मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सहज सुचलं म्हणून _ २०२६

कंजूस ·

निनाद 19/03/2026 - 08:54
पासकी या गुगल पासवर्ड मॅनेजरशी सिंक असेल ना? फोन हरवला असेल, तर तुम्ही तुमच्या गुगल आयडीने दुसऱ्या कोणत्याही लॅपटॉप, किंवा जुन्या फोनवरून लॉगिन करून चालू शकेल. क्लाउड सिंकिंगमुळे तुमच्या सर्व पासकी आपोआप दुसऱ्या फोन वर मिळतील. अकाउंट लॉक होत नाही. पास्वर्ड पण कुठे जात नाही. पण फोअन हरवला असेल तर अँड्रॉइडसाठी 'फाइंड माय डिव्हाइस वरून लॉक करा. अनोळखी व्यक्तीला तुमच्या बायोमेट्रिक्सशिवाय किंवा फोनच्या पिनशिवाय त्या पासकीचा वापर करता येणार नाही. दुसर्‍या फोन वरून सेटिंग्जमध्ये जाऊन हरवलेल्या फोनशी संबंधित असलेली जुनी पासकी कायमची काढून टाकायची.

मागील धागा ( https://www.misalpav.com/node/52636 )जुना झाल्याने आणि खूप मोठा झाल्याने हा नवीन धागा काढत आहे. राजकीय विषय सोडून इतर विषयांसाठी. ----------------------------- एक नवीन प्रश्न . PASSKEY विरुद्ध PASSWORD १. विविध साईटस किंवा इमेलसाठी login करताना username , password टाकावे लागू नये म्हणून passkey वापरण्याची पद्धत दोन वर्षांपूर्वी आणण्यात आली. २. एकच password सर्व साईटसना ठेवणे धोक्याचे आहे असं डिजिटल सुरक्षितता जाणणारे सांगतात. एवढे password बनवून लक्षात कसे ठेवायचे? ३. एकच password लक्षात ठेवा आणि तो password vault साठी वापरा. त्यात सर्व इतर passwords ठेवा सांगतात.

"बौद्ध मूर्तीशास्त्र"

Bhakti ·

कंजूस 30/01/2026 - 17:24
बरीच माहिती गोळा केली आहे. शाळेत असताना ' गौतमाला बोधी वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले आणि तो बुद्ध झाला' हे वाचलेले. पण कोणते ज्ञान हे काही कुणी सांगायला तयार नव्हते. बुद्ध आणि त्याचा धम्म - बाबासाहेबांचं हे पुस्तक वाचल्यावर कळलं.

गामा पैलवान 31/01/2026 - 00:05
भक्ती, कृपया या वाक्यातले कृबुसंस्करण उलगडावे :
ती डाळिंबाशी संबंधित आहे, जी तिला मुलांऐवजी खाण्यास शिकवली जात असे.
याचा अर्थ का होतो ? बाकी, इतके देव प्रचलित असतील तर बौद्ध हा नास्तिक पंथ का मानला जातो? याचं कारण असंय की, तो वेदांचे आधिपत्य नाकारतो. नास्तिक हा शब्द देवांचे अस्तित्व नाकारण्याशी संबंधित नाही. वेदांचे आधिपत्य नाकारले तरी वेद हेच मूळ श्रुती आहेत असं बौद्ध मानतात. आ.न., -गा.पै.

Bhakti 31/01/2026 - 11:30

हरिती हिची कथा हरिती स्वतःच्या अनेक मुलांच्या उदरनिर्वाहासाठी इतरांची मुले चोरून खात असे .दुखी पालकांनी बुद्धांकडे तक्रार केली. बुद्धांनी हरितीला धडा शिकवण्यासाठी तिच्या सर्वात लाडक्या मुलाला पिंगलला लपवून ठेवले .मूल न सापडल्याने ती व्याकुळ झाली. बुद्धांनी तिला जाणीव करून दिली की, हजारो मुले असूनही एका मुलासाठी तुला इतके दुःख होत आहे, तर ज्यांची एकमेव मुले तू खाल्लीस, त्यांना किती दुःख झाले असेल?आपली चूक लक्षात आल्यावर हरितीने माफी मागितली आणि बुद्धांची अनुयायी बनली. ती मुलांची संरक्षक देवी म्हणून पूजली जाऊ लागली. पण तरीही तिला मांसभक्षणाची आठवण होई.रक्तप्राशन करावे वाटे तेव्हा रक्ताप्रमाणेच लाल रंगाचा ज्याचा रस ते डाळींबाचे दाणे त्याचा रस हे रक्ताचे रूपक होऊन ही तृषा शमवत.
याचं कारण असंय की, तो वेदांचे आधिपत्य नाकारतो.
>ज्याला वेदांत समजले तो कधीच म्हणणार नाही की बुद्धांनी वेदांना नाकारले.बुद्धांनी वेदांभोवती पसरलेल्या अहंकारला नाकारले आहे. वेदांतातला अद्वैत आणि बौद्ध शिकवणीतला निर्वाण जो जाणतो तो अशा अहंकारात कधीच फसणार नाही
.
इतके देव प्रचलित असतील तर बौद्ध हा नास्तिक पंथ का मानला जातो? स्वतः बुद्धांनी याला विरोध केला.पण मनात अनुयायांनी हा पसार वाढवला हे वरती मी स्पष्टच लिहिले आहे की !

In reply to by Bhakti

Bhakti 31/01/2026 - 11:36
पण मनात अनुयायांनी हा पसार वाढवला ऐवजी असे वाचा... पण मुळात अनुयायांनी हा (मुर्ती,कर्मकाण्ड) पसारा वाढवला.

In reply to by Bhakti

गामा पैलवान 01/02/2026 - 15:26
भक्ती, माझ्या मते गौतमबुद्ध स्वत: वेदांविषयी आदर बाळगून आहे. मात्र त्याच्या अनुयायांच्या बाबतीत असं ठामपणे म्हणता येईल का? मी साशंक आहे. बाकी, बुद्धाने स्वत:हून कसल्याही तत्त्वज्ञानाचा प्रचार वा प्रसार केला नाही. पहिला बौद्ध तत्त्वज्ञ नागार्जुन होऊन गेला. तो बुद्धाच्या नंतर तीनचारशे वर्षांनी जन्मला होता. यावरून बौद्ध हा वेगळा धर्म न मानता पारंपरिक भारतीय पंथ मानला पाहिजे. कुठल्याही पारंपरिक भारतीय पंथात दैवते शिरतात तशीच यांतही शिरली. वैविध्यपूर्ण दैवते हा भारतीय जनमानसाचा अविष्कार आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

सोत्रि 01/02/2026 - 20:54
गामाजी,
गौतमबुद्ध स्वत: वेदांविषयी आदर बाळगून आहे.
हे जरा डिटेलमधे एक्सप्लेन कराल का?
बुद्धाने स्वत:हून कसल्याही तत्त्वज्ञानाचा प्रचार वा प्रसार केला नाही. बौद्ध हा वेगळा धर्म न मानता पारंपरिक भारतीय पंथ मानला पाहिजे
बुद्धाने वयाच्या ३५ -८० वर्षांपर्यंत त्याच्या शिकवणीचा त्याच्या प्रवचनांमधून (discourses) तो जिथे जिथे गेला तिथे तिथे प्रसार केला. त्याच प्रवचनांचं डॅाक्युमेंटेशन पुढे त्रिपीटकात केलं गेलं, त्याचा पश्चात. बुद्धाने कोणताही धर्म स्थापन केला नाही, धर्म (धम्म) ह्या शब्दाची योग्य व्याख्या त्याने विषद केली त्याच्या शिकवणूकीतून (प्रवचनांमधून), तसेच कोणताही पंथही त्याने स्थापन केली नाही. त्याच्या ध्यानप्रणालीची अनुपासना करणाऱ्या साधकांच्या समूहाला संघ म्हणतात पण त्यात कसलंही कर्मकांड नसल्याने, गुरू आणि गादी (उत्तराधिकारी) नसल्याने, कोणत्याही विशिष्ट जाती, धर्म किंवा विचारसरणीच्या लोकांसाठी मर्यादित नसल्याने तो पंथ नाही. - (अभ्यासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

गामा पैलवान 02/02/2026 - 02:43
सोत्रि,
हे जरा डिटेलमधे एक्सप्लेन कराल का?
माझी माहिती मर्यादित आहे. पण तेव्हढ्यावर निष्कर्ष काढता येतो. जर बुद्ध वेदांविषयी आदर बाळगून नसेल तर तसं स्पष्ट म्हंटलं असतं त्यानं. बाकी माझं ढोबळ विधान स्पष्ट करावयास गुग्गुळाचार्य आहेतंच : https://www.google.com/search?q=buddha+respected+vedas खरंतर तुम्हालाच याविषयी सखोल जाण आहे. बौद्ध हा पंथ नसेल तर महायान, हीनयान वगैरे काय म्हणावेत? संप्रदाय म्हणावेत का? माझी माहिती अत्यंत मर्यादित असल्याने मला हा प्रश्न पडला आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

सोत्रि 02/02/2026 - 14:02
गामाजी, ते ढोबळ विधान आहे असे म्हणता आहात तर ते तिथेच सोडून देवूयात. महायान, थेरवाद (हीनयान), वज्रयान, नवयान हे सगळे संप्रदाय म्हणता येतील कारण गटांची स्वतःची वेगळी तत्वज्ञानात्मक मांडणी आहे जरी मूळ आधारस्तंभ 'बुद्ध, धम्म आणि संघ' हेच आहेत. - (अभ्यासू) सोकाजी

In reply to by Bhakti

सोत्रि 02/02/2026 - 14:46
ज्याला वेदांत समजले तो कधीच म्हणणार नाही की बुद्धांनी वेदांना नाकारले.बुद्धांनी वेदांभोवती पसरलेल्या अहंकारला नाकारले आहे.
काय आहे वेदांत जो समजावतो की बुद्धांनी वेदांना नाकारले नाही? - (जिज्ञासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

Bhakti 02/02/2026 - 16:48
सुत्त निपत ८४६- ना वेदगु दिठथिया ना मुतिया सा मनामेति नही तन्मयोसो…. जो वेद जाणतो त्याला खोटा अहंकार येत नाही. तो ऐकीव गोष्टी आणि भ्रमांचा परिणाम करत नाही.
वेदांतातला अद्वैत आणि बौद्ध शिकवणीतला निर्वाण जो जाणतो तो अशा अहंकारात कधीच फसणार नाही

In reply to by Bhakti

सोत्रि 02/02/2026 - 18:37
भक्ती, वेदगु शब्दात वेद आलेलं असलं तरी त्यात अभिप्रेत असलेला अर्थ ४ वेदांचा वेद नाही. त्याची फोड आणि अर्थ पाली भाषेत आणि त्रिपिटकाच्या परिप्रेक्षात खालीलप्रमाणे: वेद म्हणजे सर्वोच्च ज्ञान अणि गु म्हणजे प्राप्त केलेला. बुद्धाला प्राप्त झालेलं ज्ञान ह्याचा बेस वेदना (संवेदना) आहे, सतीपट्ठाण सुत्तात ह्याचे सविस्तर विष्लेषण आहे. त्यानुसार वेदना पर करून सत्यापर्यंत पोहोचलेला म्हणजे वेदगु. वेद जाणणारा म्हणजे वेदगु हे शब्दसाधर्म्यामुळे झालेलं अशुद्ध भाषांतर आहे. मूळ प्रश्न होता, काय आहे वेदांत जो समजावतो की बुद्धांनी वेदांना नाकारले नाही? त्याचं उत्तर मिळालं नाही. तसेच नविन मुद्दा आला ह्या प्रतिसादात, वेदांतातला अद्वैत आणि बौद्ध शिकवणीतला निर्वाण. हे दोन्ही एकच आहे का? आणि त्या दोन्हीच्या परिप्रेक्षात अहंकार म्हणजे तुम्हाला नेमकं काय अभिप्रेत आहे? - (जिज्ञासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

कॉमी 02/02/2026 - 19:06
मग ते इतर संदर्भ वेदांचेच होते हे तरी कसे समजले ? तीन वेद जाणणारा हा हे इतर तीन विद्या जाणणारा नसेल कशावरून ? त्रिपिटक जर तीन आहेत तर इतर विद्या सुद्धा तीन शाखांमध्ये विभागलेल्या असू शकतात.

कॉमी 01/02/2026 - 09:44
बुध्दाने वेदाचे अधिपत्य नाकारले. बुद्धकाळात किंवा सर्वात जुन्या पाली लिखित साहित्यात वेदांचा उल्लेख आहे का ? बुद्ध वेदांबद्ल स्पष्टपणे बोलताना कुठेही आहे का ?

