातला मजेचा भाग मागे पडून काही मस्त गोष्टी समजल्या. त्यातली पहिली भ्रमनिरास करणारी गोष्ट म्हणजे तारा कधीही तुटत नाही.

सह्याद्री च्या प्रेमात न पडलेला माणूस, निदान मराठी माणूस तसा सापडणे कठीणच.!

संजयशिवाजीरावगडगे ·
सह्याद्री च्या रांगा बघून, त्यांचा प्रत्यक्ष सहवास अनुभवून, सह्याद्री च्या प्रेमात न पडलेला माणूस, निदान मराठी माणूस तसा सापडणे कठीणच.! सह्याद्री पर्वतरांग उत्तरेला सातपुडा पर्वतरांगेपासून सुरू होते. नंतर दक्षिणेला गोवा, कर्नाटक, केरळ व शेवटी तामिळनाडू राज्यामध्ये पसरलेली आहे. यातील मुख्य रांग म्हणजे सह्याद्री. सह्याद्री पर्वतरांगेमध्ये माथेरान, महाबळेश्वर, पांचगणी हे होत ! http://www.amazingsahyadri.com/ योगेश ( Yogesh Kardile) यांची ही साइट जरुर पहा !!!

केट कोलविट्झ - मनस्वी, प्रशांत चित्र-शिल्पकर्ती

चिंतातुर जंतू ·

धनंजय 16/08/2010 - 05:00
असेच म्हणतो. उत्तम कलाकाराची चांगली ओळख करून दिलेली आहे. न्यू गार्ड हाऊस शिल्प मी बघितले, तेव्हा मुसळधार पाऊस पडत होता. छतामधील भगदाडातून शिल्प भिजत होते. आई पावसापासून मुलाच्या शवाचे जमेल तितके रक्षण करत होती असे भासत होते. तिचे प्रयत्न व्यर्थ म्हटले तरी त्या माउलीची उदंड माया आणि कारुण्य जाणवत होते. त्या पावसात माय-लेक भिजत होते, पण आम्ही बघे मात्र कोरडे होतो, म्हणून अतिशय अपराधी भावना होत होती. रात्र-संध्या-उन्ह अशा वेगवेगळ्या प्रसंगांत वेगवेगळ्या छटेच्या करुण भावना उद्भवतील, असा माझा कयास आहे. शिल्पाचा अभिभाज्य घटक या दृष्टीने आपण छतातल्या विवराकडे बघितले पाहिजे.

In reply to by धनंजय

रात्र-संध्या-उन्ह अशा वेगवेगळ्या प्रसंगांत वेगवेगळ्या छटेच्या करुण भावना उद्भवतील, असा माझा कयास आहे. शिल्पाचा अभिभाज्य घटक या दृष्टीने आपण छतातल्या विवराकडे बघितले पाहिजे.
भावनिष्पत्तीत छतातल्या विवराच्या सक्रीय सहभागाविषयी आपण म्हणता ते योग्य आहे. पण तो केटच्या शिल्पाचा अविभाज्य घटक म्हणता येणार नाही, कारण केटनं शिल्प साकारताना वरच्या छताची (आणि विवराची) रचना केली नव्हती. केटच्या शिल्पाचा केंद्रस्थानी वापर करून उभारलेलं 'न्यू गार्ड हाऊस' हे एक मांडणीशिल्प (इन्स्टॉलेशन) आहे असं म्हणता येईल, पण त्याचा (कल्पक) निर्माता कुणीतरी वेगळा आहे; किंवा ही सहनिर्मिती आहे असंही म्हणता येईल. असो. मुसळधार पावसातला आपला अनुभव सांगितल्याबद्दल धन्यवाद. असं होत असेल असं वाटत होतं, पण तसं प्रत्यक्ष म्हणणारं कुणी भेटलं नव्हतं. कलाकृतीच्या उत्कट परिणामासाठी अनेक बाह्य घटकही कसे उपयोगी पडतात, याचं 'न्यू गार्ड हाऊस' हे चांगलं उदाहरण ठरावं.

सहज 16/08/2010 - 07:04
समर्थ कलाकाराची सुंदर ओळख. आपल्या मृत मुलाला कवटाळून आक्रोश करणार्‍या आईचे शिल्प आर्टजगतात बेस्ट असेलही. परंतु टिव्हीवर अफ्रीका, पॅलेस्टाईन येथील युद्ध, नरसंहारात बळी पडलेली काही खरी दृश्ये खरच कोरली गेली आहेत. उदाहरणार्थ १) अल-दुर्रा येथे वडील व मुलगा. दोघे या गोळीबारात मृत्युमुखी पडले २) हुदा घालीया तिचे सगळे कुटुंबीय बीचवर सहलीला आले असता स्फोटात बळी पडले वरील दोन्ही प्रसंगाची प्रत्यक्ष चित्रफीत पाहीली असल्याने एका शिल्पापेक्षा ते जास्त प्रभावी वाटले आहे हेही खरेच. (अवांतर -एक म्हणजे इस्त्राईलने दोन्ही प्रसंगात आपण जबाबदार नसल्याचा दावा केला आहे. ) हाताची घडी घालून बसलेल्या गरोदर स्त्रीचे चित्र अतिशय जिवंत वाटले. 'शायनिंग जर्मनी' उपमा क्लासच! १८६७ - १९४५ कालखंड म्हणावा तर अलिकडचा म्हणावा तर खूप जुना. ह्याच कालखंडात जगातील इतर देशात, भारतासकट कलेच्या क्षेत्रात जे विकास घडत गेले त्याचाही एक आढावा चिंतातूरजंतू यांनी घ्यावा अशी विनंती.

