Skip to main content

मन काहूर...

मन काहूर...

लेखक प्राजु
Published on बुधवार, 26/08/2009 प्रकाशित मुखपृष्ठ
काहूरले मन सांजवेळ होता होता हूरहूर लागे जीवा रात गूढ होता क्षितिजास पहुडली कंटाळली वीज डोळ्यातून परतूनी गेली आज नीज तळपता रवी थकलेला संध्याकाळी जळताना दिन सारा साचली काजळी रेखले या काजळास अवनीच्या डोळा सोनसळी आसमंत झाला गं सावळा सावळ्या नभाची चढे चांदव्याला धुंदी दूर दाट सावलीने थरारली फ़ांदी इवल्याशा घरट्यात इवलासा श्वास चोचीतल्या दाण्यालाही कोटराचा ध्यास दूरदूर डोंगराचे शिखरही नीजे काळ्या कागदास नक्षी चांदण्याची सजे काळोखाचा आवाजही किर्रर्र दाटे असा रात्रीवर उमटतो खोल खोल ठसा नटलेली निशा पण मन हे काहूर उदासच वाटे आज पावरीचा सूर खोल अंतरात जसा अडकला स्पंद गळा दाटलेला तरी फ़ुटेना का बांध?? - प्राजु
काव्यरस
लेखनविषय:

याद्या 4626
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

नटलेली निशा पण मन हे काहूर उदासच वाटे आज पावरीचा सूर खोल अंतरात जसा अडकला स्पंद गळा दाटलेला तरी फ़ुटेना का बांध??
+१ मस्त :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by अवलिया

मस्त... :) मदनबाण..... Stride 2009 :--- http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html

In reply to by मदनबाण

+३ जबरदस्त!! -अनामिक

In reply to by अनामिक

+४ बेफाट!! खुप आवडली...

In reply to by गोगट्यांचा समीर

छान कविता.. दिपाली :)

In reply to by दिपाली पाटिल

मस्त... काळ्याकादवरची चांदण्याची नक्षीची कल्पना भावली.. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

...इवल्याशा घरट्यात इवलासा श्वास चोचीतल्या दाण्यालाही कोटराचा ध्यास या सरर्वाधिक आवडलेल्या ओळि. आपलाच, मनोबा

निशा, काहुर मन यांचा मेळ उत्तम आहे. मीनल.

"नटलेली निशा पण मन हे काहूर उदासच वाटे आज पावरीचा सूर खोल अंतरात जसा अडकला स्पंद गळा दाटलेला तरी फ़ुटेना का बांध??" वा.. सुंदर..

आवडलीच... "क्षितिजास पहुडली कंटाळली वीज" ... मस्त. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

मस्त कल्पना आहे! :) अतिशय चित्रदर्शी कविता आवडली. (प्राजू, तुझ्या पूर्वीच्या काही कवितातल्या प्रतिमांचा तोचतोचपणा जाऊन कविता आता एका वेगळ्या उंचीवर जाऊ लागली आहे असे वाटते.) चतुरंग

एक चांगली कविता वाचल्याचा आनंद मिळाला. शेवटचे कडवे जास्त आवडले. रेवती

In reply to by रेवती

एक चांगली कविता वाचल्याचा आनंद मिळाला.
असंच म्हणते. खूप छान कविता. पहिलं आणि शेवटचं कडवं खूप आवडले. --शाल्मली.

सुरेख, चित्रदर्शी कविता
रेखले या काजळास अवनीच्या डोळा सोनसळी आसमंत झाला गं सावळा
- क्या बात है! शेवटचे कडवेही अप्रतिम.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी


मलाही शेवटचे कडवेच भावले... लिखते रहो...

सुरेख कविता

अप्रतिम झालीय कविता...... जास्त बोलायला शब्दच नाहीत.. :)

प्राजुताईंची मला आजपर्यंतची सर्वाधिक आवडलेली कविता. क्षितिजास पहुडली कंटाळली वीज जळताना दिन सारा साचली काजळी सोनसळी आसमंत झाला गं सावळा दूर दाट सावलीने थरारली फ़ांदी काळ्या कागदास नक्षी चांदण्याची सजे गळा दाटलेला तरी फ़ुटेना का बांध?? अगदी मनाला भिडणार्‍या ओळी. "Great Power Comes With Great Responsibilities"

वा ! कविता आवडली. क्षितिजास पहुडली कंटाळली वीज रेखले या काजळास अवनीच्या डोळा काळ्या कागदास नक्षी चांदण्याची सजे या कल्पना फार छान वाटल्या. चोचीतल्या दाण्यालाही कोटराचा ध्यास हे तितकेसे आवडले नाही. चेतनगुणोक्ती जरा जास्तच होते आहे असे वाटले :) आणि ते तर्काला धरूनही वाटले नाही. असो. -- लिखाळ. चालतं एकवेळ चालते पण चाल मात्र चालत नाही ;)

तळपता रवी थकलेला संध्याकाळी जळताना दिन सारा साचली काजळी रेखले या काजळास अवनीच्या डोळा सोनसळी आसमंत झाला गं सावळा . . हे कडवं तर फार आवडलं

नटलेली निशा पण मन हे काहूर उदासच वाटे आज पावरीचा सूर खोल अंतरात जसा अडकला स्पंद गळा दाटलेला तरी फ़ुटेना का बांध?? ------ मस्त !!!