मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अश्रू

शरदिनी ·

नितिन थत्ते 31/08/2009 - 21:52
मला मूळ कविता सावनकुमार टाक यांची असावी असे वाटले होते. (आठवा: शायद मेरी शादीका खयाल...) :) ह. घ्या. असो. जोक्स अपार्ट; कविता छान आहे. नितिन थत्ते (पूर्वीचा खराटा)

In reply to by नितिन थत्ते

सुबक ठेंगणी 01/09/2009 - 17:53
मूळ परदेशी आहे असं कुठेही वाटलं नाही एवढं सही जमलंय! (बघा नां...'शायद मेरी शादी का खयाल' च आठवलं. तसं म्हटलं तर दु:खाला भाषा, देश, संस्कृती ह्यांची बंधनं असतात कुठे?

शरदिनी, कविता आवडलीच. यावेळी समजेल अशी वाटली (अर्थात मला समजलेला अर्थ बरोबर आहे का हे माहित नाही). शेवटच्या कडव्या पर्यंत कळत नव्हते की कशाबद्दल आहे ही कविता. पण शेवटचे कडवे हलवून गेले. अनंत काळापासून मुलींचे मनोगत असावे असे वाटून गेले पटकन, शहारलो.... ग्रेट!!! बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

शरदिनी ताईची कविता म्हणुन खु उत्साहाने वाचली कविता कळत आहे असे उगाचच वाटते... बिका तुम्हाला शेवटच्या कडव्या बद्दल काय वाटले ते सांगता का???रसग्रहण टाका ना. निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

चतुरंग 01/09/2009 - 04:54
सुंदर कविता. आधीच्या कडव्यांमधून लोकांच्या बडा घर पोकळ वासा ह्याचा उल्लेख येत असतानाच कविता नक्की कशा शेवटाकडे नेते आहे हे समजत नाही आणि एकदम शेवटच्या कडव्यातल्या कलाटणीने सुरी फिरली! एकीकडे समाजाचे मानसिक अपंगत्व आणी एकीकडे हिचे शारीरिक लुळेपण! दुखलं मनात. चतुरंग

विजुभाऊ 01/09/2009 - 09:38
अरे बापरे शरदिनीतैंची कविता प्रथमच पटक्कन कळाली. मला वाटले की माझेच काहितरी चुकतय पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

अनिल हटेला 01/09/2009 - 17:13
शरदिनी ताईची कविता म्हणजे अर्थातच वाचली.. कळाली नाही असं वाटतये... कुणी तरी रसग्रहण टाका राव...:-( बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)

ऋषिकेश 01/09/2009 - 22:30
कविता आवडली. ऋषिकेश ------------------ रात्रीचे १० वाजून २७ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "अजूनी चालतोच वाट...."

लेखनविषय:
काव्यरस
माझ्या लग्नाच विचार कदाचित त्यांच्या मनात घोळत असेल म्हणून त्यांनी त्याला बोलावलंय गप्पा मारायला आमच्याकडे गप्पा अशाच गमतीच्या धंद्यात काही पुढेमागे होतंय मिशा पिळत बोलायचं नफा तोटा चालायचाच. उमराव, सरदार घराणी कशी संपत चाललीएत आणि ते तेज उरलेलं नाहीये थोडंसुद्धा- असलं काहीबाही होणार अजून काही गप्पा मग मुख्य मुद्द्यावर त्यांची काळजी अजीजी आणि क्वचित वादावादी मग चहात बुडालेल्या मिशा वाळवत अंगणात बसायचं सार्‍यांनी निर्णयाच्या प्रतीक्षेत चेहरा आक्रसून अणि मी त्या वसंतातल्या चमकदार दिवशीसुद्धा खिडकीत बसून माझ्या निस्तेज शरीराला फुटलेल्या त्या निर्जीव पायाकडे पाहत अश्रू ढाळायचे ---

.. जगण्यात काय आहे?

राघव ·

मदनबाण 31/08/2009 - 18:22
दिसला नाही मार्ग तरी चालावे लागणारच आहे सोडवं सोडवं म्हंटले तरी जगावे लागणारच आहे. मदनबाण..... Stride 2009 :--- http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html

क्रान्ति 31/08/2009 - 21:35
पडत्या घरास माझ्या सोडून मीच जातो.. अवशेष दावणार्‍या दगडांत काय आहे? __/\__ क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी

दुष्काळ, कर्ज यात बुडालेले शेतकरी असोत का नर्मदातीरी भंगलेली घरटी असोत.. दु:ख शेवटी काळीज पिळवटणारेच असते.. नाहीच आस जेथे जगण्यात काय आहे? आयुष्य ठेवलेल्या सरणात काय आहे? दिसतात येथ सारे मिठ्ठास बोलणारे.. स्वार्थात रंगलेल्या शब्दांत काय आहे? आता नको पुन्हा ती आश्वासने, दिलासे.. बोलावयास सारे.. पोटात काय आहे? तू सांग देवराया आता कसा जगू मी.. काळीज फाटलेले.. ठिगळात काय आहे? देऊ कसा भरवसा कोमेजल्या मनाला.. तुटतात जेथ नाती मैत्रात काय आहे? असतो असाच थोडा पाऊस सांडलेला.. भेगाळल्या धरेला पुरणार काय आहे? पडत्या घरास माझ्या सोडून मीच जातो.. अवशेष दावणार्‍या दगडांत काय आहे? (विषण्ण) राघव

..मोक्ष..

कानडाऊ योगेशु ·

मीनल 27/08/2009 - 19:07
विषय खूप वेगळा आहे. एका विधवे चे वर्णन आहे. बाह्य आहे ----उदा: एकटी,बांधलेले केस, मोकळ कपाळ, भरेलेले डोळे, उदास चेहरा. पण त्याच बरोबर तीच्या मानातील अवस्था ही प्रतित होते आहे. ती दु:खी ,निराश आहे हे प्रत्येक ओळीतून दिसते आहे. नुसतीच वर्णनात्मक कविता नाही. त्या उदास,एकाकी जिवनातून तीला पुन्हा नव्याने उभ करण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा नविन आयुष्य सुरू करणे तिला कसे सहजी शक्य आहे याची तिला जाणिव दिली जात आहे.उदा:भाळावरील तुझ्या मोहक ती बट अजुनि आहे तैसीच,अजुनि आहेस तु लावण्यखाणी. ती जाणिव तिचा मृत पतीच देत आहे मृत... कारण ---`कसा मंद राहु मी तारकांत दूर?` आणि ` इतस्तत: विखुरलो मी गंगेत ऐसा` . प्रियकर नाही तर पती.. कारण --`हो सुवासिनी पुन्हा तू` म्हणजे ती पूर्वी सुवासिनी होती पण आता नाही. त्याच्या मृत्युमुळे ती कायम अशी राहू नये यासाठी प्रामाणिक,सच्चा प्रयत्न आहे. तिच्या दु:खा मुळे तो मृत पती हे दु:खी आहे ---`तुझे दु:ख मजलाही होई अनावर,अश्रु मी ढाळतो रोज पहाटे पहाटे` त्या मुळे त्याचा जीव मृत्यु नंतरही तिच्यातच अडकलेला आहे.त्याला मोक्ष मिळालेला नाही. आणि ती जो पर्यंत पुन्हा दुस-याबरोबर नवीन आयुष्य सुरू करणार नाही तो पर्यंत ते शक्य नाही हे त्यातून दिसत आहे. शिवाय कवितेचे शिर्षक आणि `कदाचित तिथेच मग, मला मिळेल मोक्ष..` यातून ही कळते आहे. एकमेकांवरच्या आत्यंतिक प्रेमाची प्रचिती या कवितेतून प्रतित होत आहे. आणि म्हणूनच तो सांगतो आहे --`काढुन टाक आता तू मनातुनि मज--` आणि `नको होऊस माझ्या आठवणीत चूर` अस केल तरच ती नविन आयुष्य सूरू करू शकेल याची त्याला खात्री आहे.तिने त्याला विसरून जावे हीच त्याची इच्छा आहे. कविता शब्दालंकारने सजलेली किंवा रूपकांनी जड झालेली नाही म्हणूनच ती त्यातील नायिकेसारखी साधी आहे. समजायलाही सोपी आहे.पण खूप खूप काही सांगून जाणारी आहे. तांत्रिक दृष्ट्या अजून बरेच बदल ,सुधारणा आहेत.मी ते सांगण्याइतका माझा अभ्यास नाही. कविता आवडली. मीनल.