In reply to by कॉमी

सोत्रि 01/02/2026 - 21:20
पाली त्रिपिटकामध्ये (सर्वात जुने बौद्ध साहित्य) वेदांचा आणि तत्कालीन वैदिक परंपरेचा अत्यंत स्पष्ट आणि सविस्तर उल्लेख आढळतो. बुद्ध केवळ वेदांबद्दल बोललेच नाहीत, तर त्यांनी त्या काळातील वैदिक कर्मकांडांची आणि तत्त्वज्ञानाची तर्कशुद्ध चिकित्साही केली आहे. पाली साहित्यात वेदांना 'तेविज्ज' (त्रिवेद) असे म्हटले आहे. बुद्धांच्या काळात प्रामुख्याने तीनच वेद प्रचलित होते: ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेद. (अथर्ववेदाला नंतरच्या काळात वेदाचा दर्जा मिळाला). अनेक सुत्तांमध्ये बुद्धाने वेदांवर आणि त्यांच्या अधिकारावर भाष्य केले आहे. त्यापैकी काही प्रमुख संदर्भ: तेविज्ज सुत्त (दीघ निकाय): हे सर्वात महत्त्वाचे सुत्त आहे. यात दोन ब्राह्मण बुद्धांकडे येऊन विचारतात की, "कोणता वेद मार्ग खरा आहे?" बुद्ध त्यांना विचारतो की, "ज्या वेदांचे तुम्ही पठण करता, त्या मंत्रांच्या ऋषींनी कधी ब्रह्मदेवाला प्रत्यक्ष पाहिले होते का?" जेव्हा उत्तर 'नाही' येते, तेव्हा बुद्ध सांगतात की, ज्यांनी स्वतः पाहिलेले नाही अशांच्या परंपरेचे आंधळेपणाने पालन करणे म्हणजे "आंधळ्यांच्या रांगेसारखे" (अंधवेणु) आहे, जिथे पुढच्याला दिसत नाही आणि मागच्यालाही नाही. अस्सलायन सुत्त (मज्झिम निकाय): यामध्ये बुद्ध वेदांवर आधारित 'चातुर्वर्ण्य' व्यवस्थेला आव्हान देतो. तो म्हणतो की, निसर्गात सर्व माणसे समान आहेत आणि श्रेष्ठत्व हे जन्मावरून (किंवा वेदांच्या ज्ञानावरून) नसून ते कर्मावरून ठरते. सुत्त निपात (ब्राह्मणधम्म सुत्त): यात बुद्ध सांगतो की, प्राचीन ऋषी हे चारित्र्यसंपन्न होते, पण नंतरच्या काळात वेदांच्या नावाखाली प्राण्यांचे बळी देणे आणि कर्मकांड करणे सुरू झाले, जे चुकीचे आहे. - (अभ्यासू) सोकाजी

प्रचेतस 01/02/2026 - 09:57
लेख खूपच संक्षिप्त वाटला, नव्हे आहेही. बौद्ध मूर्तीशास्त्र म्हटलं की जरा अधिक उपापोह हवा होता. मूर्ती ओळखण्याची प्रमुख साधने म्हणजे मुद्रा, लांच्छन, वृक्ष. ह्यांचे अधिक वर्णन फोटोसहित हवे होते. गौतम बुद्ध म्हणजे शाक्यमुनी, भविष्यातील बुद्ध मैत्रेय ह्यांचा उल्लेख कुठे दिसला नाही. हे सर्व मानुषी बुद्ध. त्यांच्या आधीचे विपश्यी, शिखी, विश्वभू, क्रकुच्छन्द, कनकमुनी, काश्यप ह्यांचा उल्लेखही आवश्यक होता. परत बौद्ध मूर्तीकलेत गांधारकला अधिक सुप्रसिद्ध आहे. त्याचा आढावा घ्यायला हवा होता. बाकी वेरुळ येथे महायान आणि वज्रयान परंपरेतील अनोखी शिल्पे पाहायला मिळतात. जिज्ञासूंना मानुषी बौद्ध, ध्यानी बुद्ध, स्त्री बोधीसत्व, तारा, महामायुरी, पद्मपाणी, वज्रपाणी, जंभाल, हरिती, रक्तअवलोकितेश्वर, सुजाता, मैत्रेय अशी अनोखी शिल्पे पाहायची असतील तर जरुर तेथे जाऊन ती पाहावीत.

In reply to by प्रचेतस

कंजूस 01/02/2026 - 20:18
यावर एक यूट्यूबवर मालिकाच काढावी. म्हणजे व्हिडिओंची लिंक दिली की झाले काम. वेरुळच्या लेण्यांवरही मालिका असावी. एकदा सगळे फोटो जमा करायचे आणि ते जोडायचे स्लाईडशोमध्ये आणि त्याला मागून नंतर आवाज द्यायचा.

In reply to by प्रचेतस

Bhakti 02/02/2026 - 16:58
अर्थात हे सर्व अभ्यासक्रमात सांगितले.पण उणेपुरे सात दिवस(साधारण ११ तास ) त्यात इतकेच आकलन झाले.बाकी बोधिसत्वचा काहीतरी विशिष्ट क्रम आहे ,जो मला नीट समाजाला नाही ...हे मी वरती लिहिलेच आहे.
रक्तअवलोकितेश्वर,
वेरुळंंमधील बौद्ध शिल्प त्याकाळात नैसर्गिक रंगाने रंगवले होते .अगदी बौद्ध पुस्तकांत सांगितल्याप्रमाणे!परंतु कालाच्या प्रवाहात ते रंग नाहीसे झालं.रंगीत शिल्प तेव्हा किती सुंदर दिसत असतील.गांधार ,मथुरा शैली अजून फरक थोडा थोडा समाजात आहे .शैव ,वैष्णव अभ्यासक्रमातही तशा मूर्तीशैली फरक सांगितला जायचा.

In reply to by प्रचेतस

लेखन संक्षीप्त असलं तरी, लेखिकेने सुरुवातीलाच लिहिले होते की, 'चारो तरफ ज्ञान बट रहा है, जहाँ से मिले लपेट लो' आपल्याला जितके उमजले तितके लिहिणे ही चांगली गोष्ट आहे. आता उहापोह म्हटलं की जाणकारांनी लिहिले पाहिजे. जसे की, धाग्याच्या निमित्ताने सोत्रि यांनी अनुषांगिक अशी उत्तम माहिती भरली आहे. आपल्यासारखा जाणकारांनी अशा धाग्यात भर घातली पाहिजे. असे धागे समृद्ध होतात असे वाटते. बौद्ध धर्मातील हिनयान (थेरवाद) आणि महायान या दोन प्रमुख पंथांमध्ये तत्त्वज्ञानासोबतच मूर्तीशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत मूलभूत आणि रंजक फरकआहेच. या फरकांचा उगम बुद्धत्वाकडे पाहण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनातून होतो. आणि मग तशी सविस्तर मांडणी केली पाहिजे असे वाटते. हीनयान यात बुद्ध एक मानवी महापुरुष आणि मार्गदर्शक मानले गेले. सुरुवातीच्या काळात बुद्धांना मानवी रूपात दाखवणे वर्ज्य होते. त्यांच्या उपस्थितीसाठी पदकमल, धम्मचक्र, बोधिवृक्ष किंवा रिकामे आसन वापरले जात होते. साधी आणि संयमित कला स्तूप वगैरे. महायान यात, बुद्धांना मानवी रूपात आणि भव्य स्वरूपात पूजले जाते. यामध्ये विविध मुद्रा (उदा. भूस्पर्श, अभय, ध्यान) अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. महायानमध्ये अवलोकितेश्वर, मंजुश्री, तारा, वज्रपाणी अशा अनेक बोधिसत्वांच्या अलंकारिक आणि विविध आयुधे धारण केलेल्या मूर्ती आढळतात. अत्यंत सुशोभित, दागिने, मुकुट आणि भव्यता असलेली कला. बुद्धाच्या काळात मूर्ती शक्य नव्हते तर पहिली मूर्ती केव्हा आली त्याबद्दल असे म्हटल्या जाते की, बुद्धाची पहिली मानवी मूर्ती ग्रीक-बौद्ध कलाशैलीतून निर्माण झाली. जेव्हा ग्रीक लोक भारताच्या संपर्कात आले, तेव्हा त्यांच्याकडे त्यांच्या देवांना मानवी रूपात कोरण्याची जुनी परंपरा होती. ग्रीक मूर्तिकारांनी बुद्धाला मानवी शरीर दिले, ज्याला त्यांनी 'अपोलियन बुद्ध ' असे म्हटले. अल्फ्रेड फुशे यांची ही कल्पना आहे, अर्थात ही सर्व गांधार शैली. उदा. केस भारतीय परंपरेत बुद्धाचे केस मुंडण केलेले किंवा कुरळे दाखवले जातात, पण अपोलोनियन बुद्धामध्ये ते ग्रीक शैलीतील लाटांसारखे आणि वरच्या बाजूला बांधलेले असतात. चेहरा अत्यंत रेखीव, सरळ तीक्ष्ण नाक आणि अंडाकृती चेहरा असतो, जो हुबेहूब ग्रीक शिल्पांसारखा दिसतो. बुद्धाने परिधान केलेले 'चीवर' (वस्त्र) हे साध्या कापडासारखे नसून ग्रीक 'टोगा' जाड असे असते. असे असले तरी, बुद्धाची मूर्ती ही गांधार शैलीची 'मथुरा शैली' ची यावर अभ्यासकात वाद आहेत. खालील संदर्भ पुस्तके जाणकारांनी वाचून सविस्तर लिहावे असे वाटले. संदर्भ ः १. अल्फ्रेड फूशेचं 'आर्ट ग्रेको-बौद्धिक दु गांधार' फ्रेंचभाषेतील पुस्तक भाषेत असलं तरी, गांधार कलेतील मूर्तीशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी यातील चित्रे आणि विश्लेषण जागतिक स्तरावर प्रमाण मानले जाते. २, 'बुद्धाची पहिली मानवी मूर्ती' आणि ती तयार होण्यामागची प्रक्रिया यावर सविस्तर निबंध.

टर्मीनेटर 02/02/2026 - 18:54
एकतर विषय एकदम फालतू... म्हणजे काही ठराविक लोकांसाठी रसाचा असू शकेल... त्यात ज्यांना ह्या फालतू विषयात रस असेल त्यांच्या प्रश्नांना नेमके उत्तर देता येत नसेल तर काय उपयोग आहे असल्या फालतू विषयांचा?
अर्थात हे सर्व अभ्यासक्रमात सांगितले.पण उणेपुरे सात दिवस(साधारण ११ तास ) त्यात इतकेच आकलन झाले.
हे उत्तर समाधानकारक ठरेल का? तुमच्या लिखाणाला कमी किंवा निरर्थक ठरवायचा कोणताही हेतू नाही, पण मिपावर खूप व्यासंगी लोकं आहेत, उगाच तुम्हाला उस्फूर्त लेखन करता म्हणुन हरभऱ्याच्या झाडावर चढवणाऱ्या लोकांच्या नादी लागून असले लेखन इथे करू नका असे सांगावेसे वाटत आहे!

In reply to by टर्मीनेटर

अभ्या.. 02/02/2026 - 19:41
परफेक्ट..... ab .
मिपावर खूप व्यासंगी लोकं आहेत, उगाच तुम्हाला उस्फूर्त लेखन करता म्हणुन हरभऱ्याच्या झाडावर चढवणाऱ्या लोकांच्या नादी लागून असले लेखन इथे करू नका असे सांगावेसे वाटत आहे!
अनुभव काय? ........ ;) बाहुबलीला लै अनुभव आहे त्याला विचारयला पाहिजे..

सोत्रि 02/02/2026 - 19:47
असले लेखन इथे करू नका असे सांगावेसे वाटत आहे!
टर्मीनेटर, लेखाच्या विस्कळीत मांडणीबद्दल तुमच्याशी १००% सहमत आहे. त्याबद्दल दुमत नाही. (गीतारहस्य ह्या मालिकेतही विस्कळीत मांडणीमुळे चांगला विषय वाया गेला होता हे माझं वैयक्तिक मत आहे.) पण त्यामुळे एकदम लेखन करू नका असं सुचवणं, तेही विषय फालतू आहे असे एकदम जजमेंटल होऊन, ये बात कुछ हजम नही हुइ! - (जजमेंटल नसलेला) सोकाजी

In reply to by सोत्रि

कॉमी 02/02/2026 - 19:50
सहमत. अगदी नाउमेद न करता तितक्याच ठामपणे हेच म्हणणे मांडणे शक्य होते.

