माझ्या लग्नाच विचार कदाचित
त्यांच्या मनात घोळत असेल
म्हणून त्यांनी त्याला बोलावलंय
गप्पा मारायला आमच्याकडे
गप्पा अशाच गमतीच्या
धंद्यात काही पुढेमागे होतंय
मिशा पिळत बोलायचं
नफा तोटा चालायचाच.
उमराव, सरदार घराणी
कशी संपत चाललीएत
आणि ते तेज उरलेलं नाहीये
थोडंसुद्धा- असलं काहीबाही
होणार अजून काही गप्पा
मग मुख्य मुद्द्यावर
त्यांची काळजी अजीजी
आणि क्वचित वादावादी
मग चहात बुडालेल्या मिशा
वाळवत अंगणात बसायचं
सार्यांनी निर्णयाच्या प्रतीक्षेत
चेहरा आक्रसून
अणि मी त्या वसंतातल्या चमकदार दिवशीसुद्धा
खिडकीत बसून माझ्या निस्तेज शरीराला
फुटलेल्या त्या निर्जीव पायाकडे
पाहत अश्रू ढाळायचे
-------------------------- मूळ कविता : ( रशियन कवयित्री) अलेक्झांड्रा कोलोन्तोइ
फार पूर्वी ऐकलेल्या एका इंग्रजी कवितेचा स्वैर अनुवाद
३१ ऑगस्ट २००९, पुणे
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचन संख्या
3843
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
मला मूळ
अगदी हेच म्हणते!
In reply to मला मूळ by नितिन थत्ते
आवडली...
शरदिनी
In reply to आवडली... by बिपिन कार्यकर्ते
अश्रू..!
In reply to आवडली... by बिपिन कार्यकर्ते
वा!
अरे बापरे
कळली की नाही?
कविता ठिक वाटली
शरदिनी
कविता आवडली