सहज चाळले आठवणींना जाता जाता
क्षणांत सार्या भरून आल्या बघता बघता
किती राहिले अवती भवती तुझ्या तरीही
आतुर मन हे तुझ्याच एका नजरे करता
"स्वप्नं नको मज!" ..म्हणून रात्री मी जागवल्या
भास तुझे ना कधीच आले मला टाळता
जनांत नाही डोळा कधी आणले पाणी
मनांस झाल्या कितीक जखमा उठता बसता
स्पर्श तुझा तो जपून होता असा ठेवला
वादळ उठले उरांत माझ्या तो आठवता
डोळ्यांमध्ये दाटुन आली किती आसवे
दिले टाळूनी मीही त्यांना हसता हसता
अधुन मधुन मी आठवणींच्या गावी जाते
मन हे वेडे रुसून बसते मागे फिरता
किती पसारा करून जाती आठवणी या
धांदल माझी अशीच होते तो आवरता
- प्राजु
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5541
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
किती
+१
In reply to किती by मदनबाण
छान कविता
In reply to +१ by दिपाली पाटिल
+३
In reply to छान कविता by चकली
सुंदर
खुप सुंदर...
अप्रतिम !
खूप सुंदर!
वाव्वा!
आवडली.
सु...रे...ख !
अ-प्र-ति-म
सहज "चळले"
सुंदर...
छान
खास
मस्त!
प्राजुताई,
अल्टी !!!!!!!!!!!
सुरेख!
जनांत नाही
व्वा! खूप
सुंदरच कविता...
In reply to व्वा! खूप by अनामिक
मलाही! प्रा
In reply to सुंदरच कविता... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खूप सुंदर
आवडली
छान
मस्त
बरोबर ..
In reply to मस्त by प्रशांत उदय मनोहर
सर्वांचे
"स्वप्नं