प्राजु 27/08/2009 - 19:20
खूपच सुंदर! विषय अतिशय वेगळा आहे. खूप आवडली कविता. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विषय वेगळा आहे, पण थेट हृदयाला भिडणारा. विधवेचं वर्णन आणि तिला पुन्हा सुवासिनी व्हायला सांगणं खूपच आकर्षकपणे मांडलंय. तुम्हाला एवढाच अर्थ अभिप्रेत आहे की आणखीही काही सांगायचंय हे माहित नाही. पण विधवा हे आयुष्यातल्या वादळात खचलेल्या व्यक्तीसाठी रूपक आहे असं मानलं, तरी कविता अर्थपूर्ण होते. हेच या कवितेचं शक्तीस्थान आहे असं मला वाटतं. तांत्रिक गोष्टींबद्दल बोलायचं तर मात्रांमध्ये गडबड आहे, पण ठीक आहे. कविता वाचताना विशिष्ट शब्दांवर वजन देणं, शब्द/शब्दसमूह आवश्यक तेव्हा रिपीट करणं, इत्यादिंच्या सहाय्याने मात्रांची घडी बसवता येतेच. शिवाय, कवितेचा भाव खूप महत्त्वाचा आहे. आणि तो इतक्या प्रभावीपणे या कवितेत उतरला आहे, की तांत्रिक बाबी गौण वाटू लागतात. आपला, (रसिक) प्रशांत --------- एक मी आभाळ आहे ठेविले पंखांत माझ्या, सांगते मज हे न क्षितिज न बिंदु तुझिया थांबण्याचा

इतक्या उत्साहवर्धक अभिप्रायांबद्दल सर्वांचेच आभार. मीनल आणि प्रशांत - तुमच्या विश्लेषणामुळे कवितेच्या पुनःप्रत्ययाचा आनंद घेता आला.! (आनंदित) योगेशु

..मोक्ष.. ------------------------------------- फुले वेचिली देवपूजेस जी तू तुझ्या कुंतलात जरा माळ काही नवा अर्थ दे तु बहरण्यास माझ्या कुणी देव काही म्हणणार नाही नको एकटी तु राहुस ऐसे नको होऊस माझ्या आठवणीत चूर तिथे तेज माझे वातीसम फडफडे कसा मंद राहु मी तारकांत दूर? भाळावरील तुझ्या मोहक ती बट अजुनि आहे तैसीच पण भासे उदास पुन्हा उमलु दे गालावरी खळ्या गं पुन्हा मुक्त उधळु दे मनी वसंतास जरा न्याय अप्सरे,दे तू तुझ्या यौवनाला दिसे मज सारे दुरुनि नभात अजुनि आहेस तु लावण्यखाणी स्वत:ला पाहा तु पुन्हा आरशात जरा मोकळे केस सोडुन..गं..तु सुकेशा होऊनि अल्लड ये पुन्हा अंगणात तिथे मी कधीचा बरसतोय इतु

मन काहूर...

प्राजु ·

अवलिया 26/08/2009 - 22:44
नटलेली निशा पण मन हे काहूर उदासच वाटे आज पावरीचा सूर खोल अंतरात जसा अडकला स्पंद गळा दाटलेला तरी फ़ुटेना का बांध??
+१ मस्त :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by अवलिया

मदनबाण 26/08/2009 - 22:46
मस्त... :) मदनबाण..... Stride 2009 :--- http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html

In reply to by दिपाली पाटिल

मस्त... काळ्याकादवरची चांदण्याची नक्षीची कल्पना भावली.. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

मन 26/08/2009 - 22:46
...इवल्याशा घरट्यात इवलासा श्वास चोचीतल्या दाण्यालाही कोटराचा ध्यास या सरर्वाधिक आवडलेल्या ओळि. आपलाच, मनोबा

शैलेन्द्र 26/08/2009 - 23:21
"नटलेली निशा पण मन हे काहूर उदासच वाटे आज पावरीचा सूर खोल अंतरात जसा अडकला स्पंद गळा दाटलेला तरी फ़ुटेना का बांध??" वा.. सुंदर..

In reply to by बिपिन कार्यकर्ते

चतुरंग 27/08/2009 - 01:29
मस्त कल्पना आहे! :) अतिशय चित्रदर्शी कविता आवडली. (प्राजू, तुझ्या पूर्वीच्या काही कवितातल्या प्रतिमांचा तोचतोचपणा जाऊन कविता आता एका वेगळ्या उंचीवर जाऊ लागली आहे असे वाटते.) चतुरंग

रेवती 27/08/2009 - 01:28
एक चांगली कविता वाचल्याचा आनंद मिळाला. शेवटचे कडवे जास्त आवडले. रेवती

In reply to by रेवती

शाल्मली 27/08/2009 - 15:32
एक चांगली कविता वाचल्याचा आनंद मिळाला.
असंच म्हणते. खूप छान कविता. पहिलं आणि शेवटचं कडवं खूप आवडले. --शाल्मली.