In reply to by सहज

आपल्या मृत मुलाला कवटाळून आक्रोश करणार्‍या आईचे शिल्प आर्टजगतात बेस्ट असेलही. परंतु टिव्हीवर अफ्रीका, पॅलेस्टाईन येथील युद्ध, नरसंहारात बळी पडलेली काही खरी दृश्ये खरच कोरली गेली आहेत.
खरं सांगायचं तर कलाक्षेत्रात एखादीच गोष्ट सर्वोत्तम असं काही नसतं. कुणीही तसं म्हणू लागलं (उदा. मोनालिसा हे जगातलं नं. १ चित्र वगैरे) तर खुशाल समजून चालावं की म्हणणार्‍याला फार काही कळत नाही. कारण ती काही १०० मीटर धावण्याची शर्यत नाही, की अगदी निमिषाच्या फरकांना मोजून आपण पहिलं कोण ते ठरवू शकू. दुसरी गोष्ट म्हणजे आपण ज्या काळात जगतो त्या काळातल्या गोष्टींचा आपल्यावर (सान्निध्यामुळे) अधिक उत्कट परिणाम होणं साहजिक आहे. तिसरी (आणि आपल्या चर्चेच्या दृष्टीनं सर्वाधिक महत्त्वाची) गोष्ट म्हणजे आताच्या काळात माध्यमांनी आपल्या मनावर कळत-नकळत इतका कब्जा केलेला आहे की अनेक प्रतिमांमधल्या दृश्य घटकांकडे आपण विशुध्द मनानं पाहूच शकत नाही. आपण ज्यांची उदाहरणं दिली आहेत त्या प्रतिमा काहीशा तशा आहेत. इस्राएल-पॅलेस्टाईन संघर्षाच्या बाबतीत परदेशात असं अनेकदा जाणवतं की माध्यमांनी विशिष्ट प्रतिमांचा आणि कथनघटकांचा एकत्रित मारा करून वातावरणाचं इतकं ध्रुवीकरण केलेलं आहे की प्रत्यक्ष समस्येकडेही विशुध्द, तटस्थ नजरेनं पाहू शकणारे लोक फार थोडे आहेत. असो. प्रतिमांकडे पाहताना त्यांच्या आजूबाजूच्या वास्तवाशी पूर्ण फारकत घेऊ नये; पण किंचित अंतर ठेवता आलं, तर प्रत्यक्ष प्रतिमेचं पृथक्करण आणि आस्वाद अधिक डोळसपणे घेता येईल, असं वाटतं.

In reply to by चिंतातुर जंतू

सहज 17/08/2010 - 06:57
माझा मुद्दा त्या शिल्पाचे महत्व कमी न करता, मी वर उल्लेख केलेल्या दोन दृश्यांचे (माझ्या मनावर झालेले) तितकेच प्रभावी परीणाम सांगायचे होते. तुलना इ. अजिबात म्हणायचे नव्हते. अगदी चोख, मुद्देसुद शब्दात लिहणे ही एक कला आहे नक्की. वरचा चितांतूर जंतू यांचा प्रतिसाद हे त्याचे एक उत्तम उदाहरण हे शिल्प ज्या मानवी भावनांचे दर्शन घडवते, युद्धाचा, सामान्यांवर विशेषता महीला, बालकांवर होणारा दुष्परिणाम, तो एका शिल्प, चित्र इ माध्यमातुन अनुभवायचा भाग वेगळा व प्रत्यक्ष तोच प्रसंग समोर घडायचा भाग वेगळा. माझा मुद्दा हाच की एका शिल्पातील सब्जेक्ट ए व बी (धातु, माती इ घटक नव्हे)बघुन जे वाटते त्यापेक्षा समोर त्या मुलाचा भेदरलेला व ओरडणारा चेहरा, एक हताश बाप दोघे प्रत्यक्ष व्यक्ती (धातु, मातीचे शिल्प नव्हे) समोर दिसतात तेव्हा निदान माझ्याकरता त्याहून जास्त प्रभावी कुठली कलाकृती नाही. आता इथे ती चित्रे देत नाही पण लहान मुलांचे हात कापलेले, कारण ती मोठी झाल्यावर हातात शस्त्रे घेउ नयेत, खेड्यातील सर्व आबालवृद्ध महीलांवर ..तसेच सर्व पुरुषांवर देखील.. शिवाय पाशवी हा शब्द देखील सामान्य वाटेल असे पुढे 'त्या अवयवांचे' विच्छेदन. आता माध्यमातुन हे सर्व खरेखुरे फोटो येत असल्याने, पुन्हा एका 'निर्जीव' शिल्पात हे सर्व पहायचे... माझा मुद्दा कळला असावा अशी अपेक्षा ) माध्यम, वाहीन्यांचा प्रभाव हेही खरेच. प्रत्यक्ष समस्येकडेही विशुध्द, तटस्थ नजरेनं पाहू शकणारे लोक फार थोडे आहेत. या विधानाशी सहमत आहे. मिपावर, उपक्रमावर काश्मिर संदर्भात चर्चा झाली त्यातील काही मुद्दे बर्‍याच जणांना एक वेगळी माहीती देउन गेले असे वाटते. आणि असे मुद्दे, असा दृष्टीकोन मांडणारे व लोकांना विचार करायला लावणारे लोक इथे आहेत म्हणुन कधीकधी इच्छा असुन मसंस्थळावरुन जावेसे वाटत नाही. :-) प्रतिमांकडे पाहताना त्यांच्या आजूबाजूच्या वास्तवाशी पूर्ण फारकत घेऊ नये; पण किंचित अंतर ठेवता आलं, तर प्रत्यक्ष प्रतिमेचं पृथक्करण आणि आस्वाद अधिक डोळसपणे घेता येईल, असं वाटतं. पुन्हा एकदा सहमत आहे. असे लिहते रहा. धन्यु. (दुरुस्ती - अल दुर्रा येथील गोळीबारात अडकलेल्या बाप-लेकातील, फक्त मुलगा गेला. वडील वाचले असे एका दुव्यात दिसले. वरील प्रसंगातील या दृश्यांवर आधारीत दोन पोस्टल स्टँप्स टुनिशीया व जॉर्डन या दोन देशांनी बनवले.)