In reply to by सोत्रि

टर्मीनेटर 03/02/2026 - 00:26
पण त्यामुळे एकदम लेखन करू नका असं सुचवणं, तेही विषय फालतू आहे असे एकदम जजमेंटल होऊन, ये बात कुछ हजम नही हुइ!
सोकाजीनाना... आपला मिपा परिवार खूप मोठा आहे आणि त्यात आपली काही हक्काची माणसे आहेत. भक्ती ताई त्या हक्काच्या माणसांपैकीच आहेत. माझा प्रतिसाद थोडा (थोडा काय जास्तच) रुड वगैरे वाटला असेल, पण फार काही स्पष्टीकरण न देता एवढेच सांगतो "समझने वाले समझ गये हैं, ना समझे... ना समझे वो 'खिलाडी' हैं" 😀

गामा पैलवान 02/02/2026 - 21:19
सोत्रि,
वेदांतातला अद्वैत आणि बौद्ध शिकवणीतला निर्वाण. हे दोन्ही एकच आहे का?
प्रश्न अतिशय रोचक आहे. निर्वाणाची अद्वैतासोबत तुलना होऊ शकते का असाही एक उपप्रश्न पडतो. शिवाय पुनर्जन्माचाही प्रश्न आहेच. अद्वैत साधेपर्यंत आत्मा पुनर्जन्म घेत राहतो ( वा मायेमुळे घ्यावा लागतो ). तर मग निर्वाण साधेपर्यंत पुनर्जन्म कोण घेतं? आ.न., -गा.पै.

कंजूस 02/02/2026 - 21:41
मी नाही त्यातला. लेख आवडला म्हणतो. नवअभ्यासकांना नवीन विषयात प्रश्न पडतात. त्यांना हुरुप येतो. त्याची उत्तरे देण्याचा कुणी प्रयत्न करतो. मलाही बुद्ध समजला नाही आणि गीताही नाही. पुस्तके वाचतो. त्यात कुणी काय लिहिले ते सांगतो. दोन्ही विषय गहन आहेत. पण श्रद्धा अती थोर आहे. त्यावर जग चालते. ख्रिश्चन लोक ( फादर) तुकारामाच्या साहित्याचा अभ्यास करतात. कारण तुकाराम अतिशय सोप्या भाषेत लोकांना मर्म सांगतात. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले.... पंडीत लोक फुटपट्टी घेऊन जातात अनुनयी श्रद्धा.

In reply to by कंजूस

Bhakti 02/02/2026 - 21:57
हो ना कंकाका, माझा हेतू कायमच स्वछ असतो.मिपावर लेख द्यायला आवडयचं, फार " व्यासंगी " लोकांचे मत समजतात. पण पूर्ण अभ्यासू असल्याशिवाय लेख कशाला इथे द्यायचे.?? मी जर अभ्यासक असते तर कशाला लेख लिहिले असते?? "पुस्तकच लिहिले नसते का??" पण एकंदरीत अभ्यासक नसल्यास इथे लिहू नये, हा मोठा धडा आज इथे मिळाला. आपलं चेपूच बरं, नॉन अभ्यासाकांना! उरलो आता वाचनापुरते!!!

In reply to by Bhakti

गामा पैलवान 02/02/2026 - 23:57
भक्ती, पांघरा गेंड्याची कातडी आणि लिहा हो बेधडक. एक ठेच लागली तर वाचनमात्र होताय! काय म्हणावं तुम्हांस. उघडं पडायची वेळ आली तेव्हा मी कसा बघा ढोबळमानाने मोघम मार्ग पत्करला. मध्यममार्ग म्हणतात तो हाच तर नव्हे? आ.न., -गा.पै.

In reply to by Bhakti

कंजूस 03/02/2026 - 04:22
कालच्या प्रतिसादात एक वाक्य मी लिहिलं होतं पण ते नंतर गाळलं होतं. आणि तसंच झालं. यापुढे " Bhakti लेखन करणार नाही." आणि तेच तिने लिहिलंय.

लेखन करीत राहा. लोक टीका करीत राहतात. लेखनात यंव नाही, लेखनात त्यंव नाही, हे असं सगळं चालायचंचं. आपल्याला वाटतं लिहायचं तरी नक्की लिहा. कोणताही प्रस्थापित अभ्यासक-लेखक हा पहिल्यांदा नवलेखकच असतो, तेव्हा आपण नवलेखक आहोत असे समजून लिहीत राहावे. शुभेच्छा. -दिलीप बिरुटे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टर्मीनेटर 03/02/2026 - 10:17
भक्तीताई टिकेला घाबरून पळ काढणाऱ्यांतल्या नाहीत हो सर, त्या 'स्ट्रॉंग वुमन' आहेत. आणि 'त्या' प्रतिसादाचा रोख नक्की कशाकडे आहे हे समजण्या एवढ्या 'स्मार्ट' देखील आहेत. त्यामुळे चिंता नसावी, त्या लिहित्या रहातील ह्याची खात्री बाळगा!

In reply to by टर्मीनेटर

अभ्या.. 03/02/2026 - 19:18
तुमचे पर्सनल व्हॅल्युएशन तुमच्यापाशी, इथे मिपावर लिहू नका असे सुचवणेच चुकीचे आहे. लेखकाने कीती स्मार्ट आणि स्ट्राँग राहायचे ते लेखकाने स्वतः ठरवायचे, कुणी लिहू नका म्हणले तर त्यातून काय अर्थ निघतो हे बघण्याआधी "तू कोण सांगणार?" हे विचारावे अशीच माझीतर अपेक्षा आहे. अर्थात कित्येक पटाईत लेखकांनी काहीही लिहिण्यापेक्क्षा काही लिहूच नये अशी सर्वसामान्य अपेक्षा असताना तिकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष्य करुन भक्तीताईसारख्या मिपाधर्म सांभाळणार्‍या अस्सल मिपाकर लेखिकेला इथे लिहू नको असे सांगणे खरेच दुर्दैवी आहे. टर्मीभाऊंची मनातली सच्छील इच्छा समजत असली आणि त्यांचा प्रांजळ स्वभाव कळत असला तरी......... टर्मीनेटर तुम्हारा इधर चुक्याच....

कंजूस 03/02/2026 - 10:38
टीका केल्याने / झाल्याने बरेच नवलेखक येथून पळाले आहेत. आपलं लेखन डायरीत लिहून ठेवलं तर कुणीच वाचणार नाहीये, त्यापेक्षा इकडे चार राडपाण्याचे शिंतोडे उडवून घेतल्याने बरे वाटते .[ दाग अच्छे हैं. किंवा कार्यक्रम पाहा साडे माडे शिंतोडे.]

In reply to by कंजूस

Bhakti 03/02/2026 - 11:50
आपलं लेखन डायरीत लिहून ठेवलं तर कुणीच वाचणार नाहीये, त्यापेक्षा इकडे चार राडपाण्याचे शिंतोडे उडवून घेतल्याने बरे वाटते .[ दाग अच्छे हैं. किंवा कार्यक्रम पाहा साडे माडे शिंतोडे.]
एकदम बरोब्बर काका, हाच सरळ स्वच्छ हेतू असतो सोशल मीडियावर लिहिताना. पण दरवेळी आपल्यालाच आत्मपरीक्षण करायची वेळ येत असेल तर... जरा थांबलंच पाहिजे,बदलायला पाहिजे हॆ जाणवत आहे.

तरी पुन्हा सांगतो. मिपावर(किवा कुठल्याही सोमिवर) व्यक्त होण्याआधी "फाट्यावर मारणे" हा मुख्य गुण अंगी बाणवुन घ्यावा लागतो. ज्ञानोबांनी सांगितलेच आहे " जे की राजहंसाचे चालणे........" पूर्ण ओवी आठवत नाही पण म्हणुन कावळ्याने चालुच नये की काय? असे काहीसे.

गोरगावलेकर 03/02/2026 - 13:24
भक्ती ताई, मिपावर सल्ला देण्या इतका माझा अभ्यास नाही . तरीही सांगते, निराश होऊ नका. टर्मीनेटर यांनी पूर्वी कोणाच्या तरी काश्मीर भटकंतीबद्दल असाच एक संक्षिप्त प्रतिसाद दिला होता तो बऱ्याच जणांना रुचला नव्हता. पण नंतर त्यांनी त्यामागचा हेतू स्पष्ट केला तेव्हा तो बहुतेकांना आणि मुख्य म्हणजे ज्याला उद्देशून लिहिला होता त्यालाही पटला. असाच एक प्रतिसाद माझ्या लेखातील फोटोंबद्दलही होता. नंतर माझ्या पुढील लेखात सुधारणा झाल्याबद्दल त्यांनी कौतुकही केले. तेव्हा त्यांच्या स्पष्ट बोलण्यात निश्चितच काही चांगला हेतू असेल. लिहिते रहा.

गवि 03/02/2026 - 13:37
लिहीत रहा पण रँडम असंख्य विषयांवर वरवर लिहिण्याऐवजी आपल्याला आतून प्रचंड उर्मी येईल तेव्हा जे काही मनातून येईल ते लिहा. ते नेहमीच चांगलं असेल. लोकांना ते आवडेल आणि एखाद दुसऱ्याला नाही आवडलं तरी ते पटलं नाही या स्वरूपात असेल. जर आत्मपरीक्षण करण्याची गरज जाणवली असेल तर ते मोठं यश आहे. तुटक किंवा कडवट होऊन आता लेखनच थांबवते असं म्हणण्यात अर्थ नाही. याची कारणे दोन: १. मनातून ते पटत नसतं. नुसतं म्हणायला म्हटलेलं असतं. २. खरंच लिहिणं बंद केलं तर जगाला काही फारसा फरक पडत नसतो. आपण विस्मरणात विलीन होऊन जातो. तर लिहिण्याची गरज आपल्याला आहे हे मान्य करून "आता थांबले पाहिजे" वगैरे असे कोणतेही जाहीरनामे करणे आवश्यक नाही. लोकांसाठी आपण लिहीतो. पूर्ण स्वांत सुखाय लिहिणे हा भ्रम आहे. लोकांपुढे आपण ठेवतो तेच मुळात त्यांना आवडेल अशा अपेक्षेने. त्यांना त्यातून आनंद मिळाला पाहिजे. जशी रेसिपी तसंच हे. मग ते चेक न करता, अशुद्ध (भाषा अशुद्ध नव्हे, लेखन टंकन), शब्दांची आगगाडी, सुरुवात कुठून झाली आणि शेवट कुठे होतोय त्याचे भान टाळून असे लिहीले तर लोकांना ते वाचताना आनंद कसा मिळेल ! ? अर्थ, भावार्थ हे पुढचे पुढे राहिले. तेव्हा लिहिणे थांबवू नका. विचार करा. आणि अभ्यासोनि प्रकटा. प्रचू, लिहित बरोबर की लिहीत?

प्रचेतस 03/02/2026 - 14:46
लिहिणे थांबवण्याचे काहीच कारण नाही, उलट आपण वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करता, त्यावर लिहिण्याचा प्रयत्न करता हे कौतुकास्पदच आहे. मुळात असे विषय जरा अवघड. मूर्तीशास्त्र किंवा तत्त्वज्ञान अशा विषयांवर लिहिणे सोपे नव्हेच. एकवेळ हिंदू मूर्तीशास्त्र तुलनेने सोपे आहे, लक्षणे स्पष्ट असतात, तत्त्वज्ञान समजणेही बऱ्याच साधनांमुळे काहीसे साध्य होते मात्र बुद्ध किंवा जैन तत्त्वज्ञाने अथवा मूर्तीतील फरक समजणे सोपे नाही, अतिशय कमी किंवा अस्पष्ट लक्षणे असतात, साधनेही अत्यंत मर्यादित असतात. लिहिताना काही गडबड होणे किंवा सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे देता न येणे हे साहजिक आहे पण म्हणून अभ्यास सोडायचा नाही किंवा लिहिणेही सोडायचे नाही. उलट प्रतिसादांतून अधिकाधिक माहिती मिळत जाते हा फायदाच.

कंजूस 03/02/2026 - 14:56
सर्वात उत्तम म्हणजे निरीक्षणं नोंदवणे किंवा फोटो देणे. मग अभ्यासक त्यामागचे रहस्य सांगत जातात. माझ्याकडे बुद्धाच्या भारतातील लेणी लेख इमारती स्तूप किंवा संबंधित गोष्टींवर पर्यटन माहिती आहे ती मी इथे एका वेगळ्या लेखात देईन म्हणतो. माहिती मला विविध प्रदर्शनातील पत्रकांतून मिळाली आहे. काॅपिराईटचा प्रश्न नाहीये. फक्त अडचण काय की काही माहिती पत्रके फार मोठ्या साईजची आहेत. त्यांचा एक मोठा फोटो काढून पाहतो. कुणाला उत्साह आणि आवड असल्यास उपयोगी पडेल.

