मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

करुण

रातराणी

निरन्जन वहालेकर ·
लेखनविषय:
काव्यरस
रातराणी सूर्य अस्ताला गेल्यावर, अंधाराच्या साम्राज्यात, प्राणिमात्र विसावतात आपापल्या खुराड्यात ! राऊळे होतात रीती, अस्तित्व नाकारुन परमेशाचे. तुझ्या लालदिव्याच्या माडीचा आसमंत मात्र उजळतो लख्ख, अन रस्ते ओसंडून वाहू लागतात

मैत्री

गुपचुप ·
लेखनविषय:
काव्यरस
मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय... गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस सोय म्हणून सहज असं तोडू नकोस.. रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस.. आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं.. तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस.. मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा दिलं घेतलं सरेल तेव्हा..

पंख

sur_nair ·
लेखनविषय:
काव्यरस
पंख
उडता उडता एकदा एक राघू झाडाच्या एका फांदीवर येऊन बसतो हिरवट पिवळ्या पिकल्या पेरूला आपल्या लालबुंद चोचीने कोरु लागतो तोच एक आवाज येतो, "सावध सावध लबाड काळ्या बोक्यापासून जरा जपून रहा" राघू पाहतो , अंगणातल्या पिंजऱ्यात पोपट दिसतो म्हणतो "धन्यवाद मित्रा, आहेस तू कसा " पोपट म्हणतो "एकदम झकास, ताज्या हिरव्या मिरच्या, पेरूच्या गोड फोडी, पिंजऱ्यातला या आयुष्याची तुला काय म्ह

जाते म्हणतेस...................

मंगेशपावसकर ·
लेखनविषय:
काव्यरस
जाते म्हणतेस................... जाते म्हणतेस हरकत नाही ढाळतो मी अश्रू एकदा तरी पाहून जा नाते तोडतेस हरकत नाही मनी आज फक्त एकदा तरी राहून जा भातुकली मोडतेस हरकत नाही पुन्हा आज फक्त एकदा डाव मांडून जा हसते आहेस हरकत नाही माझी बुडती नाव पाहून जा जाळत आहेस हरकत नाही जळणारे माझे गाव पाहून जा छळत आहेस हरकत नाही माझे छीन-विच्छिन शरीर पाहून जा ................ मंगेश पावसकर mgccmangeshpaw@gmail.com

प्रेमबन

वर्षा म्हसकर-नायर ·
लेखनविषय:
काव्यरस
कळीचे उमलणे, बहरणे तीच्या हाती नव्हते प्रेमबनातील तीचे आस्तित्वच तीच्या हाती नव्हते. भ्रमराने यावे, प्रेम बरसुन जावे, तीला उमलावे, तीने झंकारुन जावे भ्रमराचे हे येणे , तीला उमलवणे तीच्या हाती नव्हते, प्रेमबनातील तीचे आस्तित्वच तीच्या हाती नव्हते. भ्रमराने मग तीला सोडुन जावे तीला दु:खात बुडवुन टाकावे भ्रमराचे हे सोडुन जाणे, तीला कोमेजवणे तीच्या हाती नव्हते. प्रेमबनातील तीचे आस्तित्वच तीच्या हाती नव्हते. पुन्हा नविन भ्रमराचे येणे, पुन्हा प्रेमात डुंबणे पुन्हा खंगणे आणि पुन्हा कोमेजणे सारे कसे क्रमाने, नियमाने घडत होते जरी ते घडणे तीच्या हाती नव्हते प्रेमबनातील तीचे आस्तित्वच तीच्या हाती

आता पुन्हा बॉम्बस्फोट होणार...

कुल ·
लेखनविषय:
काव्यरस
आता पुन्हा बॉम्बस्फोट होणार... आमची प्रेरणा - संदीप खरे यांची 'आता पुन्हा पाउस येणार' ही कविता आता पुन्हा बॉम्बस्फोट होणार , घरादाराच्या चिंधड्या होणार, सरकार किती परदेशी गेले ते शोधणार, रिक्षावाले गेले याचा विसर पडलेला असणार , अमेरिका संध्याकाळी निषेध करणार , सकाळीच त्यांनी 'पाक' ला शस्त्रे विकलेली असणार , इकडे पाटील कपडे बदलणार, देशमुख चित्रपट काढणार , 'बाबा' रात्रभर पार्टीत नाचणार, बाहेर जोड्यांसाठी मंत्री उभे असणार , पद्मभूषण मात्र शाहरुख च ठरणार , काय रे देवा ! आता पुन्हा दुष्काळ पडणार, विदर्भ मराठवाडा होरपळून निघणार, आबा रडायला लागणार, शिंदे हसतच राहणार , चव्हाण-ठाकरे दिल्लीला जाऊन नि

