Skip to main content

वीररस

प्रार्थना प्रिमियर लीग विजयाची

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 01/09/2014 14:10 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा एकवार, मॅन्चेस्टर युनायटेड फॅन या नात्याने गणपती बाप्पाकडे प्रार्थना करतोय, ही ईपीएल जिंकण्यासाठी. गणपती बाप्पा काय काय सांगू आलोय आम्ही मागायला ते ते सगळं, जे जे लागतं, प्रिमियर लीग मारायला ||धॄ|| कोच आहे विद्वान खरा आहे जरा निराळी त-हा मात्र सगळ्या प्लेयर्सना शिकवा त्याचं ऐकायला ||१|| संघ टाकतोय कात जरी नेहमीचीच ही बात जरी नव्या जुन्याची सांगड तेवढी मदत करा घालायला ||२|| बुद्धी पास द्यायला आणि ताकद किक मारायला जोर थोडा पायांमध्ये बॉक्स टू बॉक्स धावायला ||३|| संघ जरासा गळपटलाय विश्वास थोडा डळमळलाय एकच तगडा विजय हवाय ती आग पुन्हा लागायला ||४|| हार जीत होतेच नेहमी जाणतो जरी सारे आ
काव्यरस

एकलव्य..

लेखक vaibhav deshmukh यांनी गुरुवार, 26/06/2014 10:35 या दिवशी प्रकाशित केले.
एकलव्य.... कित्येक शतके उलटली युगांतरे झाली सत्तांतर घडले मी माञ स्थिर आहे त्याच सहानुभूतींच्या बंदिस्त नजरेत.. कोणी नाकारले म्हणूनच शांत निश्चिल मूर्तीच्या साक्षीनेच मी लक्ष्यावर असंख्य बाण सोडले मी धर्नुधर झालो रक्ताळलेल्या चार बोटांचा श्रेष्ठ शिष्यही झालो तेव्हाच; त्या हाताकडे पाहताना दु: खाचा लवलेशही नव्हता मुद्रेवर पण; मी डगमगलो ढासळलो तुमच्या अनुत्तरीत प्रश्नात? तुमच्या सहानुभूतीच्या नजरात? तुमच्या पाणावलेल्या इतिहासात? तुमच्या या पराजित युगात...!

श्रद्धा म्हणजे...

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 21/06/2014 19:23 या दिवशी प्रकाशित केले.
श्रद्धा म्हणजे आधी असतो कल्पनांचा भास श्रद्धा म्हणजे नंतर होतो त्यां'चाच पहिला श्वास श्रद्धा म्हणजे आधी असतो जाणिवांचा खेळ श्रद्धा म्हणजे नंतर होतो फुकट जाणारा वेळ श्रद्धा म्हणजे कुणा तोंडी दो वक्ताची रोटी श्रद्धा म्हणजे काही तोंडी सहज पडलेली बोटी! श्रद्धा म्हणजे काहिंसाठी pre plan जुगारी अड्डा श्रद्धा म्हणजे कुणासाठी स्वत:च पडायचा खड्डा श्रद्धा म्हणजे कुणी करतात ठरवून मोठ्ठी होळी श्रद्धा म्हणजे कुणी मारतात ठरवून छुपी अरोळी श्रद्धा म्हणजे भोळं भाबडं बिन रंगाचं कापड श्रद्धा म्हणजे उघड्या डोळ्यांना बंन्द करणारी झापड श्रद्धा म्हणजे मी(ही) म्हणतो क्रुतीवरचा विश्वास क्रुतीच करणे हा श्रद्धेच
काव्यरस

सेहेवागी पोवाडा

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 30/05/2014 23:42 या दिवशी प्रकाशित केले.
जय हो..
जय हो..

जय हो..

(गद्य).......वीर..वीर.. धुरंधर ...हणामाssर सम्राssट...क्रीकेट मैदान मुलुख तोफ...चालत्या/हलत्या/बोलत्या बॉलरांचा कर्दनकाळ...असा तो कधि कधि काळ सोडणारा..परी खेळला की आग ओकणारा...तेंडुलकरी कारकिर्दीतही आपली अन्---त्याची(ही) छाप सोडणारा... वीरु विरेंद्र अमरेंद्र..धुंव्वाधांर..सरदार..सेहेवाग!!! ऐकू या त्या...चा जय जय कार जी..जी..जी...!
काव्यरस

माझं मत कुणाला.....