ज्ञानेश... 27/08/2009 - 15:26
प्राजुताईंची मला आजपर्यंतची सर्वाधिक आवडलेली कविता. क्षितिजास पहुडली कंटाळली वीज जळताना दिन सारा साचली काजळी सोनसळी आसमंत झाला गं सावळा दूर दाट सावलीने थरारली फ़ांदी काळ्या कागदास नक्षी चांदण्याची सजे गळा दाटलेला तरी फ़ुटेना का बांध?? अगदी मनाला भिडणार्‍या ओळी. "Great Power Comes With Great Responsibilities"

लिखाळ 27/08/2009 - 16:23
वा ! कविता आवडली. क्षितिजास पहुडली कंटाळली वीज रेखले या काजळास अवनीच्या डोळा काळ्या कागदास नक्षी चांदण्याची सजे या कल्पना फार छान वाटल्या. चोचीतल्या दाण्यालाही कोटराचा ध्यास हे तितकेसे आवडले नाही. चेतनगुणोक्ती जरा जास्तच होते आहे असे वाटले :) आणि ते तर्काला धरूनही वाटले नाही. असो. -- लिखाळ. चालतं एकवेळ चालते पण चाल मात्र चालत नाही ;)

दत्ता काळे 27/08/2009 - 16:50
तळपता रवी थकलेला संध्याकाळी जळताना दिन सारा साचली काजळी रेखले या काजळास अवनीच्या डोळा सोनसळी आसमंत झाला गं सावळा . . हे कडवं तर फार आवडलं

काहूरले मन सांजवेळ होता होता हूरहूर लागे जीवा रात गूढ होता क्षितिजास पहुडली कंटाळली वीज डोळ्यातून परतूनी गेली आज नीज तळपता रवी थकलेला संध्याकाळी जळताना दिन सारा साचली काजळी रेखले या काजळास अवनीच्या डोळा सोनसळी आसमंत झाला गं सावळा सावळ्या नभाची चढे चांदव्याला धुंदी दूर दाट सावलीने थरारली फ़ांदी इवल्याशा घरट्यात इवलासा श्वास चोचीतल्या दाण्यालाही कोटराचा ध्यास दूरदूर डोंगराचे शिखरही नीजे काळ्या कागदास नक्षी चांदण्याची सजे काळोखाचा आवाजही किर्रर्र दाटे असा रात्रीवर उमटतो खोल खोल ठसा नटलेली निशा पण मन हे काहूर उदासच वाटे आज पावरीचा सूर खोल अंतरात जसा अडकला स्पंद गळा दाटलेला तरी फ़ुटेना का बांध??

र्निमाल्यातिल दोन फुले--

पुष्कराज ·

प्रमोद देव 26/08/2009 - 17:24
मस्त! कविता वास्तववादी आहे. माझे जीवनगाणे,व्यथा असो आनंद असू दे...... गात पुढे मज जाणे

छान कविता. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

क्रान्ति 26/08/2009 - 19:02
पाहिलास का व्रुद्धाश्रम तो मालवणारे दिवे इथे प्रकाशवाटा ज्यांनी आखल्या त्या वाटांचा अंत तिथे कमालीची वास्तवदर्शी कविता! क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी

प्राजु 26/08/2009 - 19:17
प्रकाशवाटा ज्यांनी आखल्या त्या वाटांचा अंत तिथे खूपच सुंदर!! खूप आवडली कविता. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

अवलिया 26/08/2009 - 22:29
खूप खूप सुरेख आहे कविता.. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

हर्षद आनंदी 26/08/2009 - 23:54
कविततेतील निर्माल्य आणि आई-वडील, नातेवाईक यांचा संदर्भ जरा समजावुन सांगा, पहिल्या कडव्याचा बाकीच्या कडव्यांशी संबंध आहे असे वाटत नाही. माझ्या अल्पमतीप्रमाणे : निर्माल्य आणि कचरा यात मुलभुत फरक आहे. देव्हार्‍यात केरसुणी कोणी चालवित नाही आणि देवाला वाहिलेल्या फुलांचे निर्माल्य होते. निर्माल्य वाहत्या पाण्यात सोडुन दिले जाते किंवा मातीत जिरवुन उत्तम खत तयार केले जाते, पण पायाखाली तुडवले जात नाही. झाडावर राहिली म्हणुन फुले चिरायु होत नाहीत, दुसर्‍या दीवशी ती कोमेजतातच!! हा निसर्ग नियम आहे. फुले कोमेजतात, म्हणुन देवाला ताजी फुले वाहिली जातात. त्यामुळे फुलांना वाईट वाटण्याचे कारण काय? पाहिलास का व्रुद्धाश्रम तो, मालवणारे दिवे इथे प्रकाशवाटा ज्यांनी आखल्या, त्या वाटांचा अंत तिथे ह्याच्याशी सहमत, निव्वळ परस्परातील हेवेदावे आणि सो कॉल्ड पुढारलेपणा जोपासण्यासाठी हा अत्यंत जीवघेणा प्रकार ज्यांच्या कडुन केला जातो त्यांना भर चौकात नागवं करुन चाबकाने फोडले पाहीजे.