Bhakti 03/02/2026 - 17:48
योगायोगाने हॆ आजच दिसले.. 1 तुमच्या सर्वांच्या आपुलकीपूर्ण प्रतिसादने खरंच भारवले आहे_/\_ माझं पुस्तकांवर, शब्दांवर खूप प्रेम आहे त्यामुळे मी लिहिणं थांबवण शक्यच नाही पण काही काळं ब्रेक योग्य ठरेल.भेटू लवकरच!

सर्वांना वाटेल की मी अतीच सिनेमे पाहते काय(कोणाला आपल्याबद्दल काही वाटलं तरी आपण बदलू नाही ,हा बेसिक नियम मान्यच असेल ..:)) तर मी माझ्या क्षेत्राशिवाय अजूनही काही विशेष पाहत असते.मुळात अज्ञानी राहायला आवडत नाही.३ इडियट मधल्या रांचोचा एक डायलॉग मला फार रिलेट होतो,कायमच...

AI सोबत लेखन : विचार, शब्द आणि जबाबदारी - प्रस्तावना

टर्मीनेटर ·

चित्रगुप्त 20/01/2026 - 06:23
पुढील भागांची प्रतिक्षा. या लेखमालेत 'प्रतिमानिर्मिती' बद्दलही येऊ द्यावे. प्रतिसादकांनी 'जनरविलेल्या इमेजा' इथे प्रतिसादात द्याव्यात का ?

युयुत्सु 20/01/2026 - 11:14
दुसरा मुद्दा - ए०आय० म्हणजे फक्त गप्पा मारणारी यंत्रे नसून त्यात यंत्रप्रज्ञा (रोबोटीक्स) पणे येते आणि ही यंत्रे अनुभवातूनच शिकतात. संगणक आणि इंटरनेट आले तेव्हा ही लोक अशीच किरकिर करत असत आणि असे लोक त्या लाटेत वाहून गेले. लेखकाचे ए०आय्०चे आकलन फारच मर्यादित वाटते.

गवि 20/01/2026 - 11:21
AI ला अनुभव नसतो. AI ला स्मृती नसते. AI ला भाव-भावना आणि संस्कृतीची जाणीव नसते.
असं नाहीये. पण लेखाच्या आशयात रास्त मुद्दे आहेतच. AI आणि मानवी मन यांची तुलना अयोग्य आहे. अनेकजण जाणीव, आत्मा (सोल) असे शब्द घेऊन AI ला ते नाही असं म्हणतात. ते ठीकच आहे. तसं असणं शक्यच नाही. आणि मुळात या संज्ञाच धूसर आहेत. खूप मोठ्या संख्येने लोक एकत्र येऊन त्यांच्या बहुमतातून तुम्हाला मत किंवा माहिती मिळाली तर जे होईल ते साधारणपणे AI करतो असं म्हणता येईल फारतर. आणि ही हजारो माणसे फक्त सुष्ट की सुष्ट दुष्ट मिश्रण की फक्त दुष्ट हे मॉडेल ट्रेनिंग आणि त्याच्याशी अनुषंगिक इतर प्रक्रिया यांवर अवलंबून.

In reply to by गवि

युयुत्सु 20/01/2026 - 11:31
अनेकजण जाणीव, आत्मा (सोल) असे शब्द घेऊन AI ला ते नाही असं म्हणतात. ए०आय्०ची बैठक ही शास्त्रीय मॉडेल्स्वर आधारित आहे. त्यामुळे आत्मा वगैरे सारख्या वादग्रस्त अशास्त्रीय कल्पना वापरून ए०आय्०चे मूल्यमापन करणे हा मला मोठा अन्याय वाटतो. ए०आय्०ची कंटेक्स्ट विण्डो आणि मानवी वर्कींग मेमरी या बर्‍याच मिळत्याजुळत्या कल्पना आहेत.

In reply to by युयुत्सु

गवि 20/01/2026 - 11:39
हो. कृत्रिम प्रज्ञा हे एक सत्य आणि वास्तव म्हणून मुळात स्वीकार झाला, आणि त्याचे खरे सत्य स्वरूप कळले की मग त्याचा वापर कसा आणि किती आणि कुठे करावा हे आपोआप उमगत जाईल असे वाटते. विज्ञानावर आधारित कोणत्याही गोष्टीत स्वतःची अशी काही नैतिकता किंवा बरे वाईट, पाप पुण्य नसतेच. ते हाताळणाऱ्यावर अवलंबून आहे. Responsible AI, Guardrails, Ethical AI, AI Governance ही क्षेत्रे यामुळेच झपाट्याने वाढत आहेत. ISO 42001, EU AI act, RBI free AI, NIST आणि इतर अनेक मानके, फ्रेमवर्क्स, रेकमेंडेशन्स अस्तित्वात येत आहेत. AI रिस्क असेसमेंट, इम्पॅक्ट असेसमेंट या संकल्पना प्रत्यक्षात येत आहेत.

In reply to by गवि

युयुत्सु 20/01/2026 - 12:00
त्याचे खरे सत्य स्वरूप कळले हे वाक्य आणी त्यातली अट मला वादग्रस्त वाटते. खर्‍या स्वरूपाचे ज्ञान प्रत्येकाच्या वकूबानुसार, मूळ ग्रहणक्षमतेनुसार होत असते. कुणाला ए०आय० पिपाणी वाटतो तर कुणाला उलथापालथ घडवून घडवणारे तंत्रज्ञान. मला ९-१०वीत असताना मराठीच्या पुस्तकातली (बहुधा इंदिरा संतांची ) एक कविता आठवते- हा बालक बसला कागद टरकावित कोपुनी तयाची म्हणते माय "खट्याळा" हा काय चालविलास विनाशक चाळा लागेल कुणा हा मुत्सद्द्याच्या हाती ते करार नामी ऐसे करतील ह्याचे वरती कि पुण्याई धूर्त कुणी मुत्सद्दी ठरवतील हातोहात मामुली रद्दी ... कि उडेल त्याच्या मधूनी अचानक भडका जो ग्रहगोलांसही देईल धडका-धडका इ० इ० कविता जशी आठवते तशी दिली आहे, आणी ए०आय आणि प्रत्येक लोकोत्तर तंत्रज्ञानाला लागू पडते.

युयुत्सु 20/01/2026 - 11:23
आणखी एक- ए०आय्०च्या सिम्युलेशन करायच्या ताकदीकडे वरील लेखकाने साफ-साफ डोळेझाक केली आहे. या सिम्युलेशन्मुळे वेगवेगळ्या शक्यतांची कल्पना करून तपासणी करणे शक्य होते. त्यामुळे विज्ञानाच्या प्रगतीचा वेग वाढत आहे, हे लेखकाच्या गावी ही नाही. यांत्रिकशेती बोकाळल्यावर लोकांना नैसर्गिक शेतीचे प्रेम उफाळून आले, त्याप्रमाणे डीझायनर-बाळे बोकाळली की नैसर्गिक बाळांबद्द्ल माणसाला प्रेम वाटू लागेल.

कंजूस 20/01/2026 - 14:49
फार चर्चेत न घुसता एक प्रश्न विचारतो की शाळेत जाणाऱ्या मुलांच्या दप्तराचे ओझे एआइ कमी करेल का? ( याअगोदर काही शाळांमध्ये tablets वापरण्याचा प्रयोग झाला. त्यांचे पुढे काय झाले? फक्त एक आधुनिक पाटी म्हणजे tab न्यायचा असा प्रयोग.)

कांदा लिंबू 20/01/2026 - 15:45
लेखमालेची प्रस्तावना आवडली. लेखन ही केवळ शब्दांची रांग नसून ती अनुभव, संदर्भ आणि संस्कृती ह्यांची गुंफण असते, लेखक आणि वाचकामधला तो एक अबोल पण अत्यंत प्रभावी असा शाब्दीक 'संवाद' असतो. AI कडे स्वतःचा अनुभव नसला, तरी त्याचा वापर करताना मानवी जाणीव आणि जबाबदारी किती महत्त्वाची आहे हेच यातून दिसते. तंत्रज्ञानाला शत्रू न मानता मदतनीस म्हणून पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. AI लेखन सुलभ करतं की साचेबद्ध बनवतं, कल्पना वाढवतं की कुंपणे उभी करतं अश्या वळणाने पुढील चर्चा जाईल असे वाटते. "मानवी सर्जनशीलता व AI generativity दोन्हींचे योग्य संतुलन हाच यशाचा मंत्र" असे म्हणावे लागेल. पुभाप्र

युयुत्सु 20/01/2026 - 16:40
माझ्या जिलब्यांच्या दुसर्‍या घाण्यामध्ये ए०आय० च्या उत्तरातील १लेच वाक्य हे "अचंबा" या जाणीव्/भावनेच्या जवळ जाणारे आहे हा एक उत्तम “thought experiment” आहे, कारण तो संविधानाला “पवित्र ग्रंथ” म्हणून न पाहता **समाज-व्यवस्था घडवणारी संस्थात्मक रचना (institutional design)** म्हणून पाहायला भाग पाडतो. https://misalpav.com/node/53449

गामा पैलवान 21/01/2026 - 02:25
अवांतर : युयुत्सु,
आत्मा वगैरे सारख्या वादग्रस्त अशास्त्रीय कल्पना
आत्मा ही संकल्पना अशास्त्रीय कशी काय बुवा? पुनर्जन्माचा पद्धतशीर अभ्यास झालेला आहे. आ.न., -गा.पै.

टर्मीनेटर 21/01/2026 - 10:38
सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार 🙏 @ चित्रगुप्त होय काका, ह्या मालिकेत लेख, कथा, कविता आणि 'प्रतिमानिर्मिती' विषयी लिहिणार आहे, 'संगीत आणि व्हिडीओ निर्मिती बद्दल पुढे कधीतरी...
"प्रतिसादकांनी 'जनरविलेल्या इमेजा' इथे प्रतिसादात द्याव्यात का ?"
मालिकेतल्या 'प्रतिमानिर्मिती' विषयीच्या भागावर अशा 'जनरविलेल्या इमेजांचे' लाल गालिचा पसरून स्वागत केले जाईल 😀 ----- @ युयुत्सु
"लेखकाचे ए०आय्०चे आकलन फारच मर्यादित वाटते." आणि "ए०आय्०च्या सिम्युलेशन करायच्या ताकदीकडे वरील लेखकाने साफ-साफ डोळेझाक केली आहे. या सिम्युलेशन्मुळे वेगवेगळ्या शक्यतांची कल्पना करून तपासणी करणे शक्य होते. त्यामुळे विज्ञानाच्या प्रगतीचा वेग वाढत आहे, हे लेखकाच्या गावी ही नाही."
प्रस्तावना न वाचताच किंवा पूर्ण न वाचताच आपण काढलेल्या वरील निष्कर्षांबद्दल आपले विशेष अभिनंदन 😀 अवांतर: आपले प्रतिसाद वाचून 'धुरंधर' चित्रपटाचा नुसता ट्रेलर पाहूनच शेपटीवर पायच नाही तर शेपटीला आग लागल्यासारखा थयथयाट करणाऱ्या अनुपमा चोप्रा आणि सुचरिता दास (की घोष) आठवल्या एकदम 😂 ----- @ गवि
"खूप मोठ्या संख्येने लोक एकत्र येऊन त्यांच्या बहुमतातून तुम्हाला मत किंवा माहिती मिळाली तर जे होईल ते साधारणपणे AI करतो असं म्हणता येईल फारतर. आणि ही हजारो माणसे फक्त सुष्ट की सुष्ट दुष्ट मिश्रण की फक्त दुष्ट हे मॉडेल ट्रेनिंग आणि त्याच्याशी अनुषंगिक इतर प्रक्रिया यांवर अवलंबून." आणि "कृत्रिम प्रज्ञा हे एक सत्य आणि वास्तव म्हणून मुळात स्वीकार झाला, आणि त्याचे खरे सत्य स्वरूप कळले की मग त्याचा वापर कसा आणि किती आणि कुठे करावा हे आपोआप उमगत जाईल असे वाटते."
वरील दोन्ही विधानांशी १००% सहमत आहे 👍 ----- @ कंजूस
"फार चर्चेत न घुसता एक प्रश्न विचारतो की शाळेत जाणाऱ्या मुलांच्या दप्तराचे ओझे एआइ कमी करेल का?"
शिक्षण खात्याने मनावर घेतल्यास नक्कीच करू शकतो! ----- @ कांदा लिंबू
मानवी सर्जनशीलता व AI generativity दोन्हींचे योग्य संतुलन हाच यशाचा मंत्र" असे म्हणावे लागेल.
+१००

युयुत्सु 21/01/2026 - 11:03
श्री० टर्मिनेटर थयाथयाट कुणाचा याचं उत्तर काळ देईलच. फक्त आपल्या लिखाणातून दिशाभूल, चुकीची.अशास्त्रीय विधाने/माहिती (AI ला अनुभव नसतो. AI ला स्मृती नसते. AI ला भाव-भावना आणि संस्कृतीची जाणीव नसते.) प्रसृत होणार नाही याची काळजी घ्या. तसेच पुढच्या वेळेला मुद्देसूद प्रतिसाद अपेक्षित आहे. आपण ए०आय्०ने केलेल्या निर्मितीवर मानवी संस्काराचा घोषा चालू ठेवला आहे. आपण वर टाकलेली प्रतिमा ए०आय० निर्मित की मानव निर्मित, त्यात मानवी संकार किती आहेत?

