मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

करुण

अश्रू

शरदिनी ·
लेखनविषय:
काव्यरस
माझ्या लग्नाच विचार कदाचित त्यांच्या मनात घोळत असेल म्हणून त्यांनी त्याला बोलावलंय गप्पा मारायला आमच्याकडे गप्पा अशाच गमतीच्या धंद्यात काही पुढेमागे होतंय मिशा पिळत बोलायचं नफा तोटा चालायचाच. उमराव, सरदार घराणी कशी संपत चाललीएत आणि ते तेज उरलेलं नाहीये थोडंसुद्धा- असलं काहीबाही होणार अजून काही गप्पा मग मुख्य मुद्द्यावर त्यांची काळजी अजीजी आणि क्वचित वादावादी मग चहात बुडालेल्या मिशा वाळवत अंगणात बसायचं सार्‍यांनी निर्णयाच्या प्रतीक्षेत चेहरा आक्रसून अणि मी त्या वसंतातल्या चमकदार दिवशीसुद्धा खिडकीत बसून माझ्या निस्तेज शरीराला फुटलेल्या त्या निर्जीव पायाकडे पाहत अश्रू ढाळायचे ---

.. जगण्यात काय आहे?

राघव ·
काव्यरस
दुष्काळ, कर्ज यात बुडालेले शेतकरी असोत का नर्मदातीरी भंगलेली घरटी असोत.. दु:ख शेवटी काळीज पिळवटणारेच असते.. नाहीच आस जेथे जगण्यात काय आहे? आयुष्य ठेवलेल्या सरणात काय आहे? दिसतात येथ सारे मिठ्ठास बोलणारे.. स्वार्थात रंगलेल्या शब्दांत काय आहे? आता नको पुन्हा ती आश्वासने, दिलासे.. बोलावयास सारे.. पोटात काय आहे? तू सांग देवराया आता कसा जगू मी.. काळीज फाटलेले.. ठिगळात काय आहे? देऊ कसा भरवसा कोमेजल्या मनाला.. तुटतात जेथ नाती मैत्रात काय आहे? असतो असाच थोडा पाऊस सांडलेला.. भेगाळल्या धरेला पुरणार काय आहे? पडत्या घरास माझ्या सोडून मीच जातो.. अवशेष दावणार्‍या दगडांत काय आहे? (विषण्ण) राघव

..मोक्ष..

कानडाऊ योगेशु ·
लेखनविषय:
काव्यरस
..मोक्ष.. ------------------------------------- फुले वेचिली देवपूजेस जी तू तुझ्या कुंतलात जरा माळ काही नवा अर्थ दे तु बहरण्यास माझ्या कुणी देव काही म्हणणार नाही नको एकटी तु राहुस ऐसे नको होऊस माझ्या आठवणीत चूर तिथे तेज माझे वातीसम फडफडे कसा मंद राहु मी तारकांत दूर? भाळावरील तुझ्या मोहक ती बट अजुनि आहे तैसीच पण भासे उदास पुन्हा उमलु दे गालावरी खळ्या गं पुन्हा मुक्त उधळु दे मनी वसंतास जरा न्याय अप्सरे,दे तू तुझ्या यौवनाला दिसे मज सारे दुरुनि नभात अजुनि आहेस तु लावण्यखाणी स्वत:ला पाहा तु पुन्हा आरशात जरा मोकळे केस सोडुन..गं..तु सुकेशा होऊनि अल्लड ये पुन्हा अंगणात तिथे मी कधीचा बरसतोय इतु

मन काहूर...

प्राजु ·
लेखनविषय:
काव्यरस
काहूरले मन सांजवेळ होता होता हूरहूर लागे जीवा रात गूढ होता क्षितिजास पहुडली कंटाळली वीज डोळ्यातून परतूनी गेली आज नीज तळपता रवी थकलेला संध्याकाळी जळताना दिन सारा साचली काजळी रेखले या काजळास अवनीच्या डोळा सोनसळी आसमंत झाला गं सावळा सावळ्या नभाची चढे चांदव्याला धुंदी दूर दाट सावलीने थरारली फ़ांदी इवल्याशा घरट्यात इवलासा श्वास चोचीतल्या दाण्यालाही कोटराचा ध्यास दूरदूर डोंगराचे शिखरही नीजे काळ्या कागदास नक्षी चांदण्याची सजे काळोखाचा आवाजही किर्रर्र दाटे असा रात्रीवर उमटतो खोल खोल ठसा नटलेली निशा पण मन हे काहूर उदासच वाटे आज पावरीचा सूर खोल अंतरात जसा अडकला स्पंद गळा दाटलेला तरी फ़ुटेना का बांध??

