मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अश्रू

शरदिनी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
माझ्या लग्नाच विचार कदाचित त्यांच्या मनात घोळत असेल म्हणून त्यांनी त्याला बोलावलंय गप्पा मारायला आमच्याकडे गप्पा अशाच गमतीच्या धंद्यात काही पुढेमागे होतंय मिशा पिळत बोलायचं नफा तोटा चालायचाच. उमराव, सरदार घराणी कशी संपत चाललीएत आणि ते तेज उरलेलं नाहीये थोडंसुद्धा- असलं काहीबाही होणार अजून काही गप्पा मग मुख्य मुद्द्यावर त्यांची काळजी अजीजी आणि क्वचित वादावादी मग चहात बुडालेल्या मिशा वाळवत अंगणात बसायचं सार्‍यांनी निर्णयाच्या प्रतीक्षेत चेहरा आक्रसून अणि मी त्या वसंतातल्या चमकदार दिवशीसुद्धा खिडकीत बसून माझ्या निस्तेज शरीराला फुटलेल्या त्या निर्जीव पायाकडे पाहत अश्रू ढाळायचे -------------------------- मूळ कविता : ( रशियन कवयित्री) अलेक्झांड्रा कोलोन्तोइ फार पूर्वी ऐकलेल्या एका इंग्रजी कवितेचा स्वैर अनुवाद ३१ ऑगस्ट २००९, पुणे

वाचने 3842 वाचनखूण प्रतिक्रिया 11

नितिन थत्ते 31/08/2009 - 21:52
मला मूळ कविता सावनकुमार टाक यांची असावी असे वाटले होते. (आठवा: शायद मेरी शादीका खयाल...) :) ह. घ्या. असो. जोक्स अपार्ट; कविता छान आहे. नितिन थत्ते (पूर्वीचा खराटा)

In reply to by नितिन थत्ते

सुबक ठेंगणी 01/09/2009 - 17:53
मूळ परदेशी आहे असं कुठेही वाटलं नाही एवढं सही जमलंय! (बघा नां...'शायद मेरी शादी का खयाल' च आठवलं. तसं म्हटलं तर दु:खाला भाषा, देश, संस्कृती ह्यांची बंधनं असतात कुठे?

शरदिनी, कविता आवडलीच. यावेळी समजेल अशी वाटली (अर्थात मला समजलेला अर्थ बरोबर आहे का हे माहित नाही). शेवटच्या कडव्या पर्यंत कळत नव्हते की कशाबद्दल आहे ही कविता. पण शेवटचे कडवे हलवून गेले. अनंत काळापासून मुलींचे मनोगत असावे असे वाटून गेले पटकन, शहारलो.... ग्रेट!!! बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

शरदिनी ताईची कविता म्हणुन खु उत्साहाने वाचली कविता कळत आहे असे उगाचच वाटते... बिका तुम्हाला शेवटच्या कडव्या बद्दल काय वाटले ते सांगता का???रसग्रहण टाका ना. निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

चतुरंग 01/09/2009 - 04:54
सुंदर कविता. आधीच्या कडव्यांमधून लोकांच्या बडा घर पोकळ वासा ह्याचा उल्लेख येत असतानाच कविता नक्की कशा शेवटाकडे नेते आहे हे समजत नाही आणि एकदम शेवटच्या कडव्यातल्या कलाटणीने सुरी फिरली! एकीकडे समाजाचे मानसिक अपंगत्व आणी एकीकडे हिचे शारीरिक लुळेपण! दुखलं मनात. चतुरंग

विजुभाऊ 01/09/2009 - 09:38
अरे बापरे शरदिनीतैंची कविता प्रथमच पटक्कन कळाली. मला वाटले की माझेच काहितरी चुकतय पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

अनिल हटेला 01/09/2009 - 17:13
शरदिनी ताईची कविता म्हणजे अर्थातच वाचली.. कळाली नाही असं वाटतये... कुणी तरी रसग्रहण टाका राव...:-( बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)

ऋषिकेश 01/09/2009 - 22:30
कविता आवडली. ऋषिकेश ------------------ रात्रीचे १० वाजून २७ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "अजूनी चालतोच वाट...."