In reply to by सहज

आता माध्यमातुन हे सर्व खरेखुरे फोटो येत असल्याने, पुन्हा एका 'निर्जीव' शिल्पात हे सर्व पहायचे... माझा मुद्दा कळला असावा अशी अपेक्षा
आपला मुद्दा कळला, पण त्यात एका सनातन मुद्द्याला स्पर्श झालेला आहे, त्यासाठी हा (प्रश्न उपस्थित करणारा) प्रतिसाद. या मुद्द्याच्या गाभ्याशी जायचं झालं तर असा प्रश्न विचारावा लागेल की जेव्हा वास्तव माझ्या समोर आहे तेव्हा मी त्याची कल्पित प्रतिमा का पाहावी? त्याला खूप वेगवेगळे पैलू आहेत. जसे: जर मला काश्मीरविषयी ताज्या बातम्या आणि काश्मीरच्या इतिहासाविषयी पुस्तकं उपलब्ध आहेत, तर मग मी सलमान रश्दीची 'शालिमार द क्लाऊन' ही कादंबरी का वाचावी? ज्यानं युध्द प्रत्यक्ष अनुभवलं आहे अशा सैनिकाला युध्दावर आधारित कादंबर्‍या किंवा चित्रपट मिळमिळीत वाटतील का? जर छायाचित्रं काढता येतात, तर मग चित्रं का काढायची/पाहायची? - या मुद्द्यात इंप्रेशनिझमचा उगम आहे. तोवर निर्माण होणार्‍या पाश्चिमात्य चित्रकलेत वास्तवाचं यथार्थ चित्रण करण्यावर भर होता. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस छायाचित्रणतंत्र उपलब्ध झाल्यावर असा प्रश्न उपस्थित झाला होता. इंप्रेशनिस्टांनी आपल्या चित्रांद्वारे त्याला उत्तर दिलं. असे अनेक प्रश्न विचारता येतील. त्यांचा मूळ रोख हा 'कथनात्मक' वा 'काल्पनिक' कलाकृतींवर असेल. मग त्यात चित्रं, शिल्पं, नाटकं, कादंबर्‍या, चित्रपट यासारखे सर्व घटक बाद आहेत का असं विचारता येईल. या दिशेनं विचार केलात तर काय सापडतंय ते पाहा.

In reply to by चिंतातुर जंतू

सहज 17/08/2010 - 16:28
> या दिशेनं विचार केलात तर काय सापडतंय ते पाहा. जग मिथ्या आहे ;-) नाही तो सनातन प्रश्न इथे उपस्थित न व्हावा. कारण साहीत्य, कला इ माणसाचे जीवन समृद्ध करतात ह्यावर माझा विश्वास आहे. कोठल्याही कलाकृतीविषयी मत असु शकते, नावड असु शकते पण बंदी शक्यतो नसावी असेच माझे मत आहे. माझा मुद्दा फक्त तो फोटो/व्हिडीओ क्लीप समोर ठेवली व ते शिल्प तर माझ्यावर होणारा प्रभावी परिणाम कोणता ते सांगीतले. शिल्प नसावे असा मुद्दा मी मांडला नाही तसे वाटल्यास तो माझा लेखनदोष समजावा. व हा खुलासा ग्राह्य धरावा. ज्यानं युध्द प्रत्यक्ष अनुभवलं आहे अशा सैनिकाला युध्दावर आधारित कादंबर्‍या किंवा चित्रपट मिळमिळीत वाटतील का? अगदी हाच मुद्दा मला लिहायचा होता. खरच याचे उत्तर काय? युद्धातील वाईट प्रसंगांबद्दल सैनीकांची काय प्रतिक्रिया असते? किंवा महायुद्धात भाग घेतलेल्या सैनीकाला वरचे शिल्प पाहून नेमके काय वाटेल? एक अंदाज असा लावता येईल की त्यांचे मेंटल कंडीशनींग झाले असेल. गुन्हेगाराची केस लढून उपजीवीका करणार्‍या वकीलाला हा आपला पेशा आहे यात गैर काही नाही असेच वाटत असणार.

In reply to by सहज

ज्यानं युध्द प्रत्यक्ष अनुभवलं आहे अशा सैनिकाला युध्दावर आधारित कादंबर्‍या किंवा चित्रपट मिळमिळीत वाटतील का? अगदी हाच मुद्दा मला लिहायचा होता. खरच याचे उत्तर काय? युद्धातील वाईट प्रसंगांबद्दल सैनीकांची काय प्रतिक्रिया असते? किंवा महायुद्धात भाग घेतलेल्या सैनीकाला वरचे शिल्प पाहून नेमके काय वाटेल? एक अंदाज असा लावता येईल की त्यांचे मेंटल कंडीशनींग झाले असेल. गुन्हेगाराची केस लढून उपजीवीका करणार्‍या वकीलाला हा आपला पेशा आहे यात गैर काही नाही असेच वाटत असणार.
यात अनेक शक्यता आहेत:
  • माणसं मारणं हा आपला पेशा मानणार्‍या सैनिकाला कदाचित ते शिल्प पाहून युध्दातला फोलपणा जाणवेल.
  • युध्दातला फोलपणा जाणवूनही माणसं मारत राहिलेल्या सैनिकाला आधीच त्यातून नैराश्य आलेलं असेल. त्यामुळे त्याला यात नवीन काहीच वाटणार नाही.
  • युध्दातल्या फोलपणाची जाणीव असूनही तो पुन्हा एकदा हेलावून जाईल. (एखादा चित्रपट पुन्हा पाहतानाही पुन्हा रडू कोसळू शकतं, तसंच)
  • प्रत्यक्ष युध्द लढूनही आणि शिल्प पाहूनही त्याला काहीच वाटणार नाही. 'उगाच काहीतरी बायकी थेरं' असं म्हणून तो पुढे जाईल.
या चारपैकी दोन शक्यतांमध्ये शिल्पामुळे काहीतरी परिणाम झाला असं म्हणता येईल.

ऋषिकेश 16/08/2010 - 10:30
या उत्तम परिचयाबद्दल अनेक आभार!! सुटीवर आलेल्या सैनिकाचं चित्र हळवं करणारं आहे हे खरंच

In reply to by ऋषिकेश

'न्यू गार्ड हाऊस' मधे मधल्या शिल्पाच्या डोक्यावर छपराला भोक आहे; ही अशी पेगन देवळांची पद्धत होती असं मी ऐकलं आहे. बर्लिनमधे जाऊनही 'न्यू गार्ड हाऊस' पाहिलं नाही ही माझी मोठी चूक होती असं वाटत आहे. पुन्हा एकदा उत्तम परिचयाबद्दल आभार.