In reply to by युयुत्सु

टर्मीनेटर 21/01/2026 - 11:57
फक्त आपल्या लिखाणातून दिशाभूल, चुकीची.अशास्त्रीय विधाने/माहिती (AI ला अनुभव नसतो. AI ला स्मृती नसते. AI ला भाव-भावना आणि संस्कृतीची जाणीव नसते.) प्रसृत होणार नाही याची काळजी घ्या.
दुर्दैवाने 'सतत पिपाणी वाजवुन लोकांना काव आणण्याची' चांगली सवय मला अजुन तरी लागली नसल्याने ही 'काळजी' नेहमीच घेत असतो 😂
आपण वर टाकलेली प्रतिमा ए०आय० निर्मित की मानव निर्मित, त्यात मानवी संकार किती आहेत?
खाली, AI निर्मित मूळ प्रतिमा आणि तिची 'बिंग इमेज क्रिएटर' वरील लिंक. 0 त्यावर फोटोशॉप वापरुन काही ' मानवी संकार' केले आहेत की नाही हे लेखातली प्रतिमा पाहुन तुम्हीच ठरवा! 'सर्वज्ञानी' व्यक्तींकडून प्रामाणिक उत्तराची अपेक्षा मी कधीच करत नसल्याने आपण त्यावर काही 'संस्कार' केले आहेत की नाही ह्याविषयीचे आपले मत कळवले नाहीत तरी माझी काहीच हरकत नाही 😀

In reply to by टर्मीनेटर

युयुत्सु 21/01/2026 - 18:10
श्री० टर्मिनेटर, 'सर्वज्ञानी' व्यक्तींकडून प्रामाणिक उत्तराची अपेक्षा मी कधीच करत नसल्याने आपण त्यावर काही 'संस्कार' केले आहेत की नाही ह्याविषयीचे आपले मत कळवले नाहीत तरी माझी काहीच हरकत नाही तुम्हाला माझ्या प्रामाणिकपणा बद्दल संशय असल्याने ही समस्या घेऊन ए०आय्०लाच साकडे घातले. प्र० What is the difference between the two images? उ० The content is the same, but the background/border treatment is different: वरची प्रतिमा: the illustration extends to a beige/tan background with no white border, so it looks more “full-bleed.” खालची प्रतिमा: has a white outer margin/frame around the illustration (especially visible at the top and bottom). Everything inside the main illustration (AI head, book, icons, etc.) is essentially identical. या संस्कारातून नेमके काय साधलं गेलं हे माझ्या बालबुद्धीला कळण्या पलिकडे आहे. पण असो...

In reply to by युयुत्सु

युयुत्सु 21/01/2026 - 18:25
ता०क० ए०आय० ने दिलेल्या उत्तरावर तुम्हाला कदाचित मानवी संस्कार अपेक्षित असतील पण मी प्रामाणिक असल्याने जसेच्या तसे दिले आहे.

In reply to by युयुत्सु

टर्मीनेटर 22/01/2026 - 11:49
"तुम्हाला माझ्या प्रामाणिकपणा बद्दल संशय असल्याने ही समस्या घेऊन ए०आय्०लाच साकडे घातले."
ह्याचं कारण म्हणजे तुम्ही खूप 'प्रेडिक्टेबल' झाला आहात! साध्या डोळ्यांना सहज दिसणारी गोष्टही एखादी 'समस्या' असल्याप्रमाणे तिचे समाधान शोधण्यासाठी तुम्ही AI कडे विचारणा करणार ह्याची खात्री असल्यानेच तो 'संशय' व्यक्त केला होता. एखाद्या सजीव / निर्जीव / दृष्य / अदृष्य गोष्टीवर आत्यंतिक प्रेम, श्रद्धा असणे समजू शकते, पण इतकी 'अंधश्रद्धा' आचंबित करणारी आहे. देवभोळ्या/धर्मवेड्यांची असो की स्वतःला विज्ञाननिष्ठ मानणाऱ्यांची असो परंतु अंधश्रद्धा हि अंधश्रद्धाच असते, तिचा दर्जा आणि पातळी समानच असते! एकंदरीत गेल्या वर्षभरातले आपले लेखन आणि प्रतिसाद वाचून तुमच्यासाठी मानवी बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलतेपेक्षा 'कृत्रिम बुद्धिमत्ता' सर्वोच्चस्थानी असल्याचे लक्षात आल्याने त्याकडे गांभीर्याने बघणे केव्हाच बंद केले होते, पण आता त्या अंधविश्वासाने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने त्यांची दखलही न घेता तिकडे साफ दुर्लक्ष करण्याचा निर्णय पक्का झाला आहे. असो... "AI ने 'ग़ालिब' निकम्मा कर दिया, वरना हम भी आदमी थे काम के"

शाम भागवत 21/01/2026 - 12:17
मला एक शंका आहे. एखादी छोटीसा स्क्रिप्ट लिहिलेली असेल तर त्याचा व्हिडीओ एआय बनवतो का? म्हणजे 'ChatGPT, Gemini, Copilot, Meta, Cloude, DeepSeek, Grok' यापैकी नक्की कोण बनवतो?

In reply to by शाम भागवत

टर्मीनेटर 21/01/2026 - 12:33
माझ्या माहितीप्रमाणे फ्री व्हर्जन्स मध्ये नाही पण काही पेड व्हर्जन्समध्ये ही सोय आहे. खालील तक्ता बघावा... a ChatGPT, Gemini, Copilot, Meta, Cloude, DeepSeek, Grok व्यतिरिक्त ही सुविधा देणारी काही मॉडेल्स उप्लब्ध आहेत, काही मोफत ऑनलाईन (मर्यादीत) सुविधाही देतात. सर्च करुन बघा!

Bhakti 21/01/2026 - 13:06
माझे बाबा रिटायर्ड आहेत.पण वेळ जावा म्हणून ते एका महत्वाच्या क्षेत्रात छोटा चेन बीझनेस करतात.ए आय चा वापर करून ते जाहिराती व्यवसाय प्रमोशन करतात.त्यांनी तयार केलेले ए आय व्हिडीओ पाहून मी चाट पडते. पण यामुळे ते सतत मोबाईल वापरतात त्यांचे ए आय एडिटेड स्टेटस दिवसभर वाहत असतात.मला आणि भावाला त्यामुळे अनेकदा त्यांची काळजी वाटते.बाबा इतक्या जिलब्या नका बनवू आम्ही काळजीपोटी सांगून थकलो.असो.

In reply to by Bhakti

टर्मीनेटर 22/01/2026 - 11:44
"पण यामुळे ते सतत मोबाईल वापरतात त्यांचे ए आय एडिटेड स्टेटस दिवसभर वाहत असतात.मला आणि भावाला त्यामुळे अनेकदा त्यांची काळजी वाटते.बाबा इतक्या जिलब्या नका बनवू आम्ही काळजीपोटी सांगून थकलो.असो."
तुम्हा भावंडांना त्यांची काळजी वाटणे स्वाभाविक आहे! त्यांच्या ह्या छंद/जिलब्यांचा इतरांना मानसिक त्रास होत नसेल तर तिकडे फारसे लक्ष देऊ नका, उद्या त्यांना आपला वेळ घालवण्यासाठी नवीन कुठले खेळणे (पिपाणी 😀) मिळाले आणि त्यात मन रमले की त्यांचे अशा जिलब्या बनवण्याचे प्रमाण आपोआप कमी किंवा शून्यवत होईल. आमच्या बाबांनीही पूर्वी नवीन नवीन Whatsapp वापरायला सुरुवात केली होती तेव्हा आमच्या डोक्याला असाच ताप झाला होता. काही 'केसेस' हाताबाहेर गेलेल्या असतात हे मान्य परंतु सर्वसाधारणपणे फार दिवस नाही टिकत असले चाळे, त्यामुळे निश्चिंत रहा!

In reply to by Bhakti

स्वधर्म 22/01/2026 - 17:00
माझ्या सासर्‍यांना विस्मरणाचा त्रास सुरू झालाय. एकदा ते आपली दुचाकी पार्क कुठे केली तेच विसरले व तिचा नंबरही विसरले. त्यामुळे मोठा घोळ झाला म्हणजे घरच्यांना तिकडे जावे लागले व मग गाडी शोधून द्यावी लागली. तर मग त्यांना न्यूरोलॉजिस्टकडे नेले, एम आर आय काढला व काही औषधेही देण्यात आली. तर न्यूरोलॉजिस्टने त्यांना मोबाईलवर गेम्स खेळायला सांगितले आहे. तसेच शब्दकोडी सोडवा नवीन वाद्य शिका असे सगळे. ते मोबाईलवर व्हॉटसअप फॉरवर्ड भरपूर करतात, पण गेम वगैरे नाही. तर सांगायचा मुद्दा असा की वयस्क लोकांनी डोळ्यांवर फार ताण येणार नाही इतपत मोबाईल वापरून बौध्दिक काम जरूर करावे. अर्थात कोणतीही गोष्ट प्रमाणाबाहेर वाईटच.

गामा पैलवान 21/01/2026 - 23:11
अवांतर : युयुत्सु,
हा हा हा !
हसायला काय झालं? पुनर्जन्म अस्तित्वात असतो इतकंच या क्षणी म्हणता येतं. हे क्षेत्र अभ्यासास मोकळं आहे. आ.न., -गा.पै.

२०२५ च्या दिवाळी अंकासाठी AI ही थीम ठेवावी अशी सूचना पुढे आल्यावर 'टीम दिवाळी अंक' च्या सदस्यांपैकी माझ्यासहित अनेकांच्या हृदयात एक बारीकशी कळ आली होती.

अदृश्य जगाचे कुतूहल-०१

Bhakti ·

In reply to by हेमंतकुमार

Bhakti 12/01/2026 - 14:58
मला वाटत नाही ,इथे मी सर्व भाग देऊ शकेल.सुक्ष्मदर्शिका चार भागात लिहिली आहे.अल्ट्रामायक्रोस्कोप ,फेज काँट्रास्ट मायक्रोस्कोप,फ्लूओरेसेन्स मायक्रोस्कोप, टेम (TEM) आणि सेम (SEM) या सर्व सुक्ष्मदर्शिका थोड्क्यात समजण्यासाठी माझा ब्लॉग नक्की वाचा :) https://bhagat-bhakti.blogspot.com/ धन्यवाद.

In reply to by Bhakti

टर्मीनेटर 12/01/2026 - 15:31
मला वाटत नाही ,इथे मी सर्व भाग देऊ शकेल.
का हो? द्या की इथेच... काही शंका असतील तर त्या विचारायला आणि पुरक माहिती शेअर करायला सदस्यांना ते सोयीचे ठरते.

स्वधर्म 12/01/2026 - 19:51
शास्त्रीय विषय गोष्टीरूपाने सोपा करून सांगितलाय. त्यामुळे वाचतच गेलो. आणखी लिहा. मागच्या वर्षी डार्वीनचे घर पाहण्याचा योग आला. त्यात काय काय जपून ठेवले आहे डार्वीनचे स्वतः चे अक्षर वगैरे. त्यात डार्वीनने वापरलेले तीन सूक्ष्मदर्शकही पाहिले. तिथल्या लोकांनी ते कसे सुधारत गेले तेही सांगितले व त्यातून सूक्ष्म वनस्पती पाहता आल्या.

