मी आसाम मध्ये कामाला आहे. इथे आल्यावर इथली भाषा व ह्या प्रांताविषजी माहिती मिळाली ती आपल्यासोबत शेयर करीत आहे..
अहोमीया भाषेत आणि मराठीत शब्दांच्या बाबतीत बरेच साम्य आहे. (बाय द वे, आसामीया/ अहोमीया माणसाला "आसामी" म्हणू नका. त्याचा इथे अर्थ wrong doer / criminal असा होतो.) अहोमीयातही आईला "आई" असे म्हणतात म्हणुन ह्या भाषेशी भावनिक नाते जुळते. (वडिलांसाठी "देवता" हा शब्द आहे.) दादा, घाम, भात (जेवण करणे म्हणजे "भात खाणे".