हा लेख तीन वर्षांपूर्वी वाचायला मिळाला असता तर बरं झालं असतं. 'उंटर डेन लिंडेन' वर मी दोनदा चाललो... पण या कलाकाराची ओळख व्हायची राहिलीच. बलात्काराच्या चित्राने मला प्रचंड भारावून टाकलं. जमिनीवर उगवलेली पाऩं आणि फुलं (पायांच्या मधली कोमेजलेली) कोमल भावनांचं रूपक आहेत, तर भोवतालच्या भिंतीवरची राक्षसी, भीषण वाटतात. भुकेकंगाल जर्मनीचं चित्रण मी कधीच बघितलं नव्हतं. पहिल्या महायुद्धानंतर अर्थातच सत्य परिस्थिती ती असणार - लहान मुलांच्या हातातल्या वाडग्यांइतक्याच पसरलेल्या त्यांच्या डोळ्यांतून ती प्रतीत होते. हिटलरने हे सत्य झाकून जे स्वप्न उभं केलं, त्यात ही वाडगी पसरणारेच कितीतरी त्याच्या साम्राज्यवादी वडवानलात जळून खाक झाले असतील हे अधिकच करुण. विणकरांचा मोर्चा असफल झाल्यानंतर झुकलेले खांदे पराभवापलिकडचं काही सांगून जातात. धन्यवाद.

नंदन 16/08/2010 - 11:08
ह्या सुरेख परिचयाबद्दल मनःपूर्वक आभार. 'न्यू गार्ड हाऊस'मधल्या शिल्पावरून मागे प्रदीप यांनी पाठवलेल्या बातमीतील चित्र आठवले (दुवा)

श्री. जंतु, परत एकदा मनापासून आभार. माझे अनुभव विश्व इतके समृद्ध करता आहात तुम्ही. त्याबद्दल. मला स्वतःला सगळ्यात जास्त परिणामकारक वाटले ते 'अन्न' ... आणि मुलाच्या प्रेताला कवटाळून एका प्रचंड रिकाम्या पोकळीत बसलेली आई. पटकन स्क्रोल डाऊन केला लेख त्या जागी.

सुनील 16/08/2010 - 19:22
चांगली ओळख करून दिली आहे ह्या महान कलाकाराची. सहजरावांनी दिलेली चित्रेही हृदयद्रावक.

चतुरंग 17/08/2010 - 01:50
ह्या महान कलाकाराचा परिचय करुन दिल्याबद्दल धन्यवाद! चित्रे खरंच उच्च आहेत. त्यात एक प्रकारची वेदना ठासून भरलेली आहे. सहकार्‍याचे प्रेत उचलून नेणारे विणकर ज्याप्रकारे दाखवले आहेत त्यातून हताशपणा, असहायता, हार हे सगळे ठिबकते आहे! शेत नांगरणार्‍या कष्टकर्‍याचे शरीर जमिनीला ज्या कोनात दाखवले आहे त्यातून त्याची उरस्फोड दिसते, त्याच्या मानेचे ताणलेले स्नायू, डावा खांदा आणि दोन्ही पोटर्‍या ज्याप्रकारे हायलाईट झाल्या आहेत त्यावरुन त्यातला ताण नजरेला जाणवतो. मुलांचे हाल मला बघवतच नाहीत, कधीच नाहीत त्यामुळे ती चित्रे पाहून ढवळले पोटात, भीषण वास्तव आहे! :( फिकुटलेल्या चेहेर्‍याची गरोदर स्त्री ही येणार्‍या बाळाच्या चाहुलीने आनंदित होण्याऐवजी त्याचे संगोपन कसे करायचे आणि पुढे त्याचे कसे होणार ह्या चिंतेने ग्रासलेली बरोब्बर दिसते आहे. केटमधल्या कलाकारावर कनवाळू मातेचे विचार जास्त प्रभाव टाकतात असे दिसते आणि तिचा मुलगा महायुद्धात मारला गेल्याची पार्श्वभूमी त्याचे कारण स्पष्ट करुन जाते. चतुरंग

कर्तबगार स्त्री कलाकारांची ओळख करून देण्याचा हा आणखी एक प्रयत्न. मागच्या लेखात लुईज़ बूर्ज्वा या खट्याळ, बंडखोर स्त्रीविषयी सांगितलं होतं.

भाषाभान : पुस्तक परिचय

पाषाणभेद ·

पाषाणभेद 17/08/2010 - 18:05
मराठीची वस्तूस्थिती व त्यावर उपाय सांगणारे हे पुस्तक आहे. हा लेख आता पर्यंत ६३ जणांनी वाचला आहे. हा लेख जास्तीत जास्त संख्येने वाचला जावून मराठीची स्थिती जाणून घेण्यासाठी एखादातरी उत्सूक होईल. केवळ हा लेख वरती आणण्यासाठी प्रतिक्रिया देत आहे. प्रतिक्रीयांच्या प्रतिक्षेत नाही. केवळ धाग्यातील विचारांचे जास्तीत जास्त वाचन व्हावे हाच मराठीप्रेमामुळे शुद्ध हेतू. हाच हेतू या धाग्यापुरता परत एका आठवड्याने सिद्ध होईलच.

मीनल 17/08/2010 - 18:13
बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील संबंध प्रेममय असले पाहिजे. सहमत! प्र्माण भाषा एकसारखी असते/ असावी. पण बोली भाषेतील शब्दा शब्दातील फरक टिपायला मजा येते.