निनाद 13/01/2026 - 06:09
खूप छान ओळख करुन दिली. अवांतर भारतात सूक्ष्मजीवशास्त्रातील पदवीधरांची संख्या मोठी असली, तरी आपण जागतिक संशोधनात मागे पडतोय, हे अगदी कडू सत्य आहे! याचं सर्वात मुख्य कारण म्हणजे आपली पदवी-केंद्रित शिक्षण व्यवस्था. आपल्याकडे प्रयोगांपेक्षा परीक्षेत मार्क मिळवण्यावर आणि थिअरी पाठ करण्यावर जास्त भर दिला जातो. आणि त्या त्या विभागातले संशोधन सोडून बाकी सर्व राजकारण करणारे दिव्य प्राध्यापक आणि त्यांच्या टोळ्या! . तसाही संशोधनासाठी लागणारा निधी आणि जागतिक दर्जाच्या लॅब्स आजही मोजक्याच संस्थांमध्ये मर्यादित आहेत. संशोधन ही एक खर्चिक आणि वेळखाऊ प्रक्रिया आहे, पण आपल्याकडे उद्योगांकडून संशोधनात होणारी गुंतवणूक खूपच कमी आहे. आणि इथेच आपले प्राध्यापक माती खातात. मग काय करणार? त्यात भर पडते ब्रेन ड्रेनची. म्हणजे आपले हुशार तरुण चांगले पगार आणि आधुनिक सोयीसुविधांच्या शोधात परदेशात निघून जातात. जोपर्यंत आपण विद्यापीठांमधील अभ्यासक्रम उद्योगांच्या गरजांशी जोडत नाही आणि संशोधकांना प्रशासकीय कटकटींतून मुक्त करून मोकळं वातावरण देत नाही, तोपर्यंत केवळ 'पदवीधरांची फौज असून उपयोग नाही. आपल्याला आता 'सर्टिफिकेट' देणारी यंत्रणा बदलून इनोव्हेशनला सन्मान देणारी संस्कृती रुजवावी लागेल. ते होण्याची काहीही आशा मला आता वाटत नाही...

सूक्ष्मदर्शिका -१ 1 खूप दिवसांनी सूक्ष्मजीवशास्त्र (microbiology ) चा ग्रंथ वाचायला घेतला . तसे सर्वच विज्ञान वैज्ञानिकांच्या अचाट शोधमोहीमेने भरलेले आहे. पण सूक्ष्मजीवशास्त्र या अदृश्य जगाचे शोध खरच थक्क करणारे आणि जरा उशीरा लागले.

'लोकधन' (ऐसी अक्षरे - ३३) ते..... 'The folk आख्यान'

Bhakti ·

सुक्या 17/11/2025 - 13:17
The Folk आख्यान विषयी खुप ऐकुन आहे. संधी मिळाली की जरुर बघेल. त्यांचे The Folk आख्यान व The Folk लोक असे दोन कार्यक्रम आहेत. ह्या दोघांमधे फर्क काय आहे माहेत नाही.

In reply to by सुक्या

Bhakti 17/11/2025 - 15:56
हो 'Folk लोक' हा वेगळा कार्यक्रम तर 'folk प्रबोधन' हा एक तिसराच कार्यक्रम आहे.आता त्यांच्यापण रील्स पाहिल्या फॉरमॅट तिन्ही कार्यक्रमांचा सारखाच वाटत आहे. पण The folk आख्यान व या दोन कार्यक्रमांचे निर्माते वेगवेगळे आहेत

सुक्या 17/11/2025 - 13:18
The Folk आख्यान विषयी खुप ऐकुन आहे. संधी मिळाली की जरुर बघेल. त्यांचे The Folk आख्यान व The Folk लोक असे दोन कार्यक्रम आहेत. ह्या दोघांमधे फर्क काय आहे माहेत नाही. ३. कोकणातून आला भट, धर शेंडी, आपट --> नारळ ४. नेसली सतारा लुगडी, तरी **** उघडी --> मका

स्वधर्म 17/11/2025 - 16:20
नक्की बघणार आहे. भारतातली सगळीकडची तरून मुले मुली टेलर स्विप्ट, के पॉप, योयो हनिसिंग किंवा संजय राठोड यांच्या रॅप आणि पॉपच्या धुनीत असताना असा कार्यक्रम बसवणे आणि तो इतका यशस्वी होणे हेच एक आश्चर्य आहे.

In reply to by स्वधर्म

या आश्चर्य वाटण्यातून हुश्शार प्रगल्भ लोक काही समजून घेत आहेत का? का नेहमीप्रमाणे तरूण पिढीला बोलून मोकळे? एखादी गोश्ट जबरदस्ती, समजत नसताना, (कित्येकदा सान्गणार्यलाही समजत नसताना) कुठलाही सन्दर्भ नसताना मारून मुट्कून का करावी? पण तीच गोश्ट, जर समजाऊन सान्गून, सन्दर्भ देऊन, आम्ही कसे भारी तुम्ही कसे नालायक असा आव न आणता सान्गितली तर "हल्लीची तरूण पिढी" सुद्धा ऐकते याचे उदाहरण म्हणून याकडे बघताय का? तरी बर कार्यक्रम करणारे २५ तील तरूण आहेत. घ॑रातल्या लहान मुलाला, ज्याला इतर वेळेला रात्री जागरण केले तर ओरडले जाते, अश्या मुलाला देवाचे आहे म्हणून किन्वा करायचे असते म्हणून जागरण गोन्धळाला बसवले तर ते कन्टाळणारच ना? मला स्वतहाला ताल वाद्यान्चे प्रचन्ड आकर्शण आहे. पण घरात देवीच्या नावाने गोन्धळ घातला जात असाताना तो सगळा धूर नाका डोळ्यात जात असताना तिथे जबर्दस्ती का बसून रहायचे हेच कळत नव्हते. अशा वेळेला तिथे ताल वाद्य कुठले वाजतेय याकडे लक्श जाईल का? ते एक वाद्य आहे आणि त्याचा आनन्द घेता येऊ शकतो हे कधी जाणवलेच नाही. तरूण पिढीला बोलताना, तुम्ही स्वतहा किति जुन्या गोश्ती करत आहात, साम्भळून ठेवत आहात? का नवीन गोश्ती टाळत आहात? तरूण पिढीशी नाव न ठेवता, अक्कल शिकवण्याचा आव न आणता सम्वाद साधताय का? उस्ताद जाकीर हुसेन यान्चा एक विडीओ बघितला होता. त्यान्ची मुलाखत घेनारी बाई अशीच हल्लीच्या तरूण पिढीबद्दल बोलत होती. पण त्या माणसाने ठामपणे तिचे म्हणणे खोडून काढ्ले. त्यान्नी सान्गितले की मला स्वतहाला अशी अनेक तरूण मुले माहीत आहेत ज्यानी भारतीय शास्त्रीय सन्गीताला वाहून घेतले आहे. मी स्वतहा तुम्हाला त्यान्च्याकडे घेऊन जातो. पण याला तिची तयारी नव्हती.

In reply to by अनामिक सदस्य

स्वधर्म 19/11/2025 - 16:51
आपला संपूर्ण प्रतिसाद हा माझा प्रतिसाद तरूण मुलांवर टिका करणारा होता या समजातून लिहिलेला आहे. पण तसे म्हणायचे नव्हते. केवळ सध्याचा मला जाणवणारा तरुण मुलांचा ट्रेंड हा बराचसा पॉप रॅप इ. कडे असताना हा कार्यक्रम यशस्वी झाला याचा आनंद सांगितला होता. त्यामुळे 'अक्कल शिकवणे' वगैरे कांगावा विनाकारण आहे.

पुण्यात जर कार्यक्रम झाला तर नक्कीच बघणार. माझ्या लहानपणी आमच्या घरी चुल,बंब, उखळ,जाते,खलबत्ता,पाटा वरवंटा आडकित्ता अशा अनेक वस्तू वापरात होत्या. आमच्या आजीने अरूंद तोडाच्या (मध्यमा आत जाईल एव्हढे लहान तोंड) चौकोनी बाटलीत लाकडी पायाचा पलंग त्याच्यावर गादी ,गादीवर बाहुली आणी त्याच्यावर हांड्यांझुबंर लटकलेले छत विणले होते. ती बाटली आजही आमच्या आजोळी आहे. मामाच्या मुलांना किती सांगीतले की संग्रहालयात द्या ऐकत नाही. एव्हढी अप्रतिम कलाकृती प्रसिद्धीवीना नष्ट होत चाललीय याचे वाईट वाटते. माझी आई, मावशी ओव्या,उखाणे,वाळवणाची गाणी म्हणताना ऐकले आहे. काही कोडी आजही लक्षात आहेत. १. आटक्यात लोटके लोटक्यात दही बारा कोस जाई पण सांडत नाही. सुर्य ६. अंधाऱ्या खोलीत म्हातारी मेली, पाच जण भाऊ पण दोघांनीच उचलली. पणती ७. तीन पायांची त्रिंबकराणी खाते लाकूड, पिते पाणी चुल ८. चुलीत गेली अन् गर्भार झाली.. भाकरी १०, एवढी एवढी ननूबाई, साऱ्या वाटंनं गाणं गाई मोटरगाडी ११. एवढीशी ननूबाई, पदर केवढा घेई सुई अफलातून होते आपले पूर्वज. अनेक अद्भुत गोष्टी पारतंत्र्यामुळे नष्ट झाल्या. मुठभर मियाँ त्याला हातभर दाढी.....??? आजच्या शहरातील पिढीला नाही सांगता येणार. आणखीन काही आठवले तर परत येईन. लेख आवडला,धन्यवाद.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 17/11/2025 - 17:37
अय्यो भारीच! अजून काही पर्यायी उत्तरं ;) १. आटक्यात लोटके लोटक्यात दही बारा कोस जाई पण सांडत नाही. नारळ ६. अंधाऱ्या खोलीत म्हातारी मेली, पाच जण भाऊ पण दोघांनीच उचलली. शेंबूड (यक् ;)) ७. तीन पायांची त्रिंबकराणी खाते लाकूड, पिते पाणी सहाण १०, एवढी एवढी ननूबाई, साऱ्या वाटंनं गाणं गाई घंटा

Bhakti 17/11/2025 - 17:41
The folk आख्यानाने त्यांची गाणी प्रसिद्ध नाही केली.लोक मोबाईल शूट करतात ही बाब वेगळी!पण हा अभंग त्यांच्या युट्यूब चॅनलवर आहे.कमाल..कमाल गीत आहे. https://youtu.be/OCmUqw8CDMk?si=1xMY7V9Fd8qo708_

इथे पुस्तक परिचयासोबतच लोककला हा सामान दुवा असणाऱ्या आणखीन एका कार्यक्रामाचाही थोडक्यात आढावा दिला आहे. मला मानवाच्या इतिहासाबद्‌दल अनेक गोष्टी जाणून घ्यायला आवडतात.त्या इतिहासाची केवळ पानेच /लिखित साहित्य वाचून सध्यातरी समाधान करून घेतले जाते. तसेच विविध उत्खनन, स्थापत्य, वस्तू, भौगोलिक खुणा त्या इतिहासाजवळ घेऊन जातात . पण अनेक मौखिक परंपरा -लोककला हा वारसा जपत आलया आहेत. लोकपरंपरा काळानुरूप बदलाचे वादळ पांघरूण वेळोवेळी रुप बद‌लून समाजा समोर येतात. परंतू काळ आता इतका वेगवान होत क्षणोक्षणी बदलत आहे की है 'लोकधन' संपुष्टात येण्याची भीती आहे. डॉ.

कल्पद्रुमाचिये तळी(ऐसी अक्षरे ३२)

Bhakti ·

निनाद 16/09/2025 - 15:11
फारच थोडक्यात मांडला आहे विषय. विस्तार आवडला असता. शेवट तर अगदीच त्रोटक आहे. तेथे विस्तार हवाच हवा.

In reply to by निनाद

Bhakti 16/09/2025 - 15:44
धन्यवाद,ह्या सर्व गोष्टींची ओळख माझ्यासाठी खूप नवी अनोखी होती.यातील प्रत्येक मुद्द्यांवर मोठे अभ्यासपूर्ण लेख मालिका होईल असे हे विषय आहेत.तरीही अजून बरेच मुद्दे मांडायला हवे होते हे मान्य आहे. हो कैलास लेणं आणि गीतेचा अठरावा अध्याय ज्ञानेश्वरांची रूपक रचना नक्कीच वाचली पाहिजे, अप्रतिम!!!

१ कल्मद्रुमातळी ब्रम्ह पुंजाळले कैसे दिसते सुनीळ तेज गे मज पाहता वेणु वेदध्वनि नाद । उमटताली सहज गे बाईजे ।। ज्येष्ठ लेखक संशोधक रा.चि.ढेरे यांच्या अभ्यासपूर्ण लिखाण कधीच अनेकांच्या लिखाणाप्रमाणे बोजड वाटत नाही.

