बावळे बुडाले धामी

Primary tabs

शरदिनी's picture
शरदिनी in जे न देखे रवी...
31 Jul 2011 - 2:01 pm

बावळे बुडाले धामी

//एक //

धडक उजागर पत्र अर्पणी
गर्भवतीचे प्राक्तन चरणी
माजघरातील संथ कीर्तनी
हंबरले बावळेच सदनी

//दोन//

सप्त चरदरी भर्जर घाता
चंदनरजनी विशिल्पवस्त्रा
सर्जनशोधा मोडीत काढा
त्रिकोणमुक्रर मृदंगढोला

//तीन//

भंगअपेक्षा भाळशेंदरी
उपेक्षितांची उकल हावरी
गोंदणनक्षी पत्तनसाक्षी
निर्मितक्रीडा घायलवक्षी

कोडीकलेजी प्रयासबोटा
फसगत निबिडा हिरवीपर्वा
अन्वयव्यर्था कशास शोधा
कविताजखमी अलभ्यबाधा

//चार//

स्वीकृततारण पिंजणपाशी
आकंठलसलस निर्मितदेशी
अवतरणातून आत्ममैथुनी
भोगभोगितो अनुभवकवनी

बावळे बुडाले धामी

शरदिनी ३१ जुलै २०११ पुणे

शृंगारभयानकनृत्य

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

31 Jul 2011 - 2:03 pm | बिपिन कार्यकर्ते

प्रतिक्रिया येतीलच... आमची ही नुसतीच पोच!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Jul 2011 - 2:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भंगअपेक्षा भाळशेंदरी
उपेक्षितांची उकल हावरी
गोंदणनक्षी पत्तनसाक्षी
निर्मितक्रीडा घायलवक्षी

या ओळी वाचून डोळ्यात पाणी आले.
बाकी, काव्याचे जाणकार रसग्रहण करतीलच.

-दिलीप बिरुटे

प्रास's picture

31 Jul 2011 - 2:37 pm | प्रास

साष्टांग ___/\___ स्विकारावा....

मी_ओंकार's picture

1 Aug 2011 - 12:41 am | मी_ओंकार

एकदम शीघ्र काव्य.

चहा पिताना हा लेख वाचला तेव्हा त्यातला जो शब्द वाचून मिसळपाव आठवले तो शब्द अखेरच्या कडव्यात पाहून डोळे पाणावले.

बादवे तुम्ही केव्हा वाचलात?

- ओंकार.

राजेश घासकडवी's picture

6 Aug 2011 - 8:02 am | राजेश घासकडवी

_/\_

अशीच इतर कवितांचीही उकल करावी अशी शरदिनींच्या चरणी नम्र विनंती.

विनायक प्रभू's picture

31 Jul 2011 - 4:19 pm | विनायक प्रभू

ह्या कवितेतील व्यक्ती आणि प्रसंग कोणते?

वसईचे किल्लेदार's picture

31 Jul 2011 - 5:01 pm | वसईचे किल्लेदार

डोळे पाणावले ... आतापर्यन्त मी स्वताला (ऊगाचच) आपला तो हा समजत होतो ... काव्याचा जाणकार हो

चतुरंग's picture

31 Jul 2011 - 7:56 pm | चतुरंग

गटारीने शरदिनीचाही घात केला तर! ;)

-रंगशरद

भडकमकर मास्तर's picture

1 Aug 2011 - 1:18 pm | भडकमकर मास्तर

ही चंदफुलांची नक्षी

वक्षी उजागरघात ग्रेस.

गर्भवान, मनाच्या माजघरातच या काव्य उदयाच्या प्राक्तन ;.... हंबरतो :........ कावळे उडाले स्वामी.

