[प्यावेसे वाटते]
क्रांतीतैची माफि मागून- ह्या काव्याचे हे एक स्वैर विडंबन-
आज मला सगळे ते हवे-हवेसे वाटते
कासवालाही जलद जाणे हवेसे वाटते
रिचवले पेले फुल्ल भरुन हे असले एव्हढाले
अग बाई, हे काय, हे तर आजच आले वाटते?
खोटंच हसत म्हणालो, "धुंदीत मजा असते"
पण मीच घेते, का तुला घेणे नकोसे वाटते?
सावली माझी म्हणे, "आराम थोडा दे मला,
सारखे झिंगणे तुझ्या सारखे नकोसे वाटते!"
आण काही तू नवे आता, बाटल्या नको त्या जुन्या
तेच-तेच शेंगदाणे नि मांचोरीयन नकोसे वाटते
थंडीत घेतात का ती ब्रॅंडी भरपुर व सारखी?
औषध जरी असले तरी एकटे पिणे नकोसे वाटते!
काव्यरस
मिसळपाव