सहज ऐकले बोलत होती र्निमाल्यातिल दोन फुले कालच आपण फुललो होतो कसे विसरले लोक खुळे जाउ दे रे सोडून दे तू काय मनाला घेसी लावून काय आपुले ह्यांचे नाते जिथे सख्यांची नाही आठवण सखे- संगती सोडून दे तू आइ-बापही आडचण होती नीच इतका झाला माणूस स्वार्थास्तव रे शिवतो नाती पाहिलास का व्रुद्धाश्रम तो मालवणारे दिवे इथे प्रकाशवाटा ज्यांनी आखल्या त्या वाटांचा अंत तिथे

चांदण्यातले जेवण

नाना बेरके ·

प्राजु 25/08/2009 - 19:46
अखंड रस्सा -भात खाता आवांतराचे अजिर्ण झाले कधीतरी मग मेतकूट भाता डिलीटण्याचे पथ्य आले.. कविता आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

श्रावण मोडक 31/08/2009 - 11:37
अखंड रस्सा -भात खाता आवांतराचे अजिर्ण झाले कधीतरी मग मेतकूट भाता डिलीटण्याचे पथ्य आले.. नाना, तुमच्या भावना ठीके, पण प्राजु यांनी लिहिलेलं खरं आहे हो. आता हे केलं कुणी आणि भोग कोणाचे वगैरे म्हणण्यात अर्थ नसतो हेही खरेच...

अवांतराला ख.फ.मध्ये मानाचे स्थान मिळाले वाटवेगळ्या सदस्याला स्वैंपाकघरात पान मिळाले (तरीही जेवण जात नाही सदस्य जातो अवघडून) अळणी खाणे जमत नाही कुचंबणा होते फार रस्सा इथला गोड वाटतो भाकरही लागते गार गार कसे जमायचे जेवण इथले फार मोठा प्रॉब्लेम झाला चवीने खाण्याच्या लालसेला मर्यादेचा लगाम लागला तोच भात, तोच रस्सा वाटे खावा सगळ्यांबरोबर चांदण्यांमध्ये घ्यावे जेवण द्यावे प्रतिसादाचे ढेकर

ये र बालां

ब्रिटिश ·

:( कविता आवडली. शेवटच्या दोन ओळी हलवून गेल्या. उगाच वाचली कविता असं वाटलं, म्हणूनच ग्रेट कविता. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

चित्रा 24/08/2009 - 21:52
> उगाच वाचली कविता असं वाटलं, म्हणूनच ग्रेट कविता. असेच म्हणते.

टुकुल 24/08/2009 - 21:39
काय लिहु कळत नाही आहे.. छान पण म्हणता येत नाही .. पण मन हालवुन टाकल --टुकुल

चतुरंग 24/08/2009 - 21:54
गेलेल्या बाळासाठी आहे त्यामुळे जास्त त्रास देऊन गेली कविता. (आत्ता पावसानं लावलेली ओढही शेतकर्‍यांना अशीच पिळवटून टाकत असेल असं वाटून गेलं..) (रिता)चतुरंग

पाषाणभेद 25/08/2009 - 04:39
मन हेलावले. रस्त्याने चालतांना नेहमी उजव्या बाजूने चालावे, त्यामुळे समोरच्या (वाहना)शी होणारी धडक टळू शकते. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

ऋषिकेश 25/08/2009 - 09:17
वेदनादायी कविता. रितेपणाला अधोरेखीत करणारी :( ऋषिकेश ------------------ सकाळचे ९ वाजून १६ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "एक झोकाऽ एक झोका.. चुके काळजाचा ठोका...."

सुनील 25/08/2009 - 11:15
नेहेमीप्रमाणे काहीतरी खुशखुशीत, विनोदी वाचायला मिळणार ह्या अपेक्षेने धागा उघडला.... एकदम कलाटणी देणारा शेवट. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मदनबाण 25/08/2009 - 22:22
:( मदनबाण..... Stride 2009 :--- http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html

आता तुज्यासाटी बग घोडा घोडा झालू गवत खात खात बग तूज्याकड आलू ऊडी मारुन राजा माज्या पाटीवर बस कती येल नूसतच ऊबं राहु आसं माकरावानी बग आता खाजवीतो कूस फुटू देना आता तूज्या गालावर हस काला काला कावला न पीवली पीवली फुलं तुज्यासाटी नाचतान मोराची पावलं आय तूजी वाट बगी डोलं सूकवून तूच कूट गेला बग आमाला टाकून ये रं बाला कल आली कालजामदूनं बग तरी माज्याकड आभालातूनं बग तरी माज्याकड आभालातूनं