बैलपोळ्या निमित्ताने

Bhakti ·

सुबोध खरे 22/08/2025 - 19:30
एक छोटासा बदल कूबड (hump). याला वशिंड म्हणतात. कुबड चा अर्थ म्हणजे पाठीच्या मणक्यातील दोषामुळे मणक्याला आलेला बाक असा आहे

चौसष्ट योगीनींचे खुप पुरातन मंदीर आहे. बुंदेले राजांनी बांधले असावे. लहानपणी मातीचे बैल कुंभारवाड्यात मिळायचे.काव,गेरू आणून ते रंगवायचे. पुजा करायची, त्यांच्या शिंगात कडबोळ्या घालायच्या. पुरणपोळीचा नैवेद्य असे. नंतर रंगीत बैल मिळण्यास सुरुवात झाली. संध्याकाळपर्यंत अनेक बैलजोड्या गावात फिरायच्या. आया बहीणी दुध पुरणपोळी खायला देत असत. बैलांना सजवले जायचे. बाशिंग, झुल,मण्यांची माळ,शिंगाना पितळी कवच असा शिणगार असायचा. मुलांना बैलपोळ्याचे महत्त्व कळावे म्हणून इयत्ता तिसरीमधे बळी नावाचा धडा होता. बळी एक साधा सरळ शेतकरी. बैलपोळ्याच्या दिवशी गावच्या पाटलांना तालुक्याला जायचे असते. बळी बैलांना गाडीला जुंपण्यास स्पष्ट नकार देतो. बघून घेऊ या पाटलांच्या धमकीला भिक घालत नाही. त्याचवेळी गावात एक मुलगा छतावरून खाली पडून जखमी होतो. उपचारासाठी त्याला तालुक्याला नेले नाही तर मरून जाईल हे कळताच बळी गाडी जुंपून त्याला वाचवतो. आजही इतक्या वर्षांनंतर धडा स्पष्ट आठवतो. आता ग्रामीण भागात सण कमी प्रमाणात तर शहरात अजिबात साजरा होत नाही. काही वर्षांत लुप्त होईल असे वाटते.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 22/08/2025 - 21:41
खुप छान गोष्ट आहे.आम्हालापण बैला विषयी धडा होता पण आठवत नाही.कधी कधी वाटतं ती ५ वी ते १० पर्यंतची मी शिकलेली सगळी बालभारतीची मराठीची पुस्तके शोधून काढावीत.'लाल चिखल' ,'स्मशानातलं सोनं' हे धडे मात्र कधीच विसरले नाही.काळजाला भिडणारे होते.ग्रामीण जीवनाविषयी होते.

In reply to by Bhakti

Bhakti 23/08/2025 - 11:03
पाखऱ्या आबांचा खोंड पांढऱ्या जो झुंज खेळणारा बैल होता.त्याने खुप स्पर्धा जिंकल्या होत्या.आबांचा जीव की प्राण पाखऱ्या होता.पण सरकारने बैलांच्या झुंजीवर बंदी आणली.पाखऱ्या आता घरीच होता.खोंड असल्याने त्याला शेतीतही वापरता येईना. हळूहळू तो म्हातारा झाला.आबांच्या मुलाने पाखऱ्याला विकायचे ठरवले.आबांना जेव्हा हे समजले तेव्हा खूप वाईट वाटले.त्या दिवशी पाखऱ्याला खुप सजवले शिंगे रंगवली झूल चढवली.पाखऱ्याला गोड धोड घास घालताना आबा म्हणाले "जा बाबा ,तुझा इथला घास आता संपला".आबांनी आवंढा गिळला.तेवढ्याच आबांचे मित्र तेथे आले.त्यांना सर्व हकीकत समजली.त्यांनी पाखऱ्याची किंमत विचारली आणि पाखऱ्याला विकत घेण्याची तयारी दर्शविली.सोबत ते म्हणाले"पाखऱ्यासोबत आबांनाही आमच्याकडे पाठवून द्या ,तेही आता म्हातारे झाले आहेत" हे ऐकून आबांच्या मुलाला आपली चूक उमगली आणि त्याने आबांचे पाय धरले. आम्हांला ही पाखऱ्या गोष्ट होती.कर्नल काका तुम्ही सांगता ती गोष्ट 'दौलत' ही आहे.

In reply to by Bhakti

धड्याचे नाव लक्षात नाही. चौसष्ट साली तिसरीत होता बहुतेक. तेव्हा तिसरीतला मुलगा घडाघडा मराठीचे धडे वाचत असे. हल्ली बहुभाषिक शिक्षणामुळे गोंधळून जात आहेत असे वाटते.(कृपया लगेच धनुष्यबाण,मशाली,तुतारी काढू नका) पण कथानक जसेच्या तसे लक्षात आहे. धन्यवाद.

In reply to by कर्नलतपस्वी

कर्नल साहेबानी सांगितला तो धडा मलाही २००३-२००७ दरम्यान होता, भक्तिताईने सांगितलेला नव्हता! :) म्हणजे धडे काही काळाचा गैप देऊन रिपीट होतात का?

In reply to by Bhakti

छान लेख आणि माहिती. 'लाल चिखल' ,'स्मशानातलं सोनं' हे धडे मात्र कधीच विसरले नाही.काळजाला भिडणारे होते. अगदी !

सौन्दर्य 22/08/2025 - 23:07
माझे संपूर्ण आयुष्य शहरात गेले त्यामुळे पोळा वगैरे सण प्रत्यक्षात कधीही बघायचा योग आला नाही. नाही म्हणायला शाळेत असताना पोळ्यावर एक कविता होती, त्यात पोळ्याचे वर्णन होते जे फारसे आठवत नाही. मात्र त्यातील एक ओळ अगदी चटका लावून गेली होती, "सण एक दिन, बाकी वर्षभर ओझे मर मर ओढायचे " अशी काहीशी ती ओळ होती. अगदी एका ओळीत बैलाचे संपूर्ण आयुष्य समर्पकपणे मांडले आहे. भक्तीजी, (तुमचे नक्की वय ठाऊक नसल्याने ताई म्हणावे की आणखी काही संबोधन वापरावे हे न कळल्यामुळे भक्तीजी म्हणतॊ.) तर, फेसबुकवर एक ग्रुप आहे त्यात बालभारतीच्या पुस्तकातील अनेक धडे, कविता वाचायला मिळतील. मला तुम्ही उल्लेखिलेले 'लाल चिखल, स्मशानातले सोने ' हे धडे पाठयक्रमात असलेले आठवत नाहीत. शक्य असेल तर ते माझ्या व्यनिवर पाठवा. नमस्कार .

छान लेख ! काल आम्ही देखील बैलपोळा साजरा केला. बहुतेक नगरी लोक हा पोळा श्रावण अमावास्येला साजरा करतात. जुंदरी / पुणेरी बहुतेक भाद्रपद अमावास्येला बैलपोळा साजरा करतात (चुकभूल देणे घेणे). आम्ही शहरात राहत असल्यामुळे आमच्या घरी बैल नाही आणि बैलांच्या मातीच्या प्रतिकृती देखील नव्हत्या. बायकोने पुरण पोळ्या केल्या होत्या त्या मला खाऊ घातल्या. तसेही आई मला बायकोचा बैल म्हणत असे त्यामुळे आजचा पोळा सार्थकी लागला. अवांतर : बायको मला आईच्या ताटाखालचं मांजर म्हणत असे पण मांजरांप्रती प्रेम दाखविण्यासाठी कोणताही सण साजरा केला जात नाही ते एक असोच.

In reply to by धर्मराजमुटके

Bhakti 23/08/2025 - 11:24
हो सांगली, कोल्हापूर,कर्नाटक भागात भाद्रपद अमावास्या पोळा 'बेंदूर' सण साजरा करतात. मांजरीचे डोहाळजेवण,बेबी शॉवरचे व्हिडिओ पाहिले आहेत.तेव्हा येतील येतील मांजराचेही दिवस आणि सण यातील यात मला शंका नाही ;)

In reply to by धर्मराजमुटके

रुपी 23/08/2025 - 23:58
हो.‌ मीपण नगरी. दर वर्षी पुरणपोळीचा नैवेद्य असतोच बैलपोळ्याचा. आमच्या शेतातल्या बैलांना काका बैलपोळ्याला छान सजवायचे. माझ्या लहानपणी कर्जतला गावातून सर्व बैलांची मिरवणूक निघायची. आता निघते की नाही, माहीत नाही. वर सौंदर्य यांनी सांगितलेली कविता आमच्या अभ्यासक्रमात नव्हती, पण पाचवीत मराठीच्या बाईंनी सांगितली होती. कालच मुलांना या सगळ्या आठवणी सांगत होते.

In reply to by धर्मराजमुटके

सौन्दर्य 25/08/2025 - 22:42
माझी आई मला 'बायकोच्या पाटाखालचे मांजर' म्हणते तर बायको 'आईच्या ताटाखालचे मांजर' म्हणते. आता 'ताटाखालचे की पाटाखालचे ?' हा स्थूल भेद सोडला तर दोघीत मी 'मांजर' असण्याबद्दल एकमत आहे, त्यामुळे खरंच मांजरीसाठी देखील एक सण असावा. (हलकेच घ्या)

तिता 24/08/2025 - 07:01
आम्ही गावात बेंदूर आणि बैलपोळा एकाच दिवसाला म्हणायचो. हा सण भाद्रपदात असायचा. मला ते जास्त संयुक्तिकही वाटते. श्रावणात शेतकऱ्याला सुट्टी कधी परवडणार?

श्वेता२४ 24/08/2025 - 09:12
पोळ्याला आम्ही लहानपणी हाताने बैल तयार करत असू. या सणाला कडबोळी करण्याची प्रथा होती. गोडामध्ये आजी पुरणाची पोळी किंवा पोळी करण्यासाठी वेळ नसेल तर पुरणाचे कडबू करायची.

अभ्या.. 25/08/2025 - 13:41
वा भक्तीताई छान. मोट्ठी सफर घडवलीत. . फक्त एक जाताजाता: ते पिकासोचे बैलाचे चित्र आहे ते Le Taureau म्हणजे द बुल असे आहे. ते काही इव्हॅलुशन वगैरेचे नाही. इव्हॅलुशन असेल तर ते चित्र लिथोग्राफ पधद्तीने केलेले आहे आहे आणि त्यात बरेच प्रिंटस घेतले जातात. पिकासोने बैलाचे चित्र सिम्प्लीफाय करण्याचा प्रयत्न केलेला होता त्याचे ते टप्पे आहेत. लोकांना पाब्लो पिकासो म्हणजे अमूर्त, दुर्बोध काहीतरी रंगवणारा आर्टिस्ट वाटतो पण त्याने अ‍ॅकेडेमिक पध्दतीने, अ‍ॅनॉटॉमी वगैरे पूर्णपणे समजून चित्रे रंगवली आहेत. बैलाची ही स्केचेस बघताना ते लक्षात येते पण तेच बैलाचे हिंस्त्रपण, पाशवी ताकद आणि पूर्ण नर असे सिम्प्लीफाईड स्केचेस करतानाचे टप्पे आहेत. अ‍ॅक्चुअली बैलाची कशी जीवशास्त्रीय उत्क्रांती होत गेली त्याचे चित्रण नाहिये हे.

In reply to by अभ्या..

Bhakti 26/08/2025 - 13:42
अ‍ॅक्चुअली बैलाची कशी जीवशास्त्रीय उत्क्रांती होत गेली त्याचे चित्रण नाहिये हे.
अर्थात जीवशास्त्रीय उत्क्रांतीचे हे चित्र नाहीच.पण आंतरजालावर चित्राचे evolution of bull असेच नाव दिसले.
बैलाची ही स्केचेस बघताना ते लक्षात येते पण तेच बैलाचे हिंस्त्रपण, पाशवी ताकद आणि पूर्ण नर असे सिम्प्लीफाईड स्केचेस करतानाचे टप्पे आहेत.
+१०० आणि हे "bull's head" पिकासोने ते सायकलच्या सीट आणि हँडलबारवरून हुशारीने एकत्र केले :) पिकासो,विन्सी,क्रिडा,हुसेन,राजा रवी वर्मा,अनुराधा ठाकूर इ.यांची कला पाहायला आवडतो. १

In reply to by Bhakti

मारवा 03/09/2025 - 19:24
तुमच्या आवडीवरून तुम्हाला surrealist चित्रे आवडतील असे वाटते. म्हणून एकदा व्लादिमिर कुश ची चित्रे बघा कल्पनांची अद्भुत भरारी आहे.

आंतरजालावर bull आणि bull with hump शोधा.दोन्ही चित्रे मिळतील .मग समजते कि बैलांच्या उत्क्रांतीमध्ये वातावरणाचा खूप मोठा भाग आहे.

