Skip to main content

र्निमाल्यातिल दोन फुले--

लेखक पुष्कराज यांनी बुधवार, 26/08/2009 16:28 या दिवशी प्रकाशित केले.
सहज ऐकले बोलत होती र्निमाल्यातिल दोन फुले कालच आपण फुललो होतो कसे विसरले लोक खुळे जाउ दे रे सोडून दे तू काय मनाला घेसी लावून काय आपुले ह्यांचे नाते जिथे सख्यांची नाही आठवण सखे- संगती सोडून दे तू आइ-बापही आडचण होती नीच इतका झाला माणूस स्वार्थास्तव रे शिवतो नाती पाहिलास का व्रुद्धाश्रम तो मालवणारे दिवे इथे प्रकाशवाटा ज्यांनी आखल्या त्या वाटांचा अंत तिथे
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2503
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

Chhan .... Sundar

मस्त! कविता वास्तववादी आहे. माझे जीवनगाणे,व्यथा असो आनंद असू दे...... गात पुढे मज जाणे

छान कविता. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

पाहिलास का व्रुद्धाश्रम तो मालवणारे दिवे इथे प्रकाशवाटा ज्यांनी आखल्या त्या वाटांचा अंत तिथे कमालीची वास्तवदर्शी कविता! क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी

प्रकाशवाटा ज्यांनी आखल्या त्या वाटांचा अंत तिथे खूपच सुंदर!! खूप आवडली कविता. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

कविता मस्तच आहे. मला आवडली. लिहा अजून. बिपिन कार्यकर्ते

पाहिलास का व्रुद्धाश्रम तो मालवणारे दिवे इथे प्रकाशवाटा ज्यांनी आखल्या त्या वाटांचा अंत तिथे सुरेख !

खूप खूप सुरेख आहे कविता.. शेवट तर केवळ अप्रतिम !! आपला हृषी !!

खूप खूप सुरेख आहे कविता.. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

कविततेतील निर्माल्य आणि आई-वडील, नातेवाईक यांचा संदर्भ जरा समजावुन सांगा, पहिल्या कडव्याचा बाकीच्या कडव्यांशी संबंध आहे असे वाटत नाही. माझ्या अल्पमतीप्रमाणे : निर्माल्य आणि कचरा यात मुलभुत फरक आहे. देव्हार्‍यात केरसुणी कोणी चालवित नाही आणि देवाला वाहिलेल्या फुलांचे निर्माल्य होते. निर्माल्य वाहत्या पाण्यात सोडुन दिले जाते किंवा मातीत जिरवुन उत्तम खत तयार केले जाते, पण पायाखाली तुडवले जात नाही. झाडावर राहिली म्हणुन फुले चिरायु होत नाहीत, दुसर्‍या दीवशी ती कोमेजतातच!! हा निसर्ग नियम आहे. फुले कोमेजतात, म्हणुन देवाला ताजी फुले वाहिली जातात. त्यामुळे फुलांना वाईट वाटण्याचे कारण काय? पाहिलास का व्रुद्धाश्रम तो, मालवणारे दिवे इथे प्रकाशवाटा ज्यांनी आखल्या, त्या वाटांचा अंत तिथे ह्याच्याशी सहमत, निव्वळ परस्परातील हेवेदावे आणि सो कॉल्ड पुढारलेपणा जोपासण्यासाठी हा अत्यंत जीवघेणा प्रकार ज्यांच्या कडुन केला जातो त्यांना भर चौकात नागवं करुन चाबकाने फोडले पाहीजे.

प्रकाशवाटा ज्यांनी आखल्या त्या वाटांचा अंत तिथे मस्तच