पसाभरं

शैलेन्द्र ·

प्राजु 22/08/2009 - 18:50
कविता खूप सुरेख आहे. सुटता वारा भुरभुर माती, आसवांनी का भिजेल शेती? घाम गाळण्या त्राण राहुदे, इतके तरि दे दान पसाभर.. सुरेख!! आटली विहीर पान्हा तळ्भर, कसे पाजावे तान्हे वावरं? कल्पना खूप सुंदर!! (कसे पाजावे तान्हे वावर.. मध्ये एक मात्रा जास्त होते आहे.) (कातर, पाचर, सर.. यातल्या र वर अनुस्वाराची गरज नाही.) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

श्रावण मोडक 22/08/2009 - 19:15
सहमत. फक्त एकच गोष्ट - पहिल्या द्विपदीतील '..रिमझीम सर' काही या कवितेच्या बाकी वजनात न बसणारी आहे. शुष्क नभ, खंडीत धरणी, भेगा, आटलेली विहिर वगैरेमध्ये रिमझिम कुठली? रिमझिम आली काय, गेली काय कळणार नाही. तुमच्या या वर्णनात लागतो तो भिजपाऊस. तोच पाहिजे इथे. कसा ते मात्र मला सांगता येणार नाही. पण तुम्ही जरूर विचार करा. वजन टिकेल.

In reply to by प्राजु

घाटावरचे भट 22/08/2009 - 20:04
'कसे पाजावे तान्हे वावर' ऐवजी 'कसे भिजावे तान्हे वावर' चालू शकेल. अर्थाला फार धक्का लागत नाही. बाकी कविता उत्तम.

क्रान्ति 22/08/2009 - 21:28
सुटता वारा भुरभुर माती, आसवांनी का भिजेल शेती? घाम गाळण्या त्राण राहुदे, इतके तरि दे दान पसाभर.. सुरेख! क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी

पक्या 22/08/2009 - 21:56
सुरेख कविता. सुटता वारा भुरभुर माती, आसवांनी का भिजेल शेती? घाम गाळण्या त्राण राहुदे, इतके तरि दे दान पसाभर.. ह्या ओळी तर खासच.

मदनबाण 23/08/2009 - 21:03
सुटता वारा भुरभुर माती, आसवांनी का भिजेल शेती? घाम गाळण्या त्राण राहुदे, इतके तरि दे दान पसाभर.. सुरेख... ही ओळ वाचुन निळु भाऊंचा हा चेहरा नजरे समोर आला :-- http://www.marathimovieworld.com/preview/goshta-choti-dongraevadhi.php http://www.marathimovieworld.com/moviestills/gosht-choti-dongara-evadhi.php मदनबाण..... चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतीहो. :) http://www.youtube.com/watch?v=z3z6limgwMo

राघव 25/08/2009 - 10:40
अतिशय सुंदर! वेदना कशी लिहावी याचे सुंदर उदाहरण आहे तुमची कविता! प्राजु-श्रावणदांशी सहमत.. पण त्या फार छोट्या जागा आहेत.. तुमच्या कवितेतून जे पोचावयास हवे, ते अगदी सहज पोचतंय! पु.ले.शु. राघव ( आधीचे नाव - मुमुक्षु ) कुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी.. सदियो रहा है दुश्मन दौर-ए-जमान हमारा!

शुष्क नभातुन टाहो कातर, खंडीत धरणी भेगा पाचर, पिवळ्या सुकत्या गवतावरती, पुन्हा पाडं रे रिमझीमती सर.. मान झुकवुनी गुरे चालती, हलवीत हुंगित लाळ गाळती, खपाटलेल्या पोटी त्यांच्या, पडेल कैसा दाणा कणभर? भेगांमधुनी ऊसळे अंकुर, परि कोवळे का क्षणभंगुर, आटली विहीर पान्हा तळ्भर, कसे पाजावे तान्हं वावर? सुटता वारा भुरभुर माती, आसवांनी का भिजेल शेती? घाम गाळण्या त्राण राहुदे, इतके तरि दे दान पसाभर..

सहज चाळले..