फार आनंद झाला या गरजेच्या पुस्तकाच्या ओळखीमुळे (लेखाच्या मांडणीसाठीही श्री.पाषाणभेद यांचे विशेष अभिनंदन. त्यांनी करून दिलेली पुस्तकाची ओळख ही केवळ तांत्रीक ओळख नसून खुद्द त्यांचीही भाषाभान ठेवण्यामागील तळमळ त्यांच्या प्रत्येक विधानातून तीव्रतेने जाणवली.) शब्दरचनेचे हुकमी सामर्थ्य मनाला येईल तशा पद्ध्तीचे मायाजाल उभे करू शकते. "श्रावण" महिन्याच्या जादुगिरीवर पीएच.डी.साधर्म्य लिखाण होऊ शकते, पण भाषाभान ठेवून बालकविंनी केवळ एका कवितेत उलगडून दिलेला आनंद अवर्णनीय अशासाठी झाला आहे की त्यांना मराठी भाषेची ताकद निश्चितच माहित होती. शंभर वर्षे होत आली "श्रावणमास" कवितेला पण रत्तीभरही जादू कमी झालेली नाही, ही किमया भाषा अलंकारांची ! "किती विद्यार्थी केवळ लेखक व्ह्यायचे आहे म्हणून एम. ए. ला मराठी घेतात?" या प्रश्नाला दुसरीही बाजु अशी आहे की, ज्या काही विद्यार्थ्यांनी मराठी विषय पदव्युत्तर शिक्षणासाठी घेतला आहे त्यांना मराठीची किती आस्था आहे? नियत अभ्यासक्रमाव्यतिरिक्त किती अवांतर वाचन तो करतो? किती जाण आहे त्याला मराठी साहित्याची? इथे कोल्हापूरात एका हायस्कुलमध्ये "मराठी" विषयाच्या शिक्षकाच्या पदासाठी अर्ज केलेल्या एका एम.ए. (मराठी), बी.एड. उमेदवाराने "मराठीतील तुम्हाला कोणता कादंबरीकार आवडतो?" या साध्या आणि सरळ प्रश्नाचे उत्तर "पु.ल.देशपांडे" असे दिले. तर दुसर्‍या एका दलित उमेदवाराला "दलित लेखकांतील कुणाकुणाचे लेखन तुम्ही वाचले आहे?" या प्रश्नाला उत्तर आले, "दया पवार". हे उत्तर बरोबर असेल्/होते. पण मुलाखतकर्त्याने पुढील उपप्रश्न विचारला, "फक्त दया पवार? बाबुराव बागुल वाचले नाहीत?" याला त्या दलित उमेदवाराने उत्तर दिले, "नाही, एम.ए.ला फक्त दया पवारांचे 'बलुतं' होतं." काय अवस्था आहे उच्च शिक्षणातील "मराठी भाषे" च्या अभ्यासक्रमाची आणि उच्चपदस्थांची तळमळ? डॉ.नीलिमा म्हणतात, "मंत्रालयात लोकप्रतिनीधींपेक्षा कारकूनांचे अधीक महत्व आहे." असेल, पण विद्यानगरीच्या विद्यापीठात काय वेगळी परिस्थिती आहे? बीओएस च्या निवडणुकीत जे घाणेरडे राजकारण विद्यापिठातून खेळले जाते तीमध्ये मराठीची तळमळ त्या विषयाच्या प्राध्यापकांना असते की, आपल्या प्रकाशनाची पुस्तके अभ्यासक्रमात "लावली" जातील हे मतलबीपणे पाहणार्‍या प्रकाशकांच्या लॉबीला? त्यामुळे शाळा-कॉलेज-विद्यापीठ या जागांपेक्षा जनसामान्य पातळीवर भाषेविषयीचे कुतहूल जागृत ठेवणे हीच सद्यस्थितीत काळाची गरज आहे आणि त्यासाठी लेखकाने ओळख करून दिलेले डॉ. नीलिमा गुंडी यांचे पुस्तक भाषेविषयी अभिमान म्हणून नव्हे तर प्रेम म्हणून जवळ असणे नीतांत गरजेचे ठरेल यात संदेह नाही. (थोडेसे अवांतर : श्री.पाषाणभेद यांचा नीलिमाताईंशी परिचय असेल तर त्यांनी पुस्तकाबाबतच्या इथल्या प्रतिक्रिया त्यांना जरूर कळवाव्यात.) इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

बाबुराव 19/08/2010 - 11:30
खरं बोल्ला दादा तुमी. पदवी आन पदव्युत्तर अभ्यासक्रमात मराठी विषय घेऊन शिकणार्‍या पोराला साहित्याची किती तोंडवळख रहाती ह्यो एम.फील च्या प्रबंधाचा इषय व्हईन. पोराला इचारलं का बाबा मराठीतले साहित्यप्रकार सांग तर आभायाकडं पाहतं. साहित्यप्रवाह इचारल्यावर दाताड काढून सवाल इचारण्याला लय शुल्लक सवाल इचारल्यासारखा पाहतो. येत जात तर काय नाय. दलित लेखक,ग्रामीण लेखक,अदिवासी लेखक, आन भाषाभ्यासकाचे नाव इचारले तर पोर्ग कोमात जातं. भाषा म्हंजी काय ? भाषेची व्याख्या ? स्वन, स्वनीम,पद,पदीम, असे प्रश्न इचारल्यावर पोर्ग बावचळून जातं. तव्हा अशा भाषाभ्यास असणार्‍या पुस्तकाची वळख शाळा-महाविद्यालयात पोरायला करुन देली पाह्यजेन. पाषाणभेदानी पुस्तकाची चांगली वळख करुन दिली. मंडळ आभारी हाय. बाबुराव :)

उत्तम ओळख, पाभे. सर्वांच्या आत्मीयतेचा पण अभ्यासाला कठीण अशा विषयावरच्या चांगल्या पुस्तकाविषयी वाचायला आवडलं. अजून येऊ द्यात.

भाऊ पाटील 19/08/2010 - 18:20
पण पदवी आन पदव्युत्तर अभ्यासक्रमात मराठी विषय घेऊन शिकणार्‍या पोरांपैकी बरेचसे नाईलाजाने (किंवा अभ्यास न केल्याने) तिकडे गेलेले असतात. त्यांच्याकडुन आणखी वेगळी अपेक्षा तरी काय ठेवणार.

