मंडळी आजही आम्ही बुधवार सत्कारणी लावण्यासाठी आलो. पण ४ दिवसाच्या सक्तिच्या उपासामुळे आमची अवस्था काहीशी अशी झाली आहे. सांगा आता काय करायचे?
लेखन विपुल आहे, पण पेच हाच आहे
हातात लेखणीही, पण दौत आत आहे
येईल कुठून उर्मी,जर बार ड्राय आहे
आरक्त वारुणीही, फक्त दोन पेग राहे
मध्येच येई पोलिस, बाजार बंद होतो
राजास सामिषाच्या, मोताद होई अंडे
जाई फिरुन तेथे,पण निराळेच थेर
मुजर्यास नेहमीच्या,आचारबंदी आहे
उत्साहपूर्ण बुधवार, येई पुन्हा पुन्हा का?
आजच करा हवे ते, उद्या गुरुवार आहे