. कारण धुके पडलेल्या चांदणरात्री जंगलाच्या मधोमध असलेल्या पटांगणात असावे एखादे विवस्त्र शिल्प,खोल उरातले सगळे सगळे विवस्त्र होत फक्त आपल्या भर्जरी शब्दांच्या अन् प्रतिमांच्या सातपदरी मखमली पडद्याचे अडसर मध्ये घालतो.
सर्जनाचे सर्ग, आत्मशोधाचे अध्याय किंवा निमिर्तीव्यवस्थेचे नादव्यूह ग्रेसच्या शब्दाआड, त्या सातपदरी मखमली पडद्याआड

. आत्मशोधाचे अध्याय, सर्जनाचे सर्ग आणि निमिर्तीव्यवस्थेचे नादव्यूह अर्थनिश्चिती संस्कृतीच्या अस्तित्वाच्याच घटना होतात. प्रातिभ आकलनाची आणि संभवाची कथानके होतात. सर्जनशोधाचे मैलाचे दगड होतात.
, ग्रेस भाषा आकांतबावरा सृजनपवित्रा' किंवा 'आकांतविभोर सृजनपेच' बेचैनीची अस्वस्थता कपाळशूळ मुक्रर त्रिकोणातला मृदंगतोल.'

सर्जनाने सर्जनाशी केलेल्या संवादाचे साक्षीदार कोडी सोडवणे
ग्रेसच्या 'कावळे उडाले स्वामी'मधल्या ललितलेखांमध्ये अंगभर बिंदी, मेखला लावण्यवतीच्या वक्षावरील गोंदणे अन् नक्षी तसेच रेतीतील पाऊलखुणांसारखे. निमिर्तीप्रक्रियेशी केलेली क्रीडा उपोद्घातही नव्हेत आणि उपसंहारही

काळिजकोडी ग्रेसचे बोट प्रयासहीनिबिडात शिरलेला हिरवा अंधारही ., फसगत

' निमिर्तीच्या अनुभूतींचा मूलाकार पिंजणीच्या पाशात पिंजणीतून ढगपिंजणीसारख्या प्रतिमांचे मायावी गुंजन

' निर्माणाच्या सुखदु:खाचे पेच निमिर्तीप्रक्रियेसंबंधीच्या सलसत तारणस्वीकार पेच प्रदेशातल्या अनुभूतींचा मूलाकार. पिंजण . त्या लसलसणाऱ्या जीवनानुभवांची गद्यसदृश, पण निखळ गद्य नसलेली मनस्वी पुनर्मांडणीच उपभोक्ता या प्रक्रियेचा, या आत्ममैथुनाचे... आणि आत्ममैथुन म्हणजे काही स्वमैथुन नव्हे. भोगायची असते ग्रेसची कविता.

सौंदर्यानुभवाचे अवतरण?

कावळे उडाले स्वामी

परिकथेतील राजकुमार's picture

1 Aug 2011 - 1:26 pm | परिकथेतील राजकुमार

आ हा हा हा

निशब्द....

शरदिनी अग पुण्यात आल्यावर भेटणार होतीस ना? काय झाले त्याचे ?

श्रावण मोडक's picture

1 Aug 2011 - 1:41 pm | श्रावण मोडक

हाहाहाहा... आजूबाजूला पाहून घे अशी चौकशी करण्यापूर्वी. ;)

चतुरंग's picture

1 Aug 2011 - 9:12 pm | चतुरंग

अहो श्रामो, आजूबाजूला पाहून शेवटी त्याने चौकशी केली असणार आहे! होय की नै रे परा? ;)

-दाये बाये रंगा

विजुभाऊ's picture

1 Aug 2011 - 1:32 pm | विजुभाऊ

ग्रेस........ची ग्रेस आठवली.
हम्म.कालेज्यात आस्ताना आपल्या ग्रेस कळ्तोय असे भासवायला मज्जा यैची.
आता ग्रेस कळ्ळा असे कोणी म्हणाला की त्याची दया येते.

रमताराम's picture

1 Aug 2011 - 9:07 pm | रमताराम

हम्म.कालेज्यात आस्ताना आपल्या ग्रेस कळ्तोय असे भासवायला मज्जा यैची.
अच्छा, म्हणजे ही सवय तेव्हापासून आहे तर. ;)

आता ग्रेस कळ्ळा असे कोणी म्हणाला की त्याची दया येते.
तुम्हाला समजला नसेल पण इतर कोणाला खरंच कळलाही असेल अशी शक्यता नाही का?
आम्हाला ग्रेसच्या कविता समजल्या नाहीत (त्या फक्त हृदयनाथांना समजतात म्हणे, किंवा जिवंत असती तर एमिली डिकिन्सनला समजल्या असत्या कदाचित) पण त्याच्या ललित लिखाणातील काही विचारांना आमचा सलाम आहे. जमल्यास त्याचे प्राजक्तावरचे (प्राजक्त वृक्ष, नाहीतर कोण प्राजक्ता असे विचाराल), थॉर्न बर्ड वरचे मुक्तक वाचून पहा. (इच्छा असल्यास).