पाषाणभेद 20/08/2010 - 03:53
प्रतिक्रिया देणारे अन आवर्जून हा धागा वाचन करणार्‍यांचे मनापासून आभार. @ इन्द्र्राज पवार: साहेब, माझी डॉ. नीलिमा ताईंची ओळख नाही. पुण्यात राहणार्‍या मंडळींनी त्यांच्याशी संपर्क साधणे म्हणजे त्यांना या विषयावर पुन्हा लिहीण्यास हुरूप येईल. >>> डॉ. नीलिमा गुंडी यांचे पुस्तक भाषेविषयी अभिमान म्हणून नव्हे तर प्रेम म्हणून जवळ असणे नितांत गरजेचे ठरेल यात संदेह नाही. वाचनालयातून हे पुस्तक आणले तेव्हा मला एखाद्या लहान मुलाला खावू मिळावा तसा आनंद झाला. वाचनालयात असल्या विषयाच्या पुस्तकाला कोणी हात लावत नाही. त्यामुळे हे पुस्तक जवळपास माझेच झाले आहे! @मीनल ताई : टकुरं, टाळकं, डोसकं, मस्तक, माथा, डोकं, डोई या एकाचअर्थी बोलीभाषेतील शब्दांची मजा वाक्यात वापरून बघा! @बाबुराव : साहित्य विषय केवळ मार्कांच्या हिशोबात अभ्यासला जातो. पुलंचे वाक्य आहे: 'ज्ञानेश्वर २ मार्कांना आहे तर मी किती मार्कांना असेन?' अशा अर्थाचे. शाळाकॉलेजातसुद्धा मुलांना रस उत्पन्न होईल असे शिकवले जात नाही. केवळ पाट्या टाकण्याचे काम केले जाते अन विद्यार्थीही त्याच लायक आहेत. एकमेकांना पुरक झाले आहे सगळे. काही अपवाद अपवादानेच सापडतील. या पुस्तकातील डॉ. नागनाथ कोतापल्ले यांची मुलाखत तर फारच मनाला लागणारी आहे व मुळातून वाचण्यासारखी आहे. ते स्व:ता एका विद्यापीठात कुलगुरू होते त्यामुळे त्यांच्या वाक्यांना अनुभवामुळे महत्व प्राप्त झाले आहे. त्यांनी नोकरशहा, शासन तसेच इंग्रजाळलेले पालक व शिक्षणसंस्था यांवर सडकून केलेली टिका जाणकार मनाला टोचणी करत राहते. त्यांनी सुचविलेले उपाय जेव्हा महाराष्ट्र शासन अंमलात आणेल तो दिवस मराठीसाठी सोन्याचा (सोनियाचा नव्हे!) असेल. @भाऊ पाटील: कोतापल्ले सरांनी यामागची कारणमिमांसा मुलाखतीत विस्तृतरीत्या केलेली आहे. @अर्धवट, @इंटरनेटप्रेमी, @मदनबाण, @बिरुटेसर, @राजेश घासकडवी व इतर वाचकांचे आभार तुमच्यापर्यंत हा विषय गेला यातच धन्यता आहे. शेवटी मराठीचा उदो उदो होणे हा हेतू सफल होणे महत्वाचे. पुन्हा एकदा सगळ्यांचे धन्यवाद.

'भाषाभान' या डॉ. नीलिमा गुंडी यांच्या पुस्तकात भाषा आणि संस्कृती यांविषयीच्या मार्मीक निरीक्षणांवर आधारीत काही ललित लेख आहेत. 'भाषाभान' मध्ये ललित आणि वैचारिक स्वरूपाचे लेख समाविष्ट केले आहेत. भाषेविषयीचे भान धारदार करण्याचे काम या लेखांद्वारे होते. यातील डॉ. अशोक रा. केळकर आणि डॉ. नागनाथ कोतापल्ले या दोन जेष्ठ नामवंत अभ्यासकांच्या यातील मुलाखती विचारांना चालना देणार्‍या आहेत. लेखीकेने प्रस्तावनेत जरी 'भाषाविषयक', 'भाषेचे' अशा अर्थाचे शब्द वापरले असतील तरी ते शब्द एका अर्थाने 'मराठी' या भाषेसंदर्भात आलेले आहे.

शिट्टीवादन आणि शिट्टीवादक

सुधीर काळे ·

In reply to by बहुगुणी

सुधीर काळे 13/08/2010 - 21:15
आपल्या न्यायसंस्थेची गोगलगायीची गती आणि सगळेच राजकारणी ’पवित्र” त्यामुळे ऐकायलाच कुणी नाहीं असे मला वाटते. शिट्ट्या वाजवणारे वाजवून वाजवून घेरी येऊन पडतील. मेणबत्तीला उद्देशून लिहिलेला एक शेर आठवला..... जब देखनेवाला कोई नहीं जल जाओ तो क्या बुझ जाओ तो क्या.....

सुनील 13/08/2010 - 21:02
पाकिस्तानात शिट्टीवादक नाहीत ह्यात नवल काही नाही. पण भारतात अशा शिट्टीवादकांची कशी वासलात लावली जाते, यावर खरी चर्चा व्हायला हवी.

बहुगुणी 13/08/2010 - 21:41
'न्यायसंस्थेची गोगलगायीची गती' बदलेल अशी आशा करावी का? निदान मुंबईत तरी अशी सुरूवात होत आहे असं दिसतं: विविध कोर्टात प्रलंबित असलेली प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी येत्या सोमवारपासून संध्याकाळच्या वेळेतही न्यायदंडाधिकारी कोर्ट सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती मुंबई हायकोर्टाचे रजिस्ट्रार जनरल एम. एन. गिलानी यांनी आज दिली. अर्थात्, यांत सर्वच प्रलंबित खटले समाविष्ट असतील, फक्त भ्रष्टाचाराचे नाही, पण तरीही भ्रष्टाचाराच्या खटल्यांच्या निपटार्‍याच्या वेगात थोडा फरक पडायची आशा धरायला हरकत नसावी. बलात्काराच्या वगैरे केसेस मध्ये जसे fast-track courts असतात तसे भ्रष्टाचाराच्या केसेस साठी असतात का? नसले तर ते असावेत यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. 'शिटीवादकां'नी उघडकीला आणलेली भ्रष्टाचाराची प्रकरणे धसाला लावून धरणं हे वृत्तपत्रांनाच नव्हे तर माहिती आधिकारांच्या कायद्याचा वापर करून सामान्य नागरिकांनाही जमलं पाहिजे. शेवटी: 'सुननेवाले हम ही हैं, कुछ करना भी हमें ही चाहिये' असं वाटतं...

सुनील 13/08/2010 - 21:45
भारतातील शिट्टीवादकांना संरक्षण देण्यासाठी एक खास कायदा करणार अशी बातमी होती. कुणाकडे अधिक माहिती आहे?

बहुगुणी 14/08/2010 - 05:59
...असं या वृत्तावरून दिसतं. या वृत्तात दिल्याप्रमाणे, शिटीवादकांना संरक्षण तर मिळेलच - The Public Interest Disclosure and Protection to Persons Making the Disclosure Bill, 2010 provides the Central Vigilance Commission powers of a civil court to hand down harsh penalty to people revealing the identity of whistleblowers, official sources said. तसंच विनाकारण/वैयक्तिक आकसाने खोट्या तक्रारी करणार्‍यावरही कायदेशीर कारवाई होऊ शकेलः According to reports, the CVC will also have powers to punish those making frivolous complaints in accordance with the bill's provisions.

