मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माहिती

फर्डिनांड मॅगेलान - जगाचा प्रवासी!

असुर ·
प्रथम पृथ्वीप्रदक्षिणा करणारा महावीर कोण? या प्रश्नाचा शोध 'फर्डिनांड मॅगेलान'पाशी येऊन संपतो. कारण हाच तो सुपरहिरो ज्याने पृथ्वीला पहिली प्रदक्षिणा घातली. ती सुद्धा आपण शंकराला प्रदक्षिणा घालतो ना, तशी! या मॅगेलानबद्दल मी पहिल्यांदा वाचलं जेव्हा मी हौशी खगोलनिरीक्षकाचं काम करायचो. दक्षिण गोलार्धातून दिसणारा एक खगोलीय अविष्कार म्हणजे मॅगेलानचे ढग. प्रत्यक्षात ह्या अवकाशातील छोट्या आकाराच्या आकाशगंगा (गॅलेक्सी) असून आपल्या आकाशगंगेच्या भोवती फिरणाऱ्या उप-आकाशगंगा (किंवा लघु-दीर्घिका) आहेत.

औषध उतारे आणि आशिर्वाद

प्रकाश घाटपांडे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
ग्रंथपरिचय- औषधं उतारे आणि आशिर्वाद

मंत्रतंत्र बाबा बुवांच्या गप्पा चाललेल्या असताना एका मित्राने एक पुस्तक वाचायला दिलं. काहीशा नाखुशीनेच मी ते पाहिल. औषधं, उतारे आणि आशिर्वाद.

एका रात्रीत वजन दोन ते अडीच किलोने घटवा (०३)

विजुभाऊ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मागील दुवा http://www.misalpav.com/node/7835 रात्री जेवणात सामीश असल्यास तळलेली अंडी , खीमा , तंदूरी चिकन , हे पदार्थ असावेत. सोबत तोंडी लावायला बोटीकबाब खीमा कबाब असे कबाब असावेत. भात वर्गीय पदार्थात बिर्याणी/ पुलाव असे रुचकर पदार्थ असावेत. सोबत मिर्चीचे सालन असावे. निरामीश असल्यास लग्नात हमखास करतात ती बटाट्याची लगदा भाजी. पावट्याची उसळ. भरल्या वांग्याची भाजी , बिरड्यावालाची रस्शाची उसळ.

स्त्रियांचे वर्चस्व

डॉ.श्रीराम दिवटे ·
लेखनप्रकार
आमच्या नदीकाठाला लागून एक झोपडपट्टी आहे. आडवी तिडवी वाढलेली, कोणाची भीडभाड न ठेवणारी, आपल्याच मस्तीत जगणारी. याच वस्तीत एक 'अफलातून' जमात राहते. ह्या जमातीत पूर्णपणे स्त्रियांचं राज्य आहे, त्यांचीच हुकूमत चालते, त्या म्हणतील ती पूर्वदिशा मानली जाते. पुरुषाला दुय्यम लेखलं जातं. त्याच्यावर अधिकार गाजवला जातो! घरातली म्हणजे झोपडीतली छोटी मोठी कामे तोच करतो. पोरं सांभाळणे, धान्य निवडणे, दळून आणणे, धुणी धुणे, भांडी घासणे, पोरांचं आवरणे (त्यात शी शू आलेच.) इ. इ. (स्वयंपाक तेवढाच काय तो स्त्रिया करतात.) बाहेरचे आर्थिक व्यवहार स्त्रियांकडेच.

छोटे छोटे प्रश्न...!

श्रीराजे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
एका वृत्तपत्रातले कात्रण ई-मेल मधुन आले. त्यातील प्रश्न मलापण नेहमी पडतात. उत्तरे मात्र मिळत नाहीत.... खालील काही मजेशीर प्रश्न तुमच्यासाठी: १) मराठी पेपरच्या रद्दीचा भाव इंग्रजी पेपरपेक्षा कमी का? - (माझ्या पाहण्यात काही ठीकाणी सारखाच भाव आहे.) २) उडप्याच्या हॉटेलात कांदाभजी का मिळत नाहित? ३) लहान बाळाशी बोलताना मोठी माणसं बोबडं का बोलतात? ४) 'मीचं म्हणून तुमच्याशी संसार केला' असं प्रत्येक बाई आपल्या नवर्‍याला का म्हणते? :?

आषाढी एकादशी काही कथा

बज्जु ·
आषाढी एकादशी:- म्रुदुमान्य नावाच्या एका दैत्याने शंकराची आराधना करुन त्याला प्रसन्न करुन घेतले आणि त्याच्याकडून वर मिळवीला की त्याला कोणत्याही प्राण्याकडून मरण प्राप्त होणार नाही, फ़क्त एका स्त्रीच्या हातून तो मरेल. या म्रुदुमान्याने या वराच्या जोरावर सर्व देवांना जिंकले आणि श्रीविष्णूस जिंकण्यासाठी तो वैकुंठास गेला, उभयतांच्या लढाईत श्रीविष्णूचा पराभव होऊन तो शंकराकडे गेला पण शंकरही आपल्या वरामुळे हताश झाला होता. नंतर ब्रम्हा - विष्णू - महेश व सर्व देव एका पर्वताच्या गुहेत लपुन राहिले. तिथे काही दिवसानी ब्रम्हा - विष्णू - महेश या तीघांच्या श्वासाने एक देवी उत्पन्न झाली.