मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चौकशी

भाषिक संपत्ती

मृत्युन्जय ·
भाषिक संपत्ती - लहानपणापासुन आवडता असलेल्या विषयावर लिहायला घ्यावे असा विचार केला त्यावेळेस याहुन जास्त समर्पक शीर्षक नाही सुचले. सध्या शिव्या (किंवा मराठीत ज्याला आपण स्लँग म्हणतो) मर्दानगीचे प्रतिक आहेत असे मौलिक ज्ञान मला नुकतेच मिळाले आहे. त्यामुळे या संपत्तीचे मोलही प्रचंड वाढले आहे. असे म्हणतात की कुठल्याही भाषेवर प्रभुत्व मिळवायचे असेल तर प्रथम त्या भाषेतल्या शिव्या शिकुन घ्याव्यात. आमच्यासाठी ही प्रक्रिया फार लवकर सुरु झाली. मायबोलीतल्या काही "मर्दानी" शब्दांवर आम्ही खुप लवकर प्रभुत्व मिळवले. कोल्हापुरात असताना (माझा लेख सुपरहिट्ट होणार.

तुमचा आवडता भयपट कोणता ?

गणपा ·
लहान असताना जरी मनात भुता खेतांबद्दल खुप भिती होती तर भयपटांबद्दल एक आकर्षण्ही होतं. पहिला भयपट कोणता पाहिला ते आठवत नाही पण मराठितला हा खेळ सावल्यांचा मधेल काही प्रसंग पाहुन टरकलो होतो. येवढा की रात्री दिवे बंद असताना बाथरुम/बेडरुम मध्ये जायला पण टरकत असे. असो तर हळु हळु भयपट पाहाण्यात मी प्रगती केली आणि चक्क पहिलाच इंग्रजी भयपट (चोरुन) पाहिला तो म्हणजे 'दी इव्हील डेड'. बहुतेक तेव्हा ५वी ६वीत होतो. एका मित्राच्या घरी व्हिडियोवर पाहिला होता.

मदत हवी आहे

priya_d ·
नमस्कार! मि मिपावर नवीनच सभासद झाले आहे. येत्या गणेशोत्सवात म्हण्ण्यासाठी (माझ्या ८ वर्षाच्या मुलाला) काही सोपे श्लोक किंवा छोटी गाणी इ. हवे आहे. कोणी मदत करु शकेल का ? लिरिक्स सुध्दा चालेल. प्रिया

मिपाकरांची ओळखपरेड ( नव्या-जुन्या सदस्यांची ओळख ) ...

छोटा डॉन ·
नमस्कार मित्रांनो ( आणि मित्रांच्या मैत्रिणींनो ) ! मिसळपावच्या कट्ट्यावर दिवसेंदिवस नवनविन सदस्यांची भर पडते आहे.सर्व नविन सदस्यांचे मिपा परिवारातर्फे स्वागत ! मिपाचे रुपडे पालटले आहे.

अनुस्वारांचे मिलन

अरुण मनोहर ·
एके काळी शुद्धलेखन फाट्यावर मारले जायचे. आता काळ बदलला असल्यामुळे, अनुस्वारांच्या उपयोगा विषयी माहिती देत आहे. ज्यांना शुद्धलेखनात स्वारस्य आहे आणि अनुस्वाराच्या वापरासाठी प्रश्न पडत असेल, अशांसाठीच हा लेख आहे. अनुस्वाराचा उच्चार न आणि म युक्त होत असतो. अनुस्वाराच्या पुढचे व्यंजन त्या त्या गोत्रातले असेल, तेव्हाच अनुस्वार न देता, त्या पुढच्या सगोत्र व्यंजनाशी अनुस्वाराचे मिलन होऊ शकते. अन्यथा असा विजोड गोत्र विवाह मराठीत मान्य नाही. परंतू माझ्या माहितीनुसार, न आणि म ने सगोत्र विवाह केलाच पाहिजे असे बंधन नाही!