हुप्प्या 14/08/2010 - 05:15
व्हिसलब्लोअरला शिट्टीवादक म्हणणे ठीक वाटत नाही. शिट्टी हा प्रकार खुशालचेंडू, उथळ फारतर आनंद व्यक्त करण्याचा प्रकार वाटतो. व्हिसलब्लोईंग मधे लोकांना खबरदार करणे, पर्दाफाश, कुठलेसे बिंग फोडणे, त्याकरता जोखीम पत्करणे ह्यातले कुठल्या छटा शिट्टी मधे येत नाहीत असे वाटते. अजून काही शब्द सुचवता येणार नाहीत का?

बहुगुणी 14/08/2010 - 05:59
Whistleblower या शब्दाचा उगम इग्लंडमध्ये 'गुन्हा घडत असतांना पाहून सहकार्‍यांना आणि इतर लोकांना alert करण्यासाठी शिटी वाजवणारा पोलीस' असा झाला. यात कायदा आणि सुव्यवस्थेचं रक्षण करणारा ही कृती करतो, सामान्य नागरिक नव्हे. या अर्थाने सर्व-सामान्य नागरिकांनी केलेल्या कामाला 'whistleblowing' हे नाव देणं तसं चुकीचंच. (काळे साहेबांनी केवळ त्या शब्दाचं भाषांतर केलं, त्यामुळे त्यांची चूक नाहीच.) असे सामान्य नागरिक (भ्रष्टाचारामागचं) सत्य शोधण्याचं कार्य करीत नाहीत, म्हणून त्यांना 'सत्य-शोधक' म्हणता येणार नाही. ते त्यांना ठाऊक असलेलं सत्य उघडकीस आणतात, त्या सत्याची वाच्यता करतात किंवा निर्भीडपणे जाहीर करतात, या अर्थांनी त्यांना अनुक्रमे सत्य-दर्शक, सत्य-वक्ते किंवा सत्य-व्रती म्हणता येईल का?

सुधीर काळे 14/08/2010 - 07:48
हुप्प्या-जी, धन्यवाद! शिट्टी हा प्रकार खुशालचेंडू, उथळ फारतर आनंद व्यक्त करण्याचा प्रकार वाटतो.>> दुर्दैवाने 'शाम ढले, खिडकीतले, तुम सीटी बजाना छोड दो' छापातली मजनूंनी मारलेली शिट्टी आणि लोकांचे कुकर्मांकडे लक्ष वेधण्यासाठी मारलेली 'फुर्र्रर्र'वालीही शिट्टी या दोन्हींना मराठीत 'शिट्टी'च म्हणतात. मीसुद्धा प्रतिशब्द वापरायचा विचार केला होता. पण whistleblower या शब्दातली 'पावर' इतर सोज्वळ शब्दात मला जाणवली नाहीं म्हणून शेवटी 'शिट्टीवादक'च पटला (आणि वापरला).

शिट्टीवादन आणि शिट्टीवादक "शिट्टीवादक" (Whistleblower) हा शब्द आणि ही जमात (दोन्ही) नव्याने लोकप्रिय होऊ लागली आहेत. साधारणपणे आपले सरकार किंवा आपली कंपनी जर कांहीं गैर व्यवहार करत असेल तर आपल्याला त्रास होण्याच्या शक्यतेकडे न पहाता सदसद्विवेकबुद्धीने त्याची वाच्यता करणार्‍याला 'शिट्टीवादक' म्हटले जाते. हेतू नेहमी असा उदात्त असतोच असे नाहीं. कधी सूडबुद्धीने, तर कधी पैशासाठीही असे करणारे शिट्टीवादक असतात. सगळ्यात सुप्रसिद्ध सदसद्विवेकी शिट्टीवादक होते 'डीप थ्रोट' या नावाने प्रसिद्ध असलेले आणि त्यावेळी FBI चे सहनिर्देशक असलेले विल्यम मार्क फेल्ट (Sr) हे गृहस्थ.

सारपास ट्रेक...13800 ft above sea level(base camp:- kasol,Himachal Pradesh)---भाग २

आर आर ·

भिरभिरा 13/08/2010 - 16:41
एवढा चांगला ट्रेक केला तुम्ही पण प्रवासवर्णन नसल्याने रसरशीत भाजीत मीठ नसल्यासारखे वाटतेय. आर आर धीरानं घ्या पण पुर्ण तयारीनेच या..

सारपास ट्रेक...13800 ft above sea level(base camp:- kasol,Himachal Pradesh)---भाग १

आर आर ·

ऋषिकेश 13/08/2010 - 16:02
आर आर तुमचे स्वागत! फारच छान फोटो आहेत. युथ हॉस्टेलची छायाचित्रण स्पर्धा असते त्यात काहि चित्रे पाठवा असा आग्रह. मी सारपास केला होता तेव्हा डिजिटल काय कोणताच क्यामेरा नव्हता. त्याचं तेव्हा काहि वाटलं नाहि पण आता खंत वाटते :(

बबलु 13/08/2010 - 23:09
अरे वा !!! मी २००४ मध्ये "सार पास" केला. धम्माल ट्रेक आहे. पण डिजिटल क्यामेरा नव्हता माझ्याकडे. बाकी कसोल चा बेस कँप मस्तच आहे. आताही त्याच ठिकाणी आहे काय ? (ट्रेकर) ... बबलु

आणि मी सिगरेट सोडली...

सुधीर काळे ·

सुधीर काळे 12/08/2010 - 12:09
".....भाक्रा नांगलचे धरण जागा तिथं इतर काही ’प्रेक्षणीय’ नसलं तरी अभिमानानं पहावीशी वाटायची." हे वाक्य "....भाक्रा नांगलचे धरण अशी स्थळे तिथं इतर काही ’प्रेक्षणीय’ नसलं तरी अभिमानानं पहावीशी वाटायची." असे वाचावे

In reply to by सुधीर काळे

मदनबाण 12/08/2010 - 12:18
स्व-संपादनाची सोय पुन्हा उपलब्ध कारावी अशी व्यवस्थापनास विनंती! हेच म्हनतो म्या...

