Skip to main content

करुण

पैंजण...!

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 06/10/2009 या दिवशी प्रकाशित केले.
भीती वाटु लागलेय आजकाल.., माझ्याच पायातल्या पैंजणांची ! सदोदीत पाठलाग करणार्‍या.., त्यांच्या त्या किणकिणाटाची. खुप हौसेने घातलं होतं आईनं..., तिच्या फिकुटलेल्या कृश हातांनी ! वय वाढलं...., समज आली....., पण पैंजणांचा मोह सुटला नाही ! बालपणी ते छमछम वाजवीत मिरवणं..., तारुण्यात आल्यावर त्यांचं... स्पोर्टशुजवरही रुबाब गाजवणं ! त्यांच्या मधुर किणकिणाटानं... मान वळवुन बघणारी धुंद तरुणाई..., आणि मोहरुन जाणारं माझं वेडं मन ! पैंजण अजुनही आहे... पण आता मन मोहरत नाही..., आता थबकत नाहीत नजरादेखील...... राहुन राहुन वळते माझीच नजर...., पायातल्या उदास पैंजणांकडे..., परिस्थितीने त्यांच्यावर... उधळलेल्या उन्म
काव्यरस

भैरवी

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 06/10/2009 या दिवशी प्रकाशित केले.
एक एक पाश तोड, गुंतण्याची वेळ नाही परतीचा प्रवास हा, थांबण्याची वेळ नाही विसर ते हेवेदावे, घाल अपराध पोटी, कोण कसे चुकले हे सांगण्याची वेळ नाही तुझे नसलेले सारे गुन्हे इथे सिद्ध झाले, वेड्या मना, तुझी बाजू मांडण्याची वेळ नाही संकटांनी आयुष्याशी उभे दावे मांडलेले, रात्र ही वै-याची आहे, पेंगण्याची वेळ नाही पैलतीर दिसे आता, आवरून घे सुरांना, भैरवीवाचून काही रंगण्याची वेळ नाही
काव्यरस

पंचाक्षरी आकांत

लेखक शरदिनी यांनी रविवार, 04/10/2009 या दिवशी प्रकाशित केले.
करालदाढा पुलकित पेढा चतुरचर्‍हाटी चंचलमूढा गोष्टगुर्जरी सुष्ट आर्जवी सर्जनदर्जन भजनगुंजनी का सृष्टीच्या भग्नमंथनी तगमग लगबग मूढचिंतनी तिरकस हलकट कृद्धधरित्री गडणी सजणी गडणीसजणी नयनवल्लरी सहजचिल्लरी पुनःपुन्हा ती उडनतश्तरी लखलख चकमक मंददर्शनी कांता करी आकांत आननी शरणमंजिरी विदुरप्रस्तरी धृष्टद्युम्नी चरितविलासी ललाटज्वलिता दारूणपलिता शिशिरवंचना टाहो फुटता पतीशिराला अंकी धारण सती करी ती पतीपरायण ध्वनि अग्नीचे आकांडतांडव मानवरूपी नाचे दानव परंपरेची मर्कटकरणी टाहो कैसा बधीरकर्णी कशाकशाची ऐसी शिकवण कोण करि हे मनात चिंतन
काव्यरस

परागंदा

लेखक मिसळभोक्ता यांनी गुरुवार, 01/10/2009 या दिवशी प्रकाशित केले.
(हे विडंबन नाही. पण प्रेरणा धन्याशेठची.) आज का आलो इथे ? थांबली पत्रे इथून माझ्या नावावर येणारी. पत्ता बदलवला तरी "फॉरवर्डींग इज नॉट डन टू अ‍ॅड्रेसेस बियाँड इंडिया" पोस्ट ऑफिसाने सांगितले वाटले होते, घर स्वच्छ केले, सगळे सामान 'शिप' केले. पण, अरेच्चा!
काव्यरस

