मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

छायाचित्रण स्पर्धा क्र. ९ सावली: निकाल

संपादक मंडळ · · जनातलं, मनातलं
छायाचित्रण स्पर्धा क्र. ९ सावली: निकाल या स्पर्धेलाही छान प्रतिसाद मिळाला. छायाचित्रे जरा कमी आली पण सगळीच अतिशय सुंदर होती. पहिल्या क्रमांकावर आलेले छायाचित्र वगळता इतर सर्वांनाच फार थोड्या फरकाने गुण मिळालेत. १) मिनियन . . savali . . २) Anandphadke . . छाया-प्रकाश ३) मार्मिक गोडसे . . 1 सर्वच छायाचित्रे जवळपास तितकीच चांगली असल्याने कोणाचा खास उल्लेख करत नाही. या स्पर्धेत भाग घेणार्‍या सर्व स्पर्धक आणि मतदारांना खूप धन्यवाद! विजेत्यांचे खास अभिनंदन!! यापुढील १० वी स्पर्धा श्री. जयंत कुलकर्णी आयोजित करतील.

वाचने 8789 वाचनखूण प्रतिक्रिया 31

स्पा Tue, 05/05/2015 - 15:12
सर्व विजेत्यांचे अभिनंदन तिसर्या क्रमांकाचे चित्र टायमिंग च्या बाबतीत कमालच आहे, पण त्यात सावली हायलाईट होत नाहीये. अर्थात हे माझे वयक्तिक मत आहे

In reply to by स्पा

मार्मिक गोडसे Tue, 05/05/2015 - 16:43
धन्यवाद. पण त्यात सावली हायलाईट होत नाहीये अगदी बरोबर. अस्थीर सावली टिपण्याच्या नादात सुप व शेंगदाणा समुहाच्या खालच्या भागाने रिफ्लेक्टरचे काम करून अर्धीअधिक सावली गिळंकृत करून टाकली.

श्रीरंग_जोशी Tue, 05/05/2015 - 18:31
सर्व विजेत्यांचे अभिनंदन. या निमित्ताने एक विनंती - स्पर्धेच्या यापुढील भागांमध्ये जरा सोपे विषय ठेवले जावेत. विषय सोपे असले की सहभाग अधिक वाढतो. गेले काही भाग पाहता विषय क्लिष्ट ठेवण्याकढे कल वाढतोय असे माझे निरिक्षण आहे.