Skip to main content

चौकशी

लैंगिक शिक्षणाचे व्यावहारीक महत्त्व

लेखक शुचि यांनी मंगळवार, 22/01/2013 19:33 या दिवशी प्रकाशित केले.

एक मुद्दा मांडायचा प्रयत्न करते - आम्हाला जेव्हा शाळेत लैंगिक शिक्षण मिळालं तेव्हा फक्त "मासिक धर्म" या विषयावर सांगीतले गेले. अजूनही भारतात तीच स्थिती आहे की आता गुप्तरोग/ एडस आदि रोगांची माहीतीदेखील सांगीतली जाते?
कारण चित्रपट, कादंबर्‍या आदिंमधून सहजीवनाअची एक इमेज निर्माण केली जाते जी अतिशय रोझी असते, खरं तर वास्तवापासून दूर असते. सततच्या भूलभुलैय्याच्या भडीमारामुळे , हार्मोनल बदलांमुळेदेखील मुलामुलींचे मन भरकटू शकते. शाळा/ विद्यालयांमधून वास्तवाची जाण करुन देण्याचे किती प्रयत्न होतात?

भूक

लेखक शुचि यांनी गुरुवार, 27/12/2012 21:17 या दिवशी प्रकाशित केले.

वाढदिवसाला मित्र-मैत्रिणींबरोबर ऐश करुन, पोटाला तडस लागेल इतकं खाऊन, ४-४ सिनेमे पाहून कंटाळा आला आहे. फेसबुकावर वांझोट्या चर्चा करुनदेखील आणि कविता, चित्रे लाईक करुन करुन देखील कंटाळा आल आहे.

बक्कळ फक्त स्वतःपुरता जगून झाले आहे. मागे वळून पहाता फक्त स्वार्थ दिसतो कुरुप हाव दिसते. न संपणारी खरेदी दिसते आणि वखवख दिसते आयुष्यात. उपरती झाली आहे म्हणा ना : (

मुद्द्यावर येते - जर भारतातील एखाद्या संस्थेला मदत करायची असेल तर कशी आणि कोणत्या संस्थेला करावी? भूक हा मुद्दा अथवा अनाथाश्रमास मदत करायची झाल्यास कोणास व कसा संपर्क साधावा?

विशिष्ट अभिजाताच्या मंत्रसमाधीचे प्राक्तन

लेखक शरदिनी यांनी रविवार, 19/08/2012 18:41 या दिवशी प्रकाशित केले.

अनन्यशून्या गरळविशिष्टा
मंतरलेली चरणप्रतिष्ठा
अल्लडढोली धोतरजोडी
चित्तरबद्धा जळमंजिष्ठा

चपळ्शरीरी आटापीटा
अल्फाबीटाग्यामाथीटा
शोधनभंजक वरबालंटा
कुठे कोणासी सचित्रघंटा

अभिजाताची मंत्रसमाधी
थिल्लर घोटा अतिकोलांटी
कांक्षितबुद्धी धरणललाटी
मेंदूक्रांती मेंदूक्रांती

शरदिनी १८ ऑगस्ट २०१२ पुणे

पत्रिका

लेखक सूड यांनी सोमवार, 06/08/2012 00:06 या दिवशी प्रकाशित केले.

दर रविवारप्रमाणे हाही रविवार आला किंवा 'उजाडला' म्हणा. कारण रविवारी उन्हं वर आल्याशिवाय योगेशराव कधी उठल्याचं आठवत नाही असं त्यांच्या सौ. योगिनीबै वेळ मिळेल तेव्हा आणि येईल त्याला, तिला ऐकवत असत. तर, आजच्या रविवारी काहीतरी मस्त मेनू ठरवावा हा विचार करत योगेशराव हॉलमधल्या सोफ्यावर लोळत पडले होते. खरंतर मेनू काय ठरवावा यापेक्षा तो आपल्या अर्धांगिनीला कसा सांगावा याचा विचार अधिक चालला असावा. कारण रविवारचा असा काही प्लान ऐकला की योगिनीबैंचा ठरलेला ट्रॅक होता, तो वाजायला सुरु व्हायचा. म्हणजे,'मी माझा सैंपाक करुन घेते, मग आणा काय हाडं चघळायला आणायची असतील ती !!