काहीतरी राहिले आहे इथे

लेखक धनंजय यांनी गुरुवार, 01/10/2009 या दिवशी प्रकाशित केले.
काहीतरी राहिले आहे इथे
असाच आलोय इथवर. येताएत अजून माझी पत्रे या पत्त्यावर...? हो, काही मिळाली वरचा पत्ता बदलून पोस्टात परतवलेली... पण राहिले होते कपाटात, मला वाटते, माझे काही कपडे. नाही मागवलेत फोनवरून, म्हटले - मीच येऊन शोधावेत. नाहीत सापडले. अरेच्चा! आहे की बोचके इथे बांधूनही ठेवले.
.
ती आतली खोली माझ्या आठवणीतली तशी नाही राहिली... हो, दिवाणखाना आहे तसाच...
काव्यरस

रान

लेखक क्रान्ति यांनी शुक्रवार, 25/09/2009 या दिवशी प्रकाशित केले.
ज्याच्या सावलीचा धरावा विश्वास विषवल्ली कवटाळे त्या वृक्षास जळला मोहर, झडली पालवी, दिसे रिता, पर्णहीन तो भकास विषवल्ली तरारली, फोफावली, वाढत चालली; वेढत चालली घनदाट गर्द हिरव्या रानाला, एकेका वृक्षाची गिळत सावली रान कुठे आता? उद्ध्वस्त स्मशान घोंघावतो वारा एकटा बेभान उघडे-बोडके निष्पर्ण सांगाडे फांदीफांदीवर भुतांचे थैमान क्षणात अवघे चित्र पालटेल वठल्या वृक्षाला धुमारा फुटेल मिटतील विध्वंसाच्या खाणाखुणा, पुन्हा रानात या गारवा दाटेल मन रान, विषवल्ली अहंभाव वेड्या, कर तिचा वेळीच पाडाव जाळ तिची बीजं, तोड तिच्या फांद्या, आणि जिंकून घे आयुष्याचा डाव
काव्यरस

(घजळ )

लेखक चेतन यांनी सोमवार, 07/09/2009 या दिवशी प्रकाशित केले.
यशोधरांची सुंदर गझल http://misalpav.com/node/9264 वाचून मला ही लिहावसं वाटलं :& ~X( ~X( ~X( असे चोंदले, राहिला श्वास नाही घसे शेकले, थांबला त्रास नाही उरी कोंडला, पूर बेभान सारा असो भेसुरा! कोरडा खास नाही मला धाप लागे, उरी दाटल्याने कुणा हाक देईन, आवाज नाही किती क्षोभ नाकातुनी शेंबडाचा मिळाली सर्दी साथ, आराम नाही जसे होतसे प्राण नाकात गोळा जरी पाहिजे, मोकळा श्वास नाही किती झीट झाले, तरी पार नाही उतारे ठरे फोल ईलाज नाही चेतन अवांतर: कधीपासुन ही सर्दी काही पाठ सोडत नाही आहे.
काव्यरस

आकाशवाणी

लेखक सुबक ठेंगणी यांनी शनिवार, 05/09/2009 या दिवशी प्रकाशित केले.
अवलियाची 'जखम' आणि मग ब्रिटिशची 'दगड' वाचून जे सुचलं ते. ह्या कवितेचा रस खरं "गंभीर" आहे असं मला वाटतं.पण तसा ऑप्शनच नव्हता! इथे मला देव म्हणजे (असेलच तर) खरा खरा देव असं अभिप्रेत आहे. मिपावरील सभासद नाही.
काव्यरस

बाबासाहेब ते भैय्यालाल...

लेखक हृषीकेश पतकी यांनी शुक्रवार, 04/09/2009 या दिवशी प्रकाशित केले.
खालील कविता दि. ४-१२-२००६ रोजी केली आहे... या कवितेतील काही जातीवाचक शब्द कुणाच्याही भावना दु़खावण्याच्या हेतूने वापरले नाहीयेत... महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात नैतिक मूल्यांची होळी होत असताना... मीही तुमच्यासारखाच निद्रिस्त... तेव्हा तुमच्या आमच्यातल्याच चार जीवांना समाज दूर सारत होता | आणि रिकामं डोकं नसलेला प्राणी म्हणून आपली ओळख जपणारा...
काव्यरस