र्निमाल्यातिल दोन फुले--

पुष्कराज ·
लेखनविषय:
काव्यरस
सहज ऐकले बोलत होती र्निमाल्यातिल दोन फुले कालच आपण फुललो होतो कसे विसरले लोक खुळे जाउ दे रे सोडून दे तू काय मनाला घेसी लावून काय आपुले ह्यांचे नाते जिथे सख्यांची नाही आठवण सखे- संगती सोडून दे तू आइ-बापही आडचण होती नीच इतका झाला माणूस स्वार्थास्तव रे शिवतो नाती पाहिलास का व्रुद्धाश्रम तो मालवणारे दिवे इथे प्रकाशवाटा ज्यांनी आखल्या त्या वाटांचा अंत तिथे

चांदण्यातले जेवण

नाना बेरके ·
लेखनविषय:
काव्यरस
अवांतराला ख.फ.मध्ये मानाचे स्थान मिळाले वाटवेगळ्या सदस्याला स्वैंपाकघरात पान मिळाले (तरीही जेवण जात नाही सदस्य जातो अवघडून) अळणी खाणे जमत नाही कुचंबणा होते फार रस्सा इथला गोड वाटतो भाकरही लागते गार गार कसे जमायचे जेवण इथले फार मोठा प्रॉब्लेम झाला चवीने खाण्याच्या लालसेला मर्यादेचा लगाम लागला तोच भात, तोच रस्सा वाटे खावा सगळ्यांबरोबर चांदण्यांमध्ये घ्यावे जेवण द्यावे प्रतिसादाचे ढेकर

ये र बालां

ब्रिटिश ·
लेखनविषय:
काव्यरस
आता तुज्यासाटी बग घोडा घोडा झालू गवत खात खात बग तूज्याकड आलू ऊडी मारुन राजा माज्या पाटीवर बस कती येल नूसतच ऊबं राहु आसं माकरावानी बग आता खाजवीतो कूस फुटू देना आता तूज्या गालावर हस काला काला कावला न पीवली पीवली फुलं तुज्यासाटी नाचतान मोराची पावलं आय तूजी वाट बगी डोलं सूकवून तूच कूट गेला बग आमाला टाकून ये रं बाला कल आली कालजामदूनं बग तरी माज्याकड आभालातूनं बग तरी माज्याकड आभालातूनं

पसाभरं

शैलेन्द्र ·
लेखनविषय:
काव्यरस
शुष्क नभातुन टाहो कातर, खंडीत धरणी भेगा पाचर, पिवळ्या सुकत्या गवतावरती, पुन्हा पाडं रे रिमझीमती सर.. मान झुकवुनी गुरे चालती, हलवीत हुंगित लाळ गाळती, खपाटलेल्या पोटी त्यांच्या, पडेल कैसा दाणा कणभर? भेगांमधुनी ऊसळे अंकुर, परि कोवळे का क्षणभंगुर, आटली विहीर पान्हा तळ्भर, कसे पाजावे तान्हं वावर? सुटता वारा भुरभुर माती, आसवांनी का भिजेल शेती? घाम गाळण्या त्राण राहुदे, इतके तरि दे दान पसाभर..

सहज चाळले..

प्राजु ·
लेखनविषय:
काव्यरस
सहज चाळले आठवणींना जाता जाता क्षणांत सार्‍या भरून आल्या बघता बघता किती राहिले अवती भवती तुझ्या तरीही आतुर मन हे तुझ्याच एका नजरे करता "स्वप्नं नको मज!" ..म्हणून रात्री मी जागवल्या भास तुझे ना कधीच आले मला टाळता जनांत नाही डोळा कधी आणले पाणी मनांस झाल्या कितीक जखमा उठता बसता स्पर्श तुझा तो जपून होता असा ठेवला वादळ उठले उरांत माझ्या तो आठवता डोळ्यांमध्ये दाटुन आली किती आसवे दिले टाळूनी मीही त्यांना हसता हसता अधुन मधुन मी आठवणींच्या गावी जाते मन हे वेडे रुसून बसते मागे फिरता किती पसारा करून जाती आठवणी या धांदल माझी अशीच होते तो आवरता - प्राजु

स्वातंत्र्यदिन (?) चिरायु होवो ......!

विशाल कुलकर्णी ·
लेखनविषय:
काव्यरस
पंधरा ऑगस्टच्या रात्री जेवल्यानंतर शतपावलीसाठी म्हणुन मी व आमचे गृहमंत्री बाहेर पडलो. खारघरच्या शिल्पचौकात एका फुटपाथच्या कडेला झोपलेला दहा-बारा वर्षाचा एक मुलगा दिसला. स्वातंत्रदिनानिमीत्त कुठल्याशा पक्षानं लावलेला कापडी फलक त्याने खाली अंथरला होता, त्याचाच अर्धा भाग अंगावर घेवुन ते लेकरु गाढ झोपलं होतं. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ६० वर्षे उलटुन गेल्यानंतरदेखील जर आपल्या देशात ५०% च्यावर लोकांची ही अवस्था असेल, तर खरोखर आपल्याला स्वातंत्र मिळालं आहे असं म्हणता येइल का?