दिल्लीची कैरोच्या दिशेने वाटचाल?
अलीकडे पैसे खाऊन ते पैसे स्विस आणि इतर बँकांत ठेवलेल्या पैशांचा हिशेब करताना त्यात इतकी शून्ये असतात कीं दोन्ही हाताचीच काय पण सोबत दोन्ही पायाची बोटे सुद्धा पुरत नाहींत! आताशी तर हे चोरलेले पैसे शून्ये न वापरता 10^6, 10^8, 10^10 असे लिहायची गरज भासू लागली आहे. लहानपणी शिकलेले (पण कधीही न वापरलेले) अब्ज, खर्व, निखर्व, पद्म, महापद्म, शंख, महाशंख, परार्ध असले एकक (units) नव्याने वापरावे लागत आहेत. अगदी अलीकडचे गुंडांनी वापरलेले "पेटी", खोका" हे शब्दही अपुरे पडत आहेत.