दोशी मोहित मर्जर... (भाग १)

लेखक अन्तु बर्वा यांनी मंगळवार, 24/07/2012 22:13 या दिवशी प्रकाशित केले.

"परदेसी परदेसी जाना नही...मुझेऽऽऽ छोडके... मुझे छोडके"

स्वारगेट बस स्ट्यांड्च्या ३ नंबरच्या प्लाट्फार्म वर 'दोशी वडेवाले' या पुण्याच्या दोन नंबरच्या वडापाव सेन्टरच्या मालकाचा; गायधनी दोशीचा नोकिआ १२०० मोबाइल वाजला.

अनोळखी नंबर मोबाईल स्क्रीन वर बघून तो बावचळला. पर्वतीहून तो फोन आला होता.

गायधनी दोशी: "ह्यालो...?"

पलीकडचा आवाज:

"गायधनी, मी मोहित नाइक बोलतोय. एक कर्त्यव्य म्हणुन तुम्हाला कॉल केलाय. उद्या मोहित वडेवाले तुमच्या उपहारग्रूहामधे काम करणार्या सगळ्या पोरांना डबल पगाराची खुल्ली आफर देणार आहे. "

क्लिक! (गायधनीने कॉल कट केला.)

डास व त्याचे चावणे

लेखक भरत कुलकर्णी यांनी रविवार, 10/06/2012 02:06 या दिवशी प्रकाशित केले.

आज या धाग्याच्या निमित्ताने एका सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडत आहे. विषय आहे डास व त्याचे चावणे. हसू नका किंवा धाग्याला नाक देखील मुरडू नका. त्याचप्रमाणे हा धागा एकोळी-बहूओळी, गणपतीला स्वेटर, गुलाबजामाच्या पाकाचे काय करायचे, सोफा, फुडप्रोसेसर कसा घ्यावा असा वर्गीकृत करू नका.

नियती ? नाय नाय टेंपोवरती!

लेखक संजय क्षीरसागर यांनी मंगळवार, 05/06/2012 17:23 या दिवशी प्रकाशित केले.

प्रेरणा : नियती ( https://www.misalpav.com/node/21857)

रक्ताळलेल्या प्रार्थना या अत्यंत प्रभावी कवितेतून इथे पदार्पण करणार्‍या हजाक या कविश्रेष्ठांची ही दुसरी कविता

नक्की कोणत्या त्रासामुळे अशी निर्मिती होते? या प्रश्नाला कविवर्यांनी "भळभळती वेदना कुठल्याही साच्याचा भाग बनु शकत नाही" असं उत्तर दिल्यानं आता वाचकांना अजून कायकाय सहन करावं लागणाराये याचा अंदाज येऊ शकतो.

अशा फाईल्स इथे चिकटविता येतात का ? एक चौकशी

लेखक चौकटराजा यांनी शनिवार, 12/05/2012 18:37 या दिवशी प्रकाशित केले.

मिपावर आपण लेख लिहिताना आपल्याला काही चित्रांची फाईल इथे लिंक देऊन जोडता येते. जालावर मूळ जागी जोपर्यंत ती फाईल आहे तो पावेतो चित्र इथे दृग्गोचर होते. हे आपण सारे जाणतोच. मी इथे नवा असल्यानी एक चौकशी करीत आहे.
आपल्याला इथे विडीओ चिकटवायचा असेल तर आपण इथे लि़क जोडतो. पण युट्यूब सारखे होस्ट असल्याने ते शक्य आहे .पण अ‍ॅनिमिटेड जी आय एफ वा तत्सम फाईल्स इथे जोडावयाच्या असतील. ( समजा दाखविणे शक्य नसेल तर ) तर असे कोणते होस्ट आहेत की जे अशा फाईल्स ला अप्लोड साठी परवानगी देतात. ?