प्राधिकरण कट्टा २९ मे २०१५

लेखनविषय:
लेख लिहायच्या सगळ्यात आधी मुविंचे कट्ट्याच्या आयड्याच्या कल्पनेबद्दल आभार मानतो. कट्ट्याच्या निमित्ताने का होईना मिपामंडळी आपल्या व्यस्त वेळापत्रकामधुन वेळ काढुन आली. हा संपुर्ण वृत्तांत नाही. कारण मी कट्ट्याची सुरुवातीची पंधरा मिनिट आणि शेवटचे दोन-तीन महत्त्वाचे तास नव्हतो. त्यामुळे संपुर्ण वृत्तांताची जबाबदारी नाखु'न'काका आणि वल्ली धरलेणीकर ह्यांच्यावर सोपावण्यात येत आहे. मी हमालीकामामधुन जेमतेम चिंचवडपर्यंत पोचतोय नं पोचतोय तोपर्यंत नाखु'न'काकांचा फोन येउन गेला.

छायाचित्रण स्पर्धा क्र. ९ सावली: निकाल

लेखनविषय:
छायाचित्रण स्पर्धा क्र. ९ सावली: निकाल या स्पर्धेलाही छान प्रतिसाद मिळाला. छायाचित्रे जरा कमी आली पण सगळीच अतिशय सुंदर होती. पहिल्या क्रमांकावर आलेले छायाचित्र वगळता इतर सर्वांनाच फार थोड्या फरकाने गुण मिळालेत.

एक "टवाळ" संध्याकाळ

लेखनविषय:
बर्याचं दिवसांपासुन व्हॉट्स अॅप गृप वरती किमान ३००० वेळा कट्टा करायच्या गोष्टी चाललेल्या होत्या. गेले २-३ आठवडे हो-ना-हो-ना करता करता शेवटी काल मोदक, मी, कपिलमुनी आणि अनाहितांचा लाडोबा असे चार जणांचा कट्टा ठरला. त्याचा एक वृत्तांत लिहायचा एक माफक प्रयत्न. कट्ट्याचं आयोजनं करतानाचं माझ्याकडुन एक मोठी चुक झाली ती म्हणजे वल्लींना फोन करायचा राहुन गेला :( (वल्ली मनापासुन सॉरी!! ). अन्या दातार कोल्हापुरला गेल्यानी आणि गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत.

_सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र (बायकोचं प्रगतीपुस्तकं)

लेखनविषय:
पेर्णास्त्रोतः सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र श्री. सौंदर्य ह्यांची माफी मागुन. (काही तासांपुर्वी 'सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र ' हा लेख वाचला होता. त्या धाग्याचं स्वैर विडंबन म्हणुन आणि बायकोला मार्क्स कसे मिळवावेत ह्याचं मार्गदर्शन म्हणुन हा विडंबनप्रसवप्रपंच) तुम्ही आयुष्यात खुष राहु इच्छिता? हा घ्या एक विडंबन मंत्र. आपापल्या नवर्‍यांना खुश कसे ठेवाल? अगदी सोप्पं आहे. नवर्‍याला खुश ठेवणं हे बटाट्याची सुकी भाजी करण्यापेक्षा सोप्पं आहे. कसं?????? सांगतो. १. नवर्‍याला आवडणार्‍या गोष्टी करा.

छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ८ निकाल.

लेखनविषय:
लेखनप्रकार
राम राम मंडळी, 'चतुष्पाद प्राणी' छायाचित्रण स्पर्धा आठला नेहमीप्रमाणेच चांगला आणि भरभरुन असा प्रतिसाद मिळाला अनेक सदस्यांनी एकापेक्षा एक सरस अशी छायाचित्र स्पर्धेत टाकली. सदस्यांनी केलेले मतदान आणि त्यातल्या निवडीच्या पद्धतीत पहिल्या पसंतीला तीन गुण, दुसर्‍या पसंतीस दोन गुण, आणि तिसर्‍या पसंतीला एक गुण अशा पद्धतीने यावेळी छायाचित्र निवडली त्यातून अनुक्रमे विजेते खालील प्रमाणे ठरले. तिसर्‍या पसंतीत काटेकी टक्कर Mrunalini आणि खान्देशी यांच्यात झाली अवघ्या दोन गुणांचा फरक राहीला होता. सर्व सहभागी सदस्य, विजेत्या स्पर्धकांबरोबर मृनालीनीचं अभिनंदन.