लेखक निलरंजन यांनी मंगळवार, 08/04/2014 23:43 या दिवशी प्रकाशित केले.
माझं मत त्याला रे ज्याने ईकास केला त्याला नाही ज्याने मला नुस्ताच झुलविला त्याला नाही ज्याने मला नुस्ता रडविला माझं मत त्याला रे ज्यानं मला घडविला माझ मत त्याला रे जो शोभलं त्या पदाला सगळीकडे त्याच्या नावाचा डंका मी पिटविला माझं मत त्याला रे माझं मत त्याला.... विडंबन: माझ आभाळ तुला घे(टिंग्या)

सूर्य थकला आहे

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 25/03/2014 11:26 या दिवशी प्रकाशित केले.

सूर्य थकला आहे


पहाट जरा चेतलेली पण;
सूर्य थकला आहे
नितळण्याच्या बुरख्याखाली
विस्तव निजला आहे
सारं काही सामसूम, मात्र;
एक काजवा जागत आहे
चंद्रकलेच्या गर्भाराला
भिक्षा मागत आहे

वादळं वारं सुटलंय पण;
वीज रुसली आहे
बुद्धिबळांच्या शय्येखाली
ऐरण भिजली आहे
शिवशिवणारे स्पंदन काही
उधाण मोजत आहे
चिवचिवणार्‍या चिमणीमध्ये
दीक्षा शोधत आहे

अंगरख्याची सनदी गुंफण
टरटर उसवत जावी
अपहाराची दुर्धर खाई

निवडणूका जवळ आल्या सारखे वाटतंय

लेखक निलरंजन यांनी रविवार, 02/03/2014 17:16 या दिवशी प्रकाशित केले.
निवडणूका जवळ आल्यासारखे वाटतंय गरीबांची कणव करणारे गल्लोगल्लीत जमलेयं कैवारी जो तो जनतेचा बनू पाहतोय पोटात एक ओठात एक अन मनात काही वेगळच साचलयं पोस्टर फलक बोर्ड नाक्यानाक्यावर लागलेत इच्छुक आणि समर्थक आता आपले घोडे दामटू लागलेत निवडून येण्याची स्वप्न आता घडोघडी पडू लागल्यात जिकण्यासाठीचा हिशेब जे ते ठेवू लागलेत उमेदवारीच्या खेळात आता वजन आपले लावू लागलेत हा आपला हा परका डाव पुन्हा नव्याने मांडू लागलेत आपआपला सवतासुभा मतदार आपले राखू लागलेत मिटींगा मेऴावे भाषण सभा चौकाचौकात घडू लागलेत म्हणूनच म्हणतो निवडणूका जवळ येऊ लागल्यात
काव्यरस

नाटकी बोलतात साले!

लेखक गंगाधर मुटे यांनी गुरुवार, 25/04/2013 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
नाटकी बोलतात साले!

कोणीतरी यांची आता, पडजीभ उपटली पाहिजे
नाटकी बोलतात साले, की गरिबी हटली पाहिजे

भुकेचा प्रश्न सुटणारा नाही, तुझ्या भाषणाने, पण;
तू वाचाळ नाहीस अशी, खात्री तर पटली पाहिजे!

राजसत्ताच कोपली बघ, तुझ्या श्रमाच्या कमाईवर
तुझी शक्ती मनगटात तू, पूर्ण एकवटली पाहिजे

रावणांच्या राज्यात पुन्हा, सीता एकाकी पडलीय
भूमीच्या मुक्तीसाठी, तुझी काया झटली पाहिजे

देच तुतारी फुंकून तू, इथेच, याच स्थळी, अशी की;

त्यांचाच जीव घे तू ..

लेखक गंगाधर मुटे यांनी रविवार, 21/04/2013 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
त्यांचाच जीव घे तू ..... हा लावतो पुढारी घामास भाव सस्ता म्हणुनी यमास झाला गिळण्यास गाव सस्ता मातीत राबताना इतके कळून आले फुकटात ठोस जखमा!