शरदिनी जी,

कविता अगदी मनात घर करुन गेली, ही तुमची पहिली कविता आहे जी मला समजली ( करण तुम्ही दिलेली लिंक)
लिंक मधील सर्व गद्य वाचुन पुन्हा कविता वाचली खुपच छान वाटले

धडक उजागर पत्र अर्पणी
गर्भवतीचे प्राक्तन चरणी

काय सुंदर अर्थ आहे या ओळीत , खुप आवडले.

असेच लिहित रहा (अर्थासहित)... वाचत आहे.

अभिजीत राजवाडे's picture

6 Aug 2011 - 5:22 am | अभिजीत राजवाडे

मधमाशीच्या पोळ्यात हात घालुन मध प्यायची काय मजा असते ते आज कळले.
हाताच्या अंतरावर तोडता येण्यासारखी बरीच फळे असतात. पण मधाची गोडी काही औरच..

खुप खुप आभार.

पिवळा डांबिस's picture

6 Aug 2011 - 11:57 am | पिवळा डांबिस

याखेपेस तूच एक विडंबन केल्याने तुझ्या कवितेचे (त्यात' नृत्य' आणि 'भयानक शृंगार' असल्याने) आणखी विंडंबन करत नाही यात खैर समज शरदिने!!!!
-खडसावू पिडांकाका
(बाकी तू मूळ कविता करण्यापेक्षा विडंबनंच पाडत जा ना!!! चार फुटकळ अनिवासी विड्म्बनकर्ते तरी बेकार होतील!!!! हा हा हा!!!!)
:)

राजेश घासकडवी's picture

7 Aug 2011 - 10:46 am | राजेश घासकडवी

याखेपेस तूच एक विडंबन केल्याने

विडंबन या शब्दाला तांत्रिक आक्षेप. मूळ लेख ही कविता नव्हती.
याखेपेस या शब्दाला तात्विक आक्षेप. आधीच्या कविता या विडंबनं नव्हती असं गृहित धरणं बरोबर नाही.
(दोन्ही आक्षेपातून 'मी तसं म्हटलंच नव्हतं' असा पळपुटेपणा करण्याची तुम्ही सोय करून ठेवली आहे म्हणा)

चार फुटकळ अनिवासी विड्म्बनकर्ते तरी बेकार होतील!!!!

यावर व्यावसायिक आक्षेप. जागतिक आर्थिक परिस्थिती खालावली आहे. अमेरिकेचं तर क्रेडिट रेटिंग गडगडायला लागलं आहे. अशा परिस्थितीत सॉफ्टवेअर जॉब्स तर आउटसोर्स होतातच. तुम्ही वर विडंबनही आउटसोर्स करायला सांगत आहात. हे वागणं बरं नव्हं..
फुटकळ या शब्दाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष.

पिवळा डांबिस's picture

8 Aug 2011 - 9:32 pm | पिवळा डांबिस

सॉफ्टवेअर जॉब्स तर आउटसोर्स होतातच. तुम्ही वर विडंबनही आउटसोर्स करायला सांगत आहात. हे वागणं बरं नव्हं..
फुटकळ अनिवासी विडंबनकारांची युनियन आमच्या घरावर मोर्चा आणणारसं दिसतंय!!!!
(पांड्या, जरा माझी गन घेऊन ये रे!!!!)
:)

सांजसंध्या's picture

27 Mar 2012 - 10:32 am | सांजसंध्या

शब्दकळांचं सौंदर्य जाणवलं. मात्र ग्रेस वाचताना कविता कळाली नाही तरी एक शब्दात न सांगता येणारी अनुभूति मिळते ती इथं नाही जाणवली. कदाचित माझ्या अज्ञानाचा परिणाम असावा..