कसा दिस आला.....{verry sad material}

मंगेशपावसकर ·
लेखनविषय:
काव्यरस
कसा दिस आला............... कसा दिस आला असा माझ्या या नशिबाचा प्रीतीनेच अंत केला माझ्या या प्रेमाचा आता माझे जीवन हे विषण्ण विराण हे मनामध्ये सुडाचे जागले थैमान हे कुणाला हे सांगू आणि समजाऊ कोणाला प्रीतीनेच अंत केला .......... कसा दिस आला .............. तेव्हा तुझे स्मित हास्य नवखे नवीन से डोळे दोन्ही माझ्यावर नाव ते मनी असे कसे तोडीत गेली तू माझ्या या मनाला प्रीतीनेच अंत केला .............. कसा दिस आला ............... आता मी न जागतो न संपते हि रात्र हि पुन्हा पुन्हा स्वप्नीची माया मनी येत जाई आता प्रेम मन कधी करेना कुणाला प्रीतीनेच अंत केला.......... कसा दिस आला............. दु

(जगताना)

राजेश घासकडवी ·
लेखनविषय:
काव्यरस
जगताना... शर्ट म्हणून जगताना खूप खोचावं लागतं स्वत:च्या फाटक्या बनियनला नीट झाकावं लागतं ताठ कॉलरनं जगताना घामाने भिजावं लागतं आणि इस्त्रीच्या वाफेखाली स्वतःला झोकाव॑ लागत॑ वॉशिंग मशिनच्या गोलात खूप घुमावं लागतं ड्रायरच्या गरम जाळात वाळवून घ्यावं लागतं चिखलाचा सामना करताना पांढरेपण जपावं लागतं चुरगळण्याच्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं टर टर फाटताना थोडं तुटावं लागतं कपाटातल्या घडीसाठी खूप वेळ पळावं लागतं

कडकलक्ष्मी

क्रान्ति ·
लेखनविषय:
काव्यरस
ढोलकी गळ्यात नि डोक्यावर देव्हारा आधार नसुनही सावरते डोलारा विटलेले हिरवे लुगडे, मळवट भाळी, अंगात खणाची ठिगळांची काचोळी काखेत पिरपिरे एक, एक धरि हाती, अन् अंश आणखी एक उपाशी पोटी सावळ्या मुखावर गर्भतेज सुकलेले, ओढीत चालते माय पाय थकलेले पदपथी सावली हेरुन बसली खाली, टेकले देव, पोरांना खाऊ घाली तो तिचा सोबती, राकट, कभिन्न काळा हळदीचा मळवट, टिळा तांबडा भाळा कमरेस झोळणा चिंध्यांचा कसलेला, केसांचा बुचडा मानेवर रुळलेला चाबूक वाजवी, गळा कवडिची माळ, अनवाणी पायी छमछमणारे चाळ दगडांचा मांडुन खेळ चिमुरडी रमली, लक्ष्मीच्या हाती तशी ढोलकी घुमली हातीचा चाबुक पुजुन सज्ज तो झाला, घातले साकडे, कौल लावि देवाला हा

बाबरीचे श्राद्ध

शरद जयकर ·
लेखनविषय:
काव्यरस
आता राम लल्लालाच करायला हवे बाबरीपरी मशिदींच रक्षण अन रसूल अल्लालाच धावायला हवंय मंदिर जन्मभूमी वाचवायला ..... स्वत:च्याच अस्तित्वासाठी ... तथाकथित धार्मिकांचे चोचले जोपासण्यासाठी स्वत:चे सत्व जपण्यासाठी अन टिकविण्याकरितासुद्धा..... खूनखराबा, जाळपोळ, विध्वंस करणा-यांना जातपात नसते, धर्म तर नसतोच नसतो... असते ती फक्त एक जीवघेणी नशा... धगधगत्या ज्वाळांची...लाल भडक रक्ताची ...आर्त किंकाळ्याची वेदनेने तडफडणा-या अश्राप हुंदक्यांची... तर बा रामलल्ला परमेश्वरा अन रसूललल्ला परवरदिगारा कान, डोळे, तोंड बंद करून महात्म्यासारखा स्थितप्रज्ञ बसला असशील तर जरा माणसात ये. थांबव या हिंस्र पशूंना...