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मृत्युन्जय 12/08/2010 - 12:56
तेवढं इंटरनेटचं व्यसन कसं सोडवायचं त्याबद्दलही लिहा की एकदा!! यासाठी जो आत्मनिश्चय लागतो तो दुसरा कुणी देऊ शकत नाहीं, तो आतूनच यावा लागतो. - काळे काका. :P

In reply to by सुहास..

धमाल मुलगा 13/08/2010 - 18:00
झालं? घसरली का गाडी आमच्यावर? च्यायला, असले दोस्त असल्यावर दुश्मनांची गरजच काय? ;) >>पण काहीही म्हण ,त्याचा पिण्याबाबतीतचा कंट्रोल जबरदस्त आहे ... :) ठ्यांकू ठ्यांकू सुहाश्या..तुच एकटा खरा मित्र. ;)

राघो भरारी 12/08/2010 - 18:15
जर तुम्हाला सिगारेट सोडायची असेल तर एकच उपाय आहे की ती एकदम बंद करणे. रोज थोडी थोडी कांडी ओढण्याची संख्या कमी करु आणि मग हळू हळू सुटेल ह्या विचाराने जर सोडण्याचा प्रयत्न केलात तर ती कधीच सुटणार नाही. मी सिगारेट एकदम बंद केली आणि आज मी सांगू शकतो की मी सिगारेट सोडली. ..राघो

In reply to by शानबा५१२

सुधीर काळे 12/08/2010 - 23:04
शानबा, असे बोलू नका. देव करो आणि आपल्याला तो शतायू करो! पण सिगरेट नक्की सोडा! लई वंगाळ व्यसन!!

आजही मला खात्री आहे की मी एक सिगरेट एकदा जरी ओढली की मी पुन्हा 'वीस सिगरेट रोज'च्या रतीबाला पोचेन.
ह्याला म्हणतात आत्मविश्वास.! :P जोक्स अपार्ट.. अश्या गोष्टींमुळे खरेच स्वतःच स्वतःची पाठ थोपटुन घ्यावीशी वाटते. मलाही सिगारेटचे व्यसन होते. इतके की डोंबिवलीला राहत असताना संध्याकाळी घरी परतताना भर गर्दीच्या वेळी दिव्याला उतरुन सिगारेट पीत असे. पण नंतर निग्रह करुन सोडले.त्यानंतर जेव्हा कधी सिगारेटची तलफ येई तेव्हा सिगारेट पिण्याची कृती मी सिम्युलेट (मराठी शब्द?)करत असे. अ‍ॅण्ड इट रियली वर्क्ड.. आज जेव्हा कधी एखादी गोष्ट कठीण वाटते तेव्हा मी स्वतःलाच बजावतो की सिगारेट सोडण्यासारखी कठीण गोष्ट मी करु शकलो तर ही का नाही जमणार! टारुभाऊनी सही अशी केली असती. - (टारोबा स्मोकर) योगेशु.

रश्मि दाते 13/08/2010 - 00:30
यासाठी जो आत्मनिश्चय लागतो तो दुसरा कुणी देऊ शकत नाहीं, तो आतूनच यावा लागतो. .. हे खरंय मला ही जडली होती ही वाईट सवय पण तीच्या जास्त आहारी जायच्या आघी सुट्ली आता दुसरे ओड्त असले तरी त्रास होतो.

धमाल मुलगा 13/08/2010 - 17:56
च्यायला...सिगरेट सोडणं हे काही सोप्पं काम नाही. इतका मनोनिग्रह असता तर च्यायला आम्ही जगाचे नकाशेही बदलायला कमी नसतं केलं. :D काळेकाका, आपले प्रयत्न पाहुन मलाही धुराच्या विळख्यातुन बाहेर पडायची इच्छा होऊ लागली आहे. :)

आणि मी सिगरेट सोडली... सिगरेट सोडून आज वीस वर्षं झाली मला! ओढायला सुरूवात झाली १९६२ साली! मी इंजिनियरिंगच्या दुसर्‍या वर्षात (S.E.) होतो व त्यावेळच्या प्रथेप्रमाणे या वर्षी इंजिनियरिंग कॉलेजच्या सर्व शाखांचे बहुतेक सर्व विद्यार्थी "भारतदर्शन"ला जायचे. म्हणजे कुठले-कुठले कारखाने पाहायच्या निमित्ताने भारतातली मिळतील तितकी प्रे़क्षणीय स्थळे पाहून घ्यायची. उदाहरणार्थ 'स्तूप' पाहण्यासाठी भोपाळमधला किंवा 'ताजमहाल' पाहण्यासाठी आग्र्यामधला कुठला तरी फडतूस कारखाना शोधून काढायचा व ते पाहायचे निमित्त सांगून स्तूप किंवा ताजमहाल पाहून घ्यायचा!

जगन्याचि कला

अशक्त ·

येडबंबू 12/08/2010 - 09:02
काय कल्पना नाही बुवा. >>> हि क्रिया अति आनि अयोग्य रितिने करताना हाताला कंप सुटतो, डोके चक्रावते, मुर्च्छा हि येवु शकते, क्वचित म्रुत्यू हि होउ शकतो. म्हनुण हि क्रिया गुरु कडुनच शिकावि व इतर कुणाल शिकवु नये असे वदवुन घेतले जाते. मग पैसे कसे मिळनार बाबांना ?

सध्या आपल्या इथे पुष्कळ बाबा आहेत पण त्यात उठुन दिसतात ते रवि शंकर. त्यांचा भक्तवर्ग बहुतांश युवक-युवति आहेत हे विशेष. ज्या पद्धतिने आर्ट ओफ लिविंग चे कार्य चालते ते पाहुन हा एक जस्ट अनादर कल्ट चा प्रकार आहे असे वाटते. कल्ट कसा सुरु करावा हे इथे पहा, http://www.youtube.com/watch?v=mnNSe5XYp6E. त्यांनी समाजसेवाहि बरिच केलि आणि करत आहे अस ऐकुन आहे. बरयाच जनांच जीवन हि बदलुन टाकलय असे दावा करनारे हि आहेत. परंतु जेव्हा माझे हुशार मित्र काम-धंदा सोडुन बाबाच्या मागे फिरताना (सत्सन्ग करताना) दिसतात तेव्हा कीव वाटते.