छायाचित्रणकला: स्पर्धा क्र.७: निकाल

लेखनविषय:
लेखनप्रकार
http://www.misalpav.com/node/30186 या सातव्या स्पर्धेलाही अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. अनेक सदस्यांनी आपली उत्तमोत्तम छायाचित्रे सादर केली. सदस्यांनी दिलेल्या गुणांनुसार पुढीलप्रमाणे पहिले ३ विजेते ठरले आहेत.

भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार घोषित

लेखनविषय:
लेखनप्रकार
आताच नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याची बातमी जाहीर झाली आहे . नेमाडे यांचा तिरस्कार करणार पब्लिक बख्खळ आहे . एके काळी आम्ही नेमाडे वाचतो हे सांगणे अभिमानाचे लक्षण होते . आता हिंदू एक समृद्ध अडगळ नंतर नेमाडे कसे outdated झाले आहेत हे अह्महिकेनॆ सांगण्याची स्पर्धा चालू आहे . कोसलाशिवाय नेमाडे मला अजून एका गोष्टीमुळे आवडतात . त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होत , " भारतीय समाज हा समजा एक चादर आहे असे आपण गृहीत धरूया . समजा हि चादर आपण झटकली तर यातून काय पडेल ?

मी,मिपा आणी कोकणी धसका...

लेखनविषय:
लेखनप्रकार
(सुचना - सदरिल लेखातील घटना दिं.११/०२/२०१४ रोजी घडलेली आहे. हा लेखही त्याच सुमारास लिहीला होता.

छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. ४: उत्सव प्रकाशाचा: निकाल

लेखनविषय:
http://www.misalpav.com/node/29297 छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. ४: उत्सव प्रकाशाचा *** नमस्कार मंडळी! चौथ्या स्पर्धेचा निकाल तुमच्याहाती देताना अतिशय आनंद होत आहे. या वेळी स्पर्धेची तसेच मतदानाची मुदत जास्त ठेवली होती. अपेक्षेप्रमाणे स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला, तसेच सर्व सदस्यांनी उत्साहाने मतदानही केले. काही अपरिहार्य कारणामुळे निकाल प्रत्यक्ष घोषित करायला जरा उशीर होत आहे. तरी क्षमस्व! सर्व स्पर्धक तसेच विजेत्यांचे अभिनंदन! पुढची स्पर्धा पाठोपाठ घोषित करत आहोत. विषयाबद्दल तसेच नियम बदलण्याबद्दल काही सूचना असतील तर जरूर कळवा. विजेते छायाचित्र क्र.

नवराष्ट्र "पीपल्स रीपब्लीक ऑफ पुणे " चे राष्ट्रगीत

पीपल्स रीपब्लीक ऑफ पुणे या राष्ट्राचे राष्ट्र गीत कोणते असावे असे तुम्हाला वाटते? आमची कुठेही शाखा नाही. या इथे अन फक्त इथेच आहे सर्व काही आमची कुठेच शाखा नाही. !! धृ !! जे का हिंडले बिंडले पत्ता शोधण्यात गुंगले ते उलटे जावोनी गंडले या इथे अन फक्त इथेच आहे सर्व काही आमची कुठेही शाखा नाही सुजला सुफला मुळा मुठा अन दुथडी भरी नागझरी. सर्वांचे चितळे पोटभरी सदाशिव नारायण साहित्य मांसाहारी उण्या दुण्या चे काम नसे हे पुण्या गुण्याचे नाव असे हे. या इथे अन फक्त इथेच आहे सर्व काही आमची कुठेही शाखा नाही. जय हे जय हे जय जय हे....... जय.पुणे......
Subscribe to अभिनंदन