प्राजु ·

मदनबाण 18/08/2009 - 09:11
किती राहिले अवती भवती तुझ्या तरीही आतुर मन हे तुझ्याच एका नजरे करता मस्तच... मदनबाण..... चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतीहो. :) http://www.youtube.com/watch?v=z3z6limgwMo

आशिष सुर्वे 18/08/2009 - 09:16
सुंदर काव्य प्राजु ताई! - कोकणी फणस ''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!'' ''Me and my girlfriend broke off over religious differences. She thought she was God and I didn't...''

दशानन 18/08/2009 - 09:25
खुप सुंदर... कविता... प्राजु ! मस्त ! डोळ्यांमध्ये दाटुन आली किती आसवे दिले टाळूनी मीही त्यांना हसता हसता निशब्द ! *** तुझ सम नाही दुसरा ध्वज तुझ सम नाही दुसरा देश तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !

राघव 18/08/2009 - 10:40
भावना खूप संयत शब्दांत, छान व्यक्त केल्या आहेस. :) संपूर्ण कविता आवडली. एकही दुसर्‍याहुन उणे कडवे नाही! अधुन मधुन मी आठवणींच्या गावी जाते मन हे वेडे रुसून बसते मागे फिरता हे वाचून मी माझा मधली एक चारोळी आठवली - आठवणींच्या गावी, मी मनाला कधी पाठवत नाही. जाताना ते खूश असतं, येताना त्याला येववत नाही! राघव ( आधीचे नाव - मुमुक्षु ) कुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी.. सदियो रहा है दुश्मन दौर-ए-जमान हमारा!

अ-मोल 18/08/2009 - 11:25
"स्वप्नं नको मज!" ..म्हणून रात्री मी जागवल्या भास तुझे ना कधीच आले मला टाळता किती पसारा करून जाती आठवणी या धांदल माझी अशीच होते तो आवरता विशेष आवडले!

मिसळभोक्ता 18/08/2009 - 11:55
मी चुकून "सहज चळले" असे वाचले, म्हटले काय तरी इण्टरेष्टिंग आहे.. पण कविता निघाली. -- मिसळभोक्ता

अधुन मधुन मी आठवणींच्या गावी जाते मन हे वेडे रुसून बसते मागे फिरता
कविता सुंदर. या ओळी खूपच आवडल्या. बिपिन कार्यकर्ते

शाल्मली 18/08/2009 - 13:36
खास कविता!
"स्वप्नं नको मज!" ..म्हणून रात्री मी जागवल्या भास तुझे ना कधीच आले मला टाळता अधुन मधुन मी आठवणींच्या गावी जाते मन हे वेडे रुसून बसते मागे फिरता
फारच सुंदर! --शाल्मली.

ऋषिकेश 18/08/2009 - 13:42
डोळ्यांमध्ये दाटुन आली किती आसवे दिले टाळूनी मीही त्यांना हसता हसता
प्रत्येक ओळ मस्त वरील ओळी जास्त आवडल्या. मस्त! ऋषिकेश ------------------ दुपारचे १ वाजून ४० मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "हे भलते अवघड असते.. "

ज्ञानेश... 18/08/2009 - 13:43
प्राजुताई, एकदम मस्त कविता! माझा दुसरा प्रतिसादही नक्की वाचा- http://www.misalpav.com/node/8995 "Great Power Comes With Great Responsibilities"

क्रान्ति 18/08/2009 - 14:55
अधुन मधुन मी आठवणींच्या गावी जाते मन हे वेडे रुसून बसते मागे फिरता किती पसारा करून जाती आठवणी या धांदल माझी अशीच होते तो आवरता वा! कमालीची अभिव्यक्ती! क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी

लिखाळ 18/08/2009 - 16:57
जनांत नाही डोळा कधीही आणले पाणी मनांस झाल्या कितीक जखमा उठता बसता
कविता आवडली. हे कडवे एकदम छान :) -- लिखाळ. दहशतवाद-भौगोलिक-जैविक असे आपत्तीचे प्रकार बदलतात पण सरकारची निष्क्रियता, भोंगळपणा बदलत नाही.

अनामिक 18/08/2009 - 17:20
व्वा! खूप सुंदर कविता... किती पसारा करून जाती आठवणी या धांदल माझी अशीच होते तो आवरता ह्या ओळी तर खूपच आवडल्या. -अनामिक

जगायला शिकायला लावणार्‍या ओळी विशेष आवडल्या. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

मस्त कविता. एक सुचवावसं वाटतं "जनांत नाही डोळा कधीही आणले पाणी" मध्ये मात्रांची थोडी गडबड होतेय. ती सुधारता आली तर आणखी मजा येईल. :) आपला, (मिपाकर) प्रशांत

In reply to by प्रशांत उदय मनोहर

प्राजु 18/08/2009 - 21:29
२ मात्रा जास्ती होताहेत. करते दुरुस्त. धन्यवाद प्रशांत. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

अविनाश ओगले 19/08/2009 - 20:59
"स्वप्नं नको मज!" ..म्हणून रात्री मी जागवल्या भास तुझे ना कधीच आले मला टाळता मस्त! ================================ "जनांत नाही डोळा कधीही आणले पाणी" मध्ये मात्रांची थोडी गडबड होतेय. ती सुधारता आली तर आणखी मजा येईल. == २ मात्रा जास्ती होताहेत. करते दुरुस्त. == हे गणित कळले नाही.