गीतारहस्य प्रकरण ८ -विश्वाची उभारणी व संहारणी

Bhakti ·

उत्तम ! एक शंका : आधी बुद्धी की आधी अहंकार ? माझ्या आकलनानुसार अहंकार हा आधी येत असला पाहिजे आणि मग त्यातून निर्माण होणाऱ्या "मी" ह्या जाणिवेला टिकवून ठेवण्यासाठी बुद्धीचा उगम होत असावा. बुद्धी नसते तेव्हाही अहंकार असतोच ना.

Bhakti 13/08/2025 - 14:48
अहंकार हा बुद्धीचाच एक पोटभेद असल्यामुळे पहिल्यानें बुद्धि झाल्याखेरीज अहंकार उत्पन्न होऊ शकत नाहीं. म्हणून अहंकार हा दुसरा म्हणजे बुद्धीच्या मागाहूनचा गुण आहे असें सांख्यांनी ठरविलें आहे. सात्त्विक, राजस व तामस भेदानें बुद्धीप्रमाणें अहंकारहि अनंत प्रकारचा असतो हैं सांगावयास नको. पुढील गुणहि याचप्रमाणें प्रत्येकीं त्रिघात अनंत आहेत. किंबहुना व्यक्त सृष्टींत प्रत्येक वस्तूचे याचप्रमाणें अनंत सात्त्विक, राजस व तामस भेद होत असतात; व या सिद्धान्तास अनुसरूनच गीतेंत गुणत्रयविभाग व श्रद्धात्रयविभाग सांगितले आहेत (गी. अ. १४ व १७).
बुद्धीपासून पुढे उत्पन्न होणाऱ्या अन् पृथकपणाच्या या गुणासच #अहंकार' म्हणतात. कारण, पृथक् पणा 'मी-तूं' या शब्दांनीच प्रथम व्यक्त करण्यांत येत होता. म्हणजेच अहं-कार-अहं- अहं [मी-मी] करणे होय.
मूळ प्रकृतीत अहंकाराने भिन्न भिन्न पदार्थ बनण्याची शक्ति याप्रमाणे आल्यावर पुढील वाढीच्या दोन शाखा होतात. १ झाडे, मनुष्य वगैरे #सेंद्रिय प्राण्यांची सृष्टि २.#निरिंद्रिय पदार्थांची सृष्टि
ग्रंथात याबाबत सांख्यांचे स्पष्टीकरण सांगितले आहे.वेदांताचा याबाबत संदर्भ या ग्रंथात नाही. तसेच प्रकृतिला किंवा ब्रम्हाला आधी व्यवसायात्मक बुद्धी जी अचेतन आहे ती होऊन विस्तार करावा वाटतो.
अव्यक्त प्रकृतीदेखील स्वतःची साम्यावस्था मोडून पुढें व्यक्त सृष्टि निर्माण करण्याचा निश्चय प्रथम करीत असते निश्चय म्हणजेच व्यवसाय, व तो करणें हैं बुद्धीचे लक्षण आहे. म्हणून प्रकृतींत व्यवसायात्मिक बुद्धि हा गुण प्रथम उत्पन्न होतो, असें सांख्यानीं ठरविलें आहे. सारांश, मनुष्याला ज्याप्रमाणें एखादें कृत्य करण्याची बुद्धि प्रथम होते, त्याचप्रमाणें प्रकृतीलाहि आपला पसारा करण्याची बुद्धि प्रथम व्हावी लागते. निण मनुष्यप्राणी सचेतन असल्यामुळे, म्हणजे त्याच्या ठायीं प्रकृतीच्या बुद्धीशीं सचेतन पुरुषाचा (आत्म्याचा) संयोग झाला असल्यामुळे, मनुष्याला झालेली व्यवसायात्मिक बुद्धि मनुष्याला समजते, आणि प्रकृति स्वतः अचेतन म्हणजे जड असल्यामुळे तिच्या बुद्धीचें तिला स्वतःला ज्ञान नसतें, असा या दोहोंमध्यें मोठा फरक आहे, हा फरक पुरुषाच्या संयोगानें प्रकृतींत उत्पन्न झालेल्या चैतन्यामुळे होत असतो; तो नुसत्या जड प्रकृतीचा गुण नव्हे. मानवी इच्छेच्या तोडीची पण अस्वयंवेद्य शक्ति जड पदार्थांतहि आहे असें मानिल्याखेरीज गुरुत्वाकर्षण किंवा रसायनक्रियेचें व लोहचुंबकाचें आकर्षण व अपसारण, इत्यादि केवळ जड सृष्टींतच आढळून येणाऱ्या आवडीनिवडीची नीट उपपत्ति लागत नाहीं, असें अर्वाचीन आधिभौतिक सृष्टिशास्त्रज्ञहि आतां म्हणू लागले आहेत, हैं लक्षांत आणिलें म्हणजे प्रकृतींत प्रथम बुद्धि हा गुण उत्पन्न होतो, या सांख्याच्या सिद्धान्ताचें आश्चर्य वाटण्याचें कांहीं कारण रहात नाहीं. प्रकृर्तीत प्रथम उत्पन्न होणाऱ्या या गुणास पाहिजे तर अचेतन किंवा अस्वयंवेद्य म्हणजे स्वतःस न कळणारी बुद्धि म्हणा. पण कांहीं म्हटलें तरी मनुष्यास होणारी बुद्धि आणि प्रकृतीस होणारी बुद्धि या दोन्ही मुळांत एकाच वर्गातल्या आहेत हें उघड आहे

गीतारहस्य -प्रकरण८ ( पान क्र. १०२-११८) **विश्वाची उभारणी व संहारणी सांख्याप्रमाणे प्रकृति व पुरुष या स्वतंत्र मूलतत्वांचे स्वरूप म्हणजे प्रकृति पुरुषासमोर आपल्या गुणाचा जो बाजार मांडते त्यास मराठी कवींनी 'संसृतीचा पिंगा' तर ज्ञानेश्वर महाराज यांनी 'प्रकृतीची टांकसाळ 'असे म्हटले आहे. प्रकृतीच्या या व्यापारास समर्थांनी 'विश्वाची उभारणी व संहारणी' हे शब्द घेतले आहेत. भगवद्‌गीतेप्रमाणे प्रकृति आपला संसार चालविण्यास स्वतंत्र नसून ती हे काम परमेश्वराच्या इच्छेने चालवीत असते ,असे म्हटले आहे .( गी. ९.१०) परंतू कपिलांनी प्रकृति स्वतंत्र मानिली आहे.

नाग पंचमी

Bhakti ·

श्वेता२४ 29/07/2025 - 15:06
लेख थोडक्यात आटोपला अजून वाचायला आवडला असता. पुरणाचे दिंड हे प्रकार कधीही घरात झाले नाही. याच धाटणीचा कडबू हा प्रकार केला जायचा. म्हणजे पुरण चपातीच्या लाटीवर ठेवून करंजीसारखा आकार द्यायचा . हे करंजीपेक्षा छोटे कडबू तळायचे व तूपासोबत खायचे. याच काळात घरात होणारा पदार्य़ म्हणजे लाह्याचे पीठ. हे तूप, दूध व गुळाबरोबर मिक्स करुन प्यायचे किंवा त्याचे लाडूही बनत. लहानपणी आवडायचे नाहीत. पण आता हेल्दी रेसिपी म्हणून खूप मिस करते.

नवीन माहीती मिळाली. ते जनुकीय वगैरे समजत नाही. नागपंचमी ही किती पुरातन आहे याची कल्पना आली. दिंड याच्या पाठिमागे चातुर्मासातील नागपंचमीची कहाणी मधे तवा आगीवर ठेवायचा नाही, भाज्या विळीने कापायच्या नाही, लांडोबा पुंडोबा असे बरेच काही आईकडून लहानपणी कळाले होते. गारुडी नाग टोपलीत घेऊन घर घर फिरायचे. मुलाना दहाचा आकडा बघायला मजा यायची. लाह्या दुध पाच पैशे एखादे दिंड असे गारूड्याला मिळायचे. पुंगी पण ऐकायला मिळायची. संध्याकाळ पर्यंत गारूड्याची झोळी भरायची पण नागोबाची वाट लागायची. काहिही म्हणा ,अंधश्रद्धा इ. पण सणावाराची मजा आता नाही. नोकरी,प्रपंच सांभाळून आणी वर हा लेखन प्रपंच केला यासाठी लेखिकेच्या उत्साहाला सॅल्युट व हा उत्साह दिन दुना रात चौगुना होत राहो. लेख आवडला. धन्यवाद.

छान माहिती दिलीत, दिंडे छानच दिसत आहेत. आजी असेपर्यंत ती म्हणायची नागपंचमीला तवा ठेवू नये, म्हणून दिंडे व्हायचे घरात. तेव्हा विशेष आवडीचे नव्हते पण तुमच्या फोटोमुळे आजीच्या हातच्या पुरणाची आठवण आली. नागपंचमीच्या शुभेच्छा!

विवेकपटाईत 30/07/2025 - 09:53
दरवर्षी नागपंचमीच्या दिवशी दिंड आणि वडे हे बनतात. माझी सौ. छत्तीस वर्षांत न चुकता प्रत्येक सणात, सणाचे पदार्थ बनवते. आपले सणवार म्हणजे वेगवेगळ्या पदार्थांची मेजवानी.

सुबोध खरे 30/07/2025 - 10:23
तपशिलात चूक -- साप आणि इतर सरपटणारे प्राणी (काही अपवाद वगळता) पाण्याखाली श्वास घेऊ शकत नाहीत कारण यांच्या माशांसारखे गिल नसून त्यांना श्वसनासाठी फुप्फुसे असतात. एकंदर थंड रक्ताचे प्राणी असल्याने त्यांना श्वसनात ऑक्सिजनची गरज बरीच कमी असते आणि त्यामुळे ते बराच काळ श्वास रोखून धरू शकतात. तसेच काही अपवाद वगळता साप आणि बहुसंख्य सरपटणारे प्राणी जमिनीवरच अंडी घालतात. उदा मगरी, कासवं याचे कारण पक्षी आणि सरपटणारे प्राणी यांचे अंडे हे सच्छिद्र असते आणि त्यातून (अंड्याला) भ्रूणाला विकसित होण्यासाठी लागणारा ऑक्सिजन मिळू शकतो. याउलट माशांची अंडी सच्छिद्र नसली तरी ती गॅस परमीएबल ( म्हणजेच वायू ला आरपार जाण्यास सक्षम) असतात. यामुळं मासे पाण्यात अंडी घालू शकतात.

नाग,साप हे सरपटणाऱ्या प्राण्यांप्रमाणे Reptilia क्लासमध्ये जरी येत असले तरी पाण्यात पोहण्याची,श्वास घेण्याची,पाण्यातही अंडे देण्याची क्षमता amphibians प्रमाणे आहे. उत्क्रांतीमध्ये survival of the fittest असं डार्विनने सांगितले आहेच.पण याबाबत जनुकीय माहिती मिळवणं खुपच रोमांचित असते. या सापाने जगण्याच्या लढाईत काय केले मग?

मराठी गाणे ai चा वापर करून

स्वरुपसुमित ·

युयुत्सु 01/07/2025 - 12:49
आधुनिक भारतीय संगीताचं आता संगणकाशी अविभाज्य नाते निर्माण झाले आहे. आता ए० आय० मुळे नव्या संगीतरचना तयार करता येतात. पण कंप्युटरचा संगीत-कल्पनांच्या निर्मितीसाठी, नव्या चाली बांधण्यासाठी वापर करण्याची कल्पना मी सुमारे ३२ वर्षापूर्वी (बहुदा प्रथमच)मांडली. अर्थातच त्याला प्रचंड विरोध झाला आणि मला माझा प्रकल्प बंद करायला भाग पाडले गेले. भारतात दूसरे काही झाले तरच नवल! आजच्या एल०एल०एम मध्ये जसे पुढे काय येणार याची शक्यता संदर्भानुसार निश्चित करून उत्तर तयार होते, तसाच काहीसा प्रकार संगीत-कल्पनांच्या निर्मितीसाठी मी तेव्हा वापरला होता.

मित्राने , एक नवीन प्रयोगाची सुरुवात करत आहे ai चा वापस करून मराठी गाणे १) इथे माझ्या तू नळी चा दुवा दिला आहे २) ai विडिओ बनवणे वेळ खाऊ आहे ,५ -५ सेक चा विडिओ एकत्र जोडत आहे ,कृपया सकारात्मक सुधारणा सुचवा ३) एका गाण्यासाठी एक वेगळा प्रतिसाद आहे ,तिकडे थोडे थोडे करून गाणे जोडत जाईन