सहज चाळले आठवणींना जाता जाता क्षणांत सार्‍या भरून आल्या बघता बघता किती राहिले अवती भवती तुझ्या तरीही आतुर मन हे तुझ्याच एका नजरे करता "स्वप्नं नको मज!" ..म्हणून रात्री मी जागवल्या भास तुझे ना कधीच आले मला टाळता जनांत नाही डोळा कधी आणले पाणी मनांस झाल्या कितीक जखमा उठता बसता स्पर्श तुझा तो जपून होता असा ठेवला वादळ उठले उरांत माझ्या तो आठवता डोळ्यांमध्ये दाटुन आली किती आसवे दिले टाळूनी मीही त्यांना हसता हसता अधुन मधुन मी आठवणींच्या गावी जाते मन हे वेडे रुसून बसते मागे फिरता किती पसारा करून जाती आठवणी या धांदल माझी अशीच होते तो आवरता - प्राजु

स्वातंत्र्यदिन (?) चिरायु होवो ......!

विशाल कुलकर्णी ·

सागर 17/08/2009 - 10:20
विशालभाऊ, शब्दच नाहीत. थेट मनाला भिडले शब्द. मला पण असे म्हणावेसे वाटते की ... " आईच्यान सांगतु...., या राजकारणी षंढांना सर्वात शेवटी जेवायला दिले पाहिजे." तरच आपल्या देशातील गरिबी नाहिशी होईन. हि स्वातंत्र्याची विदारक सत्याची बाजू असली तरी मोगलांच्या १,००० वर्षांच्या अत्याचारांपेक्षा आणि इंग्रजांच्या अत्याचारांपेक्षा नक्कीच बरी आहे असे म्हणता येईल. किमान आज आपल्या स्वतंत्र देशात गरिबांसाठी हजारो हात एकत्र येऊन काम करत आहेत. मोगली आणि इंग्रजी राजवटीत किमान आपले घर सुरक्षित राहिले तरी मोठी गोष्ट मानली जायची . असो... मिळालेल्या स्वातंत्र्याचा आनंद तर साजरा करायलाच हवा. पण देशाचा स्वातंत्र्यदिवस खर्‍या अर्थाने तेव्हाच साजरा होईन जेव्हा स्वस्त अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मूलभूत गरजा प्रत्येक भारतवासीयाला उपलब्ध होतील. जयहिंद (देशप्रेमी) सागर

आशिष सुर्वे 17/08/2009 - 11:07
जनमल्यापासुन बगतुया, हितं रामाचा वनवासच सपत न्हाय! शब्द मनाला भिडले विशाल भाऊ! - कोकणी फणस Me and my girlfriend broke off over religious differences. She thought she was God and I didn't...

In reply to by आशिष सुर्वे

मदनबाण 17/08/2009 - 11:10
असेच म्हणतो. चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतीहो. :) http://www.youtube.com/watch?v=z3z6limgwMo

क्रान्ति 18/08/2009 - 14:40
केलं स्वातंत्र्यदिनाच्या या वर्णनानं. नाण्याच्या या बाजू नेहमीच दुर्लक्षिल्या जातात. त्यांच्यावर प्रकाश पाडून खूप मोठं काम केलंय. क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी

पंधरा ऑगस्टच्या रात्री जेवल्यानंतर शतपावलीसाठी म्हणुन मी व आमचे गृहमंत्री बाहेर पडलो. खारघरच्या शिल्पचौकात एका फुटपाथच्या कडेला झोपलेला दहा-बारा वर्षाचा एक मुलगा दिसला. स्वातंत्रदिनानिमीत्त कुठल्याशा पक्षानं लावलेला कापडी फलक त्याने खाली अंथरला होता, त्याचाच अर्धा भाग अंगावर घेवुन ते लेकरु गाढ झोपलं होतं. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ६० वर्षे उलटुन गेल्यानंतरदेखील जर आपल्या देशात ५०% च्यावर लोकांची ही अवस्था असेल, तर खरोखर आपल्याला स्वातंत्र मिळालं आहे असं म्हणता येइल का?